, ,

दोघांत तिसरा...

May 30, 2008 Leave a Comment

तुमच्यापैकी अनेक जणांचे जी-मेलवर अकाऊंट असेलच? असेल म्हणून काय विचारता, एक सोडून चार-चार अकाऊंट्स आहेत, असे उत्तर देणारे अनेक जण सापडतील. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या गुगल मेल अर्थात जी-मेलने बहुविध सुविधा देऊन त्याचा वापर करणाऱ्यांना आपलेसे केले. त्यामुळेच अनेक जणांनी जी-मेल वर दोन-दोन, तीन-तीन अकाऊंट्स ओपन केले आहेत. एक पर्सनल अकाऊंट, एक अॉफिशियल करस्पॉडन्ससाठी आणि एक फक्त फॉरवर्ड््ससाठी - प्रत्येकाची कारणे वेगळी आहेत. असो. आता तुम्ही विचाराल, हे आम्हाला सांगायची काय गरज? त्याचे मुख्य कारण म्हणजे, कोणत्याही ब्राऊजरमध्ये एकावेळी एकच अकाऊंट अॅक्सेस करता येत. दुसऱ्या अकाऊंटमध्ये लॉग-इन व्हायचे असेल तर पहिल्यातून लॉग-आऊट व्हावे लागते किंवा दोन अकाऊंट्स दोन वेगवेगळ्या ब्राऊजर्समध्ये (म्हणजे एक इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये आणि एक फायरफॉक्समध्ये) ओपन करावे लागतात.
पण यावर एक उत्तम पर्याय आहे...


हा पर्याय केवळ मोझिला फायरफॉक्स हे ब्राऊजर वापरणाऱ्यांकरिताच आहे. ज्यांच्याकडे फायरफॉक्स नसेल त्यांनी येथून डाऊनलोड करावे.


फायरफॉक्ससाठी ‘जी-मेल मॅनेजर’ (येथून डाऊनलोड करा) नावाचे एक ‘एक्स्टेंशन’ येते. ते डाऊनलोड करा किंवा दिलेल्या लिंकवरून थेट इन्स्टॉल करा. हे इन्स्टॉल झाल्यानंतर फायरफॉक्स एकदा रिस्टार्ट करावे लागते. रिस्टार्ट केल्यानंतर टूल्स अॅड-अॉन्स येथे जावे. त्यात तुम्हाला जी-मेल मॅनेजर असे एक्स्टेंशन दिसेल. हेच एक्स्टेन्शन ब्राऊजरच्या तळात उजव्या कोपऱ्यातही दिसेल. त्यावर राईट-क्लिक केल्यास प्रेफरन्सेस असा अॉप्शन येईल. त्यावर क्लिक करून तुमच्या जी-मेल अकाऊंट्सची माहिती भरा आणि ओके म्हणा. आता तुम्ही कितीही जी-मेल अकाऊंट यातून अॅक्सेस करू शकता!

(फायरफॉक्समध्ये इंटरनेटएक्स्प्लोरर टॅब असेही एक एक्स्टेंशन उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. इन्स्टॉल करण्यासाठी वर सांगितलेली पद्धत वापरा. ब्राऊजर रिस्टार्ट केल्यानंतर तळात उजव्या कोपऱ्यात तुम्हाला इंटरनेट एक्स्प्लोररचे ई असे चिन्ह दिसेल. दुसरा टॅब ओपन करून त्या चिन्हावर क्लिक केल्यास तो टॅब इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये कन्व्हर्ट होईल. आता तुम्ही एका फायरफॉक्स टॅबमध्ये एक अकाऊंट आणि दुसऱ्या इंटरनेट एक्स्प्लोरर टॅबमध्ये दुसरे जी-मेल अकाऊंट ओपन करू शकता. पण यात केवळ दोनच अकाऊंट ओपन करता येत असल्याने जी-मेल मॅनेजरचा पर्याय सर्वांत चांगला आहे.)

टेकसॅव्ही लोकांसाठी आणखी एक पर्यायः कुकीपाय १.१.० (अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा)

Related Posts :



3 comments »

  • Silence said:  

    छान माहिती पुरवलीत! धन्यवाद.

  • Amit Tekale said:  

    Thanks Silence. Keep Readin...

  • देवदत्त said:  

    मस्त माहिती....
    गूगलच्या वापरासंबंधी चांगली माहिती मिळाली.
    धन्यवाद :)