Showing posts with label Macintosh. Show all posts
Showing posts with label Macintosh. Show all posts
,

िवझो ः एक स्पेशल पर्पज ब्राऊजर

June 17, 2009 0 comments

सर्वसामान्य इंटरनेट युजरला इंटरनेट एक्स्प्लोअररपलीकडे कुठले ब्राऊजर असते, याची कल्पनाच नसते. e असं लिहिलेल्या आयकॉनवर क्लिक केलं की इंटरनेट सुरू होतं, अशी अनेकांची समजूत असते. पण या ब्राऊजरच्या विश्वात प्रचंड मारामारी सुरू असते, याची कल्पना तुम्हाला असेलंच. या ब्राऊजरचा प्रवास मात्र अतिशय रंजक आहे. आज इंटरनेट एक्प्लोअरर पाठोपाठ फायरफॉक्स, सफारी, अॉपेरा, क्रोमसारखे ब्राऊजर्सही वापरले जातात. पण यापुढे जाऊन केवळ सोशल नेटवर्किंगसाठी तयार केलेले फ्लॉकसारखे ब्राऊजर्सही ठराविक लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. आज आपण अशाच एका ‘स्पेशल पर्पज ब्राऊजर’ची माहिती घेणार आहोत.

ब्रिटनमधील 'रॅडिकल सॉफ्ट' या कंपनीने मोझिला फायरफॉक्सचाच आधार घेत 'विझो' हे स्पेशल पर्पज ब्राऊजर विकसित केले. हळू-हळू विकसित होत या ब्राऊजरचे अॅडव्हान्स्ड व्हर्जन (विझो ३) आता उपलब्ध झाले आहे. या ब्राऊजरमध्ये असणारी सर्व वैशिष्ट्ये फायरफॉक्समध्ये आहेतच; असं प्रथमदर्शनी तुम्हाला वाटू शकतं. एका अर्थाने ते खरंही आहे; पण या ब्राऊजरची उद्दिष्टं वेगळी आहेत. फास्टर डाऊनलोड्स आणि स्मार्टर ब्राऊजिंगसाठी तयार केलेले ब्राऊजर, अशी विझोची प्रतिमा तयार करण्यात आली आहे.



एखादी फाईल डाऊनलोड करताना मूळ सर्व्हरशी मल्टिपल कनेक्शन्स एस्टॅब्लिश करून विझो डाऊनलोडचा स्पीड १० पटीने वाढवते. यामुळे डाऊनलोडिंगमध्ये जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. या ब्राऊजरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इनबिल्ट टोरेंट डाऊनलोडर. (साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांनी ‘टोरेन्ट्स’ या विषयावर लिहिण्याची मागणी केली होती; पण या विषयावर लिहिणे अजून झाले नाही. याविषयी एक सविस्तर पोस्ट नक्की लिहीन.) तुम्ही टोरेंट क्लाएंट वापरून मोठ्या फाईल्स (सॉफ्टवेअर्स, मूव्हीज) डाऊनलोड करत असाल तर आता वेगळा टोरेंट क्लाएंट वापरायची अजिबात गरज नाही. विझोतून तुम्ही थेट टोरेंट फाईल्स डाऊनलोड करू शकता. याकरता फायर टोरेंट हा क्लाएंट या ब्राऊजरमध्येच समाविष्ट केलेला आहे. याव्यतिरिक्त फायरफॉक्ससाठी उपलब्ध असणारे अनेक लोकप्रिय अॅड-अॉन्स किंवा एक्स्टेंशन्स यात अगोदरच समाविष्ट करण्यात अाले आहेत.

सुरवातीला केवळ विंडोज अॉपरेटिंग सिस्टिमसाठी उपलब्ध असणारे हे ब्राऊजर आता मॅकिन्तोषसाठीही उपलब्ध झाले आहे. याची लिनक्स आवृत्तीही लवकरच येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या उपलब्ध असलेली विझोची आवृत्ती खरोखर देखणी आहे. क्रोमच्या धर्तीवर यातील फीचर्सची पुनर्रचना करण्यात आल्याने हा ब्राऊजर एक वेगळाच आनंद देऊन जातो. विझो डाऊनलोड करा, वापरा आणि तुमच्या प्रतिक्रियाही अवश्य द्या.
Read the full story

, , , ,

इसको लगा डाला, तो लाईफ ‘जिंगा’लाला!

June 4, 2009 0 comments

एखाद्या आवडत्या साईटवरील विशिष्ट सेक्शन कॅप्चर करण्यासाठी तुम्ही काय करता? विंडोज वापरणारे प्रिंट स्क्रीन किंवा मॅकिन्तोष वापरणारे Command+Shift+3 वापर असतील. पण यातून हवा तो सेक्शन वेगळा काढण्यासाठी ‘इमेज एडिट’ करावी लागते. त्याऐवजी जे सेक्शन कॅप्चर करायचं आहे तेवढंच करा. यासाठी या क्षेत्रातील दिग्गज ‘टेकस्मिथ’ने एक फ्री स्क्रीन कॅप्चर सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ‘स्नॅग-इट’ आणि ‘कॅमटाशिया स्टुडियो’चे निर्माते असलेल्या ‘टेकस्मिथ’ने सर्वसामान्य ग्राहकांसाठी ‘जिंग’ हा नवा आणि मोफत पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
‘जिंग’च्या माध्यमातून तुम्ही स्टिल आणि व्हिडीओ अशा दोन्ही प्रकारांत स्क्रीन कॅप्चर करू शकता. हव्या त्या आकार स्क्रीनचे कॅप्चर घेणे किंवा स्क्रीनवरील अॅक्टिव्हिटीचे पाच मिनिटांपर्यंत रेकॉर्डिंग करणे याद्वारे शक्य होते. स्टिल स्क्रीन कॅप्चरसाठी वापरले जाणारे ‘स्नॅग-इट’ (५० डॉलर्स) आणि स्क्रीन रेकॉर्डिंसाठी वापरले जाणारे ‘कॅमटाशिया स्टुडिओ’ (२९९ डॉलर्स) ही दोन्ही सॉफ्टवेअर्स प्रोफेशनल गटात मोडतात. ‘जिंग’चेही प्रोफेशनल व्हर्जन (१५ डॉलर्स प्रतिवर्ष) उपलब्ध
आहे; पण मोफत व्हर्जनमध्ये सर्वसामान्य ग्राहकाच्या सर्व गरजा भागू शकतात.

‘जिंग’ विंडोज (एक्सपी, व्हिस्टा) आणि मॅकिन्तोषसाठी उपलब्ध आहे. साधारण आठ एमबीचे हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एका कोपऱ्यात ‘जिंग’चा सूर्य (Sun) तळपू लागतो. त्यावर कर्सर नेल्यास कॅप्चर, हिस्ट्री आणि मोअर असे अॉप्शन्स दिसतात. नवीन स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर कॅप्चर म्हणून हवा तेवढा स्क्रीन एरिया सिलेक्ट करा व ‘कॅप्चर अॅन इमेज’ किंवा ‘कॅप्चर ए व्हिडीओ’वर क्लिक करा. कॅप्चर झालेली इमेज (यावर टेक्स्ट आणि बॉक्सेसही अॅड करता येतात) किंवा व्हिडीओ तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर स्टोअर करून ठेऊ शकता किंवा ‘स्क्रीनकास्ट डॉट कॉम’वर थेट अपलोड करू शकता. ‘स्क्रीनकास्ट डॉट कॉम’ ही ‘टेकस्मिथ’चीच आणखी एक सेवा. ‘जिंग’ वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचे अकाऊंट अोपन करावे लागते. याच अकाऊंटचा वापर करून तुम्ही ‘स्क्रीनकास्ट’वर दोन जीबी पर्यंतचा डाटा स्टोअर करून ठेऊ शकता. हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत कॅप्चर केलेल्या इमेजेस आणि व्हिडीओ दिसतात. मोअरमध्ये जाऊन तुम्ही ‘जिंग’च्या सेटिंग्ज बदलू शकता. उदा. कॉम्प्युटर स्टार्ट केल्यानंतर ‘जिंग’ अॅक्टिव्हेट व्हायला हवे की नको वगैरे सेटिंग्ज इथून बदलता येतात. ‘जिंग’च्या मोफत व्हर्जनमध्ये व्हिडीओ केवळ फ्लॅश फॉरमॅटमध्ये (swf) सेव्ह करता येतात; प्रोफेशनल व्हर्जनमध्ये ते mpeg4 फॉरमॅटमध्येही सेव्ह करता येऊ शकतात - एवढाच काय तो फरक! ट्युटोरियल, प्रेझेंटेशन वगैरे तयार करण्यासाठी या सेवेचा मोठा उपयोग होतो.

See How Jing Works
See a Video Capture
Read the full story

, ,

भन्नाट वॉलपेपर्स

December 25, 2008 0 comments


तुम्हाला मूडनुसार वॉलपेपर बदलणं आवडत असेल तर तुम्ही गुगलवर ‘जरा हटके’ वॉलपेपर शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असाल. व्यर्थ अशासाठी की वॉलपेपर असा सर्च दिल्यास शेकडो साईट्स मिळतात, पण त्यातल्या काहीच साईटवर तुम्हाला हवे तसे वॉलपेपर्स मिळतात. मिळालेल्या वॉलपेपर्सचा आकारही तुमच्या स्क्रीन रिझोल्यूशनला कम्पॅटिबल नसेल तर मग स्ट्रेच, टाईल असे प्रकार आपण करून बघतो. पण त्याने मूळ वॉलपेपर डिस्टॉर्ट होतो व त्यातील गंमत निघून जाते.

तुम्हाला आवडेल असा आणि तुमच्या स्क्रीन साईजचा वॉलपेपर देणारी साईट म्हणजे इंटरफेस लिफ्ट. या साईटवर तुम्हाला हव्या त्या रिझोल्यूशनचे (वाईडस्क्रीन, ड्यूअल मॉनिटर, एचडीटीव्ही, मोबाईल इ.) वॉलपेपर्स मिळतील. आर्टिस्ट्स आणि टॅग्जनुसार सर्व वॉलपेपर्सचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला आवडीचे वॉलपेपर शोधण्यासाठी फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. या साईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर विंडोज आणि मॅकिन्तोषसाठी लागणारे आयकॉन्स आणि थीम्सही उपलब्ध आहेत.



Read the full story

, ,

फ्रेश वॉलपेपर्स!

October 15, 2008 0 comments

तुमच्यापैकी अनेकांकडे आयफोन किंवा आयपॉड टच असेल. मोबाईल फोनवर नवे, फ्रेश वॉलपेपर टाकण्यासाठी आपण कायम उत्सुक असतो. त्यामुळे एखाद्याकडे सुंदर वॉलपेपर दिसला की लगेच तो ब्लुटूथवरून ट्रान्स्फर करून घेतो. आयफोन किंवा आयपॉड टचमध्ये ब्लुटूथची सुविधा नसल्यामुळे आयट्यून्स चा वापर करून डेटा ट्रान्स्फर करावा लागतो. आयफोनची स्क्रीन साईज इतरांपेक्षा मोठी असल्याने सर्वसाधारण इमेजेस वॉलपेपर म्हणून वापरता येत नाहीत. त्यासाठी इमेज रिसाईज करून घ्यावी लागते. पण आज मी तुम्हाला आयफोन, अायपॉड आणि इतर सर्व मोबाईल फोनसाठी वापरता येण्यासारख्या वॉलपेपर्सच्या खजिन्याची किल्ली देणार आहे.

पूल्गा या वेबसाईटवर तुम्हाला आयफोन आणि आयपॉडसाठी तयार केलेले असंख्य वॉलपेपर्स मिळतील.
हौशी कलाकारांनी तयार केलेले वॉलपेपर्स या साईटवरून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता. संबंधित वॉलपेपर आयफोन किंवा आयपॉड टचवर घेण्यासाठी आयट्यून्सला जोडून सिंक्रोनाईज करा आणि फोटोज आयकॉनवर क्लिक करून वॉलपेपर म्हणून सेट करू शकता. तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्हीदेखील तुमच्या कलाकृती पूल्गावर ठेऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे इन्व्हिटेशन लागते. इन्व्हिटेशनसाठी इथे क्लिक करा.



हे झाले आयफोन आणि आयपॉड टचसाठी. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे आयफोन नाही. आम्ही काय करायचे? त्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही मोबोपिक या सेवेचा वापर करून आयफोनसाठी तयार केलेले वॉलपेपर तुमच्या मोबाईलच्या आकारात रिसाईज करून वापरू शकता. मोबोपिकच्या डिरेक्टरीत तुमचा फोन नसेल तर अगोदर फोनची स्क्रीन साईज (पिक्सेल्स) माहित करून घ्या. त्यानंतर पिक्सलर या सेवेचा वापर करून संबंधित वॉलपेपर रिसाईज किंवा क्रॉप करून तुमच्या फोनसाठी कन्व्हर्ट करा.

पूल्गावरून डाऊनलोड केलेली इमेज



िपक्सलर वापरून नोकिया E71साठी कन्व्हर्ट केलेली इमेज (३२० बाय २४० पिक्सेल्स)


Read the full story

,

पॉलिश्ड फॉर मॅकः न्यूजफायर

September 30, 2008 0 comments

आरएसएस अथर्थात रियली सिंपल सिंडिकेशनने अनेक गोष्टी सोप्या केल्या आहे. पहिली म्हणजे तुमच्या आवडत्या वेबसाईट्सला दरवेळी भेट देण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलेले सेक्शन अपडेट झाल्यावर लगेचच ते तुमच्या आरएसएस रीडरमध्ये रिफ्लेक्ट होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डेटा सेन्सिटिव्ह प्लॅन्स वापरणाऱ्यांचे (विशेषतः मोबाईलवर सर्फिंग करणाऱ्यांचे) पैसे वाचतात. अॉनलाईन फीड किंवा आरएसएस रीडर वापरणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी डेस्कटॉप रीडर्सही तितकेच लोकप्रिय आहेत. आज मी मॅकिन्तोश वापरणाऱ्यांसाठी एका डेस्कटॉप रीडरची माहिती देणार आहे.
न्यूजफायर हे मॅकिन्तोशसाठीचे सुंदर फीड रीडर आहे. केवळ ७५० केबींचे हे अॅप्लीकेशन मॅक युजर्ससाठी उपयोगी ठरते. मॅकच्या अोरिजिनल अॅप्लीकेशन्सप्रमाणे न्यूजफायरचा इंटरफेस पॉलिश्ड वाटतो. त्यामुळे आपण एक्स्टर्नल अॅप्लीकेशन वापरतो आहोत, असे वाटत नाही.



यात तुम्ही नवे फीड अॅड करू शकता व त्यांचे क्लासिफिकेशन करू शकता. उदा. नॅशनल न्यूजसाठी तुम्ही नॅशनल वेबसाईट्सचे आरएसएस फीड एकत्र ठेवू शकता व इंटरनॅशनल न्यूजसाठी बीबीसी किंवा सीएनएनचे फीड्स एकत्र ठेवू शकता. फीड डिस्प्ले आणि फीड डाऊनलोडसाठीच्या सेटिंग्ज पर्सनलाईझ करता येतात. अॉनलाईन फीड रीडरमध्ये फीड्स अनेक महिने तसेच पडून राहतात. न्यूजफायरमध्ये तुम्ही ठराविक काळानंतर फीड डिलीट करण्याचे अॉप्शन ठेवू शकता. म्युझिक किंवा व्हिडिओ डाऊनलोडच्याही सेटिंग्ज यात बदलता येतात.
न्यूजफायर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

अॉनलाईन कीनोट!

September 8, 2008 0 comments



मायक्रोसॉफ्ट अॉफिसप्रमाणे मॅकिन्तोशचे आयवर्क हे सॉफ्टवेअर प्रचलित आहे. आयवर्कमध्ये पेजेस, नंबर्स आणि कीनोट ही तीन अॅप्लीकेशन्स वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचे काम करतात. यातील कीनोट हे अॅप्लीकेशन प्रोफेशनल प्रेझेंटेशन्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कीनोटमध्ये तयार केलेले प्रेझेंटेशन तुम्ही विविध फॉरमॅट्समध्ये (पीपीटी, पीडीएफ, फ्लॅश आदी) एक्स्पोर्ट करून सेव्ह करू शकता. याचा इंटरफेसही पॉवरपॉईंटपेक्षा अधिक सोपा आहे. कीनोटमध्ये प्रेझेंटेशन तयार करणे हा एक सुखद अनुभव असतो. कीनोट हे केवळ मॅकिन्तोश अॉपरेटिंग सिस्टिमवरंच वापरता येते. त्यामुळे विंडोज वापरणाऱ्यांना कीनोटचा अनुभव घेता येत नाही. पण अॅपलमधील दोन सहकाऱ्यांनी स्वतःची कंपनी काढून एक नवी सेवा लॉंच केली आहे. ही सेवा वापरून तुम्हीदेखील कीनोटचा अनुभव घेऊ शकाल.



२८० स्लाईड्स
हे त्या सेवेचे नाव. अॉनलाईन प्रेझेंटेशन टूल्सच्या यादीतली ही तिसरी सेवा. कीनोटशी मिळतीजुळती असल्याने अल्पावधीतच ही सेवा लोकप्रिय झाली. याअगोदर एम्प्रेसर आणि स्लाईडरॉकेट या दोन सेवा अशाच प्रकारचे काम करत होत्या. या सेवांची फारशी चर्चा झाली नाही. २८० स्लाईड्स वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही थेट प्रेझेंटेशन तयार करू शकता. यासाठी अनेक थीम्सही उपलब्ध आहेत. २८० स्लाईड्समध्ये तयार केलेले प्रेझेंटेशन तुम्ही अॉनलाईन स्टोअर करू शकता, स्लाईडशेअरसारख्या साईटवर शेअर करू शकता आणि अॉनलाईन प्रेझेंटही करू शकता. २८० स्लाईड्समध्ये तुम्ही अगोदर तयार केलेले प्रेझेंटेशन्स इम्पोर्ट करून एडिटही करू शकता. कीनोटचा अनुभव घ्यायचा असेल तर २८० स्लाईड्स एकदा वापरून पाहाच!
Read the full story

, ,

गणपती बाप्पा मोरया!

August 31, 2008 5 comments


जगभर विखुरलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणणारा गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. मायदेशापासून शेकडो मैल दूर असलेल्यांना गजाननाची आराधना करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ई-सकाळने मोरया हे नवे दालन काल सुरू केले आहे. गणपतीसंदभर्भात इत्थंभूत माहिती असलेल्या या दालनात गणपतीचे सुरेख वॉलपेपर्सही उपलब्ध आहेत. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांसाठी यातील निवडक वॉलपेपर्स अायफोन आणि आयपॉड टचच्या साईझमध्ये उपलब्ध करून देत आहेत. (सौजन्यः ई-सकाळ आणि किरण वेल्हाणकर)

गणपतीचे आयफोन वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
गणपतीचे डेस्कटॉप वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हेच वॉलपेपर्स इतर मोबाईलसाठी रिसाईझ करून वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी वाचाः पाच मिनिटांत मोबाईल वॉलपेपर

आयफोनसाठीचे इतर वॉलपेपर्स तुम्ही येथून किंवा येथून डाऊनलोड करू शकता.
Read the full story

,

भाष्य नाही...

August 23, 2008 1 comments



भारतात नुकताच आयफोन ३जी लॉंच झाला आहे. नव्याने आयफोन घेणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्वसाधारण फोनच्या धाटणीपासून शेकडो मैल दूर असलेला आयफोन फीचर्सच्या बाबतीतही तेवढाच (किंबहुना जरा जास्त) दूर आहे. त्यात सुधारणा होण्यास आणखी किती वेळ लागेल, याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. आयफोन ३जीबद्दल बरे-वाईट तुम्ही एेकले, वाचले, पाहिले असेल. गिझ्मोडोने या विषयावर अधिक बोलण्याएेवजी आपल्या भावना वरील चित्राने व्यक्त केल्या आहेत.
गिझ्मोडोवरील आयफोन ३जी संदभर्भातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

आय प्ले फॉर यू, यू प्ले फॉर मी...

August 11, 2008 0 comments

एखाद्या मित्राच्या कॉम्प्युटरवर एखादं चांगलं गाणं एेकलं की ते अापल्याकडेही असावं असं वाटतं. त्याची आणि आपली आवड मिळती-जुळती असली तर आपण गाण्यांचं अख्खं फोल्डर पळवतो. गाणी ही अशी गोष्ट आहे, की कितीही असली तरी कमीच वाटतात. आणि आजकाल हार्डडिस्कची कपॅसिटी किमान १०० जीबींच्यापुढेच असते, त्यामुळे आपण कितीही गाणी स्टोअर करू शकतो. आता प्रश्न असा आहे की एवढी गाणी मिळवायची कुठून? त्यातही आपली आवड इतरांपेक्षा हटके असेल तर गाणी मिळवण्यासाठीचे सोर्सेस अत्यंत मर्यादित राहतात. अशा लोकांसाठी यू प्ले मी सारखे म्युझिक सोशल नेटवर्क कामास येते.

होय. सोशल नेटवर्किंगमधील नवा ट्रेंड म्हणून म्युझिक नेटवर्किंगकडे पाहिलं जातंय. यू प्ले मी ही याच प्रकारातील एक सेवा. यू प्ले मी डॉट कॉमवर मेंबर म्हणून रजिस्टर केल्यानंतर तुम्ही साधारण २० एमबीचा डेस्कटॉप क्लाएंट डाऊनलोड करून घेऊ शकता. आता तुम्ही जेव्हा अॉनलाईन असाल आणि तुमच्या लोकल अॉडिओ किंवा व्हिडीओ प्लेअरवर एखादं गाणं एेकत किंवा पाहत असाल त्या वेळी यू प्ले मी तेच गाणं एेकणाऱ्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात करतो. अशी एखादी व्यक्ती सापडल्यास त्याचे प्रोफाईल डिस्प्ले केले जाते. अर्थात त्याचवेळी तुमचे प्रोफाईलही त्या व्यक्तीस दिसते. त्या व्यक्तीच्या प्लेलिस्टमधील इतर गाणीही तुम्ही एेकू शकता. अॉनलाईन मेसेजही पाठवू शकता. त्या व्यक्तीस फ्रेंडलिस्टमध्ये अॅड करून तुम्ही नवे म्युझिक नेटवर्क तयार करू शकता.



Supported Players:


यू प्ले मी विंडोज (एक्सपी, व्हिस्टा) आणि मॅकिन्तोष अॉपरेटिंग सिस्टिमवर इन्स्टॉल करता येते.
Read the full story

,

कॅच देम यंग!

July 19, 2008 0 comments


अनेक लहान-मोठ्या शहरांत अॉथोराईज्ड रिसेलर्सचे नेटवर्क उभे करून अॅपलने आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. या रिसेलर्सकडे आयमॅक (डेस्कटॉप), मॅकबुक (लॅपटॉप), अॅपल सॉफ्टवेअर्स आणि विविध अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. रिलायन्स रिटेलतर्फेही देशभरात सुमारे ५० आयस्टोअर्सची चेन उभारण्यात येत आहे. प्रोफेशनल कोर्सेसला अॅडमिशन घेणारे विद्याथर्थी आजकाल डेस्कटॉपपेक्षा लॅपटॉप घेणेच अधिक पसंत करतात. अशा एज ग्रुपला टारगेट करून
अॅपलने आता भारतातील निवडक शैक्षणिक संस्थांमधील विद्याथर्थ्यांना ना मॅकबुक आणि मॅकबुक प्रो सवलतीत उपलब्ध करून दिले आहे. ही सवलत सुमारे १२ टक्क्यांपर्यंत आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध प्रॉडक्ट्सच्या किमती खाली दिल्या आहेतः


तुम्ही खालीलपैकी कोणत्याही संस्थेत शिकत असाल, किंवा शिकवत असाल किंवा संबंधित असाल तर ३० अॉगस्ट २००८ पर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताः




ही पोस्ट तुमच्या मित्रांना ई-मेलवर पाठविण्यासाठी डावीकडे असलेल्या Friend Forward यावर क्लिक करा.

या योजनेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

मॅकिन्तोशसाठी साईट स्पेसिफिक ब्राऊजर

July 12, 2008 0 comments


नेहमी लागणाऱ्या साईट्स (उदा. जी-मेल, फेसबुक, अॉरकुट, गुगल न्यूज वगैरे) ओपन करण्यासाठी एखादा शॉर्टकट उपलब्ध झाला तर? असा शॉर्टकट उपलब्ध आहे. त्यास साईट स्पेसिफिक ब्राऊजर (एसएसबी) असे म्हणतात. विंडोजसाठी बबल्स नावाचे एसएसबी उपलब्ध आहे. बबल्सबद्दल अधिक माहितीसाठी वाचाः क्विक ब्राऊजिंगचा नवा मंत्र. आता विंडोजसाठी एखादे अॅप्लीकेशन उपलब्ध आहे आणि मॅकिन्तोशसाठी नाही, असं कसं चालेल?

फ्लुईड हे मॅकिन्तोशसाठीचे साईट स्पेसिफिक ब्राऊजर. फ्लुईड इन्स्टॉल केल्यानंतर एका छोट्या विंडोत तुम्ही नवे वेब अॅप्लीकेशन तयार करू शकता. तुम्हाला ज्या वेबसाईटसाठी शॉर्टकट तयार करायचा आहे त्याची लिंक आणि आयकॉन एंटर करून तुमच्या डॉकसाठी एक नवे अॅप्लीकेशन तयार होते.

यावर क्लिक केल्यास तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरमध्ये ती साईट ओपन होईल. याचा फायदा असा, की तुम्हाला जी-मेल, फेसबुक, गुगल रीडर आदी नेहमी लागणाऱ्या साईट्ससाठी ब्राऊजरमधील टॅब एंगेज करण्याची गरज नाही. तुम्ही इंटरनेटला कनेक्ट असलात की एसएसबीमधून तुम्हाला या साईटवरील अॅक्टिव्हिटीजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील.

Read the full story

, ,

फ्लिकर आणा डेस्कटॉपवर!

July 4, 2008 0 comments

एखाद्या पिकनिकवरून आल्यावर आपण किमान पन्नास-शंभर फोटो घेऊन येतो आणि ते फ्लिकर किंवा पिकासासारख्या अॉनलाईन फोटो-शेअरिंग साईट्सवर अपलोड करतो. त्यातील चांगले फोटो निवडा, फ्लिकरवर लॉग-इन व्हा, फोटो अपलोड होण्याची वाट पाहा याचा अनेकदा कंटाळा येतो आणि कालांतराने फ्लिकरचा पासवर्डही आपण विसरतो. सोशल स्फीअरमध्ये तुम्ही कायम अॅक्टीव्ह राहायला हवं. त्यामुळे अनेक ओळखी होऊन त्याचा फायदाही होतो. फ्लिकरवर अॅक्टीव्ह राहण्यासाठी तुम्हाला जर एखादा डेस्कटॉप क्लाएंट मिळाला तर?

मॅकिन्तोश वापरणाऱ्यासांठी एक Infinite-Sushi या कंपनीने तयार केलेले १००१ - फ्लिकर अॅक्सेसरी हा डेस्कटॉप क्लाएंट तुम्ही वापरू शकता. १००१ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. १००१ इन्स्टॉल केल्यानंतर अॅप्लीकेशन लॉंच करा. पहिल्यांदा लॉंच केल्यावर तुम्हाला फ्लिकरचे अकाऊंट अॉथेन्टिकेट करावे लागेल. ते केल्यानंतर तुम्हाला एक डिफॉल्ट फोटो स्ट्रीम पाहायला मिळेल. या स्ट्रीममध्ये फ्लिकरवर अपलोड झालेले ताजे फोटो, तुम्ही अॅड केलेल्या मित्रांचे फोटो किंवा तुम्हाला हव्या असलेल्या टॅगचे फोटो पाहायला मिळतील. Streams→Edit Streams यात जाऊन तुम्ही या सेटिंग्ज बदलू शकता. स्ट्रीम नको असल्यास, तोही अॉप्शन तुम्ही सेट करू शकता. फोटो अपलोड करण्यासाठी आता तुम्हाला फ्लिकरवर जाण्याची गरज नाही.

१००१ या डेस्कटॉप क्लाएंटचा वापर करून फोटो अपलोड करणं अतिशय सोपं आहे. याचा आयकॉन तुमच्या डॉकमध्ये असेल तर तुम्हाला जे फोटो अपलोड करायचे आहेत ते ड्रॅग करून यात टाका किंवा Image→Upload येथे जाऊन अपलोड करा. या फोटोंना टॅग करणे, रिसाईझ करणे आदी सगळ्या गोष्टी तुम्ही थेट १००१ मधून करू शकता.



विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यासांठीही असे अनेक डेस्कटॉप क्लाएंट्स डेव्हलप केलेले आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणेच हे डेस्कटॉप क्लाएंट्स काम करतात. विंडोजसाठी पॉप्युलर आणि अॅडव्हान्स्ड क्लाएंट आहे पॉवरस्नॅप. विशेष म्हणजे हे अॅप्लीकेशन भारतीय इंजिनिअर्सनी डेव्हलप केलेले आहे.
पॉवरस्नॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
फ्लिकरवरील फोटोंना फोटो-टॅग करण्यासाठी वाचाः गो...गेट इट; नव्हे गो...टॅग इट!


Read the full story

, ,

लॅपटॉप चोरांपासून वाचण्यासाठी...

June 28, 2008 0 comments


आजकाल व्हाईट कॉलर क्राईम्सचे प्रमाण खूप वाढले आहे. कोणाचे तरी बॅंक अकाऊंट हॅक करून पैसे पळविल्याच्या बातम्या कानावर पडत असतात. आपले अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून अॉनलाईन ट्रान्झॅक्शन्स करताना काय काळजी घ्यावी, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे व्हाईट कॉलर क्राईम करणारे त्यावर फारसे अवलंबून राहतंच नाहीत. आपण कुठे ढिसाळपणा करू शकतो, याकडे त्यांचे लक्ष असते. यातील एक म्हणजे, कोणत्या वेबसाईटवर लॉग-इन होतोय हे आपण काळजीपूर्वक तपासत नाही. त्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स मी फेक अॅड्रेसेस कसे ओळखाल? या पोस्टमध्ये दिल्या होत्या. यामुळे आपण इंटरनेटवर तरी किमान सुरक्षित राहू शकतो. आता प्रश्न राहिला तो अॉफलाईन सुरक्षिततेचा. म्हणजे, तुमचा लॅपटॉप समजा चोरीला गेला तर काय करायचं? अशी वेळ तुमच्यावर येऊ नये, परंतु आलीच तर चोराला ट्रॅक करणं शक्य आहे.

अॉनलाईन थेफ्ट ट्रॅकिंग सिस्टिम्सद्वारे तुम्ही चोरीस गेलेला लॅपटॉप नेमका कुठे आहे हे ट्रॅक करू शकता. यासाठी चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट करणे आवश्यक आहे. ‘लॅपटॉप लॉक’ हे या सेवेचे नाव. ‘लॅपटॉप लॉक’वर रजिस्टर करून तुमच्या लॅपटॉपचे डिटेल्स एंटर केल्यानंतर ‘लॅपटॉप लॉक’ क्लाएंट डाऊनलोड करावा लागतो. त्यानंतर हा क्लाएंट व तुमचे ‘लॅपटॉप लॉक’वरील अकाऊंट एकमेकांना लिंक केले की रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर डेस्कटॉप क्लाएंट ओपन करून लॅपटॉप चोरीस गेल्यावर काय प्रोसेस होणं अपेक्षित आहे, याची माहिती भरावी लागते. म्हणजे चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट केला की ‘लॅपटॉप लॉक’ अॅक्टिव्हेट होऊन ठरवून दिलेल्या प्रोसेसेस (उदा. महत्त्वाच्या ड्राईव्हमधील फाईल्स डिलीट करणे, काही फाईल्स एन्क्रिप्ट करणे वगैरे) पूर्ण करतो. चोरीला गेल्यानंतर तुम्ही ‘लॅपटॉप लॉक’च्या अकाऊंटवर लॉग-इन करून लॅपटॉपचे स्टेटस मिसिंग किंवा स्टोलन असे करावे लागते. त्यानंतर चोरट्याच्या आयपी अॅड्रेसवरून त्याचा नेमका पत्ता शोधला जातो. ‘लॅपटॉप लॉक’तर्फे चोरी पकडण्याची किंवा चोरीस गेलेला लॅपटॉप परत मिळवून देण्याची कोणतीही हम दिली जात नसली तरी ही माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरू शकते व तुमचा लॅपटॉप परत मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात. ‘लॅपटॉप लॉक’ ही सेवा फक्त विंडोज २०००, एक्सपी आणि व्हिस्टासाठी उपलब्ध आहे.

मॅकिन्तोश वापरणाऱ्यासाठी याहून अधिक खात्रीलायक सेवा उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे अंडरकव्हर. अंडरकव्हरची प्रोसेस ‘लॅपटॉप लॉक’शी मिळतीजुळती असली तरी यातील नवे फीचर म्हणजे चोरट्याने लॅपटॉप विकण्याचा प्रयत्न केला तर विकत घेणाऱ्यास, हा लॅपटॉप चोरीचा असल्याची माहिती मिळते. अंडरकव्हर ही पेड सेवा अाहे. मॅकिन्तोशमधील इनबिल्ट कॅमेऱ्याचा वापर करून चोरट्याचे फोटो पाठविण्यासाठी अायअलर्टयू ही सेवा कामाला येते. यातील कोणतीही सेवा तुमचा लॅपटॉप परत देण्याची हमी देत नसले तरी अधिक सुरक्षिततेसाठी या सेवा वापरण्यास काहीच हरकत नाही.
Read the full story

,

गुगल मॅक सर्च

June 3, 2008 0 comments

ज्यांच्याकडे अॅपलचा लॅपटॉप (मॅकबुक) किंवा डेस्कटॉप (आय-मॅक) आहे त्यांना अनेक वेळा मॅकिन्तोश अॉपरेटिंग सिस्टिम किंवा अॅपलसंदर्भात सर्च करावा लागतो. अशा वेळी अनेकदा अनावश्यक सर्च रिझल्ट्स येतात. ते टाळण्यासाठी एक खास टिपः
तुम्ही मॅक वापरत असाल आणि गुगल फॅन असाल तर हा प्रॉब्लेम सुटला म्हणून समजा.





गुगलची मॅकसाठी स्वतंत्र सर्च फॅसिलिटी आहे. www.google.com/mac या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला सर्चचे दोन अॉप्शन्स मिळतील - १. सर्च मॅक साईट्स आणि २. सर्च द वेब. पहिल्या अॉप्शनमध्ये तुम्ही दिलेल्या क्वेरीसाठी फक्त मॅकसंदर्भात असलेला डेटा चेक केला जाईल. त्यामुळे त्यातून मिळणारे रिझल्ट्स हे नक्कीच योग्य असणार आहेत. तेव्हा तुम्हाला मॅकबद्दल काही क्वेरी असेल तर गुगल मॅक सर्च एकदा आजमावून पाहा...
Read the full story