Showing posts with label Tips N Tricks. Show all posts
Showing posts with label Tips N Tricks. Show all posts
, , ,

फास्ट, फास्टर, फास्टेस्ट फायरफॉक्ससाठी...

July 1, 2009 0 comments

नेट फारंच स्लो झालंय का रे? - शैलेशचा प्रश्न
नेट व्यवस्थित आहे. तुझं ब्राऊजर गंडलंय... - श्रीचे उत्तर

शैलेश फायरफॉक्सचा भक्त. कितीही सुंदर दिसणारं, सोयी-सुविधांनी युक्त असं नवं ब्राऊजर आलं तरी हा गडी फायरफॉक्सलाच चिकटून होता. शैलेशसारख्या फायरफॉक्सपंथीयांची ही नेहमीची तक्रार. हा ब्राऊजर प्रचंड मेमरी खातो, एक्स्टेन्शन्स वाढली की हा पार ढपतो इथपासून ते पेज लोड होण्यास प्रचंड वेळ लागतो इथपर्यंत अनेक तक्रारी सारख्या सुरू असतात. पण तरीदेखील हे लोक दुसऱ्या ब्राऊजरकडे वळत नाहीत. अशा फायरफॉक्सपंथीयांसाठीच आजची ही पोस्ट लिहितोय.

फायरफॉक्सच्या Configuration फाईलमध्ये किंचित बदल करून तुम्ही तुमच्या फायरफॉक्सला जोरदार पळवू शकता. अर्थात, यासाठी तुम्हाला Configuration चेंज करावे लागेल. पुढे दिलेल्या स्टेप्स अत्यंत काळजीपूर्वक फॉलो कराः

Cache फीचरसाठी राखून ठेवलेली RAM कमी करण्यासाठीः

सर्फिंगदरम्यान कॅशिंगसाठी फायरफॉक्सतर्फे ठराविक RAM वापरली जाते. यामुळे अनेकदा इतर प्रोसेसेस आणि फायरफॉक्सही स्लो होण्याची शक्यता असते. ही RAM कमी करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः

  • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
  • आता वरच्या बाजूस Filter नावाने एक सर्च बार येईल. त्यात browser.sessionhistory.max_total_viewer असा सर्च द्या.
  • Value वर क्लिक करून ती 0 अशी सेट करा (Default Value: -1)
पेज लोड स्पीड वाढवण्यासाठीः
फायरफॉक्समध्ये आपण जेव्हा एखाद्या साईटचा अॅड्रेस एंटर करतो तेव्हा त्या साईटच्या सर्व्हरला केवळ एकच रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यामुळे साहजिकच पेज लोड होण्यास वेळ लागतो. एकावेळी अनेक रिक्वेस्ट्स पाठवण्यासाठी पुढील बदल कराः
  • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
  • Filter मध्ये network.http.pipelining असे टाईप करून व्हॅल्यूवर क्लिक करा व ती True अशी सेट करा. (Default Value: False)
  • याच पद्धतीने network.http.proxy.pipelining असे टाईप करा. ही व्हॅल्यूही True अशी सेट करा. (Default Value: False)
  • आता network.http.pipelining.maxrequests असे टाईप करून ही व्हॅल्यू 10 अशी सेट करा. (Default Value: 4)
  • आता याच विंडोत राईट-क्लिक करून New > Integer असे सिलेक्ट करा. याला nglayout.initialpaint.delay असे नाव द्या आणि त्याची व्हॅल्यू 0 अशी सेट करा.
फायरफॉक्स मिनिमाईझ्ड असताना RAM दहा एमबीपर्यंत कमी करण्यासाठीः
फायरफॉक्स वापरताना बरीचशी RAM वापरली जाते. त्यामुळे इतर अॅप्लिकेशन्स अनेक वेळा हँग होण्याची किंवा स्लो होण्याची शक्यता असते. अशा वेळी फायरफॉक्स बंद केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. पण फायरफॉक्स मिनिमाईझ करून ठेवल्यास होणारा RAM चा वापर आपण कमी करू शकतो. असे करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
  • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
  • आता याच विंडोत राईट-क्लिक करून New > Boolean असे सिलेक्ट करा.
  • याला config.trim_on_minimize असे नाव देऊन एंटर करा.
  • नव्या बॉक्समध्ये याची व्हॅल्यू True अशी सेट करा.
या सगळ्या स्टेप्सनंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करा व नव्या स्पीडचा अनुभव घ्या! तुमचा अनुभव कॉमेंट्सच्य माध्यमातून इतराशी जरूर शेअर करा.
Source: http://www.zixpk.com/
Read the full story

, , , ,

िसग्नेचर स्टाईल!

June 25, 2009 3 comments

ई-मेल सिग्नेचर्स हा एक प्रचंड इंटरेस्टिंग प्रकार आहे. तुम्हाला आलेल्या ई-मेल्स एकदा चेक करा. प्रत्येकाच्या ई-मेलमध्ये मेसेजनंतर एक वेगळ्याच प्रकारची सिग्नेचर तुम्हाला दिसून येईल. काही जण नुसतं नाव लिहिणं पसंत करतात, तर काही जणांना नाव, गाव, पत्त्यासह ब्लॉग, वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रोफाईल्सच्या लिंक्स देणंही आवडतं. पण अत्यंत सपक वाटणाऱ्या या सिग्नेचर्स आकर्षक करता आल्या तर? येस. वाईज स्टँप नावाचे फायरफॉक्स अॅड-अॉन वापरून तुम्ही ई-मेल सिग्नेचर्सने तुमची नवी ओळख तयार करू शकता.

जी-मेल, याहू मेल, हॉटमेल आणि एओएल मेल आणि इतर अनेक ई-मेल सेवांमध्ये तुम्ही वाईज स्टँपची मदत घेऊन तयार केलेल्या सिग्नेचर्स वापरू शकता. वाईज स्टँप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर फायरफॉक्समध्ये खाली उजव्या कोपऱ्यात स्टँपचा आयकॉन दिसायला लागेल. असाच आयकॉन तुम्हाला जी-मेलच्या कॉम्पोझ मेन्यूमध्येही दिसेल. हा आयकॉन वापरून तुम्ही अगोदर तयार करून ठेवलेल्या पर्सनल किंवा बिझनेस सिग्नेचर्स ई-मेलमध्ये अॅड करू शकाल.

वाईज स्टँपमध्ये सिग्नेचर तयार करणे एकदम सोपे आहे. यासाठी तुम्ही एकतर तयार टेम्प्लेट वापरू शकता किंवा थेट तुम्हाला हवी तशी सिग्नेचर तयार करू शकता. पन्नासहून अधिक सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर, इ.) आणि इन्स्टन्ट मेसेंजर (जी-टॉक, स्काईप, इ.) सेवांसाठीचे छोटे आयकॉन्स तुम्ही सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. याशिवाय तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटचा प्रसार करण्यासाठीसुद्धा ई-मेल सिग्नेचर वापरता येऊ शकते. वाईज स्टँपमध्ये आरएसएस फीड एंटर करून तुमच्या ब्लॉगवरील ताज्या पोस्टचे हेडिंगदेखील ई-मेल सिग्नेचरमध्ये दिसू शकते, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. याच पद्धतीने लास्ट एफएमवर तुम्ही ऐकलेले गाणे, यू ट्यूबवरील एखादा व्हिडीओ किंवा ट्विटर, फेसबुकवरील स्टेटस मेसेजसुद्धा ई-मेल सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. या सिग्नेचर एचटीएमएल फॉरमॅटमध्ये असल्याने तुम्ही त्या इतर ठिकाणीही (उदा. गुगल डॉक्स) वापरू शकता.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीतले बदलः

मित्रांनो,
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या साधी-सोपी टेक्नॉलॉजी या ब्लॉगमध्ये तुमच्या सोयीसाठी काही बदल करत आहे. यापूर्वी या ब्लॉगसाठी मी 'अर्थेमिया' ही मूळ वर्डप्रेससाठी तयार केलेली थीम वापरत होतो. आता याच थीमचे 'मॉडिफाईड व्हर्जन' उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ते वापरण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही फीचर्स (उदा. Headline) आता तरी अडचणीचे वाटत आहेत; पण त्यावर काही तरी उपाय नक्कीच सापडेल. अर्थात यातील कॅटेगरी नेव्हिगेशन आणि फीचर्ड पोस्ट्स हा प्रकार उत्तम आहे. त्यामुळे साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे हे नवे रूप तुम्हाला आवडेल, अशी अपेक्षा आहे. sasotechnology@gmail.com वर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
Read the full story

, , ,

अॉफलाईन जी-मेल

February 2, 2009 98 comments

अॉन-द-मूव्ह कनेक्टिव्हिटी ही संकल्पना आता भारतात लोकप्रिय होऊ लागलीये. रिलायन्स, टाटा इंडिकॉम, एअरटेल, आयडियासारख्या मोबाईल कंपन्यांची वायरलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवा अनेक जण वापरत असतील. शिवाय मोबाईलवर इंटरनेट सर्फ करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत आहे. का कुणास ठाऊक, पण अॉन-द-मूव्ह इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणजे ‘डोक्याला ताप,’ अशीच अनेकांची समजूत आहे. अॉन-द-मूव्ह कनेक्ट असण्याचा प्रमुख फायदा म्हणजे तुम्ही केव्हाही एखादा महत्त्वाचा ई-मेल पाठवू शकता किंवा आलेल्या ई-मेलला उत्तर देऊ शकता. पण या कंपन्यांच्या डेटा कार्डवर विसंबून राहण्याची सोय नाही. मेलबॉक्स ओपन होण्यासच इतका वेळ लागतो, की तोपर्यंत समोरच्या माणसाला फोन करून किंवा एसएमएस करून निरोप पाठवता येऊ शकतो. एखादी फाईल पाठवायची असेल तर? डेटा कार्ड आणि हेवी अॅटॅचमेंट? फरगेट इट...बरं एखादा जुना मेल अोपन करून त्यातून काही माहिती मिळवायची असेल तर? महाराज, त्यासाठी मेलबॉक्स अोपन तर व्हायला हवा ना...आऊटलूक वापरणारे आलेले ई-मेल्स अॉफलाईन वाचू शकतात. पण जी-मेल वापरणाऱ्यांचे काय? आता जी-मेलवापरणारे देखील आपले मेल अॉफलाईन अॅक्सेस करू शकतात. जी-मेलने गेल्या आठवड्यात जी-मेल अॉफलाईन या सेवेची चाचणी सुरू केली आहे.

तुमच्या मेलबॉक्समधील सर्व कन्टेन्ट लोकल कॅश मेमरीत (Cache Memory) साठवून ठेवण्याचे काम जी-मेलतर्फे केले जाते. यासाठी ‘गुगल गिअर्स’ हे सॉफ्टवेअर वापरले जाते. गुगल अॉफलाईन अॅक्टिव्हेट केल्यानंतर तुम्ही जोपर्यंत इंटरनेटला कनेक्ट असता तोपर्यंतचे तुमचे सर्व ई-मेल्स गुगलच्या सर्व्हरशी सिंक्रोनाईझ केले जातात. तुम्ही डिसकनेक्ट झाल्यानंतर जी-मेल आपोआप अॉफलाईन मोडमध्ये जाते. या मोडमध्ये तुम्ही ई-मेल वाचू शकता, महत्त्वाच्या ई-मेल्सना स्टार मार्क करू शकता आणि लेबलही लावू शकता. ई-मेलला उत्तर देणेही शक्य होते; पण मेल पाठवता येऊ शकता नाही. तुमचे उत्तर आऊटबॉक्समध्ये सेव्ह होते व तुम्ही पुन्हा इंटरनेटला कनेक्ट झाला की, लगेच आऊटबॉक्समधील मेल पाठवले जाते. अॉफलाईन जी-मेलमधून अॅटॅच केलेल्या फाईल्स डाऊनलोड करता येत नाहीत, तसेच मेसेजेस डिलीट करता येत नाहीत. अॉफलाईन जी-मेलची अद्याप चाचणी सुरू आहे. त्यामुळे ते वापरताना काही अडचणी येऊ शकतात, असे गुगलने जी-मेलब्लॉगवर म्हटले आहे.

अॉफलाईन जी-मेल अॅक्टिव्हेट करण्यासाठीः
१. तुमच्या मेलबॉक्समध्ये वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या जी-मेल लॅब्जच्या आयकॉनवर क्लिक करा. किंवा सेटिंग्जमध्ये जाऊन लॅब्ज या टॅबवर क्लिक करा.
२. आता जी-मेल अॉफलाईन हे फीचर एनेबल करा. या पेजमध्ये सर्वांत खाली सेव्ह चेंजेस असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक करा.
३. आता पुन्हा इनबॉक्समध्ये या. वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात Offline 0.1 अशी लिंक अॅक्टिव्हेट झाली असेल. त्यावर क्लिक करून गुगल गिअर्स इन्स्टॉल करा.
४. पूर्ण इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला ब्राऊजर रिस्टार्ट करावे लागेल.
५. आता तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसतानादेखील जी-मेल अॅक्सेस करू शकता.
Read the full story

,

वेळ वाचवण्यासाठी

January 12, 2009 0 comments

जी-मेलमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारची अॅटॅचमेंट (उदा. pdf, doc, xls, wmv, ppt) असलेले मेल कसे शोधावे, अशी विचारणा साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे वाचक सचिन दुभाषी यांनी केली होती.
जी-मेलच्या सर्च बॉक्समध्ये पुढील फॉरमॅटमध्ये क्वेरी दिल्यास तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळू शकेल.
तुम्हाला पीडीएफ अॅटॅचमेंट असलेल्या मेल्स शोधायच्या असतील तर पुढीलप्रमाणे सर्च द्याः
filename:{pdf}
याच पद्धतीने तुम्ही महिरपी कंसात स्पेस देऊन विविध प्रकारच्या अॅटॅचमेंट्स शोधू शकता. एखाद्या ठराविक व्यक्तीकडून आलेल्या अॅटॅचमेंट शोधण्यासाठी अॅडव्हान्स्ड सर्च अॉप्शन्समध्ये जाऊन From मध्ये त्या व्यक्तीचे नाव व Has the words मध्ये filename:{pdf doc} असे टाईप करा. तुम्हाला हवे ते रिझल्ट्स मिळतील. वेळ वाचवण्यासाठी ही टिप खूप उपयोगी ठरते. Read the full story

, ,

‘पॅसेंजर’ इंटरनेटला ‘एक्स्प्रेस’ कसं करणार?

December 18, 2008 5 comments

काही कारणांमुळे कधी-कधी इंटरनेटचा स्पीड कमी होतो. त्यामुळे घरीही काम होत नाही आणि अॉफिसमध्येही तीच परिस्थिती होते. अशा वेळी काही ट्विक्स वापरून आपण हा स्पीड वाढवू शकतो. वास्तविक इंटरनेट सर्विस प्रोव्हायडरकडून किंवा नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटरकडून मिळणारा स्पीड वाढवता येत नाही; परंतु ही छोटी टिप वापरून आपण इंटरनेट एक्स्प्लोररचा ब्राऊजिंग स्पीड नक्कीच वाढवू शकतो.

या ट्विकमध्ये विंडोज कॉन्फिगरेशन डेटा (रजिस्ट्री) एडिट करायचा आहे. त्यात गोंधळ होण्याची शक्यता असल्याने अगोदर रजिस्ट्री बॅक-अप करून ठेवा.
रजिस्ट्री बॅक-अप करण्यासाठी:
स्टार्ट > प्रोग्राम्स > अॅक्सेसरीज > सिस्टीम टूल्स > सिस्टीम रिस्टोर
रिस्टोर पॉईंट सिलेक्ट केल्यानंतर त्याविषयीची माहिती एंटर करा असा बॉक्स ओपन होईल. नेक्स्टवर क्लिक करून पुढे जा. रिस्टोर पॉईंट तयार होईल.

रजिस्ट्री रिस्टोर करण्यासाठीः

स्टार्ट > प्रोग्राम्स > अॅक्सेसरीज > सिस्टीम टूल्स > सिस्टीम रिस्टोर
Restore my computer to an earlier time सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक करा.
बॅक-अप घेतल्याची तारिख आणि रिस्टोर पॉईंट सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक केल्यास रजिस्ट्री रिस्टोर होईल.

आता मुख्य टिपकडे वळूया. इंटरनेट एक्स्प्लोररकडून दोन स्ट्रीमद्वारे डेटा फेच केला जातो. आपण या स्ट्रीमची संख्या दोनवरून सहावर नेणार आहोत. यामुळे तुम्ही वेगाने ब्राऊजिंग करू शकाल. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
१. स्टार्ट > रन
२. regedit टाईप करून अोकेवर क्लिक करा


३. नव्याने ओपन झालेल्या विंडोमध्ये डाव्या बाजूस HKEY_CURRENT_USER\Software\Microsoft\Windows\CurrentVersion\Internet Settings मध्ये जा.
४. त्यासमोर उजव्या भागात MaxConnectionsPerServer आणि MaxConnectionsPer1_0Server शोधा.
५. त्यावर राईट क्लिक करून मॉडिफायवर क्लिक करा. आता डेसिमल सिलेक्ट करून व्हॅल्यू फील्डमध्ये ६ एंटर करा. MaxConnectionsPerServer आणि MaxConnectionsPer1_0Server साठी ही प्रोसेस फॉलो करा.
६. या दोन व्हॅल्यूज (MaxConnectionsPerServer आणि MaxConnectionsPer1_0Server) सापडल्या नाहीत तर उजव्या भागातील व्हाईट पोर्शनमध्ये राईट क्लिक करून NEW > DWORD सिलेक्ट करा. या नव्या DWORD व्हॅल्यूचे नाव MaxConnectionsPerServer असे देऊन एंटर करा. ही स्टेप रिपीट करून MaxConnectionsPer1_0Server अशा नावाने आणखी एक DWORD व्हॅल्यू तयार करा.


७. आता स्टेप ५ मध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हॅल्यूज मॉडिफाय करा.


८. regedit बंद करून सिस्टीम रिस्टार्ट करा.

हे बदल करण्यापूवर्वी एखादी साईट ओपन होण्यासाठी किती वेळ लागतो, हे नोंदवून ठेवा. Cache क्लिअर करून बदल केल्यानंतर तीच साईट ओपन होण्यास किती वेळ लागतो हे पाहा.

आपला अनुभव अवश्य कळवा.

Read the full story

, ,

हायपरलिंक्सचे ट्रेलर

December 9, 2008 0 comments

तुमचा माहितीचा प्राथमिक स्रोत कोणता, असे विचारल्यास आज १० पैकी आठ जण इंटरनेट असेच उत्तर देतील. आपण दररोज किमान पाच-पन्नास साईट्सना नक्कीच भेट देत असू. एखाद्या साईटवर असलेल्या लिंक्स इंटरेस्टिंग वाटल्या तर तेथेही जाऊन आपण अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही साईट्स आणि ब्लॉग्जवर तर अशा रिलेटेड पोस्ट्स आणि साईट्सचा खजिनाच दडलेला असतो. या पद्धतीने माहिती गोळा करताना मूळ साईटवरून इतके भरकटायला होते, की आपण काय वाचत होतो, हेच लक्षात राहत नाही. शिवाय अनेक लिंक्स क्लिक केल्यामुळे विंडोज (किंवा टॅब्ज)ची गर्दी होते. मोठ्या अपेक्षा ठेवून क्लिक केलेल्या लिंक बऱ्याच वेळा अपेक्षाभंग करतात. त्यामुळे आपला वेळही वाया जातो. त्या लिंकवर नेमकं काय आहे, याचा क्लू मिळाला तर?

इंटरक्लू हे फायरफॉक्सचे एक्स्टेंशन वापरून तुम्ही तुमची सर्फिंग प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकता. इंटरक्लू तुम्हाला लिंकचे टीझर किंवा ट्रेलर दाखवते. कसे ते सांगतो. इंटरक्लू इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जेव्हा एखाद्या साईटला भेट द्याल (उदा. न्यूयॉर्क टाईम्स) तेव्हा हायपरलिंक केलेल्या प्रत्येक इलेमेंटचे ट्रेलर तुम्हाला पाहता येईल. संबंधित लिंकवर माऊस पॉईंट केल्यानंतर काही मिलिसेकंदात त्यासमोर इंटरक्लूचा किंवा त्या साईटचा फेव्ह-आयकॉन दिसायला लागेल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मूळ विंडोत एक छोटी विंडो ओपन होईल व त्या लिंकवर काय आहे याची थोडक्यात माहिती पाहावयास मिळेल. त्यानंतर तुम्ही संबंधित लिंकवर जायचे किंवा नाही, हे ठरवू शकता.

इंटरक्लू टेक्स्ट, व्हिडीओ, पीडीएफ, इमेजेस आदी सगळ्यांचे ट्रेलर तुम्हास दाखवू शकतो. तसेच इंटरक्लूच्या छोट्या विंडोतून तुम्ही संबंधित लिंक फेव्हरेटमध्ये अॅड करू शकता, ई-मेल करू शकता, कॉपी करून घेऊ शकता, डिग, न्यूजव्हाईन, डेलिशियस किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता आणि प्रिंटही करू शकता. या छोट्या विंडोचा आकार कमी-जास्त करण्यापासून ते लिंकचे स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले करण्यापर्यंत अनेक कस्टमायजेशन्स तुम्ही यात करू शकता. त्यासाठी इंटरक्लूच्या सेटिंग्ज पाहा. थोडक्यात काय तर, मस्ट हॅव, असे हे एक्स्टेंशन आहे.
इंटरक्लू इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, , ,

वेबकॅम नसतानाही करा व्हिडीओ चॅट...

November 21, 2008 0 comments


जी-मेलने गेल्या आठवड्यात व्हिडीओ अाणि व्हॉईस चॅट हे नवे फीचर सुरू केले. यापूवर्वी व्हॉईस चॅटसाठी जी-टॉक हे अॅप्लीकेशन वापरावे लागत असे. व्हिडीओ चॅटसाठी तुम्ही स्काईप किंवा याहू मेसेंजर वापरत असाल. पण थेट ई-मेलमध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस चॅट इंटिग्रेट करून गुगलने या प्रचलित सेवांसमोर जबरदस्त स्पधर्धा निमर्माण केली आहे. तुमच्यापैकी अनेकांनी जी-मेलची ही नवी सेवा वापरून पाहिली असेलच. काय म्हणता? तुम्ही अजून ही सेवा वापरलेली नाही? का? वेबकॅम नाही म्हणून? फिकर नॉट...



साधी-सोपी टेक्नॉलॉजी नियमित वाचणाऱ्यांना ही अडचण आलीच नसेल. अॉगस्टमध्ये लिहिलेल्या एका पोस्टमध्ये मोबाईल कॅमेऱ्याला वेबकॅममध्ये रुपांतरित करणाऱ्या वीगो (वेबकॅम व्हेरेवर आय गो) या सेवेबद्दल मी माहिती दिली होती. ती पोस्ट तुमच्याकडून मिस झाली असल्यास, पुन्हा एकदा वाचा (मेरे पास 'वीगो' है) आणि जी-मेलच्या नव्या सेवेचा आनंद घ्या. याच पद्धतीने तुम्ही स्काईप, याहू मेसेंजर आणि विंडोज लाईव्ह मेसेंजर वापरूनदेखील व्हिडीओ चॅट करू शकता.

त्यापूवर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याः
१. जी-मेल व्हिडीओ आणि व्हॉईस चॅटसाठी एक छोटेसे अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागते. ते अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. फुलस्क्रीन व्हिडीओ चॅटसाठी तुम्हाला तुमचे फ्लॅश व्हर्जन अपडेट करावे लागेल.
३. कॉम्प्युटर रिस्टार्ट करा.
४. वीगो हे अॅप्लीकेशन केवळ नोकियाच्या सिरीज ६० (व्हर्जन २.० आणि ३.०) हॅंडसेट्सवर वापरता येते. कम्पॅटिबल हॅंडसेट्सच्या यादीसाठी येथे क्लिक करा.
५. वीगोचे डेस्कटॉप अॅप्लीकेश विंडोज एक्सपीवर वापरता येते. ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
६. इन्स्टॉल करण्याआधी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईलचे ब्लुटूथ अॉन करा.
७. डेस्कटॉप अॅप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातूनच एक .sis फाईल मोबाईलवर पाठवली जाते. त्यासाठी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईल पेअर्ड असल्याची खात्री करा. .sis फाईल मोबाईलवर इन्स्टॉल करा.
८. दोन्हीकडील अॅप्लीकेशन्स रन करा. मोबाईलवर अॉप्शन्समध्ये जाऊन कनेक्ट म्हटल्यानंतर डेस्कटॉप/लॅपटॉपवर व्हिडीओ दिसू लागेल.
९. आता तुम्ही जी-मेल चॅटमध्ये गेल्यास तुमच्या नावासमोर व्हिडीओ आयकॉन दिसू लागेल.
१०. एन्जॉय जी-मेल व्हिडीओ चॅट!
Read the full story

, , ,

कीप इट सेफ!

November 18, 2008 0 comments

साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या स्क्रिबिट या सेवेचा अनेक जण उपयोग करत आहेत. एका वाचकाने फाईल्स आणि फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करण्यासाठी असलेल्या सेवांची माहिती देण्याची सूचना केली आहे. आजच्या या पोस्टमध्ये मी अशा काही सेवा आणि टिप्सची माहिती देणार आहे.

मायक्रोसॉफ्ट अॉफिस फाईल्स कशा प्रोटेक्ट कराल?
मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट आदी फाईल्स पासवर्ड प्रोटेक्ट करण्यासाठी संबंधित फाईल ओपन करून फाईल अॉप्शन्समध्ये जाऊन सेव्ह अॅज करा. त्यानंतर टूल्स > अॉप्शन्स > सिक्युरिटीमध्ये जाऊन पासवर्ड एंटर करा. फाईल ओपन करण्यासाठी तसेच कॉम्प्युटर शेअर करत असल्यास फाईल मॉडिफाय करण्यासाठी स्वतंत्र पासवर्ड सेट करता येतात.

विंडोज एक्सपीवरील फाईल्स कशा प्रोटेक्ट कराल?

- जे फोल्डर प्रोटेक्ट करायचे असेल त्यावर राईट क्लिक करून प्रॉपटर्टीज सिलेक्ट करा.
- अॅडव्हान्स्ड टॅबवर जाऊन "Encrypt contents to secure data" यासमोरील बॉक्सवर चेक करा. आणि पासवर्ड सेट करा.
- आता "Apply changes to this folder only" असे म्हणून पुढे जा. संबंधित फोल्डरमधील सबफोल्डर्सना देखील पासवर्ड प्रोटेक्ट करता येते. पण तूर्त तुम्ही "Apply changes to this folder only" असे म्हणू शकता.
आता "Apply" म्हणून "OK"वर क्लिक करा.

पासवर्ड प्रोटेक्शनसाठीचे आणखी काही मार्ग
याखेरीज तुम्ही थर्ड पाटर्टी सॉफ्टवेअर्स वापरून फाईल्स आणि फोल्डर्स प्रोटेक्ट करू शकता. काही मोफत सॉफ्टवेअर्सची थोडक्यात
माहिती येथे देत आहे.


माय लॉकबॉक्सः डिजिटल लॉकर असल्यासारखी ही सेवा आहे. माय लॉकबॉक्सचे लोकेशन फिक्स केल्यानंतर तुम्ही या बॉक्समध्ये कितीही फोल्डर्स किंवा फाईल्स स्टोअर करू शकता. यात लॉक केलेल्या फाईल्स तुम्ही अनलॉक केल्याशिवाय पाहता येणार नाहीत.

फ्री हाईड फोल्डरः विंडोजमधील हाईड फोल्डर आणि फ्री हाईड फोल्डर यात फरक आहे. विंडोजमध्ये तुम्ही हाईड केलेले फोल्डर्स सेटिंग बदलून अनहाईड करता येतात, पण फ्री हाईड फोल्डर वापरल्यास हाईड केलेले फोल्डर्स पासवर्ड प्रोटेक्ट करून ठेवता येतात.
Read the full story

,

बग्ज ‘शॉर्ट’ लाईफ

November 4, 2008 3 comments

The script tried to execute a method or access a property of an incomplete object

असा काहीसा एरर मेसेज अाल्यामुळे शैलेशचे काम एकदम थांबले. तो ज्या प्रोग्राममध्ये काम करत होता त्यातील हेल्प अॉप्शनमध्येदेखील यावर सोल्यूशन नव्हते. आता काय करणार? विशिष्ट टेक्नॉलॉजीशी संबंधित फोरम्सवर अशा प्रश्नांचे उत्तर सापडण्याची शक्यता असते. पण असे फोरम शोधणेदेखील तितकेच अवघड जाते. काहीवेळेला एरर काय आहे, हेच मुळी कळत नाही. त्यामुळे सोल्यूशन शोधायचे ते कशाचे, हा प्रश्न पडतो. एरर मेसेजचा अर्थ सांगणाऱ्या आणि त्यावर सोल्यूशन देणाऱ्या बग्ड या सेवेबद्दल मी आज माहिती देणार आहे.



गेल्या वषर्षी बीटा आवृत्ती लॉंच केल्यानंतर आता बग्ड (http://bug.gd) ही सेवा खऱ्या अथर्थाने कोलॅबरेटिव्ह सेवा बनली आहे. आतापर्यंत हजारो एरर मेसेजेससाठीचे सोल्यूशन्स या सेवेमार्फत दिले गेले असून दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. बग्ड वापरणे अतिशय सोपे आहे. तुम्ही एखादी अॅक्टिव्हिटी करत असताना अचानक काहीतरी चूक घडली की तुमच्यासमोर एरर मेसेज येतो. हा एरर मेसेज कॉपी करून बग्ड डॉट कॉमवरील हेल्प विंडोत पेस्ट करा किंवा नव्याने टाईप करा. सर्चवर क्लिक केल्यानंतर संबंधित एरर कशामुळे आली असून त्यावरील सोल्यूशन (अगोदर एखाद्या युजरने दिले असल्यास) मिळेल. तुमच्या एररवर सोल्यूशन नसेल तर तुम्हाला किमान ४८ तासांसाठी थांबण्याची विनंती केली जाते. तुमच्या एररवर एखाद्या व्यक्तीने सोल्यूशन दिले की तुम्हाला ई-मेलद्वारे त्याची सूचना मिळते. बग्डचा डेटाबेस बऱ्यापैकी मोठा असल्याने बहुतांश एररवरील सोल्यूशन यात उपलब्ध आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत असाल तर तुम्ही कंपनीच्या सिस्टिममध्ये येणाऱ्या एररचा स्वतंत्र डेटाबेस करून तो संबंधित कंपनीतील कर्मचाऱ्यांशी शेअरही करू शकता. बग्डचे फायरफॉक्स एक्स्टेंशनही उपलब्ध आहे.
Read the full story

, ,

नो मोअर पिन्चेस!

November 1, 2008 4 comments

आज ही पोस्ट लिहिताना शाळेतल्या सरांची आठवण येतेय. नववी-दहावीत असताना आम्हाला भूगोल शिकवायला वाठोरे सर होते. प्रत्येक सरांची जशी एक लकब असते, तशी यांची विशिष्ट लकब होती. ते बोलताना ‘प’चा उच्चार ‘फ’ असा करायचे. म्हणजे, ‘पृथ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे,’ हे वाक्य ते ‘फृथ्वीचा ७० टक्के फृष्ठभाग फाण्याने व्याफलेला आहे,’ असे बोलायचे. सुरवातीला आम्हाला विचित्र वाटायचे, फण नंतर सवय झाली (:-)). आम्हीही एकमेकांशी तसंच बोलायला लागलो. काल सर्च करताना एक नवी साईट सापडली आणि वाठोरे सरांची प्रकषर्षाने आठवण आली.

फिन्च हे त्या नव्या साईटचे नाव. या सेवेचे मी केलेले वर्णन असेः खिशाला फिन्च (अथर्थात पिन्च) बसू नये म्हणून वापरावी अशी सेवा म्हणजे फिन्च. मागे एका पोस्टमध्ये मी फोनिफायर या सेवेबद्दल माहिती दिली होती. मोबाईलवर वेब सर्फिंग करताना पुरेसा स्पीड मिळत नाही. त्यात आपल्याला हव्या त्या साईटवर भरपूर इमेजेस आणि इतर इलेमेंट्स असली की साईट लोड होण्यास वेळही लागतो आणि जीपीआरएसचे चार्जेसही वाढतात. ज्यांच्या घरी अद्यापही डायल-अप इंटरनेट कनेक्शन्स आहेत त्यांनादेखील हेवी साईट्स लोड करताना त्रास होतो. डेटाकार्ड किंवा यूएसबी इंटरनेट वापरणाऱ्यांच्या त्रासाला तर सीमाच नाही. अशा सर्व दुःखी-कष्टी लोकांसाठी फिन्च ही सेवा उपयोगास येते. तुम्हाला जी साईट अॅक्सेस करायची आहे, ती तुम्ही फिन्चच्या माध्यमातून अॅक्सेस केली की त्यातील डिझाईन इलेमेंट्स, इमेजेस, फ्लॅश फाईल्स आदी गोष्टी बाजूला ठेवून केवळ टेक्स्ट लोड केले जाते. त्यामुळे न्यूयॉर्क टाईम्सचे १.४ एमबीचे होमपेज केवळ ८४ केबीत ओपन होते. तब्बल ९४ टक्क्यांनी साईज कमी होणे म्हणजे पैसा आणि वेळ दोन्हीची बचत.

New York Times (Original Size: 1.4mb)




New York Times (With Finch: 84 kb)




Read the full story

, ,

राज ठाकरेंचे काय होणार?

October 21, 2008 0 comments

आजचा सबंध दिवस महाराष्ट्रातील लोक राज ठाकरेंकडे लक्ष ठेवून होते. पहाटे अडीच वाजता राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक झाल्यानंतर दुपारी वांद्र्याच्या कोटर्टात आणले. त्यांच्यावर दाखल करण्यात अालेल्या विविध गुन्ह्यांत एका कोटर्टाने त्यांना जामीन दिला, तर एका कोटर्टाने नाकारला. त्यामुळे अगोदरच धास्तावलेले सर्वसामान्य लोक दिवसभर न्यूज चॅनेल्स आणि वेबसाईट्सवर नजर ठेवून होते. साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर अचानक राज ठाकरे कसे अवतरले? हा ब्लॉग कोणी हॅक तर नाही ना केला?

नाही. साधी-सोपी टेक्नॉलॉजी सुरक्षित आहे. केवळ एका नव्या अॉनलाईन सेवेची माहिती करून देण्यासाठी साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर राज ठाकरेंच्या अटकेचे उदाहरण घेतले आहे. काही प्रसंगी आपण वेबसाईट्सला अगदी चिकटून बसतो. १०-१० सेकंदांनी वेबसाईट रिफ्रेश करतो. कारण सतत काही ना काही अपडेट मिळत असतात. पण सतत रिफ्रेश करणं म्हणजे...काही वेळाने कंटाळा यायला लागतो आणि नेमक्या तेवढ्याच वेळात काहीतरी महत्त्वाची घटना घडते. क्रिकेट स्कोअर देणाऱ्या साईट्समध्ये अॉटो रिफ्रेशची सोय असते. बऱ्याच ब्राऊजरमध्येही अॉटो-रिफ्रेशची सोय असते. नसल्यास तसे प्लग-इन्स किंवा अॅड-अॉन्स असतात. उदा. फायरफॉक्ससाठी रिलोड एव्हरी हे अॅड-अॉन उपलब्ध आहे. पण अशी अॅड-अॉन्स वापरल्यामुळे ब्राऊजरमधील सर्व साईट्स सतत रिफ्रेश होत राहतात. याची आपल्याला गरज नसते. केवळ न्यूज साईट्स किंवा सतत अपडेट होणाऱ्या साईट्स रिफ्रेश व्हाव्यात, ही आपली गरज असते. त्यावेळी तुम्ही साईट रिलोडर ही अॉनलाईन सेवा वापरू शकता.




साईट रिलोडरमध्ये तुम्हाला हव्या त्या साईट्सची यादी तुम्ही तयार करून ठेवू शकता. साईट रिलोडरवर साईन इन होण्यासाठी तुम्ही गुगलचे अकाऊंट वापरू शकता. साईन इन झाल्यानंतर तुम्ही हव्या त्या साईटची यादी तयार करून सेव्ह करू शकता. साईट रिलोडर वापरण्यापूवर्वी पॉप-अप ब्लॉकर डिअॅक्टिव्हेट करावे लागेल किंवा अॉल्वेज अलो पॉप-अप्स फ्रॉम साईट रिलोडर असा अॉप्शन वापरावा लागेल. एखादी साईट किती वेळाने रिफ्रेश व्हावी, यासाठी तुम्ही पाच सेकंदांपासून ३० मिनिटांपर्यंतचा पयर्याय निवडू शकता.
Read the full story

,

जी-मेलमध्ये इमेज कशी प्लेस कराल?

September 26, 2008 2 comments

तुम्हाला अनेक फॉरवर्ड ई-मेल्स येत असतील. फॉरवर्ड ई-मेल्समध्ये अनेकदा इमेजेस असतात. जी-मेलवरून असे मेल पाहताना Display Images Below असा अॉप्शन येतो. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्या मेलसोबत अालेल्या इमेजेस पाहू शकतो. या इमेजेस अॅटॅचमेंट स्वरूपात आलेल्या नसतात. त्या मेलमध्येच एम्बेड केलेल्या असतात. जी-मेलमध्ये एचटीएमएल फॉरमॅटिंगचा अॉप्शन नसल्याने तुम्हाला डेस्कटॉपवर असणाऱ्या इमेजेस थेट मेल बॉडीमध्ये प्लेस करता येत नाहीत. पण एक सोपी ट्रिक वापरून तुम्ही हे साध्य करू शकता.

तुम्ही आऊटलूक किंवा तत्सम डेस्कटॉप मेल क्लाएंट वापरत असाल आणि त्यावर कोणतेही मेल अकाऊंट Configure केलेले असेल तर तुम्ही थेट बॉडीमध्ये इमेजेस प्लेस करू शकता. कारण अशा क्लाएंट्समध्ये एचटीएमएल अॉप्शन असतो. अथर्थात यासाठी हा अॉप्शन अॅक्टीव्ह असायला हवा.

डेस्कटॉपवरील एखादी एमेज जी-मेलच्या बॉडीमध्ये प्लेस करायची असल्यास सर्वप्रथम तुम्हाला ती एखाद्या इमेज-होस्टिंग साईटवर होस्ट करावी लागेल. उदा. इमेजशॅक किंवा पिकासा वेब अल्बम. इमेज होस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची एक लिंक मिळेल. ही लिंक दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करा. तुम्ही अपलोड केलेली इमेज डिस्प्ले होईल. आता ही इमेज थेट जी-मेलच्या कॉम्पोझ बॉक्समध्ये ड्रॅग करा. दुसऱ्या विंडोएेवजी दुसऱ्या टॅबमध्ये इमेज ओपन केल्यास Ctrl-A करून नंतर Ctrl-C (अर्थात सिलेक्ट अॉल आणि कॉपी) करावे. आता कॉम्पोझ बॉक्समध्ये ज्या ठिकाणी इमेज प्लेस करायची आहे तेथे कर्सर नेऊन Ctrl-V (पेस्ट) करावे.



यावरून एक लक्षात येईल की जी-मेलच्या कॉम्पोझ बॉक्समध्ये वेबवर असलेली कोणतीही इमेज प्लेस करता येते. त्यामुळे इतर साईटवरील इमेज प्लेस करायची असल्यास ती डेस्कटॉपवर सेव्ह न करता थेट कॉम्पोझ बॉक्समध्ये ड्रॅग करावी. कॉम्पोझ बॉक्समध्ये इमेज प्लेस केल्यानंतर इमेज रिसाईझचे अॉप्शनही तुम्हाला पाहायला मिळतील.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे वाचक अनिकेत वैद्य यांनी आणखी एका ट्रिकचा उल्लेख केला आहे. ती अशीः
गुगल डॉक्समध्ये जाऊन नवे डॉक्युमेंट क्रिएट करा. मेनूबारमधून इन्सर्ट > पिक्चर सिलेक्ट करून इमेज अॅड करा. इथे प्लेस केलेली इमेज Ctrl-A करून सिलेक्ट करा व जी-मेल कॉम्पोझ बॉक्समध्ये प्लेस करा.



Read the full story

,

बडे मियॉं, छोटे मियॉं!

September 20, 2008 0 comments

यूआरएल शॉर्टनिंग सेवेबद्दल तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही या सेवा वापरतही असाल. एखादी भलीमोठी लिंक दुसऱ्याला पाठवण्यापेक्षा २०-२५ कॅरेक्टर्समधली छोटी लिंक पाठवणे केव्हाही सोपं. या सेवेचा जो फायदा आहे त्याचा गैरफायदाही अनेक जण घेऊ शकतात. शॉर्ट केलेल्या यूआरएलवरून तुम्ही कोणत्या साईटवर जाणार आहात याचा कोणताही पत्ता लागत नाही. अशावेळी तुम्ही एखाद्या पोर्न साईटवर किंवा तुमच्या कॉम्प्यूटरला घातक ठरेल अशा एखाद्या साईटवर रिडायरेक्ट होण्याची शक्यता असते. यावर उपाय काय?



नेमका हाच प्रश्न डोक्यात ठेवून लॉंग यूआरएल ही सेवा तयार करण्यात आली. या प्रश्नावरचे उत्तर म्हणजे शॉर्ट यूआरएल डिकोड करून पाहणे. अथर्थात मूळ यूआरएल पाहणे. तुमच्या जवळच्या मित्राने किंवा सहकाऱ्याने पाठवलेली यूआरएल आक्षेपार्ह नसेल, पण अनोळखी ई-मेलवरून आलेली यूआरएल किंवा एखाद्या ब्लॉगवरील यूअारएल क्रॉसचेक करण्यासाठी आपण लॉंग यूआरएल वापरू शकतो. उदा. एखाद्याने तुम्हाला http://is.gd/w अशी यूअारएल पाठवली. या शॉर्ट यूआरएलची मूळ लिंक कोणती आहे हे पाहण्यासाठी तुम्ही ही यूआरएल लॉंग यूआरएलच्या बॉक्समध्ये पेस्ट करा. एक्स्पान्डवर क्लिक करून तुम्ही याची मूळ लिंक http://google.com ही आहे हे पाहू शकता. खात्री झाल्यानंतर तुम्ही संबंधित साईटवर जाऊ शकता.

यूअारएल शॉर्टनिंग सेवेसंबंधी अधिक माहितीसाठी वाचाः शॉर्ट अॅंड स्वीट
Read the full story

,

हिट मी लॅटर

September 17, 2008 2 comments



काही वेळा आपण कामात इतके व्यस्त असतो की ई-मेल पाहायला सुद्धा वेळ मिळत नाही. जी काही दोन-पाच मिनिटं मिळतात त्यात फक्त कोणाकडून मेल आलेले आहे, एवढंच पाहणं होतं. किंवा आपण एक दोन दिवस रजेवर गेलो की आल्यानंतर पन्नास-शंभर मेल येऊन पडलेले असतात. या गदर्दीत एखादा महत्त्वाचा मेल मिस होण्याची शक्यता असते. अशावेळी हिट मी लॅटर ही सेवा तुमच्या कामास येऊ शकते.



हिट मी लॅटरद्वारे तुम्हाला पुन्हा मेल पाठवण्याची व्यवस्था केली जाते. कशी ते सांगतो. उदा. तुम्हाला आज कामाचा प्रचंड ताण आहे आणि मेल पाहण्यासही वेळ नाही. मेलबॉक्स चेक करण्यासाठी म्हणून तुम्ही फक्त पाच मिनिटं काढू शकलात. आलेल्या वीसेक मेल्सपैकी पाच-सहा मेल्स महत्त्वाचे असतात. अशा वेळी संबंधित मेल्स तुम्ही 24@hitmelater.com या अॅड्रेसवर पाठवून द्या. चोवीस तासांनंतर हिट मी लॅटरद्वारे पुन्हा मेल पाठवण्याची व्यवस्था केली जाते. चोवीसच्या जागी तुम्ही ५ किंवा ४५ लिहिलंत तर संबंधित मेल ५ किंवा ४५ तासांनंतर पुन्हा तुम्हाला पाठवला जाईल. तुम्ही friday@hitmelater.com वर मेल फॉरवर्ड केल्यास आजनंतर लगेच येणाऱ्या शुक्रवारी सकाळी संबंधित मेल तुम्हाला पुन्हा पाठवला जाईल. हिट मी लॅटर ही सेवा वापरण्यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करावे लागत नाही. ही सेवा अत्यंत सुरक्षित असल्याचा दावाही या कंपनीने केला आहे.
Read the full story

,

लाईटवेट मेल

September 10, 2008 0 comments

कधी कधी इंटरनेटची स्पीड इतकी कमी असते की गुगलसुद्धा ओपन होण्यात अडचण येते. अशा वेळी आपल्याला एखादा अर्जंट ई-मेल करायचा असेल तर?



जी-मेल ओपन होताना अडचण येत असेल तर तुम्ही बेसिक एचटीएमएल व्ह्यू अॉप्शन सिलेक्ट करू शकता. पण त्याहूनही लाईट अॉप्शन हवा असेल तर तुम्ही जी-मेल मोबाईल ट्राय करू शकता. जी-मेल मोबाईल हे सर्वांत लाईट अॅप्लीकेशन आहे. जी-मेल मोबाईल केवळ मोबाईलवरंच वापरावं असं नाही. तुम्ही कोणत्याही ब्राऊजरमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करू शकता. त्यासाठी http://m.gmail.com यावर क्लिक करा. तुम्ही एक स्वतंत्र विंडोमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करून ठेवू शकता. याच पद्धतीने तुम्ही याहू मेल (m.yahoo.com), एमएसएन मेल (mobile.msn.com) आदी सहजरित्या वापरू शकता. मोबाईलवर आणि पीसीवरदेखील!
Read the full story

,

फसवणूक जी-मेलची!

August 10, 2008 8 comments

आजकाल बहुतांश जण जी-मेल वापरतात. जी-मेलमधील सोयी-सुविधांमुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. सोपा आणि सुटसुटीत इंटरफेस, चॅटिंग, पुश मेल (POP3/IMAP), मेल मर्ज अशा अनेक सुविधांमुळे अनेक लोक जी-मेलवर शिफ्ट झाले. त्यासमोर इतर अकाऊंट्स खरोखर फिके पडले. जी-मेलमध्ये कमीत कमी स्पॅम मेल्स येतात आणि जे काही येतात तेही फिल्टर होऊन थेट स्पॅम फोल्डरमध्ये जातात. त्यामुळे वेळेची बचत होते. एवढी सगळी फीचर्स असली तरी एक सुरक्षेच्या कारणास्तव गुगलने एक्झिक्युटेबल अर्थात .EXE फाईल्स पाठविण्याची सोय जी-मेलमध्ये ठेवलेली नाही. पण एक अगदी सोपी ट्रिक वापरून तुम्ही हेही करू शकता...

.EXE फाईल .ZIP करून पाठवली तर? पण जी-मेल तेवढे इंटेलिजंट नक्कीच आहे. .ZIP मध्ये .EXE असेल तरीदेखील आपल्याला ती फाईल जी-मेलमधून पाठविता येत नाही. अशा परिस्थितीत .EXE फाईल पाठविण्यासाठी केवळ एक्स्टेंशन बदलावे. उदा. तुम्हाला xyz.exe ही फाईल पाठवायची आहे. .EXE असल्यामुळे जी-मेल ही फाईल अॅटॅचमेंट म्हणून अॅक्सेप्ट करणार नाही. अशा वेळी .EXE च्या एेवजी .doc किंवा .exx किंवा कोणतेही रॅंडम एक्स्टेंशन द्या. म्हणजे हीच फाईल xyz.exx अशी होईल. आता तुम्ही ही फाईल अॅटॅचमेंट म्हणून पाठवू शकता. रिसीव्ह करणाऱ्याने ही फाईल रिनेम करून एक्स्टेंशन पुन्हा .EXE करावे. अॅज सिंम्पल अॅज दॅट!



Read the full story

,

पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्टर

August 7, 2008 1 comments

एखाद्या विशिष्ट विषयावर सर्च करत असताना आपण अनेक वेगवेगळ्या फॉरमॅटमधील फाईल्स डाऊनलोड करत असतो. म्हणजे काही माहिती आपण थेट वेबसाईटवरून घेतो. काही माहितीसाठी वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट फाईल्स डाऊनलोड करतो. काही वेळा पीडीएफ फाईल्सही डाऊनलोड करतो. आता नेमकी या पीडीएफ फाईलमधील एखादी इमेज आपल्याला कुठेतरी वापरण्यासाठी हवी असते. बोंबला...आता आली का पंचाईत? ही इमेज कशी मिळवायची?


मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल किंवा पॉवपॉईंट यातील एखादी इमेज तुम्हाला मूळ स्वरूपात हवी असल्यास ती फाईल सेव्ह अॅज एचटीएमएल करा. तुम्ही जिथे फाईल सेव्ह कराल तिथे एका एचटीएमएल फाईलसह एक नवे फोल्डर तयार होईल. त्यात तुम्हाला हव्या असलेल्या इमेजेस मूळ स्वरूपात (.jpg, .gif वगैरे) सेव्ह झालेल्या असतील. आता प्रश्न उरतो तो पीडीएफ फाईल्सचा. पीडीएफमधील इमेजेस मूळ स्वरूपात कशा मिळवता येतील? वरील पद्धतीने इमेजेस मिळवता येतील. पण त्यासाठी तुमच्याकडे अॅडोब अक्रोबॅट असायला हवे. अॅडोब अॅक्रोबॅटची तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही आणखी एका मार्गाने पीडीएफ फाईलमधील इमेजेस एक्स्ट्रॅक्ट करू शकता.



सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट नावाचे एक छोटेसे अॅप्लीकेशन वापरून तुम्ही पीडीएफ फाईलमध्ये असलेल्या TIF, JPEG, BMP, GIF, PNG, TGA, PBM, PPM, PCX या फॉरमॅटमधील इमेजेस एक्स्ट्रॅक्ट करू शकता.
एवढेच नव्हे तर हे अॅप्लीकेशन वापरून एनक्रिप्ट केलेल्या पीडीएफ फाईल्समधील इमेजेसही तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट विंडोज एनटी/२०००/एक्सपी/२००३ आणि व्हिस्टालाही सपोर्ट करते.

सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, , ,

मल्टिपल जी-टॉक!

August 4, 2008 2 comments



एकावेळी दोन किंवा अनेक जी-मेल अकाऊंट्स कशी अॅक्सेस करावीत, यासंदभर्भातील माहिती मी या अगोदर दिली होती (वाचाः दोघांत तिसरा...). तुम्ही दोन किंवा त्याहून अधिक जी-मेल अकाऊंट्स वापरत असाल तर त्या-त्या अकाऊंट्ससाठी जी-टॉक अॅक्सेस करताना तुमची नक्कीच पंचाईत होत असेल. म्हणजे, एका अकाऊंटवरून लॉग अाऊट होऊन दुसऱ्यावर लॉग-इन व्हावं लागत असेल. यावर उपाय आहे. एकावेळी मल्टिपल जी-टॉक अकाऊंट्स अॅक्सेस करण्यासाठी पुढे दिलेली साधी-सोपी ट्रिक वापरा.



ही ट्रिक म्हणजे इथिकल हॅकिंग आहे. जी-मेल, जी-टॉकसाठी असे अनेक हॅक्स उपलब्ध आहेत. या हॅकला GTalk Polygamy असे म्हणतात. यात तुम्ही एकदा डाऊनलोड केलेला जी-टॉक क्लाएंट एकाचवेळी मल्टिपल अकाऊंट्स अॅक्सेस करण्याससाठी वापरू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो कराः
सवर्वांत अाधी जी-टॉक क्लाएंट डिफॉल्ट लोकेशनला (म्हणजे c:\program files\google\google talk\googletalk.exe येथे) सेव्ह आहे किंवा कसे, हे तपासून घ्या

१. डेस्कटॉपवर जाऊन राईट-क्लिक करा. त्यानंतर ‘न्यू’वर कर्सर नेऊन ‘शॉर्टकट’ सिलेक्ट करा.
२. आता टेक्सबॉक्समध्ये पुढील ओळ पेस्ट करा (अवतरणचिन्हासह)
"c:\program files\google\google talk\googletalk.exe" /nomutex
३. नेक्स्टवर क्लिक करा.
४. या शॉर्टकटला तुम्ही हवे ते नाव देऊ शकता. उदा. जी-टॉक १, जी-टॉक २ किंवा तुमचे यूजरनेम
त्यानंतर ओकेवर क्लिक करा.
५. आता तुमच्याकडे जी-टॉकचे दोन स्वतंत्र शॉर्टकट आहेत. त्यावरून तुम्ही दोन वेगवेगळ्या अकाऊंट्सवर लॉग-इन होऊ शकता.
Read the full story

,

रविवारची साफसफाई

August 3, 2008 0 comments

रविवार म्हणजे साफसफाईचा दिवस. घरातल्या साफसफाईसोबत आपण आपल्या गॅजेट्सची, कॉम्प्युटरची, मेलबॉक्सेसची आणि सोशल नेटवर्किंगवरील आपल्या प्रोफाईल्सचीही साफसफाई करणे आवश्यक आहे. यासाठी मी अगोदरच्या काही पोस्ट्समध्ये माहिती दिली होती. ज्यांचे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि ज्यांचा मित्रपरिवार दांडगा आहे, त्यांना दररोज ढिगाने अॅप्लीकेशन रिक्वेस्ट्स येत असणार. प्रत्येक रिक्वेस्ट पाहून ती अॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायची म्हणजे वेळही तितकाच लागणार. पण आता तुम्ही एक क्लिकवर सगळ्या रिक्वेस्ट्स (फ्रेंड, इव्हेंट आणि ग्रुप इन्व्हाईट्स वगळून) इग्नोअर करू शकता.

अनेक सदस्यांच्या तक्रारींची दखल घेऊन फेसबुकने जानेवारीत Ignore All हे फीचर अॅड केले. एका ब्लॉगरने दिलेल्या माहितीनुसार २५ किंवा त्याहून अधिक रिक्वेस्ट्स अाल्यानंतरच हे फीचर अॅक्टीव्ह होते. पंचवीसहून कमी रिक्वेस्ट्स असणाऱ्यांनी Ignore All हे बुकमार्कलेट वापरावे. हे वापरणे अतिशय सोपे आहे. Ignore All वर राईट क्लिक करून ते तुमच्या बुकमार्क फेव्हरेट्समध्ये अॅड करा. फेसबुक रिफ्रेश केल्यानंतर रिक्वेस्टच्या शेजारी Ignore All अशी लिंक दिसू लागेल.



कॉम्प्युटरची सफाई करण्यासाठी वाचाः मस्ट हॅव (सीसीक्लीनर)
डुप्लीकेट फाईल्स डिलीट करण्यासाठी वाचाः हार्डडिस्कला घेऊ द्या मोकळा श्वास!
मेल बॉक्समध्ये स्पॅम नको असल्यास वाचाः स्टे अवे फ्रॉम स्पॅम
Read the full story

,

रॅम एक्स्प्रेस - भाग २

August 1, 2008 0 comments


अॅप्लीकेशन्सची संख्या वाढली की आपला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप धापा टाकायला लागतो. अॅडोबचे एखादे अॅप्लीकेशन (विशेषतः फोटोशॉप किंवा ड्रीमवीव्हर) क्लिक करून ओपन होईपर्यंत आपण एक कप चहा तयार करून घेऊ शकतो. रॅम म्हणजे काय चीज असते, हे त्यावेळी आपल्याला कळतं. त्यामुळे एखाद्याने नवा लॅपटॉप घेतला आणि त्याची रॅम २ जीबी आहे असं कळलं की अस्वस्थ व्हायला लागतं - कारण आपण ५१२ एमबीवर कामाचा गाडा ओढत असतो. विंडोज व्हिस्टा वापरणाऱ्यांना रेडीबुस्ट या फीचरमुळे रॅमच्या कटकटीतून मुक्ती मिळाली आहे. या अॅप्लीकेशनचा वापर करून व्हिस्टाचे ग्राहक साधा पेनड्राईव्ह वापरून रॅम बूस्ट करू शकतात. पण रेडीबुस्ट हे फक्त व्हिस्टासाठी आहे. एक्सपी वापरणाऱ्यांचे काय?

रेडीबुस्टच्याच धतर्तीवर तयार केलेले ईबुस्टर हे अॅप्लीकेशन एक्सपीसाठी रॅम बुस्टर म्हणून वापरता येऊ शकते. पेनड्राईव्हमधील फ्लॅश मेमरी वापरून तुमच्या मशीनची स्पीड वाढविण्याचे काम ईबुस्टरद्वारे केले जाते. रेडीबुस्टचा एक तोटा म्हणजे त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या पेनड्राईव्ह्जची गरज असते. ईबुस्टरसाठी तुम्ही कोणताही साधारण पेनड्राईव्ह वापरू शकता. इतकेच नव्हे तर, डिजिटल कॅमेरा आणि मोबाईल फोनमध्ये वापरले जाणारे फ्लॅश मेमरी कार्डही (CF, SD/SDHC, MMC, xD, इ.) तसेच एक्स्टर्नल हार्ड डिस्कही यासाठी वापरता येते. नेहमी वापरल्या जाणाऱ्या अॅप्लीकेशन्सच्या आकडेवारीचे विश्लेषण ईबुस्टरद्वारे केले जाते. या आकडेवारीच्या आधारे सदर अॅप्लीकेशन ओपन करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या फाईल्स कॅश मेमरीत ठेवल्या जातात. त्यामुळे अॅप्लीकेशन ओपन होताना लागणारा वेळ वाचतो. यामुळे मशीन बूट होण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही लक्षणीय घट होते.



ईबुस्टरचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही एकावेळी चार एक्स्टर्नल डिव्हायसेस वापरून रॅम बूस्ट करू शकता. आणि प्रत्येक डिव्हाईसवर ४ जीबीपर्यंत कॅश मेमरी राहू शकते.
ईबुस्टर हे पेड अॅप्लीकेशन असले तरी ट्रायल व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ते अनंत काळासाठी वापरू शकता. एकदा मशीन बूट केल्यानंतर केवळ चार तास हे अॅप्लीकेशन वापरता येते. म्हणजे दिवसातून केवळ एकदा रिस्टार्ट करून तुम्ही अॉफिसमध्ये हे अॅप्लीकेशन वापरू शकता. तेव्हा वाट न बघता ईबुस्टर डाऊनलोड करा. आणि तुमच्या २५६, ५१२ एमबीच्या मशीनला समुद्र पार करण्यासाठी या नव्या ‘रॅम’सेतूचा आधार द्या.

रॅम बुस्ट करण्यासाठी आणखी एक ट्रिक, वाचाः रॅम एक्स्प्रेस
Read the full story