Showing posts with label mobile. Show all posts
Showing posts with label mobile. Show all posts
,

डाऊनलोडः Nokia N97 आणि E75 च्या रिंगटोन्स!

July 4, 2009 0 comments

नोकिया N97 या नव्या मोबाईल फोनची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. हा मोबाईल गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला खरा; पण ३५ हजार रुपये किमतीचा टॅग पाहून किती लोक त्याकडे वळतील याबद्दल शंकाच आहे. अर्थात, या मोबाईलची थेट स्पर्धा आयफोनशीच असणार आहे, त्यामुळे याची किंमत ३०-३२ हजारांच्या पुढे असेल, असे वाटत होतेच. कोणताही नवा मोबाईल बाजारात आला की तो घ्यावासा वाटतोच. एक-दोन हजारांनी बजेट पुढे-मागे करून तो फोन विकत घेण्याची आपली तयारीही असते. पण आकडा तीस हजारांच्या पुढे गेला की मागे सरकायला होतं. मग सध्याचा मोबाईल काय वाईट आहे, असं वाटायला लागतं.

यात जे आहे तेच नव्या मोबाईलमध्ये आहे. शिवाय नवा मोबाईल जरा मोठा आणि जड वाटतोय, असे म्हणून आपणंच आपल्या मनाची समजूत काढत राहतो. तर, ज्यांना N97 किंवा त्याच्या अगोदर आलेला E75 यापैकी एखादा मोबाईल आवडलेला आहे, घेण्याची इच्छाही होतेय, पण ‘बायको’ किंवा ‘खिसा’ परवानगी देत नाहीये, अशांसाठी एक खास अॉफर आहे - या दोन्ही मोबाईल फोनकरता तयार केलेल्या रिंगटोन्स तुम्ही तुमच्या सध्याच्या मोबाईलवर वापरू शकता.

कधी-कधी दुधाची तहान ताकावर भागवावी लागते, त्यातलाच हा प्रकार. सिंबियन ब्लॉगने या दोन्ही फोनसाठीच्या रिंगटोन्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात काही रिंगटोन्स नेहमीच्याच असल्या तरी त्यात जरासे बदल केल्याचे ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल. सर्वसाधारण रिंगटोन्सपेक्षा या रिंगटोन्स अधिक मॉडर्न आणि पॉलिश्ड वाटतात. N97 च्या पॅकेजमध्ये भारतीय बाजाच्या काही रिंगटोन्सही आहेत.

या सर्व रिंगटोन्स .aac फॉरमॅटमध्ये आहेत. तुमच्या मोबाईलवर या फॉरमॅटमधील रिंगटोन्स चालत असतील तर तुम्ही N97 आणि E75 च्या रिंगटोन्सचा आनंद घेऊ शकता.

Download:
Nokia N97 Ringtones
Nokia E75 Ringtones
Also Download:
Nokia N97 Theme by_Mandeep

Read the full story

, , ,

गुगलचे ‘अॉल-इन-वन’ मोबाईल अॅप्लिकेशन

June 22, 2009 1 comments

आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या गुगलच्या अनेक सेवा आपण रोज वापरत असतो. गुगल सर्च खेरीज, जी-मेल, यू ट्यूब, गुगल रीडर, अॉर्कुट, गुगल कॅलेंडर, न्यूज, ब्लॉगर आदी सेवाही कमी-अधिक प्रमाणात निश्चित वापरल्या जातात. भारतात ज्या वेगाने कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा प्रसार होतोय त्याहून कित्येक जास्त पटीने मोबाईल आणि मोबाईल इंटरनेटचा प्रसार होतोय. फिडेलिटी इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण मोबाईलधारकांपैकी १० टक्के लोक मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात.

हा आकडा जवळपास सव्वाचार कोटींवर जातो. यातील सुमारे ८० लाख लोक नियमित (म्हणजे अगदी दररोज) मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात, अशी आकडेवारीही फिडेलिटीने जाहीर केली आहे. थोडक्यात काय तर, अख्खा भारतंच इंटरनेटसाठी आता मोबाईलवर अवलंबून राहणार आहे. आकडेवारीतून बाहेर पडून आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात.

मोबाईलचे महत्त्व ओळखून गुगलने त्यांच्या एकेक सेवेसाठीचे मोबाईल अॅप्लिकेशन्स लाँच करणे सुरूच ठेवले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी अॉर्कुटचे मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले. जी-मेल, यूट्यूब, गुगल मॅप्स आदी अॅप्लिकेशन्स अगोदर उपलब्ध होते. पण प्रत्येक अॅप्लिकेशनचा आयकॉन शोधून त्यावर क्लिक करायची गरज आता उरली नाहीये. सिंबियन (S60) अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या मोबाईल फोनसाठी गुगलचे मास्टर मोबाईल अॅप्लिकेशन (गुगल मोबाईल अॅप) नुकतेच सादर करण्यात आले आहे. आयफोन, ब्लॅकबेरी आणि विंडोज मोबाईलसाठी हे अॅप्लिकेशन अगोदरंच उपलब्ध होते.
गुगलच्या तमाम सेवा तुम्ही या मास्टर अॅप्लिकेशनमधून अॅक्सेस करू शकता. अर्थात, त्यातील विविध अॅप्लिकेशन्स अगोदर इन्स्टॉल करून घ्यावे लागतील. सर्च क्वेरी सजेशन्स आणि लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स ही मोबाईलची अॅपची खास वैशिष्ट्ये. हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर अगोदर तुमचा देश सिलेक्ट करावा लागतो. यात तुम्ही भारत सिलेक्ट केल्यास गुगलच्या सर्व अॅप्लिकेशनचा (उदा. यू ट्यूब) अॅक्सेस मिळणार नाही. तो हवा असल्यास देश विचारल्यास यूनायटेड स्टेट्स सिलेक्ट करा. या सेटिंग्ज तुम्ही नंतर बदलू शकता. लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स हवे असल्यास मात्र तुम्हाला तुम्ही राहत असलेला देशंच सिलेक्ट करावा लागेल.

गुगल मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये m.google.com असे टाईप करा.
सोनी-एरिक्सन, सॅमसंग मोबाईलधारकांसाठी स्वतंत्र अॅप्लिकेशन नसले तरी हीच लिंक वापरून एका ठिकाणाहून गुगलच्या सर्व सेवा अॅक्सेस करता येऊ शकतील.

अधिक माहितीसाठीः

Official Google Mobile Blog
Google Mobile Page
Read the full story

, , ,

इंटेलिजंट बिझनेससाठी...

June 3, 2009 4 comments

डेंटिस्टपासून ते मोबाईल स्टोअर शोधण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी ‘गुगल’ वापरणे आजकाल सोयीचे जाते. या अशा साऱ्या गोष्टी असतात यलो पेजेसमध्ये मिळतात; पण तुमच्या-माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं अशी जाडजूड यलो पेजेस डिरेक्टरी बाळगत नाहीत. एखादं चांगलं चायनीज रेस्टॉरंट शोधण्यासाठी आपण मोबाईलचा पर्याय अधिक पसंत करू. तुमच्या मोबाईलवर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही गुगल लोकलच्या आधारे सर्च करू शकता. यासाठी गुगलने ठिकठिकाणच्या आघाडीच्या यलो पेजेस कंपन्यांशी अगोदरंच टाय-अप्स केले आहेत. पण गल्लीतला पानवाला, इस्त्रीवाला, किरकोळ किराणा दुकानदार, हेअर कटिंग सलून, गॅरेजेस, पंक्चर काढून देणारे आदींची माहिती या ‘यलो पेजेस’मध्येदेखील नसते. अशा प्रकारच्या कोणत्याही व्यावसायिकास आपला व्यवसाय गुगल लोकल आणि गुगल मॅप्सवर आणण्याची सुविधा गुगलने लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून अगोदरंच उपलब्ध करून दिली आहे. आता अशा व्यावसायिकांसाठी गुगलने अॅनालिटिक्ससारखी नवी सेवाही देऊ केली आहे.
लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दुकानाची किंवा सेवेची माहिती देऊन (उदा. Anil Fruit Shop, Kumar Parisar Society, Kothrud, Pune) तुमचा व्यवसाय गुगल लोकल वर लिस्ट करू शकता. यानंतर संबंधित शहरातील किंवा प्रभागातील व्यक्तीने त्या अनुषंगाने सर्च केल्यास (Fruit Shop Kothrud) त्याला रिझल्टपेजवर तेथील व्यावसायिकांची माहिती व नकाशावर त्यांचे ठिकाण दिसेल. तुम्ही मोबाईलवरून सर्च करत असाल तर रिझल्टमध्ये डिस्प्ले झालेल्या टेलिफोन किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला थेट कॉलही करता येतो. तुम्हाला काही अॉफर्स द्यायच्या असतील तर त्याही यातून देता येतात. येणारे ग्राहक तुमच्या सेवेबद्दल त्यांच्या प्रतिक्रियाही येथे देऊ शकतात. या माध्यमातून सर्च करून हवे ते दुकान किंवा सेवा शोधणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढतंच जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही तुमचा व्यवसाय किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा व्यवसाय (उदा. तुमचे फॅमिली डॉक्टर, तुमचा किराणा दुकानदार, ठरलेला पाणीपुरीवाला वगैरे) गुगल लोकलवर लिस्ट करू शकता.


या सेवेत गुगलने नुकतेच अॅनालिसिस डॅशबोर्डही अॅड केले आहे. याचा मुख्य फायदा असा की कोणत्या कीवर्डसाठी किती लोक तुमच्या लिस्टिंगवर आले, कुठून आले याची थेट माहिती तुम्हाला मिळू शकते. म्हणजे फ्रुट शॉपसाठी लोकांनी Fresh Fruits, Fruits, Vegetable and Fruits, Apple, Alphonso, Mangoes यापैकी कोणत्या कीवर्डने सर्च केले हेही तुम्हाला समजू शकते. यावरून तुम्हाला एखाद्या वस्तूच्या मागणीचा अंदाजही येऊ शकतो. म्हणजे एखादे महागडे फळ तुमच्या दुकानात नसेल आणि त्या फळाच्या नावाने सर्वाधिक सर्च होतोय, असे लक्षात आले तर तुम्ही ते फळ तुमच्या दुकानात ठेऊन चांगला व्यवसाय करू शकता. याचप्रमाणे लोक कोणत्या भागातून तुमच्या दुकानात येतात, हेही या डॅशबोर्डवरून कळू शकते. ज्या भागातून सर्वात जास्त लोक येतात त्या भागात एखादी शाखा सुरू करण्यास हरकत नाही, असा अंदाजही तुम्ही लावू शकता. स्थानिक व्यावसायिकांसाठी गुगलची ही सेवा नक्कीच उपयोगाची ठरणार आहे. या गटात मोडणाऱ्या किती लोकांकडे इंटरनेट असेल याबद्दल शंका असली तरी तुम्ही-आम्ही आपल्या जवळच्या लोकांना ही सेवा वापरून पाहण्याचा सल्ला देऊन मार्गदर्शन नक्कीच करू शकतो!

(माझाच अनुभव सांगतो. मागे एकदा डेंटल क्लिनिंगसाठी मी माझ्याच एरियातील डेंटिस्ट्स शोधत होतो. सर्चमध्ये त्या एरियातील पाच-सहा डेंटिस्ट्स सापडले. त्यापैकी दोन-तीन जणांकडे मी जाऊन आलो. पण त्यातील दोन बंद होते आणि एक डॉक्टर क्लिनिंग करत नव्हते. फिरता-फिरता मला आणखी एक डेंटिस्ट सापडले. मी त्यांच्याकडे गेलो. क्लिनिंग झाल्यानंतर मी डॉक्टरांना म्हणालो की, डॉक्टर, तुमच्या शेजारच्या तीन-चार डॉक्टरांची नावं गुगल सर्चमध्ये येतात; पण तुमचं नाव त्यात नाहीये. त्यांना याचा काही गंध नव्हता. पण त्यांच्या डेस्कवर लॅपटॉप होता. नशीबाने इंटरनेटही होते. मी त्यांचे क्लिनिक गुगल लोकलवर लिस्ट केले. डॉक्टर खूश झाले. त्यांनी माझ्याकडून शंभर रुपये कमी घेतले आणि पुढच्या दिवाळीला ग्रिटींगही पाठवले!)

आणखी एकः
मित्रांनो, २७ मे रोजी साधी-सोपी टेक्नॉलॉजीला एक वर्ष पूर्ण झाले. जानेवारीपर्यंत जोमाने लिहिल्यानंतर थोडासा ब्रेक हवा होता. त्यामुळे ‘गुगल लॅटिट््यूड’ या शेवटच्या पोस्टनंतर लिखाण केले नाही. पण ब्लॉगला रोज भेट देणाऱ्यांची संख्या उत्साहवर्धक होती. त्यानंतरच्या चार महिन्यांत दरमहा हजारभर हिट्स ब्लॉगला मिळत होत्या. आजपासून पुन्हा एकदा नव्याने लिखाण करण्याचा विचार आहे.
तुमच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत...
Read the full story

,

लोकेशन शेअरिंगसाठी ‘गुगल लॅटिट्यूड’

February 5, 2009 2 comments

फेसबुक, ट्विटर यांच्या मोबाईल एडिशन्स वेगाने लोकप्रिय होत असतानाच आता गुगलने मोबाईलच्या वापराला एक नवी दिशा प्राप्त करून दिली आहे. गुगलने ‘मॅप्स’ प्रोजेक्ट अंतर्गत ‘लॅटिट्यूड’ या नव्या प्रॉडक्टची आज घोषणा केली. पुण्यात जंगली महाराज रोडवर फिरताना माझ्या एका मित्राने त्याच्या क्लाएंटला तो सोलापूर रोडवर टॅफिक जॅममध्ये अडकल्याचे सांगितल्याचे मला आठवतेय. पण 'गुगल लॅटिट्यूड'वरून तुम्ही तुमच्या मित्रांची अशी फसवणूक नक्कीच करू शकणार नाही. तुमच्या मोबाईलच्या लोकेशनवरून तुम्ही नेमके कुठे आहात, हे आता तुमच्या जी-टॉकवरील मित्रांना कळू शकणार आहे!

‘गुगल लॅटिट्यूड’ ही अतिशय साधी-सोपी अशी सेवा आहे. तुमच्याकडे सिंबियन एस ६० सपोर्टेड फोन्स (अथर्थात बहुतांश नोकिया स्मार्टफोन्स), विंडोज मोबाईल ५.० आणि त्यापुढील अॉपरेटिंग सिस्टिम वापरणारे सर्व फोन्स आणि कलर ब्लॅकबेरी हँडसेट्सवर तुम्ही गुगल लॅटिट्यूड वापरू शकता. अँड्रॉईड अॉपरेटिंग सिस्टिम्स असलेल्या टी-मोबाईल जी-१ साठी व अॅपल आयफोनसाठी ही सेवा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे, जी-मेल ब्लॉगवर म्हटले आहे.

‘गुगल लॅटिट्यूड’ वापरून तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट करू शकता, प्रोफाईल पिक्चर बदलू शकता; तसेच तुमच्या लॅटिट्यूड फ्रेंड्सचे लोकेशनही पाहू शकता. तुमचे लोकेशन दाखवायचे नसल्यास, तसा अॉप्शन यात आहे. त्यामुळे घाबरून जाऊन ही सेवा ट्राय करण्याचे टाळू नका.

‘गुगल लॅटिट्यूड’ वापरण्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस कनेक्टिव्हिटी किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल मॅप्स अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल. ते डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये जाऊन http://www.google.com/latitude असे टाईप करा किंवा येथे क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक एंटर करा.
Read the full story

,

बुक्स अॉन मोबाईल

January 5, 2009 0 comments

गेल्या वर्षभरापासून शैलेशच्या कामाचा व्याप वाढला होता. बारा-बारा तास अॉफिस, मुंबई-दिल्ली- बेंगळुरू दौरे, बॉसबरोबर मीटिंग्ज या साऱ्यात त्याला त्याचा सवर्वांत आवडता - वाचनाचा छंद जोपासायला वेळच मिळत नव्हता. दौऱ्यावर जाताना सोबत पुस्तकांचं ओझं नेणं नकोसं होते. त्यामुळे प्रवासात किंवा रात्री झोपतानाही वाचन होत नाही. वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला बरेच दिवस वाचायला काही मिळालं नाही की ती सैरभैर होते. अशा व्यक्तींसाठी बुक्स इन माय फोन ही सेवा उपयोगी ठरू शकते.

बुक्स इन माय फोन या सेवेचे उद्दिष्ट नावातूनच स्पष्ट होते. या साईटवर शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही लेखक किंवा पुस्तकाच्या नावाने सर्च करून हवे ते पुस्तक मिळवू शकता. पुस्तक मिळाल्यानंतर ते थेट मोबाईलवर डाऊनलोड करू शकता किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता. जावा आकर्काईव्ह, जावा डिकम्पायलर (JAR, JAD) या फॉरमॅटमधील मोबाईल बुकची साईज काही केबींत असते. त्यामुळे तुमच्या मोबाईलची फारशी मेमरीही जात नाही.


वॉटपॅड ही देखील अशीच एक सेवा. m.wattpad.com वरून वॉटपॅडचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही हवे ते पुस्तक वाचू शकता. मोबाईलवर पुस्तक वाचण्याकरता आणखी काही साईट्स तुम्हाला माहित असतील तर त्या जरूर शेअर करा.
Read the full story

जीपीआरएसला पयर्याय एसएमएसचा!

January 2, 2009 3 comments

साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर मी आतापर्यंत अनेक मोबाईल अॅप्लीकेशन्स आणि सेवांबद्दल माहिती दिलेली आहे. यात एसएमएस लाईफ, फ्लिकर अॉन मोबाईल, क्विक, प्लीक्स, वीगो, जी-मेल मोबाईल आदींचा समावेश होता (मोबाईलविषयीच्या सर्व पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा). यातील बहुतांश सेवा वापरण्यासाठी जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. तथापि, ब्लॉग वाचणाऱ्या अनेकांनी आपल्याकडे जीपीआरएस नसल्याने या सुविधा वापरता येत नाही असे कळवले आहे. अशा वाचकांसाठी
आणि अथर्थात जीपीआरएसधारकांसाठीही पुढील दोन सेवा उपयोगी ठरू शकतात.
एसएमएस ग्यानः
प्रवासादरम्यान एखादे पुस्तक किंवा लेख वाचताना काही इंग्लिश शब्दांवर आपली गाडी अडकते. त्याचा अर्थ न लागल्याने पुढेही जाता येत नाही. प्रवासात असल्यामुळे डिक्शनरीही हाताशी नसते. अशा वेळी आपण एसएमएसच्या आधारे संबंधित शब्दाचा अर्थ जाणून घेऊ शकतो. एसएमएस ग्यान ही सेवा म्हणजे एसएमएस विकिपेडिया. अगदी साध्या-सोप्या कीवर्डच्या आधारे तुम्ही हवी ती मािहती असाल तिथे मिळवू शकता. ही सेवा अशी वापरावीः
. एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठीः
GYAN(space)Chandrayaan असे टाईप करून 9895974926 या क्रमांकावर पाठवा.

१६० कॅरेक्टर्समध्ये आलेली माहिती पुरेशी वाटत नसल्यास तुम्ही त्याच मेसेजला MORE असा रिप्लाय पाठवल्यास त्यासंबंधी अधिक माहिती मिळेल. याहूनही अधिक माहिती हवी असल्यास MORE2 असा रिप्लाय करा.

. एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठीः
GYAN(space)D(space)keyword असा मेसेज 9895974926 या क्रमांकावर पाठवा.
Example: GYAN D peter

या शब्दाचा अर्थ एसएमएसवर असा येईल -
Peter: Only used in the phrase peter out 2 dwindle 2 trail off 2 diminish 2 nothing.

. एखाद्या घटनेसंबंधीचे अलर्ट मिळवण्यासाठीः
GYAN(space)A(space)keyword असा मेसेज 9895974926 या क्रमांकावर पाठवा.
Example: GYAN A mumbaiattack
या कीवर्डसाठी ट्विटरवर अपडेट होणारी माहिती एसएमएसवर पाठवली जाईल.

. दररोज नवी माहिती आणि दिनविशेष मिळवण्यासाठीः
GYAN(space)START असा मेसेज 9895974926 या क्रमांकावर पाठवा.

ही सेवा अनसबस्क्राईब करण्यासाठी -
GYAN(space)STOP असा मेसेज 9895974926 या क्रमांकावर पाठवा.

(9895974926 हा क्रमांक SMS GYAN नावाने सेव्ह करून ठेवावा.)
मोबी डॉट इनः
ही सेवा वापरून तुम्ही महत्त्वाचे ई-मेल्स एसएमएसवर रिसीव्ह करू शकता आणि एसएमएसवरूनच उत्तरही देऊ शकता. मोबी डॉट इनचा वापर करून ई-मेल रिसीव्ह करण्यासाठी पैसे भरावे लागतात. तथापि, महिनाभर तुम्ही ही सेवा मोफत ट्राय करू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा. ही सेवा वापरून ई-मेल पाठवण्यासाठी कोणताही चार्ज आकारला जात नाही.
मोफत -मेल पाठवण्यासाठीः
SEND(space)E-mail ID(space)Your Message असा मेसेज टाईप करून 9845498454 वर पाठवा.
Read the full story

, ,

नवीन वषर्षाच्या (मोफत) हार्दिक शुभेच्छा!

December 30, 2008 3 comments

सर्वप्रथम, साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या सर्व वाचकांनी नव्या वषर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...मनापासून!
नवीन वषर्षाच्या शुभेच्छा एसएमएसवरून पाठवताना आपण जरा विचार करतो. कारण फोनबुकमधल्या दोन-चारशे जणांना एसएमएस पाठवयाचा म्हटलं तर किमान दोन-अडीचशे रुपयांचा फटका बसतो. एरवी दरमहा अडीचशे रुपये बिल भरण्याची सवय लागलेल्यांना नवीन वषर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाच-सहाशे रुपये बिल भरणे कठीण जाते. नवीन वषर्षाचे एसएमएस पाठवण्यासाठी आणि नव्या वषर्षात एसएमएसचे बिल कमी करण्यासाठी काय करता येईल, याबद्दल मी आज माहिती देणार आहे.

कॉम्प्युटर आणि मोबाईलवरून मोफत एसएमएस पाठवण्यासाठी तुम्ही एसएमएस लाईफ डॉट इन या नव्या सेवेचा वापर करू शकता. मोफत एसएमएसची सुविधा इतरही काही कंपन्यांकडून दिली जाते. तथापि, एसएमएस लाईफचे वैशिष्ट्य म्हणजे या सेवेचे मोबाईल अॅप्लीकेशन वापरून तुम्ही जीपीआरएस किंवा वाय-फायच्या आधारेही मोफत एसएमएस पाठवू शकता. एसएमएस लाईफ वापरण्यासाठी सर्वप्रथम या साईटवर रजिस्टर व्हावे लागते. तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा लॉग-इन आयडी असतो. लॉग-इन झाल्यानंतर तुम्ही ८० कॅरेक्टर्समध्ये तुमचा मेसेज टाईप करून हव्या त्या व्यक्तीला पाठवू शकता. उरलेल्या ८० कॅरेक्टर्समध्ये एसएमएस लाईफतफर्फे जाहिरात इन्सर्ट केली जाते. या सेवेत अॉनलाईन फोनबुकही तयार करता येते. एक व्यक्ती एका दिवसात जास्तीत-जास्त १०० एसएमएस पाठवू शकते. या सेवेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एसएमएस शेड्यूलही करू शकता. अथर्थात एक तारखेला सकाळी १० वाजता पाठवायचा एसएमएस तुम्ही आज शेड्यूल करून ठेवू शकता. सदर एसएमएस दिलेल्या तारखेस संबंधित व्यक्तींना पाठवला जातो. सर्वसाधारण मोबाईलमध्ये एसएमएस शेड्यूलिंगची सुविधा नसते. वाढदिवस, अॅनिव्हर्सरीज आदींचे अलर्टही तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता.



या सर्व गोष्टी मोबाईलवरूनही अॅक्सेस करता येतात. त्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. मोबाईल ब्राऊजरमधून m.smslife.in या साईवर जाऊन एसएमएस लाईफचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करा. लॉग-इन झाल्यानंतर तुम्ही थेट तुमच्या मोबाईल फोनबुकमधील क्रमांकावर एसएमएस लाईफच्या आधारे मेसेज पाठवू शकाल.
Read the full story

,

मोबाईल स्ट्रीमिंग

December 26, 2008 0 comments

मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला. २६ नोव्हेंबरच्या रात्री सुरू झालेले ते भयनाट्य तब्बल ६० तास सुरू राहिले आणि आपल्यापैकी अनेकांनी न्यूज चॅनेल्सवर हे नाट्य लाईव्ह पाहिलेच असेल. या घटनेनंतर भारतीय न्यूज चॅनेल्सवर टीकेची झोड उठली. न्यूजवॉच या वेबसाईटने यासंबंधी एक झटपट survey घेतला. हा survey तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. असो. याच घटनेच्या वेळी तरुणांनी सोशल मीडियाचा - अथर्थात ट्विटर, फ्लिकर, फेसबुक इ.चा मोठ्या प्रमाणावर वापर केला (ई-सकाळवरील ही बातमी वाचा). अनेकांनी न्यूज चॅनेल्सपेक्षा या सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवला. सोशल मीडियासाठी सोर्स होते तुमच्या-आमच्यासारखे लोक. काही थेट घटनास्थळाहून माहिती देत होते; काही ताज, ओबेरॉयमध्ये अडकलेल्या मित्रांशी फोन, एसएमएसद्वारे संपर्क साधून माहिती देत होते. सोशल मीडियातून लाईव्ह व्हिडीओज मात्र प्रसारित झाले नाहीत. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेता, एका अर्थाने बरेच झाले असे म्हणावे लागेल. पण तुमच्यासमोर बातमीमूल्य असलेली घटना घडत असताना तुम्ही व्हिडीओ फॉर्ममध्ये ती इतरांशी थेट शेअर करू शकलात तर?



होय. असे करता येणे शक्य आहे. मोबाईलचा वापर करून एखादा व्हिडीओ तुम्ही आता थेट इतरांशी शेअर करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस अथर्थात मोबाईल इंटरनेट कनेक्शन आणि क्विक असणे गरजेचे आहे. क्विक(Qik) ही सेवा वापरून तुम्ही मोबाईलवरून शूट करत असलेला व्हिडीओ थेट इतरांशी शेअर करू शकता. क्विक आयकफोन, ब्लॅकबेरी, विंडोज मोबाईल आणि सिंबियन फोनसाठी उपलब्ध आहे. क्विक वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
१. क्विकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. यासाठी केवळ २ ते ३ मिनिटे लागतात.
२. त्यानंतर तुमचा मोबाईल हॅंडसेट निवडून क्विकचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्या. तुम्ही एसएमएसने वॅप लिंक मागवू शकता अथवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून ब्लुटूथने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता.


३. मोबाईलवर क्लिक इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातून तुमच्या क्विक अकाऊंटवर लॉग-इन व्हा.
४. आता क्विकमध्ये जाऊन स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतर काही क्षणांत तुम्ही शूट करत असलेला व्हिडीओ तुम्ही कॉम्प्युटरवर पाहू शकाल. लक्षात ठेवा, क्विकचा वापर करून स्ट्रीम केलेला पहिला व्हिडीओ तुम्हाला सवर्वांसोबत शेअर करावा लागतो. त्यानंतर मात्र तुम्ही ग्रुप्स तयार करून तो ठराविक लोकांसोबत शेअर करू शकता.
५. स्ट्रीम होत असलेला व्हिडीओ लाईव्ह पाहता येतो. त्यानंतर तो तुम्ही FLV, 3GP किंवा MP4 फॉरमॅटमध्ये डाऊनलोडही करून घेऊ शकता. व्हिडीओ कुठे शूट केला याचे लोकेशन गुगल मॅपवर पाहता देखील येते.

क्विकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रीमिंग सुरू असताना तुम्ही इतरांशी चॅटही करू शकता. म्हणजे, तुम्ही समोरच्या व्यक्तीस हवा तसा कॅमेरा फिरवून त्याला हवा तो अॅंगल मिळवून देऊ शकता. न्यूज चॅनेल्स आणि न्यूज वेबसाईट्सना या सेवाचा प्रचंड फायदा होऊ शकतो.
Read the full story

, ,

भन्नाट वॉलपेपर्स

December 25, 2008 0 comments


तुम्हाला मूडनुसार वॉलपेपर बदलणं आवडत असेल तर तुम्ही गुगलवर ‘जरा हटके’ वॉलपेपर शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असाल. व्यर्थ अशासाठी की वॉलपेपर असा सर्च दिल्यास शेकडो साईट्स मिळतात, पण त्यातल्या काहीच साईटवर तुम्हाला हवे तसे वॉलपेपर्स मिळतात. मिळालेल्या वॉलपेपर्सचा आकारही तुमच्या स्क्रीन रिझोल्यूशनला कम्पॅटिबल नसेल तर मग स्ट्रेच, टाईल असे प्रकार आपण करून बघतो. पण त्याने मूळ वॉलपेपर डिस्टॉर्ट होतो व त्यातील गंमत निघून जाते.

तुम्हाला आवडेल असा आणि तुमच्या स्क्रीन साईजचा वॉलपेपर देणारी साईट म्हणजे इंटरफेस लिफ्ट. या साईटवर तुम्हाला हव्या त्या रिझोल्यूशनचे (वाईडस्क्रीन, ड्यूअल मॉनिटर, एचडीटीव्ही, मोबाईल इ.) वॉलपेपर्स मिळतील. आर्टिस्ट्स आणि टॅग्जनुसार सर्व वॉलपेपर्सचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला आवडीचे वॉलपेपर शोधण्यासाठी फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. या साईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर विंडोज आणि मॅकिन्तोषसाठी लागणारे आयकॉन्स आणि थीम्सही उपलब्ध आहेत.



Read the full story

,

सबकुछ मोबाईल!

December 13, 2008 0 comments

मध्यप्रदेशची लोकसंख्या किती किंवा साबरमती आश्रम केव्हा बांधला गेला होता असे प्रश्न कोणी रस्त्यात विचारले तर आपली पुरती फजिती होते. लोकसंख्या वगैरे या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या वगैरे मुळीच नाहीत. शिवाय गुगल, विकिपेडियाची सवय झाल्यामुळे इंटरनेट अॉन असताना आपण एक सेकंदात सांगतो असे म्हणून पाठ असल्यागत मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंडची लोकसंख्या सांगून मोकळे होतो. पण असं रस्त्यात वगैरे विचारल्यावर. अॉफिसमधला ‘शेर’ रस्त्यात असा ‘ढेर’ होतो...

पण असं ढेर होऊन कसं चालेल? माहिती आपण खिशात घेऊन चालत असतो. तुमच्याकडे जीपीआरएस एनेबल्ड मोबाईल असेल तर तुम्ही गुगल, विकिपेडिया अॉनलाईन अॅक्सेस करून तितक्याच तत्परतेने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. गुगलचे मोबाईल सर्च तुम्ही वापरून पाहिलं असेलच. विकिपेडियाचीही मोबाईल एडिशन उपलब्ध आहेत. mobile.wikipedia.org असे टाईप करून तुम्ही मोबाईलसाठी तयार केलेले विकिपेडिया अॅक्सेस करू शकता. मोबाईल विकिपेडिया वापरण्यास कठीण जाते, असा माझा अनुभव आहे. डेस्कटॉपवर दिसणारे अखंड पेज मोबाईलवर विभागले जाते. त्यामुळे तुम्हाला अनेक वेळा Continue असे म्हणावे लागते. यात वेळ वाया जातो. मोबाईल विकिपेडिया एेवजी तुम्ही वॅपेडिया डॉट मोबी (www.wapedia.mobi) ही सेवा वापरल्यास तुम्ही तेच रिझल्ट्स एकाच पेजवर पाहू शकाल.


शिवाय यात विकिपेडिया, गुगल इमेजेस आणि ताप्तू (मोबाईल इंटरटेन्मेंट सर्च इंजिन) यापैकी कोणतीही सेवा वापरून रिझल्ट्स फेच करू शकता. याव्यतिरिक्त In the news, Featured content, Did you know? आदी व्हॅल्यू अॅडेड सेक्शन्सही यात पाहायला मिळतात. वॅपिपेडिया (www.wapipedia.org) ही याच प्रकारातील आणखी एक सेवा. मोबाईलसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या साईट्सची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीदेखील तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये feedm8.com/sasotechnology असे टाईप करून बुकमार्क करा.
Read the full story

,

फ्लिकर अॉन मोबाईल

December 12, 2008 0 comments

सुट्यांमध्ये मस्त भटकंतीला गेलेल्या शैलेशने मोबाईलवर भरपूर फोटो काढले. परत आल्यानंतर एकेक फोटो डाऊनलोड करून फ्लिकर, अॉरकुट, फेसबुकवर अपलोड करत बसलेला असताना त्याला जाणवले की, त्याचवेळी आपल्या मित्रांना फोटो पाठवता आले असते तर? मोबाईलवरून थेट फोटो पाठवायचे म्हटले तर एमएमएस हा सोपा आणि खात्रीलायक पयर्याय. पण त्याला पैसे अधिक मोजावे लागतात. तुमच्याकडे जीपीआरएसचा अनलिमिटेड डेटा ट्रान्स्फर प्लॅन असेल तर तुम्ही विशिष्ट अॅप्लीकेशन वापरून थेट मोबाईलवरून फोटो इतरांशी शेअर करू शकता.

फोटो शेअरिंग साईटमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लिकरवर तुमचे अकाऊंट असेल आणि जीपीआरएस अॅक्टिव्ह फोन असेल तर तुम्ही हे काम चुटकीसरशी करू शकता. मोबाईलच्या ब्राऊजरमध्ये जाऊन m.flickr.com (किंवा m.yahoo.com) असे टाईप करा किंवा येथे जाऊन तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. तुम्हाला आलेल्या मेसेजमध्ये एक लिंक असेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवर तुमचा याहूचा आयडी आणि पासवर्ड एंटर करा. तुम्ही फ्लिकरच्या मोबाईल व्हर्जनमध्ये एंटर झालेला आहात. ‘अपलोड न्यू फोटो’वर क्लिक करून फोन मेमरी किंवा मेमरी कार्डवरील फोटो सिलेक्ट करा. काही क्षणांत तुमचा फोटो फ्लिकरवर अपलोड होईल.



या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सिटीझन जर्नलिस्टही होऊ शकता. ज्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे वातर्ताहर तात्काळ पोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी तुम्ही असाल तर तेथील फोटो तुम्ही फ्लिकरवर अपलोड करून संबंधितांना कळवू शकता. प्रसारमाध्यमेदेखील आपल्या वेबसाईटवरून असे आवाहन करू शकतात. त्यासाठी त्यांनी आपला फ्लिकर आयडी देऊन प्रेक्षकांना अथवा वाचकांना आपल्या फ्लिकर कॉन्टॅक्ट्समध्ये अॅड करण्यास सांगावे. असे केल्याने फोटो अपलोड करताना शेअर विथ कॉन्टॅक्ट्स असे म्हणून फोटो थेट त्यांच्यापर्यंत पोचवता येऊ शकतो.

  • नोकियाच्या एन सिरीज फोन्सवर फ्लिकर हे अॅप्लीकेशन अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहे.
  • ब्लॅकबेरी वापरणाऱ्यांनी येथे क्लिक करावे.
  • याहूच्या इतर सेवा मोबाईलवर अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही याहू गो वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा.
साधी-सोपी टेक्नॉलॉजीदेखील तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये feedm8.com/sasotechnology असे टाईप करून बुकमार्क करा.
Read the full story

,

स्पाईस अप युवर मोबाईल!

November 29, 2008 4 comments

तुम्हाला कायम अपडेट राहण्याची सवय असेल आणि मोबाईल फोनशिवाय तुमचे पानही हलत नसेल, तर तुमच्यासाठी एक परफेक्ट मोबाईल अॅप्लीकेशन तयार झाले आहे. पत्नीपासून प्लंबरपर्यंत आणि नोकरीपासून न्यूज अपडेटपर्यंत सर्वकाही मोबाईलवर एकाच ठिकाणी मिळण्याची सोय यात केली आहे.

स्पाईस टेलिव्हेंचर्सने मोबीसॉक या नव्या कंपनीची स्थापना केली असून याच नावाने पहिले मोबाईल
अॅप्लीकेशन नुकतेच (सॉफ्ट) लॉंच केले आहे. यात फायनान्शियल एक्स्प्रेस, सुलेखा, क्रिकबझ, जीवनसाथी, मेकमायट्रिप आणि नोकरी डॉट कॉम या सहा सेवांसाठीची अॅप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. मेकमायट्रिप आणि क्रिकबझ वगळता इतर सर्व अॅप्लीकेशन्स एकाच पॅकेजमध्ये उपलब्ध आहेत.



उदा. तुम्ही सुलेखा डॉट कॉम डाऊनलोड केल्यास फायनान्शियल एक्स्प्रेस, जीवनसाथी आणि नोकरी डॉट कॉम आपोआप डाऊनलोड होतील. याचा इंटरफेस अत्यंत साधा आणि वापरण्यास सोपा आहे. संबंधित सेवेच्या लोगोवर क्लिक करून तुम्ही माहिती मिळवू शकता. मोबीसॉकमध्ये भविष्यात आणखी अनेक कंपन्यांच्या सेवा इंटिग्रेट केल्या जाण्याची शक्यता आहे.
मोबीसॉक डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये wap.mobisoc.com टाईप करा किंवा येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

क्विक एटीएम लोकेटर

November 25, 2008 0 comments

कायर्यालयीन किंवा खासगी कामानिमित्त आपल्याला अनेकदा बाहेरगावी जावं लागतं. अशावेळी गरजेपुरते पैसे (कॅश) आपण जवळ ठेवतो आणि काही लागलेच तर एटीएममधून काढता येतील, असे समजून बाहेर पडतो. आपली भेट एक-दोन दिवसांची असेल तर धावपळ होणे साहजिक असते. मग एेनवेळी पैसे कमी पडतात, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करता येत नाही, एटीएम कुठे आहे हे माहित नसतं, गाडी सुटायची वेळ झालेली असते...थोडक्यात सांगायचं तर आपली पुरती वाट लागते.

आपल्या बॅंकेचं एटीएम संबंधित गावात असेलच असं नाही. त्यामुळे अनेक वेळा सहयोगी बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात. जगातील बहुतांश एटीएममध्ये व्हिसा कार्ड चालतात. तुमच्याकडे व्हिसा कार्ड असेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरूनही नजीकच्या एटीमएमची माहिती मिळवू शकता.


व्हिसा ग्लोबलने ही सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. देशाचे नाव आणि गावाचे नाव एंटर केल्यानंतर तेथील सर्व एटीएम केंद्रांची यादी पाहावयास मिळते. तुम्हाला विशिष्ट बॅंकेचे एटीएम शोधायचे असेल तर अॅडव्हान्स्ड सर्चमध्ये जाऊन शोधू शकता. एकूण १७० देशांतील व्हिसा एटीएम्सचा यात समावेश आहे. ही सेवा वापरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://visa.via.infonow.net/locator/global/

ही लिंक लांबलचक आणि लक्षात ठेवण्यास अवघड आहे. मात्र, टायनीयूआरएल वापरून कस्टमाईज केल्यास हीच साईट तुम्ही पुढील लिंकवरून देखील अॅक्सेस करू शकताः http://tinyurl.com/VisaATM
Read the full story

,

साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे मोबाईल व्हर्जन

November 22, 2008 0 comments

तुमच्या मोबाईलवर देवनागरी फॉंट्स डिस्प्ले होऊ शकत असतील तर आता तुम्ही साधी-सोपी टेक्नॉलॉजी मोबाईलवर देखील वाचू शकता. मोबाईल ब्राऊजिंग डेटा सेन्सिटिव्ह असल्याने कमीत-कमी डेटा डाऊनलोड होईल, याची काळजी यात घेण्यात आली आहे. Feedm8 ही सेवा वापरून साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे मोबाईल व्हर्जन तयार करण्यात आले आहे. मोबाईलवर साधी-सोपी टेक्नॉलॉजी अॅक्सेस करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये http://www.feedm8.com/sasotechnology असे टाईप करा. तुमचा प्रतिसाद कळवण्यास विसरू नका. साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे एसएमएस अलर्ट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
Feedm8 ही सेवा वापरून तुम्हीदेखील तुमच्या ब्लॉगचे मोबाईल व्हर्जन तयार करू शकता.

मोबाईल डेटा कन्झम्प्शन कमी करण्यासाठी वाचाः
आता कशाला ‘बिला’ची बात...
नो मोअर पिंचेस! Read the full story

,

ब्लुटूथ चॅटिंगचा जनकः प्लीक्स


तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व कॉन्टॅक्ट्सचा बॅक-अप तुमच्याकडे आहे?
- हो
तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या इमेजेस, व्हिडीओज, डॉक्युमेंट्सचा बॅक-अप तुमच्याकडे आहे?
- अं...नाही
तुम्ही ब्लुटूथ वापरून कधी चॅटिंग केलं आहे?

- असं करता येतं?
तुम्ही ठेवलेल्या बॅक-अपसाठी आणि पाठवलेल्या मेसेजेससाठी कधी कुणी तुम्हाला गिफ्ट दिलं आहे?
छे...काय वेड लागलंय का? फुकट सेवा वापरायची आणि वर गिफ्टची अपेक्षा ठेवायची?

अशी सेवा कुणी देऊ केली तर तुम्ही वापराल?

पॅरिसस्थित मेग्लिन सॉफ्टवेअर या कंपनीने डेव्हलप केलेली प्लीक्स ही सेवा पारंपरिक ओव्हर-द-एअर (ओटीए) मोबाईल डेटा बॅक-अपहून अत्यंत निराळी आहे. तुम्ही मोबीकॉल किंवा झिबसारखी (वाचाः बॅक-अप युवर मोबाईल कन्टेन्ट) सेवा वापरत असाल, तर तुम्हाला प्लीक्सचे वेगळेपण जाणवेल. मोबीकॉल किंवा झिब या सेवांचे मोबाईल अॅप्लीकेशन उपलब्ध नाही. प्लीक्सचे मोबाईल अॅप्लीकेशन सुमारे २००० मोबाईल हॅंडसेटमध्ये वापरता येते. हा प्लीक्सचा सवर्वांत मोठा फायदा आहे. मोबाईल अॅप्लीकेशनमुळे सिंक्रोनायझेशनसाठी लागणाऱ्या सेटिंग्जच्या भानगडीत पडण्याची गरज उरत नाही. मोबीकॉल आणि झिबमध्येदेखील सेटिंग्ज मिळविताना अडचण येत नाही, परंतु त्यांच्या सेटिंग्ज सर्व हॅंडसेटसाठी उपलब्ध नसल्यामुळे काहीवेळा तुमच्या हॅंडसेटच्या फॅमिलीतील एखाद्या हॅंडसेटनुसार सेटिंग्ज मॅन्युअली एंटर कराव्या लागता.

प्लीक्स वापरण्यासाठी जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाईलवर प्लीक्स डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये http://en.pleex.com असे टाईप करा. अॅप्लीकेशन इन्स्टॉल करण्यापूवर्वी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन करण्यास केवळ १० ते १५ सेकंद लागतात. नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, बर्थडेट आदी माहिती दिल्यानंतर तुम्ही अॅप्लीकेशन डाऊनलोड करू शकता.

प्लीक्सचा वापर करून तुम्ही खालील गोष्टी करू शकताः

कॉन्टॅक्ट्स बॅक-अपः प्लीक्स ओपन केल्यानंतर त्यातील सिंक्रोनाईझ युवर अॅड्रेस बुक यावर क्लिक करा. बॅक-अप आणि रिस्टोर असे दोन अॉप्शन्स दिसतील. पहिल्यांदा प्लीक्स वापरताना बॅक-अपवर क्लिक करा. काही क्षणांत तुमचे कॉन्टॅक्ट्स अॉनलाईन स्टोअर होतील. हॅंडसेट चेंज केल्यास त्यावर आधी प्लीक्स डाऊनलोड करून तुमच्या नावाने लॉग-इन व्हा व रिस्टोर म्हणा.
फाईल्स बॅक-अपः तुमच्या मोबाईल फोनमध्ये व मेमरी कार्डमध्ये असणाऱ्या सर्व फाईल्स तुम्ही प्लीक्स अॉनलाईनवर स्टोअर करू शकता. प्लीक्स डॉट कॉमवरून तुम्ही या फाईल्स अॅक्सेस करू शकता. फ्लिकर किंवा ब्लॉगरवर थेट अपलोड करणेही शक्य आहे.
प्रोफाईल्स अॅंड फ्री चॅटः ब्लुटूथ नेटवर्किंग हा नवा प्रकार प्लीक्सने डेव्हलप केला आहे. याहू चॅटरूम प्रमाणे यात तुम्ही तुमच्या आवडीची चॅटरूम निवडून तुमचे प्रोफाईल तयार करू शकता. याखेरीज प्लीक्स वापरणारी एखादी दुसरी व्यक्ती तुमच्या जवळ असेल तर तुम्ही ब्लुटूथच्या आधारे चॅटही करू शकता. उदा. एखाद्या मिटींगमध्ये पैसे खर्च करून मेसेजेस पाठवण्यापेक्षा ब्लुटूथ चॅट अधिक उत्तम! जीपीआरएसचा प्लॅन मात्र अनलिमिटेड हवा.
सेन्ड मेसेजेसः प्लीक्सचा वापर करून कोणत्याही मोबाईलवर एसएमएस पाठवू शकता. म्हणजे प्लीक्स सुरू असताना एसएमएस करावयाचा असेल तर मेसेजेसमध्ये जाण्याची गरज नाही. यातून पाठवलेल्या एसएमएसमध्ये एका ओळीची जाहिरात असते.
गेट गिफ्ट्सः प्लीक्सवरील प्रत्येक अॅक्टिव्हिटीसाठी तुम्हाला काही पॉईंट्स मिळतात. उदा. प्लीक्स डाऊनलोड केल्यानंतर १०० पॉईंट्स, कॉन्टॅक्ट्सचा बॅक-अप घेतल्यानंतर १० पॉईंट्स वगैरे. या पॉईंट्सना प्लीक्सो असे म्हटले जाते. या प्लीक्सोजचा वापर करून तुम्ही मोबाईल वॉलपेपर्स, रिंगटोन्स आदी गोष्टी डाऊनलोड करून घेऊ शकता.
Read the full story

, , ,

वेबकॅम नसतानाही करा व्हिडीओ चॅट...

November 21, 2008 0 comments


जी-मेलने गेल्या आठवड्यात व्हिडीओ अाणि व्हॉईस चॅट हे नवे फीचर सुरू केले. यापूवर्वी व्हॉईस चॅटसाठी जी-टॉक हे अॅप्लीकेशन वापरावे लागत असे. व्हिडीओ चॅटसाठी तुम्ही स्काईप किंवा याहू मेसेंजर वापरत असाल. पण थेट ई-मेलमध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस चॅट इंटिग्रेट करून गुगलने या प्रचलित सेवांसमोर जबरदस्त स्पधर्धा निमर्माण केली आहे. तुमच्यापैकी अनेकांनी जी-मेलची ही नवी सेवा वापरून पाहिली असेलच. काय म्हणता? तुम्ही अजून ही सेवा वापरलेली नाही? का? वेबकॅम नाही म्हणून? फिकर नॉट...



साधी-सोपी टेक्नॉलॉजी नियमित वाचणाऱ्यांना ही अडचण आलीच नसेल. अॉगस्टमध्ये लिहिलेल्या एका पोस्टमध्ये मोबाईल कॅमेऱ्याला वेबकॅममध्ये रुपांतरित करणाऱ्या वीगो (वेबकॅम व्हेरेवर आय गो) या सेवेबद्दल मी माहिती दिली होती. ती पोस्ट तुमच्याकडून मिस झाली असल्यास, पुन्हा एकदा वाचा (मेरे पास 'वीगो' है) आणि जी-मेलच्या नव्या सेवेचा आनंद घ्या. याच पद्धतीने तुम्ही स्काईप, याहू मेसेंजर आणि विंडोज लाईव्ह मेसेंजर वापरूनदेखील व्हिडीओ चॅट करू शकता.

त्यापूवर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याः
१. जी-मेल व्हिडीओ आणि व्हॉईस चॅटसाठी एक छोटेसे अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागते. ते अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. फुलस्क्रीन व्हिडीओ चॅटसाठी तुम्हाला तुमचे फ्लॅश व्हर्जन अपडेट करावे लागेल.
३. कॉम्प्युटर रिस्टार्ट करा.
४. वीगो हे अॅप्लीकेशन केवळ नोकियाच्या सिरीज ६० (व्हर्जन २.० आणि ३.०) हॅंडसेट्सवर वापरता येते. कम्पॅटिबल हॅंडसेट्सच्या यादीसाठी येथे क्लिक करा.
५. वीगोचे डेस्कटॉप अॅप्लीकेश विंडोज एक्सपीवर वापरता येते. ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
६. इन्स्टॉल करण्याआधी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईलचे ब्लुटूथ अॉन करा.
७. डेस्कटॉप अॅप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातूनच एक .sis फाईल मोबाईलवर पाठवली जाते. त्यासाठी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईल पेअर्ड असल्याची खात्री करा. .sis फाईल मोबाईलवर इन्स्टॉल करा.
८. दोन्हीकडील अॅप्लीकेशन्स रन करा. मोबाईलवर अॉप्शन्समध्ये जाऊन कनेक्ट म्हटल्यानंतर डेस्कटॉप/लॅपटॉपवर व्हिडीओ दिसू लागेल.
९. आता तुम्ही जी-मेल चॅटमध्ये गेल्यास तुमच्या नावासमोर व्हिडीओ आयकॉन दिसू लागेल.
१०. एन्जॉय जी-मेल व्हिडीओ चॅट!
Read the full story

, ,

पर्सनल फिटनेस मॅनेजर

तुम्ही नोकियाचे फॅन आहात? तुम्ही स्पोर्ट््टस आणि फिटनेस अॅक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्टेड आहात? तुमच्याकडे नोकियाचा जीपीएस एनेबल्ड फोन आहे? या सगळ्य प्रश्नांचे उत्तर ‘हो’ असेल तर तुमच्यासाठी एका भन्नाट सेवेची मािहती मी आज देणार आहे. या सेवेचे नाव आहे नोकिया स्पोर्ट््टस ट्रॅकर.

नोकिया स्पोर्ट््टस ट्रॅकर म्हणजे तुमचा पर्सनल फिटनेस मॅनेजर. एखादा फिटनेस इन्स्ट्रक्टरदेखील तुमच्या फिटनेस आणि स्पोर्ट््टस अॅक्टिव्हिटीजचा एवढा अॅक्युरेट ट्रॅक ठेवू शकणार नाही. नोकिया स्पोर्ट््टस ट्रॅकर जीपीएसच्या आधारे तुमच्या अॅक्टिव्हिटीजचा ट्रॅक ठेवते. या अॅक्टिव्हिटीजमध्ये वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्किईंग आदींचा समावेश आहे. तुमच्या हॅंडसेटमध्ये नोकिया स्पोर्ट््टस ट्रॅकर अगोदरच इन्स्टॉल केलेले असेल तर तुम्ही थेट त्याचा वापर सुरू करू शकता अथवा येथून डाऊनलोड करू शकता. तुमच्या हॅंडसेटवर स्पोर्ट््टस ट्रॅकर इन्स्टॉल करता येणे शक्य आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
नोकिया स्पोर्ट््टस ट्रॅकर कसे वापरावे?
समजा तुम्ही दररोज सकाळी तासभर फिरावयास जाता. आपण किती किलोमीटर चाललो, किती स्पीडने चाललो याची ढोबळ माहिती आपल्याला असते. परंतु हीच माहिती अगदी अॅक्युरेट हवी असेल तर नोकिया स्पोर्ट््टस ट्रॅकरचा वापर करता येईल. तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉलेशन या फोल्डरमध्ये असलेल्या नोकिया स्पोर्ट््टस ट्रॅकर या आयकॉनवर क्लिक करा. अॅक्टिव्हिटी सिलेक्ट करून ओके म्हटल्यानंतर ‘अपलोड टू सर्विस’ असे विचारले जाईल. येस असे म्हटल्यानंतर तुमच्या अॅक्टिव्हिटीज नोकियाच्या स्पोर्ट््टसट्रॅकर वेब सर्विसवर अपलोड होतील.

सेटिंग्ज



अॅक्टिव्हिटी मॉनिटर




वर्कआऊट शेड्यूल



वर्कआऊट समरी


तुम्ही किती वेळ चाललात, किती गतीने चाललात, कुठे गती कमी झाली, कुठे वाढली, ताशी वेग किती होता अशी सर्व प्रकारची माहिती तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसू शकेल. हीच सर्व माहिती वेबवरदेखील स्टोअर राहील. स्पोर्ट््टसट्रॅकरच्या वेब सर्विसवर तुमचा अॅक्टिव्हिटी रूट गुगल मॅपवर डिस्प्ले होईल. ही माहिती तुम्ही इतरांशी किंवा तुमच्या मित्रांशी अॉनलाईन शेअर करू शकाल. तुम्ही तुमचा फिटनेस ग्रुप तयार करू शकता आणि इतर ग्रुप व कम्युनिटीज जॉईनदेखील करू शकता.

नोकियाच्या सध्याच्या हॉट सेलिंग E71 हॅंडसेटवर स्पोर्टस ट्रॅकर आहे. Fortune या मासिकाने या हॅंडसेटला बेस्ट पीडीए म्हणून गौरवले आहे. या संबंधी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

से बाय टू शॉर्टकोड्स, वेलकम गुगल एसएमएस सर्च

November 19, 2008 0 comments

गुगल इंडियाने एसएमएस सर्चची आज घोषणा केली. भारतातील जीपीआरएसधारकांची संख्या सातत्याने वाढत असली तरी एकूण मोबाईलधारकांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. जीपीआरएस न वापरणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून गुगल इंडियाने सर्चची प्रक्रिया आणखी सोपी करून टाकली आहे. ही सेवा भारतातील सर्व जीएसएम आणि सीडीएमए ग्राहकांना वापरता येईल.

इंटरनेटवरील गुगल सर्च आणि एसएमएसवरील गुगल सर्च यात मोठा फरक असल्याचे कंपनीने सांगितले आहे. एसएमएसवरील सर्च रिझल्ट संबंधित कीवर्डसाठी अत्यंत रिलेव्हन्ट असतील, याची खात्री गुगल इंडियाने दिली आहे. या सेवेमुळे 58888 सारख्या शॉर्टकोड सेवांवर नक्कीच परिणाम होणार आहे.

एसएमएस सर्च कसा करावा?
उदा. तुम्हाला ताजा क्रिकेट स्कोअर जाणून घ्यायचा असेल, तर Cricket India असा मेसेज 9-77-33-00000 या क्रमांकावर पाठवून द्या. हा क्रमांक शॉर्टकोड नसल्यामुळे या मेसेजसाठी नॉर्मल एसएमएस चार्ज पडेल.


याच पद्धतीने तुम्ही शहरातील सिनेमे, ट्रेनचे शेड्यूल, भविष्य, पंचांग, फ्लाईट स्टेटस, पीएनआर स्टेटस, ताज्या बातम्या आदी सर्व माहिती मिळू शकेल. थोडक्यात ज्या गोष्टींसाठी तुम्ही गुगल ओपन करता, त्या सर्व गोष्टी आता एसएमएसवरून मिळणार आहे. तेव्हा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये 9-77-33-00000 हा नंबर गुगल सर्च म्हणून अॅड करावयास विसरू नका.
Read the full story

,

टीव्ही गाईड २.०ः बर्प टीव्ही

झिप-ए-झॅप या इंडियन टीव्ही प्रोग्रामिंग गाईडची ओळख तुम्हाला गेल्या एका पोस्टमध्ये करून दिली होती. तुमच्यापैकी अनेक जण ही सेवा वापरत असतीलही. या सेवेमार्फत रेकमंडेड प्रोग्राम्सचे ई-मेल अलर्ट् नियमित येतात. एसएमएस अलर्ट मिळण्यास अडचणी येतात, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे अशीच एखादी दुसरी सेवा आहे किंवा कसे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि झिप-ए-झॅपपेक्षाही उत्तम सेवा सापडली.

बर्प या साईटबद्दल तुम्ही कधी एेकले आहे? एेकले नसल्यास सांगतो. आयआयटी कानपूरमधील एका विद्यार्थ्याने २००६ मध्ये बर्प डॉट कॉम ही साईट सुरू केली. सुरवातीला या सेवेचे उद्दिष्ट सिटी गाईड्स एवढ्यापुरतेच मयर्यादित होते. पुरेसे आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे बर्पच्या संस्थापकाने सिटी गाईड, सिटी सर्च, रिव्ह्य्ज, लाईफस्टाईल याविषयीच्या विविध अॉनलाईन सेवा सुरू केल्या. बर्प टीव्ही ही त्यापैकीच एक सेवा. बर्प टीव्ही म्हणजे भारतात दिसणाऱ्या ढीगभर चॅनेल्सचे अॉनलाईन प्रोग्राम गाईड! झिप-ए-झॅपपेक्षा बर्प टीव्ही अधिक प्रोफेशनल वाटतो. याचा इंटरफेसही वेब २.० साईटला साजेसा असा आहे. चॅनेल्सच्या कॅटेगरीज, प्रोग्राम जॉनर, मूव्हीज अॉन टीव्ही अशा सेक्शन्समुळे ही साईट अधिक उपयुक्त ठरते. शिवाय मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कार्यक्रमांचे एसएमएस अलर्टही मिळतात.

प्रोग्राम लिस्टिंग


मूव्हीज अॉन टीव्ही


एसएमएस अलर्ट


फेव्हरेट चॅनेल्स, फेव्हरेट प्रोग्राम्स अशा लिस्टिंगही तुम्ही करून ठेवू शकता. फेव्हरेट प्रोग्राम्सचे एसएमएस अलर्ट तुम्हाला नियमित मिळतील. प्रोग्राम लिस्टिंग तुम्हाला ई-मेलवर देखील मिळू शकते. एवढेच नव्हे तर तुम्ही मोबाईलवरूनदेखील बर्प टीव्ही सर्फ करू शकता. त्यासाठी http://tv.burrp.com/m/ अशी लिंक तुमच्या मोबाईल ब्राऊजरमध्ये टाईप करून सर्फ करा व तुमचा अनुभव कळवा.
Read the full story

, ,

नो मोअर पिन्चेस!

November 1, 2008 4 comments

आज ही पोस्ट लिहिताना शाळेतल्या सरांची आठवण येतेय. नववी-दहावीत असताना आम्हाला भूगोल शिकवायला वाठोरे सर होते. प्रत्येक सरांची जशी एक लकब असते, तशी यांची विशिष्ट लकब होती. ते बोलताना ‘प’चा उच्चार ‘फ’ असा करायचे. म्हणजे, ‘पृथ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे,’ हे वाक्य ते ‘फृथ्वीचा ७० टक्के फृष्ठभाग फाण्याने व्याफलेला आहे,’ असे बोलायचे. सुरवातीला आम्हाला विचित्र वाटायचे, फण नंतर सवय झाली (:-)). आम्हीही एकमेकांशी तसंच बोलायला लागलो. काल सर्च करताना एक नवी साईट सापडली आणि वाठोरे सरांची प्रकषर्षाने आठवण आली.

फिन्च हे त्या नव्या साईटचे नाव. या सेवेचे मी केलेले वर्णन असेः खिशाला फिन्च (अथर्थात पिन्च) बसू नये म्हणून वापरावी अशी सेवा म्हणजे फिन्च. मागे एका पोस्टमध्ये मी फोनिफायर या सेवेबद्दल माहिती दिली होती. मोबाईलवर वेब सर्फिंग करताना पुरेसा स्पीड मिळत नाही. त्यात आपल्याला हव्या त्या साईटवर भरपूर इमेजेस आणि इतर इलेमेंट्स असली की साईट लोड होण्यास वेळही लागतो आणि जीपीआरएसचे चार्जेसही वाढतात. ज्यांच्या घरी अद्यापही डायल-अप इंटरनेट कनेक्शन्स आहेत त्यांनादेखील हेवी साईट्स लोड करताना त्रास होतो. डेटाकार्ड किंवा यूएसबी इंटरनेट वापरणाऱ्यांच्या त्रासाला तर सीमाच नाही. अशा सर्व दुःखी-कष्टी लोकांसाठी फिन्च ही सेवा उपयोगास येते. तुम्हाला जी साईट अॅक्सेस करायची आहे, ती तुम्ही फिन्चच्या माध्यमातून अॅक्सेस केली की त्यातील डिझाईन इलेमेंट्स, इमेजेस, फ्लॅश फाईल्स आदी गोष्टी बाजूला ठेवून केवळ टेक्स्ट लोड केले जाते. त्यामुळे न्यूयॉर्क टाईम्सचे १.४ एमबीचे होमपेज केवळ ८४ केबीत ओपन होते. तब्बल ९४ टक्क्यांनी साईज कमी होणे म्हणजे पैसा आणि वेळ दोन्हीची बचत.

New York Times (Original Size: 1.4mb)




New York Times (With Finch: 84 kb)




Read the full story