Showing posts with label Google Services. Show all posts
Showing posts with label Google Services. Show all posts
, ,

िडक्शनरी इन चॅट

July 8, 2009 4 comments

‘डिक्शनरी’ची गरज कोणाला, केव्हा आणि कुठे भासेल याचा नेम नाही. बुकशेल्फमधील जाडजूड अॉक्सफर्ड डिक्शनरी तशी केव्हाही कामाला येते, पण कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर वाढल्यामुळे आपण साहजिकच या माध्यमातील डिक्शनरीज वापरायला लागतो. वर्डमध्ये काम करत असताना आपण तिथली डिक्शनरी वापरतो, मोबाईलसाठीही डिक्शनरीचे अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. सर्चचा वापर करूनही आपण एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ शकतो. ई-मेल वाचताना किंवा लिहिताना एखादा शब्द अडला तरीदेखील तुम्ही तिथल्या तिथे त्याचा अर्थ जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही गुगल बोट वापरू शकता. बोट म्हणजे वेब रोबोट्स अर्थाच एखाद्या कमांडसाठी ठरवून दिलेले काम करणारे अॅप्लिकेशन्स.

गुगल टॉक किंवा जी-मेल चॅटमधून lookup@bot.im या ई-मेल अॅड्रेसला चॅटिंगसाठी इन्व्हाईट केल्यानंतर तुम्ही ही सेवा वापरू शकता. dict असे टाईप करून त्यापुढे तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचाय तो शब्द Lookup ला पाठवला की पुढच्या सेकंदाला तुम्हाला त्याचा अर्थ मिळेल.

उदा. तुम्हाला Deprecate या शब्दाचा अर्थ माहित करून घ्यायचा असल्यास dict deprecate असा मेसेज पाठवा.
या बोटचा वापर करून तुम्ही कठीण हिंदी शब्दांचे अर्थही समजून घेऊ शकता. उदा. dict गहरा असा मेसेज केल्यानंतर या शब्दाचा इंग्लिशमधील अर्थ तुमच्यासमोर येईल.





याच पद्धतीने इंग्लिशमधील शब्द हिंदीत भाषांतरित करायचे असतील तर तुम्ही en2hi.translit@bot.talk.google.com या बोटचा वापर करू शकता.

अधिक बोट्ससाठी वाचाः
Useful Google Talk Bots That You Must Add as Friends
Read the full story

, ,

प्रोफेशनल ब्लॉगर टेम्प्लेट्सचा मिनी-खजिना!

June 26, 2009 1 comments

नव्याने ब्लॉगिंगमध्ये उतरणाऱ्या व्यक्तीसाठी ब्लॉगर हा एक अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे. केवळ तीन स्टेपमध्ये ब्लॉग तयार करून एखादी व्यक्ती लिहिण्यास सुरवात करू शकते. त्यानंतरही तो मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. पण एकदा का ब्लॉगरवर हात बसला की मग ‘काड्या’ कराव्याशा वाटतात. लोगो बदलता येतो का ते पाहणे, बॅकग्राऊंड बदलून पाहणे, नव-नवे विजेट्स किंवा गॅजेट्स अॅड करणे अशा विविध लेव्हलच्या ‘काड्या’ आपण करून पाहतो. ‘एचटीएमएल’ची माहिती असेल तर मग ही लेव्हल आणखी पुढे जाते; पण ‘काड्या’ करून पाहिल्या ना तरीसुद्धा ‘एचटीएमएल’ थोडेबहुत कळायला लागते आणि मग ब्लॉगमध्ये हवे तसे बदल करणे शक्य होते.

एकदा का यशस्वीरित्या काही बदल करणं जमलं की आत्मविश्वास वाढतो आणि आपण अजून पुढे जायला लागतो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण टेम्प्लेट किंवा थीम बदलायचा विचार करतो. पण इतरांहून जरासं वेगळं टेम्प्लेट मिळणं, ते आवडणं आणि ते यशस्वीरित्या ब्लॉगला अप्लाय करणं तितकसं सोपं नाही. मुळात ब्लॉगरसाठी फार क्रिएटिव्ह टेम्प्लेट तयार करणं तांत्रिक मर्यादांमुळे शक्य होत नाही. हे खरं असलं तरी इस्तंबूलच्या ओरक (Ooruc चा उच्चार बहुदा असाच असावा) नावाच्या एका तरूणाने उच्च दर्जाचे प्रोफेशनल ब्लॉगर टेम्प्लेट्स तयार केले आहेत.



themes.ooruc.com वर ही टेम्प्लेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ब्लॉगरवर उपलब्ध असणारी रटाळ टेम्प्लेट्स किंवा इतर उपलब्ध असणारी दोन, तीन, चार किंवा पाच कॉलममधील टेम्प्लेट्स पाहून आणि वापरून कंटाळा आला असेल आणि सिरियस ब्लॉगिंग करायचं असेल तर ओरकने तयार केलेली टेम्प्लेट्स वापरून पाहायला हरकत नाही. वर्डप्रेसवरून प्रेरणा घेत मूळ वर्डप्रेससाठी तयार केलेली मॅगझिन स्टाईल टेम्प्लेट्सही कन्व्हर्ट करून ब्लॉगरसाठी वापरली जातात; पण ओरकच्या प्रीमियम टेम्प्लेट्सना खरंच तोड नाहीये. ही टेम्प्लेट्स वापरून तयार केलेला ब्लॉग पाहिल्यास तो ब्लॉगरवर होस्ट केलाय, यावर खरंच विश्वास बसत नाही. मॅगझिन, न्यूजपेपर, म्युझिक, गॅजेट्स, ई-कॉमर्स आदींसाठी वापरता येण्याजोगे टेम्प्लेट्स ओरकने तयार केले आहेत. यातील काही टेम्प्लेट्स मोफत डाऊनलोड करता येतात; तर काही टेम्प्लेट्ससाठी पैसे मोजावे लागतील. त्यांच्या किमती बारा डॉलरपासून पुढे आहेत. पण पन्नास-शंभर डॉलरच्या गुंतवणुकीत एखाद्या छोट्या वर्तमानपत्राची किंवा मासिकाची वेबसाईट सहज तयार होऊ शकत असेल तर काय हरकत आहे? जर तुम्हीसुद्धा सिरियसली असा काही विचार करत असाल आणि तुमच्या दृष्टीने ब्लॉगर हे सर्वांत सोपे माध्यम असेल तर ओरकचे एखादे टेम्प्लेट नक्की वापरा आणि तुमच्या साईटला किंवा ब्लॉगला एक खास प्रोफेशनल लूक द्या.
Read the full story

, , , ,

िसग्नेचर स्टाईल!

June 25, 2009 3 comments

ई-मेल सिग्नेचर्स हा एक प्रचंड इंटरेस्टिंग प्रकार आहे. तुम्हाला आलेल्या ई-मेल्स एकदा चेक करा. प्रत्येकाच्या ई-मेलमध्ये मेसेजनंतर एक वेगळ्याच प्रकारची सिग्नेचर तुम्हाला दिसून येईल. काही जण नुसतं नाव लिहिणं पसंत करतात, तर काही जणांना नाव, गाव, पत्त्यासह ब्लॉग, वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रोफाईल्सच्या लिंक्स देणंही आवडतं. पण अत्यंत सपक वाटणाऱ्या या सिग्नेचर्स आकर्षक करता आल्या तर? येस. वाईज स्टँप नावाचे फायरफॉक्स अॅड-अॉन वापरून तुम्ही ई-मेल सिग्नेचर्सने तुमची नवी ओळख तयार करू शकता.

जी-मेल, याहू मेल, हॉटमेल आणि एओएल मेल आणि इतर अनेक ई-मेल सेवांमध्ये तुम्ही वाईज स्टँपची मदत घेऊन तयार केलेल्या सिग्नेचर्स वापरू शकता. वाईज स्टँप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर फायरफॉक्समध्ये खाली उजव्या कोपऱ्यात स्टँपचा आयकॉन दिसायला लागेल. असाच आयकॉन तुम्हाला जी-मेलच्या कॉम्पोझ मेन्यूमध्येही दिसेल. हा आयकॉन वापरून तुम्ही अगोदर तयार करून ठेवलेल्या पर्सनल किंवा बिझनेस सिग्नेचर्स ई-मेलमध्ये अॅड करू शकाल.

वाईज स्टँपमध्ये सिग्नेचर तयार करणे एकदम सोपे आहे. यासाठी तुम्ही एकतर तयार टेम्प्लेट वापरू शकता किंवा थेट तुम्हाला हवी तशी सिग्नेचर तयार करू शकता. पन्नासहून अधिक सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर, इ.) आणि इन्स्टन्ट मेसेंजर (जी-टॉक, स्काईप, इ.) सेवांसाठीचे छोटे आयकॉन्स तुम्ही सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. याशिवाय तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटचा प्रसार करण्यासाठीसुद्धा ई-मेल सिग्नेचर वापरता येऊ शकते. वाईज स्टँपमध्ये आरएसएस फीड एंटर करून तुमच्या ब्लॉगवरील ताज्या पोस्टचे हेडिंगदेखील ई-मेल सिग्नेचरमध्ये दिसू शकते, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. याच पद्धतीने लास्ट एफएमवर तुम्ही ऐकलेले गाणे, यू ट्यूबवरील एखादा व्हिडीओ किंवा ट्विटर, फेसबुकवरील स्टेटस मेसेजसुद्धा ई-मेल सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. या सिग्नेचर एचटीएमएल फॉरमॅटमध्ये असल्याने तुम्ही त्या इतर ठिकाणीही (उदा. गुगल डॉक्स) वापरू शकता.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीतले बदलः

मित्रांनो,
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या साधी-सोपी टेक्नॉलॉजी या ब्लॉगमध्ये तुमच्या सोयीसाठी काही बदल करत आहे. यापूर्वी या ब्लॉगसाठी मी 'अर्थेमिया' ही मूळ वर्डप्रेससाठी तयार केलेली थीम वापरत होतो. आता याच थीमचे 'मॉडिफाईड व्हर्जन' उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ते वापरण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही फीचर्स (उदा. Headline) आता तरी अडचणीचे वाटत आहेत; पण त्यावर काही तरी उपाय नक्कीच सापडेल. अर्थात यातील कॅटेगरी नेव्हिगेशन आणि फीचर्ड पोस्ट्स हा प्रकार उत्तम आहे. त्यामुळे साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे हे नवे रूप तुम्हाला आवडेल, अशी अपेक्षा आहे. sasotechnology@gmail.com वर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
Read the full story

, , ,

गुगलचे ‘अॉल-इन-वन’ मोबाईल अॅप्लिकेशन

June 22, 2009 1 comments

आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या गुगलच्या अनेक सेवा आपण रोज वापरत असतो. गुगल सर्च खेरीज, जी-मेल, यू ट्यूब, गुगल रीडर, अॉर्कुट, गुगल कॅलेंडर, न्यूज, ब्लॉगर आदी सेवाही कमी-अधिक प्रमाणात निश्चित वापरल्या जातात. भारतात ज्या वेगाने कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा प्रसार होतोय त्याहून कित्येक जास्त पटीने मोबाईल आणि मोबाईल इंटरनेटचा प्रसार होतोय. फिडेलिटी इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण मोबाईलधारकांपैकी १० टक्के लोक मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात.

हा आकडा जवळपास सव्वाचार कोटींवर जातो. यातील सुमारे ८० लाख लोक नियमित (म्हणजे अगदी दररोज) मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात, अशी आकडेवारीही फिडेलिटीने जाहीर केली आहे. थोडक्यात काय तर, अख्खा भारतंच इंटरनेटसाठी आता मोबाईलवर अवलंबून राहणार आहे. आकडेवारीतून बाहेर पडून आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात.

मोबाईलचे महत्त्व ओळखून गुगलने त्यांच्या एकेक सेवेसाठीचे मोबाईल अॅप्लिकेशन्स लाँच करणे सुरूच ठेवले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी अॉर्कुटचे मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले. जी-मेल, यूट्यूब, गुगल मॅप्स आदी अॅप्लिकेशन्स अगोदर उपलब्ध होते. पण प्रत्येक अॅप्लिकेशनचा आयकॉन शोधून त्यावर क्लिक करायची गरज आता उरली नाहीये. सिंबियन (S60) अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या मोबाईल फोनसाठी गुगलचे मास्टर मोबाईल अॅप्लिकेशन (गुगल मोबाईल अॅप) नुकतेच सादर करण्यात आले आहे. आयफोन, ब्लॅकबेरी आणि विंडोज मोबाईलसाठी हे अॅप्लिकेशन अगोदरंच उपलब्ध होते.
गुगलच्या तमाम सेवा तुम्ही या मास्टर अॅप्लिकेशनमधून अॅक्सेस करू शकता. अर्थात, त्यातील विविध अॅप्लिकेशन्स अगोदर इन्स्टॉल करून घ्यावे लागतील. सर्च क्वेरी सजेशन्स आणि लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स ही मोबाईलची अॅपची खास वैशिष्ट्ये. हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर अगोदर तुमचा देश सिलेक्ट करावा लागतो. यात तुम्ही भारत सिलेक्ट केल्यास गुगलच्या सर्व अॅप्लिकेशनचा (उदा. यू ट्यूब) अॅक्सेस मिळणार नाही. तो हवा असल्यास देश विचारल्यास यूनायटेड स्टेट्स सिलेक्ट करा. या सेटिंग्ज तुम्ही नंतर बदलू शकता. लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स हवे असल्यास मात्र तुम्हाला तुम्ही राहत असलेला देशंच सिलेक्ट करावा लागेल.

गुगल मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये m.google.com असे टाईप करा.
सोनी-एरिक्सन, सॅमसंग मोबाईलधारकांसाठी स्वतंत्र अॅप्लिकेशन नसले तरी हीच लिंक वापरून एका ठिकाणाहून गुगलच्या सर्व सेवा अॅक्सेस करता येऊ शकतील.

अधिक माहितीसाठीः

Official Google Mobile Blog
Google Mobile Page
Read the full story

, , ,

इंटेलिजंट बिझनेससाठी...

June 3, 2009 4 comments

डेंटिस्टपासून ते मोबाईल स्टोअर शोधण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी ‘गुगल’ वापरणे आजकाल सोयीचे जाते. या अशा साऱ्या गोष्टी असतात यलो पेजेसमध्ये मिळतात; पण तुमच्या-माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं अशी जाडजूड यलो पेजेस डिरेक्टरी बाळगत नाहीत. एखादं चांगलं चायनीज रेस्टॉरंट शोधण्यासाठी आपण मोबाईलचा पर्याय अधिक पसंत करू. तुमच्या मोबाईलवर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही गुगल लोकलच्या आधारे सर्च करू शकता. यासाठी गुगलने ठिकठिकाणच्या आघाडीच्या यलो पेजेस कंपन्यांशी अगोदरंच टाय-अप्स केले आहेत. पण गल्लीतला पानवाला, इस्त्रीवाला, किरकोळ किराणा दुकानदार, हेअर कटिंग सलून, गॅरेजेस, पंक्चर काढून देणारे आदींची माहिती या ‘यलो पेजेस’मध्येदेखील नसते. अशा प्रकारच्या कोणत्याही व्यावसायिकास आपला व्यवसाय गुगल लोकल आणि गुगल मॅप्सवर आणण्याची सुविधा गुगलने लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून अगोदरंच उपलब्ध करून दिली आहे. आता अशा व्यावसायिकांसाठी गुगलने अॅनालिटिक्ससारखी नवी सेवाही देऊ केली आहे.
लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दुकानाची किंवा सेवेची माहिती देऊन (उदा. Anil Fruit Shop, Kumar Parisar Society, Kothrud, Pune) तुमचा व्यवसाय गुगल लोकल वर लिस्ट करू शकता. यानंतर संबंधित शहरातील किंवा प्रभागातील व्यक्तीने त्या अनुषंगाने सर्च केल्यास (Fruit Shop Kothrud) त्याला रिझल्टपेजवर तेथील व्यावसायिकांची माहिती व नकाशावर त्यांचे ठिकाण दिसेल. तुम्ही मोबाईलवरून सर्च करत असाल तर रिझल्टमध्ये डिस्प्ले झालेल्या टेलिफोन किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला थेट कॉलही करता येतो. तुम्हाला काही अॉफर्स द्यायच्या असतील तर त्याही यातून देता येतात. येणारे ग्राहक तुमच्या सेवेबद्दल त्यांच्या प्रतिक्रियाही येथे देऊ शकतात. या माध्यमातून सर्च करून हवे ते दुकान किंवा सेवा शोधणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढतंच जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही तुमचा व्यवसाय किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा व्यवसाय (उदा. तुमचे फॅमिली डॉक्टर, तुमचा किराणा दुकानदार, ठरलेला पाणीपुरीवाला वगैरे) गुगल लोकलवर लिस्ट करू शकता.


या सेवेत गुगलने नुकतेच अॅनालिसिस डॅशबोर्डही अॅड केले आहे. याचा मुख्य फायदा असा की कोणत्या कीवर्डसाठी किती लोक तुमच्या लिस्टिंगवर आले, कुठून आले याची थेट माहिती तुम्हाला मिळू शकते. म्हणजे फ्रुट शॉपसाठी लोकांनी Fresh Fruits, Fruits, Vegetable and Fruits, Apple, Alphonso, Mangoes यापैकी कोणत्या कीवर्डने सर्च केले हेही तुम्हाला समजू शकते. यावरून तुम्हाला एखाद्या वस्तूच्या मागणीचा अंदाजही येऊ शकतो. म्हणजे एखादे महागडे फळ तुमच्या दुकानात नसेल आणि त्या फळाच्या नावाने सर्वाधिक सर्च होतोय, असे लक्षात आले तर तुम्ही ते फळ तुमच्या दुकानात ठेऊन चांगला व्यवसाय करू शकता. याचप्रमाणे लोक कोणत्या भागातून तुमच्या दुकानात येतात, हेही या डॅशबोर्डवरून कळू शकते. ज्या भागातून सर्वात जास्त लोक येतात त्या भागात एखादी शाखा सुरू करण्यास हरकत नाही, असा अंदाजही तुम्ही लावू शकता. स्थानिक व्यावसायिकांसाठी गुगलची ही सेवा नक्कीच उपयोगाची ठरणार आहे. या गटात मोडणाऱ्या किती लोकांकडे इंटरनेट असेल याबद्दल शंका असली तरी तुम्ही-आम्ही आपल्या जवळच्या लोकांना ही सेवा वापरून पाहण्याचा सल्ला देऊन मार्गदर्शन नक्कीच करू शकतो!

(माझाच अनुभव सांगतो. मागे एकदा डेंटल क्लिनिंगसाठी मी माझ्याच एरियातील डेंटिस्ट्स शोधत होतो. सर्चमध्ये त्या एरियातील पाच-सहा डेंटिस्ट्स सापडले. त्यापैकी दोन-तीन जणांकडे मी जाऊन आलो. पण त्यातील दोन बंद होते आणि एक डॉक्टर क्लिनिंग करत नव्हते. फिरता-फिरता मला आणखी एक डेंटिस्ट सापडले. मी त्यांच्याकडे गेलो. क्लिनिंग झाल्यानंतर मी डॉक्टरांना म्हणालो की, डॉक्टर, तुमच्या शेजारच्या तीन-चार डॉक्टरांची नावं गुगल सर्चमध्ये येतात; पण तुमचं नाव त्यात नाहीये. त्यांना याचा काही गंध नव्हता. पण त्यांच्या डेस्कवर लॅपटॉप होता. नशीबाने इंटरनेटही होते. मी त्यांचे क्लिनिक गुगल लोकलवर लिस्ट केले. डॉक्टर खूश झाले. त्यांनी माझ्याकडून शंभर रुपये कमी घेतले आणि पुढच्या दिवाळीला ग्रिटींगही पाठवले!)

आणखी एकः
मित्रांनो, २७ मे रोजी साधी-सोपी टेक्नॉलॉजीला एक वर्ष पूर्ण झाले. जानेवारीपर्यंत जोमाने लिहिल्यानंतर थोडासा ब्रेक हवा होता. त्यामुळे ‘गुगल लॅटिट््यूड’ या शेवटच्या पोस्टनंतर लिखाण केले नाही. पण ब्लॉगला रोज भेट देणाऱ्यांची संख्या उत्साहवर्धक होती. त्यानंतरच्या चार महिन्यांत दरमहा हजारभर हिट्स ब्लॉगला मिळत होत्या. आजपासून पुन्हा एकदा नव्याने लिखाण करण्याचा विचार आहे.
तुमच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत...
Read the full story

,

लोकेशन शेअरिंगसाठी ‘गुगल लॅटिट्यूड’

February 5, 2009 2 comments

फेसबुक, ट्विटर यांच्या मोबाईल एडिशन्स वेगाने लोकप्रिय होत असतानाच आता गुगलने मोबाईलच्या वापराला एक नवी दिशा प्राप्त करून दिली आहे. गुगलने ‘मॅप्स’ प्रोजेक्ट अंतर्गत ‘लॅटिट्यूड’ या नव्या प्रॉडक्टची आज घोषणा केली. पुण्यात जंगली महाराज रोडवर फिरताना माझ्या एका मित्राने त्याच्या क्लाएंटला तो सोलापूर रोडवर टॅफिक जॅममध्ये अडकल्याचे सांगितल्याचे मला आठवतेय. पण 'गुगल लॅटिट्यूड'वरून तुम्ही तुमच्या मित्रांची अशी फसवणूक नक्कीच करू शकणार नाही. तुमच्या मोबाईलच्या लोकेशनवरून तुम्ही नेमके कुठे आहात, हे आता तुमच्या जी-टॉकवरील मित्रांना कळू शकणार आहे!

‘गुगल लॅटिट्यूड’ ही अतिशय साधी-सोपी अशी सेवा आहे. तुमच्याकडे सिंबियन एस ६० सपोर्टेड फोन्स (अथर्थात बहुतांश नोकिया स्मार्टफोन्स), विंडोज मोबाईल ५.० आणि त्यापुढील अॉपरेटिंग सिस्टिम वापरणारे सर्व फोन्स आणि कलर ब्लॅकबेरी हँडसेट्सवर तुम्ही गुगल लॅटिट्यूड वापरू शकता. अँड्रॉईड अॉपरेटिंग सिस्टिम्स असलेल्या टी-मोबाईल जी-१ साठी व अॅपल आयफोनसाठी ही सेवा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे, जी-मेल ब्लॉगवर म्हटले आहे.

‘गुगल लॅटिट्यूड’ वापरून तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट करू शकता, प्रोफाईल पिक्चर बदलू शकता; तसेच तुमच्या लॅटिट्यूड फ्रेंड्सचे लोकेशनही पाहू शकता. तुमचे लोकेशन दाखवायचे नसल्यास, तसा अॉप्शन यात आहे. त्यामुळे घाबरून जाऊन ही सेवा ट्राय करण्याचे टाळू नका.

‘गुगल लॅटिट्यूड’ वापरण्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस कनेक्टिव्हिटी किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल मॅप्स अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल. ते डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये जाऊन http://www.google.com/latitude असे टाईप करा किंवा येथे क्लिक करून तुमचा मोबाईल क्रमांक एंटर करा.
Read the full story

, , ,

अॉफलाईन जी-मेल

February 2, 2009 98 comments

अॉन-द-मूव्ह कनेक्टिव्हिटी ही संकल्पना आता भारतात लोकप्रिय होऊ लागलीये. रिलायन्स, टाटा इंडिकॉम, एअरटेल, आयडियासारख्या मोबाईल कंपन्यांची वायरलेस इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवा अनेक जण वापरत असतील. शिवाय मोबाईलवर इंटरनेट सर्फ करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत आहे. का कुणास ठाऊक, पण अॉन-द-मूव्ह इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणजे ‘डोक्याला ताप,’ अशीच अनेकांची समजूत आहे. अॉन-द-मूव्ह कनेक्ट असण्याचा प्रमुख फायदा म्हणजे तुम्ही केव्हाही एखादा महत्त्वाचा ई-मेल पाठवू शकता किंवा आलेल्या ई-मेलला उत्तर देऊ शकता. पण या कंपन्यांच्या डेटा कार्डवर विसंबून राहण्याची सोय नाही. मेलबॉक्स ओपन होण्यासच इतका वेळ लागतो, की तोपर्यंत समोरच्या माणसाला फोन करून किंवा एसएमएस करून निरोप पाठवता येऊ शकतो. एखादी फाईल पाठवायची असेल तर? डेटा कार्ड आणि हेवी अॅटॅचमेंट? फरगेट इट...बरं एखादा जुना मेल अोपन करून त्यातून काही माहिती मिळवायची असेल तर? महाराज, त्यासाठी मेलबॉक्स अोपन तर व्हायला हवा ना...आऊटलूक वापरणारे आलेले ई-मेल्स अॉफलाईन वाचू शकतात. पण जी-मेल वापरणाऱ्यांचे काय? आता जी-मेलवापरणारे देखील आपले मेल अॉफलाईन अॅक्सेस करू शकतात. जी-मेलने गेल्या आठवड्यात जी-मेल अॉफलाईन या सेवेची चाचणी सुरू केली आहे.

तुमच्या मेलबॉक्समधील सर्व कन्टेन्ट लोकल कॅश मेमरीत (Cache Memory) साठवून ठेवण्याचे काम जी-मेलतर्फे केले जाते. यासाठी ‘गुगल गिअर्स’ हे सॉफ्टवेअर वापरले जाते. गुगल अॉफलाईन अॅक्टिव्हेट केल्यानंतर तुम्ही जोपर्यंत इंटरनेटला कनेक्ट असता तोपर्यंतचे तुमचे सर्व ई-मेल्स गुगलच्या सर्व्हरशी सिंक्रोनाईझ केले जातात. तुम्ही डिसकनेक्ट झाल्यानंतर जी-मेल आपोआप अॉफलाईन मोडमध्ये जाते. या मोडमध्ये तुम्ही ई-मेल वाचू शकता, महत्त्वाच्या ई-मेल्सना स्टार मार्क करू शकता आणि लेबलही लावू शकता. ई-मेलला उत्तर देणेही शक्य होते; पण मेल पाठवता येऊ शकता नाही. तुमचे उत्तर आऊटबॉक्समध्ये सेव्ह होते व तुम्ही पुन्हा इंटरनेटला कनेक्ट झाला की, लगेच आऊटबॉक्समधील मेल पाठवले जाते. अॉफलाईन जी-मेलमधून अॅटॅच केलेल्या फाईल्स डाऊनलोड करता येत नाहीत, तसेच मेसेजेस डिलीट करता येत नाहीत. अॉफलाईन जी-मेलची अद्याप चाचणी सुरू आहे. त्यामुळे ते वापरताना काही अडचणी येऊ शकतात, असे गुगलने जी-मेलब्लॉगवर म्हटले आहे.

अॉफलाईन जी-मेल अॅक्टिव्हेट करण्यासाठीः
१. तुमच्या मेलबॉक्समध्ये वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या जी-मेल लॅब्जच्या आयकॉनवर क्लिक करा. किंवा सेटिंग्जमध्ये जाऊन लॅब्ज या टॅबवर क्लिक करा.
२. आता जी-मेल अॉफलाईन हे फीचर एनेबल करा. या पेजमध्ये सर्वांत खाली सेव्ह चेंजेस असे लिहिलेले असेल. त्यावर क्लिक करा.
३. आता पुन्हा इनबॉक्समध्ये या. वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात Offline 0.1 अशी लिंक अॅक्टिव्हेट झाली असेल. त्यावर क्लिक करून गुगल गिअर्स इन्स्टॉल करा.
४. पूर्ण इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला ब्राऊजर रिस्टार्ट करावे लागेल.
५. आता तुम्ही इंटरनेट कनेक्शन नसतानादेखील जी-मेल अॅक्सेस करू शकता.
Read the full story

,

‘हाय-डेफिनेशन’ डाऊनलोडर!

January 13, 2009 7 comments

यूट्यूबवर आजकाल अनेक टीव्ही सिरियल्स आणि मूव्हीज अपलोड केल्या जातात. अमेरिकन, ब्रिटीश आणि भारतीय प्रॉडक्शन हाऊसेस याकडे एक प्रमाोशनल अॅक्टीव्हिटी म्हणून पाहत आहेत. त्यामुळे फॉक्स सर्चलाईट, कोलंबिया पिक्चर्स आदींचे स्वतंत्र यूट्यूब चॅनेल्सही आहेत. डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, फॉक्स हिस्टरी आदी चॅनेल्सवरील गाजलेल्या सिरीजही तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. पण यूट्यूबवर पाहायचं म्हणजे तुम्हाला अॉनलाईन राहावं लागतं. शिवाय तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर ‘लो’ किंवा असेल त्या रिझॉल्यूशनमध्ये संबंधित व्हिडीओ पाहायला लागतात. हे व्हिडीओ हाय-डेफिनिशनमध्ये उपलब्ध असल्यास तुम्ही ते आहे तसे डाऊनलोड करून थेट टीव्हीवर पाहू शकता.




यूट्यूबवरील व्हिडीओ एचडी फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही यूट्यूब डाऊनलोडर एचडी या सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. विंडोज अॉपरेटिंग िसस्टिम (95/98/Me/2000/XP/2003/Vista) वर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता येऊ शकते. यूट्यूबवर एचडी फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेल्या व्हिडीओची लिंक तुम्ही यूट्यूब डाऊनलोडर एचडीमध्ये पेस्ट केली की संबंधित व्हिडीओ एफएलव्ही, एव्हीआय, एमपी४ (आयपॉड कम्पॅटिबल) किंवा एव्हीआय एचडी फॉरमॅटमध्ये सेव्ह करून घेऊ शकता.
यूट्यूब डाऊनलोडर एचडी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

यूट्यूबवरील व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठीच्या आणखी एका सेवेची माहिती वाचाः झटपट डाऊनलोड
Read the full story

,

वेळ वाचवण्यासाठी

January 12, 2009 0 comments

जी-मेलमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारची अॅटॅचमेंट (उदा. pdf, doc, xls, wmv, ppt) असलेले मेल कसे शोधावे, अशी विचारणा साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे वाचक सचिन दुभाषी यांनी केली होती.
जी-मेलच्या सर्च बॉक्समध्ये पुढील फॉरमॅटमध्ये क्वेरी दिल्यास तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळू शकेल.
तुम्हाला पीडीएफ अॅटॅचमेंट असलेल्या मेल्स शोधायच्या असतील तर पुढीलप्रमाणे सर्च द्याः
filename:{pdf}
याच पद्धतीने तुम्ही महिरपी कंसात स्पेस देऊन विविध प्रकारच्या अॅटॅचमेंट्स शोधू शकता. एखाद्या ठराविक व्यक्तीकडून आलेल्या अॅटॅचमेंट शोधण्यासाठी अॅडव्हान्स्ड सर्च अॉप्शन्समध्ये जाऊन From मध्ये त्या व्यक्तीचे नाव व Has the words मध्ये filename:{pdf doc} असे टाईप करा. तुम्हाला हवे ते रिझल्ट्स मिळतील. वेळ वाचवण्यासाठी ही टिप खूप उपयोगी ठरते. Read the full story

गुगल इंडिया ब्लॉग वाचलात का?

December 4, 2008 1 comments

गेल्या महिन्याभरात गुगलने अनेक नवी प्रॉडक्ट्स लॉंच केली. भारतीय ग्राहक समोर ठेवून लॉंच केलेल्या काही खास प्रॉडक्ट्सकडून (उदा. एसएमएस चॅनेल्स आणि एसएमएस सर्च) गुगलच्या अधिक अपेक्षा असणार. एकूण काय, तर भारतीय बाजारपेठेवर गुगलने आता लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी गेल्या अॉक्टोबरमध्ये गुगल इंडिया ब्लॉगही सुरू केला आहे.

या ब्लॉगवर अद्याप फारशी अॅक्टिव्हिटी पाहायला मिळालेली नसली तरी आगामी काळात गुगल इंडिया ब्लॉग भारतीय नेटिझनांच्या फेव्हरेट साईट्समध्ये नक्कीच पाहावयास मिळेल. गुगल इंडिया ब्लॉगवरील पहिल्या पोस्टमध्ये एम.टी.रघुनाथ हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणतोः



Namaste, India!

Google has a lot going on in India: We have offices in four cities. We're building some new, interesting products—like Google Map Maker and many others on India Labs — for Indian users. We have great aloo parathas in our cafes. And we have the largest number of Googlers outside the United States. But ... we didn't have an official blog where we could talk about the exciting things we're working on.

(संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

गुगलचे आणखी काही ब्लॉगः
अॉफिशियल गुगल ब्लॉग
जी-मेल ब्लॉग
गुगलच्या सर्व ब्लॉगची यादी येथे पाहा.
गुगलच्या विविध प्रॉडक्ट्सच्या यादीसाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, , ,

वेबकॅम नसतानाही करा व्हिडीओ चॅट...

November 21, 2008 0 comments


जी-मेलने गेल्या आठवड्यात व्हिडीओ अाणि व्हॉईस चॅट हे नवे फीचर सुरू केले. यापूवर्वी व्हॉईस चॅटसाठी जी-टॉक हे अॅप्लीकेशन वापरावे लागत असे. व्हिडीओ चॅटसाठी तुम्ही स्काईप किंवा याहू मेसेंजर वापरत असाल. पण थेट ई-मेलमध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस चॅट इंटिग्रेट करून गुगलने या प्रचलित सेवांसमोर जबरदस्त स्पधर्धा निमर्माण केली आहे. तुमच्यापैकी अनेकांनी जी-मेलची ही नवी सेवा वापरून पाहिली असेलच. काय म्हणता? तुम्ही अजून ही सेवा वापरलेली नाही? का? वेबकॅम नाही म्हणून? फिकर नॉट...



साधी-सोपी टेक्नॉलॉजी नियमित वाचणाऱ्यांना ही अडचण आलीच नसेल. अॉगस्टमध्ये लिहिलेल्या एका पोस्टमध्ये मोबाईल कॅमेऱ्याला वेबकॅममध्ये रुपांतरित करणाऱ्या वीगो (वेबकॅम व्हेरेवर आय गो) या सेवेबद्दल मी माहिती दिली होती. ती पोस्ट तुमच्याकडून मिस झाली असल्यास, पुन्हा एकदा वाचा (मेरे पास 'वीगो' है) आणि जी-मेलच्या नव्या सेवेचा आनंद घ्या. याच पद्धतीने तुम्ही स्काईप, याहू मेसेंजर आणि विंडोज लाईव्ह मेसेंजर वापरूनदेखील व्हिडीओ चॅट करू शकता.

त्यापूवर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याः
१. जी-मेल व्हिडीओ आणि व्हॉईस चॅटसाठी एक छोटेसे अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे लागते. ते अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. फुलस्क्रीन व्हिडीओ चॅटसाठी तुम्हाला तुमचे फ्लॅश व्हर्जन अपडेट करावे लागेल.
३. कॉम्प्युटर रिस्टार्ट करा.
४. वीगो हे अॅप्लीकेशन केवळ नोकियाच्या सिरीज ६० (व्हर्जन २.० आणि ३.०) हॅंडसेट्सवर वापरता येते. कम्पॅटिबल हॅंडसेट्सच्या यादीसाठी येथे क्लिक करा.
५. वीगोचे डेस्कटॉप अॅप्लीकेश विंडोज एक्सपीवर वापरता येते. ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
६. इन्स्टॉल करण्याआधी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईलचे ब्लुटूथ अॉन करा.
७. डेस्कटॉप अॅप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातूनच एक .sis फाईल मोबाईलवर पाठवली जाते. त्यासाठी डेस्कटॉप/लॅपटॉप आणि मोबाईल पेअर्ड असल्याची खात्री करा. .sis फाईल मोबाईलवर इन्स्टॉल करा.
८. दोन्हीकडील अॅप्लीकेशन्स रन करा. मोबाईलवर अॉप्शन्समध्ये जाऊन कनेक्ट म्हटल्यानंतर डेस्कटॉप/लॅपटॉपवर व्हिडीओ दिसू लागेल.
९. आता तुम्ही जी-मेल चॅटमध्ये गेल्यास तुमच्या नावासमोर व्हिडीओ आयकॉन दिसू लागेल.
१०. एन्जॉय जी-मेल व्हिडीओ चॅट!
Read the full story

फ्रेश जी-मेल

November 20, 2008 2 comments

गेल्या आठवड्यात व्हिडीओ चॅट लॉंच केल्यानंतर आता या आठवड्यात जी-मेलने थीम्सची घोषणा केली आहे. अॉरकुट वापरणाऱ्यांनी थीम चेंजचा अनुभव घेतला असेलच. त्याच धतर्तीवर जी-मेलने काल रात्री थीमची अधिकृत घोषणा केली. यापूवर्वी ग्रीसमंकी एक्स्टेंशन वापरून जी-मेलचा लूक बदलावा लागत असे. आता मात्र जी-मेल सेटिंग्जमध्येच थीम्स असा अॉप्शन उपलब्ध होणार आहे. सुरवातीला जी-मेलने ३० थीम्स उपलब्ध करून िदल्या असून यात क्रोम, नेचर, नोटबुक, रेन आदींचा समावेश आहे.



ही सुविधा टप्प्याटप्प्याने सर्व जी-मेलधारकांसाठी अॅक्टिव्ह होणार असून येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे जी-मेलच्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे. माझ्या अकाऊंटवर अद्याप ही सुविधा अॅक्टिव्ह झालेली नाही. तुमच्या अकाऊंटवर झाली असल्यास कृपया आपला अनुभव येथे शेअर करा.
जी-मेलच्या डिफॉल्ट लूकमध्येदेखील किरकोळ सुधारणा केल्याचे या ब्लॉगवर म्हटले आहे.
अपडेटः
ब्लॉगर गणेशने Zoozimp ही थीम सजेस्ट केली आहे.
ब्लॉगर अभिजीतने Desk ही थीम सजेस्ट केली आहे.
तुम्हीही तुमचे सजेशन देऊ शकता. Read the full story

,

से बाय टू शॉर्टकोड्स, वेलकम गुगल एसएमएस सर्च

November 19, 2008 0 comments

गुगल इंडियाने एसएमएस सर्चची आज घोषणा केली. भारतातील जीपीआरएसधारकांची संख्या सातत्याने वाढत असली तरी एकूण मोबाईलधारकांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. जीपीआरएस न वापरणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून गुगल इंडियाने सर्चची प्रक्रिया आणखी सोपी करून टाकली आहे. ही सेवा भारतातील सर्व जीएसएम आणि सीडीएमए ग्राहकांना वापरता येईल.

इंटरनेटवरील गुगल सर्च आणि एसएमएसवरील गुगल सर्च यात मोठा फरक असल्याचे कंपनीने सांगितले आहे. एसएमएसवरील सर्च रिझल्ट संबंधित कीवर्डसाठी अत्यंत रिलेव्हन्ट असतील, याची खात्री गुगल इंडियाने दिली आहे. या सेवेमुळे 58888 सारख्या शॉर्टकोड सेवांवर नक्कीच परिणाम होणार आहे.

एसएमएस सर्च कसा करावा?
उदा. तुम्हाला ताजा क्रिकेट स्कोअर जाणून घ्यायचा असेल, तर Cricket India असा मेसेज 9-77-33-00000 या क्रमांकावर पाठवून द्या. हा क्रमांक शॉर्टकोड नसल्यामुळे या मेसेजसाठी नॉर्मल एसएमएस चार्ज पडेल.


याच पद्धतीने तुम्ही शहरातील सिनेमे, ट्रेनचे शेड्यूल, भविष्य, पंचांग, फ्लाईट स्टेटस, पीएनआर स्टेटस, ताज्या बातम्या आदी सर्व माहिती मिळू शकेल. थोडक्यात ज्या गोष्टींसाठी तुम्ही गुगल ओपन करता, त्या सर्व गोष्टी आता एसएमएसवरून मिळणार आहे. तेव्हा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये 9-77-33-00000 हा नंबर गुगल सर्च म्हणून अॅड करावयास विसरू नका.
Read the full story

, ,

एक का तीन, एक का तीन...

November 17, 2008 0 comments

गुगलमध्ये सर्च दिल्यास नेहमीप्रमाणे मोस्ट रिलेव्हन्ट रिझल्ट्स पहिल्या पाचांत आपल्याला मिळतात. एकदा का अपेक्षित लिंकवर क्लिक केलं की आपण पुन्हा गुगलच्या रिझल्ट पेजवर फिरकत नाही. सर्च रिझल्ट्सच्या प्रेझेंटेशनवर आपण फारसं लक्ष देत नाही. पण यावर सर्च इंजिन चालवणाऱ्यांचे बारीक लक्ष आहे. कशा पद्धतीने रिझल्ट्स डिस्प्ले केल्यानंतर वाचकाला सवर्वाधिक समाधान मिळेल, यासंदभर्भात या कंपन्या सतत अभ्यास करत असतात. यातूनच व्हिज्युअल सर्च इंजिन्सची संकल्पना पुढे आली. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी आतापर्यंत काही व्हिज्युअल सर्च इंजिनची अोळख करून दिलेली आहे (अधिक माहितीसाठी Related Stories वाचा). गुगलच्या सर्च िरझल्ट्समध्ये थोडेसे नावीन्य आणणाऱ्या एका फायरफॉक्स एक्स्टेंशनची माहिती मी आज देणार आहे.

गुगलचा डिफॉल्ट सर्च रिझल्ट व्ह्यू सिंगल कॉलम आहे. सिंगल कॉलममध्ये एका पेजवर जास्तीत जास्त १० सर्च रिझल्ट्स दिसतात. अधिक स्क्रीन रिझॉल्यूशन किंवा वाईडस्क्रीन मॉनिटर्स वापरणाऱ्यांना संपूर्ण स्क्रीनचा वापर करावयचा असल्यास गुगल मल्टी-कॉलम व्ह्यूचा फायदा होऊ शकतो. 1920×1200 रिझॉल्यूशन ठेवलेल्या मॉनिटरवर गुगल मल्टी-कॉलम वापरून एका वेळी ३० रिझल्ट्स पाहता येणे शक्य आहे. प्रॉडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गुगल मल्टी-कॉलमचा नक्कीच फायदा होऊ शकतो.



फायरफॉक्स वापरणाऱ्यांसाठी ग्रीसमंकी स्क्रीप्ट इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. ग्रीसमंकी एनेबल केल्यानंतर गुगल मल्टी-कॉलम युजरस्क्रीप्ट इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा. प्रत्येक इन्स्टॉलेशननंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करणे गरजेचे आहे. आता तुम्ही ALT 1, ALT 2 आणि ALT 3 वापरून गुगल सर्च रिझल्ट पेज एक, दोन किंवा तीन कॉलममध्ये पाहू शकाल.
Read the full story

,

न्यू, इम्प्रूव्ह्ड जी-मेल मोबाईल २.०

October 24, 2008 1 comments

तुमच्यापैकी अनेक जण मोबाईलवर ई-मेल पाहण्यासाठी जी-मेल अॅप्लीकेशन वापरत असतील. ज्यांनी अद्याप हे अॅप्लीकेशन वापरले नसेल त्यांच्यासाठी आणि जे वापरत अाहेत, त्यांच्यासाठीही खूषखबर आहे. जी-मेल मोबाईलचे लेटेस्ट व्हर्जन काल लॉंच झाले. या व्हर्जनबद्दल मी आज माहिती देणार आहे.

जी-मेल फॉर मोबाईल २.० असे या नव्या व्हर्जनचे नामकरण करण्यात आले आहे. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या डेरेक फिलीप्स या अभियंत्याने जी-मेल आणि गुगल मोबाईल ब्लॉगवर या व्हर्जनच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. या अगोदरच्या व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी होत्या - उदा. स्क्रोलिंगमध्ये अडचणी येत असत, एक वेळी केवळ एकच ई-मेल ड्राफ्ट ठेवता येत असे, एका वेळी एकच जी-मेल अकाऊंट configure करता येत असे वगैरे. नव्या व्हर्जनमध्ये यातील अनेक त्रुटी दूर करून मोबाईलवर कम्प्लीट ई-मेल एक्स्पीरिअंस देण्याचा प्रयत्न केला आहे.



जी-मेल फॉर मोबाईल २.०ची काही वैशिष्ट्येः
१. स्पीड इम्प्रूव्हमेंटः स्क्रीन फ्रीझ होण्याचे प्रकार कमी, पूवर्वीपेक्षा अधिक स्मूद स्क्रोलिंग
२. मल्टिपल अकाऊंट्सः एकावेळी अनेक जी-मेल अकाऊंट्स configure करण्याची सुविधा. अगोदरच्या व्हर्जनमध्ये एकावेळी एकच अकाऊंट वापरता येत असे.
३. अॉफलाईन सपोर्टः सिग्नल नसतानादेखील नव्याने आलेले ई-मेल्स अॅक्सेस करता येतात.
४. मल्टिपल ई-मेल ड्राफ्ट्सः एकावेळी अनेक ड्राफ्ट्स सेव्ह करून ठेवता येतात.
५. शॉर्टकट कीजः QWERTY कीबोर्डचा मोबाईल असल्यास शॉर्टकट कीज वापरता येतात. उदा. Undoसाठी Z, New conversationसाठी k, old conversationसाठी j वगैरे. अधिक शॉर्टकट्ससाठी अॅप्लीकेशनमध्ये जाऊन Menu/Help वर क्लिक करा.
६. ३५ भाषांचा सपोर्टः तुमच्या मोबाईलच्या डिफॉल्ट लॅंग्वेजनुसार जी-मेल फॉर मोबाईल २.० लॅंग्वेज सिलेक्ट करतो. यात हिंदीसह ३५ जागतिक भाषांचा समावेश आहे.

जी-मेल फॉर मोबाईल २.० डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये जाऊन m.google.com/mail ही लिंक अॅक्सेस करा. तुम्ही अगोदरचे व्हर्जन वापरत असाल तर याच लिंकवर जाऊन नवे व्हर्जन डाऊनलोड करा व अाधीचे व्हर्जन रिप्लेस करा.
Read the full story

गुगलचे रिटर्न गिफ्ट!

September 27, 2008 1 comments

सजर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनी बरोबर दहा वषर्षांपूवर्वी गुगलची स्थापना केली आणि अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत आज गुगलला जगातील अव्वल कंपन्यांच्या यादीत नेऊन ठेवले. गुगलची स्थापना करण्यापूवर्वी आणि केल्यानंतरची चार-पाच वर्षं त्यांच्यासाठी मोठी आव्हानात्मक होती. आपल्या संकल्पनेत जग जिंकण्याची ताकद आहे याची त्यांना खात्री होती. पण अशा गोष्टी इतरांना (विशेषतः फायनान्सर्सना) पटवून देणे अत्यंत कठीण असते. याची जाणीव ठेवून गुगलने दशकपूतर्ती निमित्त आज Project 10 to the 100th ची घोषणा केली आहे. तुमच्याजवळ जग बदलू शकणारी कल्पना असेल तर ती लगेच गुगलला कळवा गुगलच्या चाळणीतून तुमची कल्पना पुढे गेल्यास तुमच्या प्रोजेक्टसाठी आवश्यक तेवढा निधी मिळू शकतो. या प्रोजेक्टबद्दल अजूनतरी फारसे मतप्रदर्शन झालेले नाही. अनेक जण याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याची शक्यता आहे. आमची कल्पना घेऊन गुगल पैसे लाटणार वगैरे वगैरे. पण डोन्ट बी इव्हिल असे गुगलचे घोषवाक्य आहे. त्यामुळे गुगल असे काही करेल, असे वाटत नाही. याऊलट गुगलने व्यक्त केलेली कृतज्ञता खरोखर वाखाणण्याजोगी आहे, असे मला वाटते. गुगलच्या अनेक सेवा वापरणाऱ्या तुमच्या-माझ्यासारख्या लोकांमुळेच कंपनीचा वार्षिक महसूल १६.५ बिलियन डॉलरवर गेला आहे. लोकांना मदत करणाऱ्याना सक्षम करणे या हेतूने आम्ही हा प्रोजक्ट सुरू करत आहोत, असे गुगलने म्हटले आहे. यातून येणाऱ्या पाच सवर्वोत्तम कल्पना राबवण्यासाठी गुगल १० मिलियन डॉलरची मदत करणार आहे. पुढे दिलेल्या विषयाशी संबंधित कोणतीही कल्पना तुमच्याकडे असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्ही २० अॉक्टोबरपर्यंत येथे सबमिट करू शकता.



या माध्यमातून आलेल्या सर्व कल्पनांचे ठराविक निकषांच्या आधारे विश्लेषण केले जाईल. त्यातून निवडक १०० कल्पना २७ जानेवारी २००९ रोजी जाहीर केल्या जातील. त्यानंतर या १०० कल्पनांतून पब्लिक वोटिंगच्या आधारे २० कल्पनांची निवड होईल व गुगलने स्थापलेली सल्लागार समिती त्यातून पाच सवर्वोत्तम कल्पनांची निवड करेल.
Read the full story

,

जी-मेलमध्ये इमेज कशी प्लेस कराल?

September 26, 2008 2 comments

तुम्हाला अनेक फॉरवर्ड ई-मेल्स येत असतील. फॉरवर्ड ई-मेल्समध्ये अनेकदा इमेजेस असतात. जी-मेलवरून असे मेल पाहताना Display Images Below असा अॉप्शन येतो. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्या मेलसोबत अालेल्या इमेजेस पाहू शकतो. या इमेजेस अॅटॅचमेंट स्वरूपात आलेल्या नसतात. त्या मेलमध्येच एम्बेड केलेल्या असतात. जी-मेलमध्ये एचटीएमएल फॉरमॅटिंगचा अॉप्शन नसल्याने तुम्हाला डेस्कटॉपवर असणाऱ्या इमेजेस थेट मेल बॉडीमध्ये प्लेस करता येत नाहीत. पण एक सोपी ट्रिक वापरून तुम्ही हे साध्य करू शकता.

तुम्ही आऊटलूक किंवा तत्सम डेस्कटॉप मेल क्लाएंट वापरत असाल आणि त्यावर कोणतेही मेल अकाऊंट Configure केलेले असेल तर तुम्ही थेट बॉडीमध्ये इमेजेस प्लेस करू शकता. कारण अशा क्लाएंट्समध्ये एचटीएमएल अॉप्शन असतो. अथर्थात यासाठी हा अॉप्शन अॅक्टीव्ह असायला हवा.

डेस्कटॉपवरील एखादी एमेज जी-मेलच्या बॉडीमध्ये प्लेस करायची असल्यास सर्वप्रथम तुम्हाला ती एखाद्या इमेज-होस्टिंग साईटवर होस्ट करावी लागेल. उदा. इमेजशॅक किंवा पिकासा वेब अल्बम. इमेज होस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याची एक लिंक मिळेल. ही लिंक दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करा. तुम्ही अपलोड केलेली इमेज डिस्प्ले होईल. आता ही इमेज थेट जी-मेलच्या कॉम्पोझ बॉक्समध्ये ड्रॅग करा. दुसऱ्या विंडोएेवजी दुसऱ्या टॅबमध्ये इमेज ओपन केल्यास Ctrl-A करून नंतर Ctrl-C (अर्थात सिलेक्ट अॉल आणि कॉपी) करावे. आता कॉम्पोझ बॉक्समध्ये ज्या ठिकाणी इमेज प्लेस करायची आहे तेथे कर्सर नेऊन Ctrl-V (पेस्ट) करावे.



यावरून एक लक्षात येईल की जी-मेलच्या कॉम्पोझ बॉक्समध्ये वेबवर असलेली कोणतीही इमेज प्लेस करता येते. त्यामुळे इतर साईटवरील इमेज प्लेस करायची असल्यास ती डेस्कटॉपवर सेव्ह न करता थेट कॉम्पोझ बॉक्समध्ये ड्रॅग करावी. कॉम्पोझ बॉक्समध्ये इमेज प्लेस केल्यानंतर इमेज रिसाईझचे अॉप्शनही तुम्हाला पाहायला मिळतील.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे वाचक अनिकेत वैद्य यांनी आणखी एका ट्रिकचा उल्लेख केला आहे. ती अशीः
गुगल डॉक्समध्ये जाऊन नवे डॉक्युमेंट क्रिएट करा. मेनूबारमधून इन्सर्ट > पिक्चर सिलेक्ट करून इमेज अॅड करा. इथे प्लेस केलेली इमेज Ctrl-A करून सिलेक्ट करा व जी-मेल कॉम्पोझ बॉक्समध्ये प्लेस करा.



Read the full story

गुगल लॅब्जची नवी फीचर्स

September 18, 2008 0 comments



गुगल लॅब्जने काही नवी फीचर्स काल अॅड केली आहेत. यापूवर्वी लॅब्जने एकाचवेळी १३ फीचर्स अॅड केली होती. काल त्यांनी ८-९ नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. यातील सवर्वांत महत्त्वाचे आणि गरजेचे फीचर म्हणजे राईट हॅंड चॅट अॅंड लेबल.



तुम्ही वाईडस्क्रीन डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरत असाल आणि कायम जी-मेल वापरत असाल तर हे फीचर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तुमच्या जी-मेल अकाऊंटमध्ये शेकडो लेबल्स आणि तितकेच चॅट फ्रेंड्स असतील तर स्क्रोल डाऊन करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशावेळी तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन लॅब्जवर क्लिक करा. त्यात राईट-साईड चॅट आणि राईट-साईड लेबल्स असे पर्याय दिसतील. एनेबल केल्यानंतर चॅट बॉक्स आणि लेबल बॉक्स उजव्या बाजूस शिफ्ट होतील. यासोबतच डाव्या बाजूस असणारे एलेमेंट्स हलवण्यासाठी तुम्ही नेव्हीगेशन बार ड्रॅग अॅंड ड्रॉप हे फीचर वापरू शकता.
लेबलसाठी कस्टमाईज्ड कलर आणि गो टू लेबल ही दोन नवी फीचर्सही अॅड केलेली आहेत. रिप्लायसाठी तीन नवी फीचर्स अॅड केलेली आहेत. तसेच अनेक वेळा अॅटॅचमेंट पाठवण्यास विसरणाऱ्यांसाठी फरगॉटन अॅटॅचमेंट रिमाईंडर हेही फीचर अाहे.
या अगोदरच्या फीचर्ससाठी वाचाः तुम्ही जी-मेल लॅब्ज ट्राय केलंत का?
Read the full story

,

लाईटवेट मेल

September 10, 2008 0 comments

कधी कधी इंटरनेटची स्पीड इतकी कमी असते की गुगलसुद्धा ओपन होण्यात अडचण येते. अशा वेळी आपल्याला एखादा अर्जंट ई-मेल करायचा असेल तर?



जी-मेल ओपन होताना अडचण येत असेल तर तुम्ही बेसिक एचटीएमएल व्ह्यू अॉप्शन सिलेक्ट करू शकता. पण त्याहूनही लाईट अॉप्शन हवा असेल तर तुम्ही जी-मेल मोबाईल ट्राय करू शकता. जी-मेल मोबाईल हे सर्वांत लाईट अॅप्लीकेशन आहे. जी-मेल मोबाईल केवळ मोबाईलवरंच वापरावं असं नाही. तुम्ही कोणत्याही ब्राऊजरमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करू शकता. त्यासाठी http://m.gmail.com यावर क्लिक करा. तुम्ही एक स्वतंत्र विंडोमध्ये जी-मेल मोबाईल ओपन करून ठेवू शकता. याच पद्धतीने तुम्ही याहू मेल (m.yahoo.com), एमएसएन मेल (mobile.msn.com) आदी सहजरित्या वापरू शकता. मोबाईलवर आणि पीसीवरदेखील!
Read the full story

,

क्रोम शांती क्रोम!

September 5, 2008 3 comments



गुगलच्या क्रोम या नव्या ब्राऊजरबद्दल तुम्ही एव्हाना एेकले किंवा वाचले असेल. विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांनी तर ते वापरूनदेखील पाहिले असेल. गुगल क्रोम लॉंच होऊन आज चार दिवस झाले. माझ्याकडे अॅपल मॅकबुक असल्याने मी अद्याप ते वापरू शकलेलो नाही. मॅकिन्तोश आणि लिनक्ससाठीचे व्हर्जन लवकरात लवकर लॉंच करणार असल्याचे गुगलने कन्फर्म केले आहे. माझ्या ज्या सहकाऱ्यांनी क्रोम वापरून पाहिले आहे, त्यातील बहुतेक सवर्वांच्या पसंतीस ते खरे उतरले आहे. बहुतांश ब्लॉगर्सनेदेखील क्रोमचे भरभरून कौतुक केले आहे. क्रोमच्या बीटा लॉंचमुळे ब्राऊजरमधील स्पधर्धा अधिकच तीव्र होणार, हे स्पष्ट आहे. क्रोमची थेट स्पर्धा इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि मोझिला फायरफॉक्सशी असेल. वेबसर्फरला कमीत कमी कष्टांत अधिक सोयी मिळतील याचा विचार करून सुधारित फायरफॉक्स ३ नुकतेच लॉंच झाले आहे. मायक्रोसॉफ्टनेही इंटरनेट एक्स्प्लोएरर ८ चे बीटा व्हर्जन बाजारात आणले आहे. स्पीड आणि मेमरी युसेज या निकषांवर क्रोम या दोन्ही ब्राऊजर्सना मागे टाकत असल्याचे विविध ब्लॉगर्सने केलेल्या चाचण्यांवरून पुढे आले आहे.



बीटा लॉंच असल्यामुळे अनेक प्रोफेशनल टेक्नॉलॉजी ब्लॉगर्स आणि मीडिया रायटर्स याविषयी उघड भाष्य करीत नाहीयेत. विविध ब्लॉगवर क्रोमबाबत सुरू असलेली चचर्चा अशीः
- विविध अॅड-अॉन्स किंवा एक्स्टेंशन्समुळे फायरफॉक्स आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.
जगातील सुमारे ८० टक्के वेबसर्फर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर वापरतात. या सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यास गुगल क्रोमला निश्चितंच काही कालावधी लागणार. गुगलने सर्च इंजिनच्या स्पधर्धेत याहूला ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने मागे टाकले, त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-बॅक टू बेसिक्स अशा प्रकारचे साधे-सोपे ब्राऊजर असल्याने अधिक वेगाने लोकप्रिय होण्याची शक्यता.
सर्वसामान्य वेबयुजरच्या प्रत्येक टप्प्यावर अापली गरज निमर्माण करणाऱ्या गुगलतफर्फे लवकरच मोबाईल अॉपरेटिंग सिस्टिम (अॅंड्रॉईड) लॉंच केली जाणार आहे. अॅंड्रॉईडच्या माध्यमातून क्रोम अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयफोनलाही धोका संभावतो.

-वेबसर्फरसाठीचे प्रायमरी ब्राऊजर होण्यासाठी अतिशय सिंपल इंटरफेस ही क्रोमची ताकद ठरू शकते आणि त्यापासूनच सवर्वांत मोठा धोकाही संभावतो. First Impression कितीही चांगले असले तरी प्रायमरी ब्राऊजर होण्याइतपत पॉवरफुल फीचर्स गुगल क्रोमच्या बीटा व्हर्जनमध्ये नाहीत.

-हीच बाब टूलबारसाठीही लागू पडते. टूलबार असणे सोयीचे की नसणे, हे फायनल व्हर्जनमध्ये आपल्याला कळेल.

-गुगल क्रोमची जी वैशिष्ट्ये गुगलने हायलाईट केली आहेत त्यातील बहुतेक सर्व वैशिष्ट्ये विविध एक्स्टेंशन्सच्या रूपाने फायरफॉक्समध्ये उपलब्ध आहेत. लाईफहॅकरने याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

गुगल क्रोमबद्दल आणखीही बरेच लिहिले जाईल, टीका होईल, अडचणी समोर येतील. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे बीटा व्हर्जन आहे. त्यामुळे अंतिम व्हर्जन येईपर्यंत ‘क्रोम शांती क्रोम’ एवढेच आपण म्हणू शकतो.
तुमचे गुगल क्रोमबाबत काय मत आहे?
Read the full story