,

सर्च करा, पैसे कमवा...

July 15, 2008 Leave a Comment


भारतीय मोबाईल व्यवसायात एक काळ असा होता जेव्हा लोकल इनकमिंग कॉलसाठीही पाच रुपये मोजावे लागत. आज भारतातील मोबाईल सेवा जगातील सर्वांत स्वस्त सेवा म्हणून ओळखली जाते. अशात रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन मोबाईल’ने भारतात ‘टाटा इंडिकॉम’च्या मदतीने सेवा सुरू केली आणि ‘गेट पेड फॉर इनकमिंग’ या योजनेने तरुणवगर्गास आकर्षित केले. या नावीन्यपूर्ण योजनेस कितपत यश मिळाले, याची आकडेवारी उपलब्ध नसली तरी सहा-सात मोबाईल कंपन्यांसोबत स्पर्धा करायची म्हटल्यावर अशा योजना महत्त्वाची भूमिका निभावतात. असाच काहीसा प्रकार आता सर्च इंजिन्सच्या बाबतीत घडताना दिसतोय. तुम्ही महिन्याला जर ६५०० सर्चेस करत असाल तर बसल्या-बसल्या २५ डॉलर्स कमवू शकता...

इंटरनेटच्या मायाजालात सर्च इंजिन्सच्या माध्यमातून किती कमाई करता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गुगल होय. केवळ आठ-नऊ वषर्षांच्या कालावधीत १६ बिलीयन डॉलर्सची उलाढाल करून गुगलने हे सिद्ध केले आहे. सर्च इंजिन म्हणजे गुगल हे समीकरण आता लहान मुलांच्या डोक्यातही पक्कं झालंय. अशा परिस्थितीत इतर सर्च इंजिन्सना नावीन्यपूर्ण योजना राबवून इंटरनेट ट्रॅफिक आपल्याकडे वळवणे भाग आहे. स्कोर या सोशल सर्च इंजिनने नेमकी हीच स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे. स्कोरवर केलेल्या प्रत्येक सर्च आणि कॉमेंटसाठी तसेच दिलेल्या प्रत्येक व्होटसाठीही पॉईंट्स मिळतात. सर्चसाठी १, व्होटसाठी २ आणि कॉमेंटसाठी ३ पॉईंट्स मिळतात.



तुम्ही तुमच्या िमत्रांना स्कोर वापरण्यासाठी इन्व्हाईट केल्यास त्यांनी कमविलेल्या एकूण पॉईंट्सच्या २५ टक्के पॉईंट्स तुम्हाला मिळतात. स्कोरवर रजिस्टर झाल्यानंतर स्कोरमधून सर्च करून तुम्ही हे पॉईंट्स कमवू शकता. असे एकूण ६५०० पॉईंट्स कमवल्यानंतर २५ डॉलरचे व्हिसा गिफ्ट कार्ड तुम्हाला घरपोच मिळते. हे गिफ्ट कार्ड वापरून तुम्ही कोणत्याही दुकानांत खरेदी करू शकता.
स्कोर हे वास्तविक सर्च इंजिन अॅग्रीगेटर आहे. यात तुम्ही कोणताही सर्च दिल्यास गुगल, याहू आणि एमएसएन यावर मिळणारे रिझल्ट्स एकत्रित दाखवले जातात. यात तुम्ही हवा तो प्राधान्यक्रम निवडू शकता. तेव्हा याहू, गुगल विसरा आणि स्कोर बुकमार्क करा!

सर्च इंजिनबाबत साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :



2 comments »

  • Unknown said:  

    far chaan mahiti detay tumhi. asech mahiti dyavi. shubhhechha.

  • Unknown said:  

    far chaan mahiti detay tumhi. asech mahiti dyavi. shubhhechha.