मेरे पास ‘वीगो’ है...
आजकाल जवळ-जवळ सर्वच लॅपटॉपमध्ये बिल्ट-इन वेबकॅम असतो. पण ज्यांचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जुना आहे, अशांना स्वतंत्र वेबकॅम घ्यावा लागतो. वेबकॅम ही तशी फार महागडी वस्तू नसली, तरी रोज त्याचा फारसा वापर होत नसल्याने आपण त्याचा विचार करत नाही. पण तुम्हाला फुकटात वेबकॅम देऊ केला तर? अॉल्वेज वेलकम! लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आहे; पण वेबकॅम नाही, अशा लोकांसाठी ‘वीगो’(WWIGO) हे सॉफ्टवेअर उपयोगास येते. काय आहे हे ‘वीगो’?
‘वीगो’अथर्थात Webcam Wherever I Go - WWIGO.काही भारतीय युवकांनी विकसित केलेले हे सॉफ्टवेअर आता जगभर लोकप्रिय झाले आहे. कॅमेरा मोबाईल फोनचा वेबकॅम म्हणून वापर कसा करता येईल, यासाठी बंगलोरस्थित मोत्विक या कंपनीने सुमारे ६ महिने संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाचे फलित म्हणजे ‘वीगो’. यात दोन अॅप्लीकेशन्स आहेत. एक तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर व एक तुमच्या कॅमेरा मोबाईल फोनवर इन्स्टॉल करावे लागते. मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यातून कॅप्चर केलेले व्हिडिअो ब्लुटूथद्वारे तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर पाठवले जातात. सर्वसाधारण वेबकॅमचे रिझॉल्यूशन हे कॅमेरा फोन्सच्या रिझॉल्यूशन्सपेक्षा कमी दजर्जाचे असते. त्यामुळे ‘वीगो’चा वापर करून रेकॉर्ड केलेले व्हिडिओ किंवा व्हिडिओ चॅट अधिक दर्जेदार होते. ‘वीगो’ सध्या केवळ नोकियाच्या सिरीज ६० (व्हर्जन २.० आणि ३.०) फोन्ससाठी तयार केले आहे. इतर फोनधारकांना ही सेवा वापरता येणार नाही. ‘वीगो’चा वापर करून तुम्ही स्काईप, याहू मेसेंजर किंवा विंडोज लाईव्ह मेसेंजरमध्ये व्हिडिओ चॅट करू शकता.
सपोर्टिंग सिस्टिम्सः विंडोज २०००, एक्सपी आणि व्हिस्टा
‘वीगो’ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
‘वीगो’सारखीच आणखी एक सेवा आहे. मोबिओला हे त्या सेवेचे नाव. ही सेवा मोफत नाही.
0 comments »
Post a Comment