,

इट्स नाईस टू बी ए क्रिटीक....

August 22, 2008 Leave a Comment



निंदकाचे घर असावे शेजारी, असे म्हणतात ते खरंच आहे. आपण करत असलेल्या एखाद्या गोष्टीवर बरी-वाईट टीका होणं अत्यावश्यक असतं. त्याशिवाय आपण त्यात सुधारणा करू शकत नाही. आपल्या कामाबद्दल, आपल्या व्यवहाराबद्दल, वागणुकीबद्दल, अॉफिसमध्ये आपण इतरांशी कसे वागतो याबद्दल, स्वभावाबद्दल सतत फीडबॅक मिळणेही तितकेच गरजेचे आहे. आपण जशी इतरांवर टीका करत असतो, तशी इतर लोक आपल्याबद्दलही टीका करत असतील, याचे भान ठेवले पाहिजे. तुझी वागणूक योग्य नाही, असे एखाद्या मित्रास किंवा सहकाऱ्यास थेट सांगणे काही वेळा कठीण जाते. पण त्याला ते न सांगणेही चुकीचे आहे. कोणत्याही माध्यमातून त्याच्यापर्यंत हा मेसेज जाणे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल, हा टेक्नॉलॉजीसंदर्भात लिहायचे सोडून भलतेच काहीतरी कायल िलहितोय? आजच्या पोस्टमध्ये मी इतरांना फीडबॅक देण्यासाठी तयार केलेल्या एका सेवेबद्दल माहिती देणार आहे.



असा फीडबॅक देताना आपण शक्यतो अनाम राहण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी एसएमएस किंवा ई-मेल कामास येत नाहीत. अशा लोकांना अनाम राहून ई-मेल पाठवण्यासाठी तुम्ही नव्याने सुरू झालेल्या नाईसक्रिटीक या सेवेचा वापर करू शकता. NiceCritic.com is a way of communicating difficult thoughts comfortably. This free service gives users the ability to say something to someone that has been on their minds in a safe, non-embarrassing environment. हे नाईसक्रिटीकचे मिशन स्टेटमेंट आहे. यावरून त्यांचा उद्देश स्पष्ट होतो. उदा. तुमच्या एखाद्या सहकाऱ्याला मिटींगमध्ये इतरांना बोलू न देण्याची सवय आहे, तर त्याला तुम्ही Please let others talk during a meeting असा अनाम ई-मेल पाठवू शकता. आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची त्याची वृत्ती असेल, तर तो जरूर सुधारण्याचा प्रयत्न करेल. अनाम राहून तुमचे कार्य पूर्ण होईल. नाईसक्रिटीकमध्ये अशा एकूण नऊ विभागांत मेसेजेसची विभागणी केलेली आहे. हे नऊ विभाग पुढीलप्रमाणेः
Personal Hygiene
Appearance
Office Behaviour
Cubicle Critic
Sports Etiquette
Neighbouroly Suggestion
Thoughts for Schoolmates
General Behavoiur
Anonymous Praise

तुम्ही आणखी विभागांची नावे सुचवू शकता. एखाद्या व्यक्तीस यातील कोणत्याही विभागातील मेसेज पाठवायचा असेल तर मेसेज सिलक्ट करून सेन्ड धिस मेसेजवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या सहकाऱ्याचे नाव आणि ई-मेल अॅड्रेस एंटर करा. संबंधित सहकाऱ्यापर्यंत नाईसक्रिटीक नावाने तुमचा मेसेज पोचवला जाईल.





या सेवेचा उद्देश चांगला असता तरी याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीस त्रास होऊ नये याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. एकदा एक मेसेज पाठविल्यानंतर पुढचे ९६ तास त्या व्यक्तीस तोच मेसेज पाठवता येणार नाही आणि संबंधिक व्यक्ती नाईसक्रिटीककडून येणारे मेसेजेस थांबवूही शकते.

Related Posts :



1 comments »

  • Unknown said:  

    SIR HOW TO DOWNLOAD TURBO C & INSTALL IT ON WINDOWS VISTA?