, , , ,

िसग्नेचर स्टाईल!

June 25, 2009 Leave a Comment

ई-मेल सिग्नेचर्स हा एक प्रचंड इंटरेस्टिंग प्रकार आहे. तुम्हाला आलेल्या ई-मेल्स एकदा चेक करा. प्रत्येकाच्या ई-मेलमध्ये मेसेजनंतर एक वेगळ्याच प्रकारची सिग्नेचर तुम्हाला दिसून येईल. काही जण नुसतं नाव लिहिणं पसंत करतात, तर काही जणांना नाव, गाव, पत्त्यासह ब्लॉग, वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रोफाईल्सच्या लिंक्स देणंही आवडतं. पण अत्यंत सपक वाटणाऱ्या या सिग्नेचर्स आकर्षक करता आल्या तर? येस. वाईज स्टँप नावाचे फायरफॉक्स अॅड-अॉन वापरून तुम्ही ई-मेल सिग्नेचर्सने तुमची नवी ओळख तयार करू शकता.

जी-मेल, याहू मेल, हॉटमेल आणि एओएल मेल आणि इतर अनेक ई-मेल सेवांमध्ये तुम्ही वाईज स्टँपची मदत घेऊन तयार केलेल्या सिग्नेचर्स वापरू शकता. वाईज स्टँप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर फायरफॉक्समध्ये खाली उजव्या कोपऱ्यात स्टँपचा आयकॉन दिसायला लागेल. असाच आयकॉन तुम्हाला जी-मेलच्या कॉम्पोझ मेन्यूमध्येही दिसेल. हा आयकॉन वापरून तुम्ही अगोदर तयार करून ठेवलेल्या पर्सनल किंवा बिझनेस सिग्नेचर्स ई-मेलमध्ये अॅड करू शकाल.

वाईज स्टँपमध्ये सिग्नेचर तयार करणे एकदम सोपे आहे. यासाठी तुम्ही एकतर तयार टेम्प्लेट वापरू शकता किंवा थेट तुम्हाला हवी तशी सिग्नेचर तयार करू शकता. पन्नासहून अधिक सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर, इ.) आणि इन्स्टन्ट मेसेंजर (जी-टॉक, स्काईप, इ.) सेवांसाठीचे छोटे आयकॉन्स तुम्ही सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. याशिवाय तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटचा प्रसार करण्यासाठीसुद्धा ई-मेल सिग्नेचर वापरता येऊ शकते. वाईज स्टँपमध्ये आरएसएस फीड एंटर करून तुमच्या ब्लॉगवरील ताज्या पोस्टचे हेडिंगदेखील ई-मेल सिग्नेचरमध्ये दिसू शकते, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. याच पद्धतीने लास्ट एफएमवर तुम्ही ऐकलेले गाणे, यू ट्यूबवरील एखादा व्हिडीओ किंवा ट्विटर, फेसबुकवरील स्टेटस मेसेजसुद्धा ई-मेल सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. या सिग्नेचर एचटीएमएल फॉरमॅटमध्ये असल्याने तुम्ही त्या इतर ठिकाणीही (उदा. गुगल डॉक्स) वापरू शकता.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीतले बदलः

मित्रांनो,
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या साधी-सोपी टेक्नॉलॉजी या ब्लॉगमध्ये तुमच्या सोयीसाठी काही बदल करत आहे. यापूर्वी या ब्लॉगसाठी मी 'अर्थेमिया' ही मूळ वर्डप्रेससाठी तयार केलेली थीम वापरत होतो. आता याच थीमचे 'मॉडिफाईड व्हर्जन' उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ते वापरण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही फीचर्स (उदा. Headline) आता तरी अडचणीचे वाटत आहेत; पण त्यावर काही तरी उपाय नक्कीच सापडेल. अर्थात यातील कॅटेगरी नेव्हिगेशन आणि फीचर्ड पोस्ट्स हा प्रकार उत्तम आहे. त्यामुळे साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे हे नवे रूप तुम्हाला आवडेल, अशी अपेक्षा आहे. sasotechnology@gmail.com वर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

Related Posts :



3 comments »

  • Swati Arun said:  

    This is one of the best add on. I love signing off with a decent signature. Dhanyawad Amit for sharing this. :-)

  • veerendra said:  

    amit sir
    badal aawadle ani post hi .. pan header madhla font badala .. sakal wachlya sarakha watat madhunach !

  • Amit Tekale said:  

    @ Swati
    Thanks a lot Swati. Keep reading Saso for more stuff like this.

    @Virendra
    Badal aawadalyabaddal dhanyawad. Kiran is doing a new nice logo for me. I hope you will like the new logo.