एडिसनचा फॉर्म्युला!
भूगोल आणि विज्ञान यात फरक काय, असं विचारल्यास तुम्ही काय उत्तर द्याल? भूगोलात "डिस्कव्हरी' असते अन् विज्ञानात "इन्व्हेन्शन'! जी गोष्ट अस्तित्वात आहे, ती शोधून काढणे म्हणजे "डिस्कव्हरी' आणि जी गोष्ट अस्तित्वात नाही ती प्रयोगांतून निर्माण करणे म्हणजे "इन्व्हेन्शन'. "डिस्कव्हरी'साठी शारीरिक कष्ट घ्यावे लागतात, तर "इन्व्हेन्शन'साठी मानसिक, असा तुमचा समज असेल. यात तथ्य आहे; पण हे 100 टक्के सत्य नाही. जगातील बहुतांश "इन्व्हेन्शन्स' ही 99ः1 या फॉर्म्युल्यातून आली आहेत. काय आहे हा फॉर्म्युला?
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन सर्वांना माहीत असतील. एडिसनने विद्युत दिव्यांचा अर्थात बल्बचा शोध लावला. ज्या काळातील नागरिक वीज किंवा अखंड तेवत राहणारा आणि झटक्यात बंद किंवा झटक्यात सुरू होणारा दिवा अशी कल्पनादेखील करू शकत नव्हते, त्या काळात एडिसनने कल्पकतेच्या जोरावर सातत्याने प्रयोग सुरू ठेवले. त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि जग प्रकाशमय झाले. याचा अर्थ कोणत्याही "टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन"ला 100 टक्के कल्पकतेची जोड लागते, असा होऊ शकतो; पण तो तसा नाहीये. "इन्व्हेन्शन'चा फॉर्म्युला आहे - 99 टक्के प्रयत्न आणि 1 टक्का कल्पकता! त्यामुळे नवउद्योजक किंवा आंत्रप्रिन्युअर यांनी कल्पकतेचा बाऊ करू नये. माहिती-तंत्रज्ञानात काम करणाऱ्यांना याची अनेक वेळा प्रचिती आलेली असेल. एखादे नवे सॉफ्टवेअर तयार करताना त्याच्यामागचे नेमके लॉजिक तयार करताना मेंदूला जितके कष्ट होतात, त्यापेक्षा अधिक कष्ट ते सॉफ्टवेअर प्रत्यक्षात उतरवताना तुमच्या शरीराला होतात. प्रत्यक्षात "बल्ब' साकारण्यापूर्वी एडिसनला सुमारे 10 हजार प्रयोग करावे लागले होते; त्यासमोर सॉफ्टवेअरची काय गत?
99ः1 हा फॉर्म्युला तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वच कामांना लागू होतो, असे दिसते. यात कल्पकतेचा भाग केवळ एक टक्का असला तरी तो तितकाच महत्त्वाचा ठरतो. नवे आणि अस्तित्वात नसलेले तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणावयाचे झाल्यास कोणीही दिलेली कोणतीही कल्पना टाकाऊ आहे म्हणून नाकारू नका. प्रथमदर्शनी अर्थहीन वाटणारी कल्पनाच तुम्हाला करोडपती बनवू शकते. फक्त त्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. प्रयत्नशीलतेचे घटक म्हणजे- त्या विषयाबद्दल सतत काहीतरी वाचत राहणे, वेबसाईट्सचा वापर करून नवी माहिती आणि अपडेट्स मिळविणे, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना भेटून योग्य प्रश्न विचारणे आणि तुम्हाला नेमके काय हवे, ते नोंदवून ठेवणे. कल्पकता ही उपजतच असते; त्याचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. एडिसनसारख्या महान शास्त्रज्ञाने अकल्पनीय वाटावा असा बल्बचा शोध लावला आणि तरीदेखील यातील 1 टक्काच श्रेय तो कल्पकतेला देतो, यावरून प्रयत्नशीलतेचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल.
प्रयत्नशीलता आणि कल्पकता यांत मूलभूत फरक असला तरी दोन्ही बाबी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. प्रयत्नशीलतेशी निगडित आणखी एक मुद्दा इथे सांगावासा वाटतोय. 99 टक्क्यांच्या पूर्ततेसाठी तुम्हाला तीन "आर'चा (रीसर्च, रिट्राईव्ह आणि रेकॉर्ड इन्फॉर्मेशन) प्रचंड फायदा होणार आहे. बऱ्याच वेळा आपण रीसर्च करतो; परंतु वेळेअभावी ती माहिती काढून संग्रही ठेवण्याचा कंटाळा करतो. पुढे एखाद्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला ती माहिती लागते. संग्रही नसल्यामुळे त्या वेळी पुन्हा शोधाशोध करण्यात तितकाच वेळ दवडावा लागतो. त्यामुळे हे तीन "आर' पाळणे महत्त्वाचे ठरते. ते पाळण्यासाठी आज आपण विविध तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या विकासासाठी तंत्रज्ञानच कामी येते, हेही सिद्ध होते. तुम्हीही एखाद्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करीत असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेवा, की कल्पकता 1 आणि प्रयत्नशीलता 99!
nice post...
"Prayatnanti Parmeshvar" :)
Hi,
Very nice blog...
I read almost all post...It is very informative and various types of technical and nontechnical collection.
Really great work man..Keep it up...
Best of Luck from my side...
Nice information. Buy Samsung Galaxy S4 online from http://themobilestore.in
What you're saying is completely true. I know that everybody must say the same thing, but I just think that you put it in a way that everyone can understand. I'm sure you'll reach so many people with what you've got to say.