, ,

नवीन वषर्षाच्या (मोफत) हार्दिक शुभेच्छा!

December 30, 2008 3 comments

सर्वप्रथम, साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या सर्व वाचकांनी नव्या वषर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...मनापासून!
नवीन वषर्षाच्या शुभेच्छा एसएमएसवरून पाठवताना आपण जरा विचार करतो. कारण फोनबुकमधल्या दोन-चारशे जणांना एसएमएस पाठवयाचा म्हटलं तर किमान दोन-अडीचशे रुपयांचा फटका बसतो. एरवी दरमहा अडीचशे रुपये बिल भरण्याची सवय लागलेल्यांना नवीन वषर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाच-सहाशे रुपये बिल भरणे कठीण जाते. नवीन वषर्षाचे एसएमएस पाठवण्यासाठी आणि नव्या वषर्षात एसएमएसचे बिल कमी करण्यासाठी काय करता येईल, याबद्दल मी आज माहिती देणार आहे.

कॉम्प्युटर आणि मोबाईलवरून मोफत एसएमएस पाठवण्यासाठी तुम्ही एसएमएस लाईफ डॉट इन या नव्या सेवेचा वापर करू शकता. मोफत एसएमएसची सुविधा इतरही काही कंपन्यांकडून दिली जाते. तथापि, एसएमएस लाईफचे वैशिष्ट्य म्हणजे या सेवेचे मोबाईल अॅप्लीकेशन वापरून तुम्ही जीपीआरएस किंवा वाय-फायच्या आधारेही मोफत एसएमएस पाठवू शकता. एसएमएस लाईफ वापरण्यासाठी सर्वप्रथम या साईटवर रजिस्टर व्हावे लागते. तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा लॉग-इन आयडी असतो. लॉग-इन झाल्यानंतर तुम्ही ८० कॅरेक्टर्समध्ये तुमचा मेसेज टाईप करून हव्या त्या व्यक्तीला पाठवू शकता. उरलेल्या ८० कॅरेक्टर्समध्ये एसएमएस लाईफतफर्फे जाहिरात इन्सर्ट केली जाते. या सेवेत अॉनलाईन फोनबुकही तयार करता येते. एक व्यक्ती एका दिवसात जास्तीत-जास्त १०० एसएमएस पाठवू शकते. या सेवेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एसएमएस शेड्यूलही करू शकता. अथर्थात एक तारखेला सकाळी १० वाजता पाठवायचा एसएमएस तुम्ही आज शेड्यूल करून ठेवू शकता. सदर एसएमएस दिलेल्या तारखेस संबंधित व्यक्तींना पाठवला जातो. सर्वसाधारण मोबाईलमध्ये एसएमएस शेड्यूलिंगची सुविधा नसते. वाढदिवस, अॅनिव्हर्सरीज आदींचे अलर्टही तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता.



या सर्व गोष्टी मोबाईलवरूनही अॅक्सेस करता येतात. त्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस किंवा वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. मोबाईल ब्राऊजरमधून m.smslife.in या साईवर जाऊन एसएमएस लाईफचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करा. लॉग-इन झाल्यानंतर तुम्ही थेट तुमच्या मोबाईल फोनबुकमधील क्रमांकावर एसएमएस लाईफच्या आधारे मेसेज पाठवू शकाल.
Read the full story

,

मोबाईल स्ट्रीमिंग

December 26, 2008 0 comments

मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला. २६ नोव्हेंबरच्या रात्री सुरू झालेले ते भयनाट्य तब्बल ६० तास सुरू राहिले आणि आपल्यापैकी अनेकांनी न्यूज चॅनेल्सवर हे नाट्य लाईव्ह पाहिलेच असेल. या घटनेनंतर भारतीय न्यूज चॅनेल्सवर टीकेची झोड उठली. न्यूजवॉच या वेबसाईटने यासंबंधी एक झटपट survey घेतला. हा survey तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. असो. याच घटनेच्या वेळी तरुणांनी सोशल मीडियाचा - अथर्थात ट्विटर, फ्लिकर, फेसबुक इ.चा मोठ्या प्रमाणावर वापर केला (ई-सकाळवरील ही बातमी वाचा). अनेकांनी न्यूज चॅनेल्सपेक्षा या सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवला. सोशल मीडियासाठी सोर्स होते तुमच्या-आमच्यासारखे लोक. काही थेट घटनास्थळाहून माहिती देत होते; काही ताज, ओबेरॉयमध्ये अडकलेल्या मित्रांशी फोन, एसएमएसद्वारे संपर्क साधून माहिती देत होते. सोशल मीडियातून लाईव्ह व्हिडीओज मात्र प्रसारित झाले नाहीत. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेता, एका अर्थाने बरेच झाले असे म्हणावे लागेल. पण तुमच्यासमोर बातमीमूल्य असलेली घटना घडत असताना तुम्ही व्हिडीओ फॉर्ममध्ये ती इतरांशी थेट शेअर करू शकलात तर?



होय. असे करता येणे शक्य आहे. मोबाईलचा वापर करून एखादा व्हिडीओ तुम्ही आता थेट इतरांशी शेअर करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे जीपीआरएस अथर्थात मोबाईल इंटरनेट कनेक्शन आणि क्विक असणे गरजेचे आहे. क्विक(Qik) ही सेवा वापरून तुम्ही मोबाईलवरून शूट करत असलेला व्हिडीओ थेट इतरांशी शेअर करू शकता. क्विक आयकफोन, ब्लॅकबेरी, विंडोज मोबाईल आणि सिंबियन फोनसाठी उपलब्ध आहे. क्विक वापरण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
१. क्विकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. यासाठी केवळ २ ते ३ मिनिटे लागतात.
२. त्यानंतर तुमचा मोबाईल हॅंडसेट निवडून क्विकचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्या. तुम्ही एसएमएसने वॅप लिंक मागवू शकता अथवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून ब्लुटूथने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता.


३. मोबाईलवर क्लिक इन्स्टॉल झाल्यानंतर त्यातून तुमच्या क्विक अकाऊंटवर लॉग-इन व्हा.
४. आता क्विकमध्ये जाऊन स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतर काही क्षणांत तुम्ही शूट करत असलेला व्हिडीओ तुम्ही कॉम्प्युटरवर पाहू शकाल. लक्षात ठेवा, क्विकचा वापर करून स्ट्रीम केलेला पहिला व्हिडीओ तुम्हाला सवर्वांसोबत शेअर करावा लागतो. त्यानंतर मात्र तुम्ही ग्रुप्स तयार करून तो ठराविक लोकांसोबत शेअर करू शकता.
५. स्ट्रीम होत असलेला व्हिडीओ लाईव्ह पाहता येतो. त्यानंतर तो तुम्ही FLV, 3GP किंवा MP4 फॉरमॅटमध्ये डाऊनलोडही करून घेऊ शकता. व्हिडीओ कुठे शूट केला याचे लोकेशन गुगल मॅपवर पाहता देखील येते.

क्विकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रीमिंग सुरू असताना तुम्ही इतरांशी चॅटही करू शकता. म्हणजे, तुम्ही समोरच्या व्यक्तीस हवा तसा कॅमेरा फिरवून त्याला हवा तो अॅंगल मिळवून देऊ शकता. न्यूज चॅनेल्स आणि न्यूज वेबसाईट्सना या सेवाचा प्रचंड फायदा होऊ शकतो.
Read the full story

, ,

भन्नाट वॉलपेपर्स

December 25, 2008 1 comments


तुम्हाला मूडनुसार वॉलपेपर बदलणं आवडत असेल तर तुम्ही गुगलवर ‘जरा हटके’ वॉलपेपर शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असाल. व्यर्थ अशासाठी की वॉलपेपर असा सर्च दिल्यास शेकडो साईट्स मिळतात, पण त्यातल्या काहीच साईटवर तुम्हाला हवे तसे वॉलपेपर्स मिळतात. मिळालेल्या वॉलपेपर्सचा आकारही तुमच्या स्क्रीन रिझोल्यूशनला कम्पॅटिबल नसेल तर मग स्ट्रेच, टाईल असे प्रकार आपण करून बघतो. पण त्याने मूळ वॉलपेपर डिस्टॉर्ट होतो व त्यातील गंमत निघून जाते.

तुम्हाला आवडेल असा आणि तुमच्या स्क्रीन साईजचा वॉलपेपर देणारी साईट म्हणजे इंटरफेस लिफ्ट. या साईटवर तुम्हाला हव्या त्या रिझोल्यूशनचे (वाईडस्क्रीन, ड्यूअल मॉनिटर, एचडीटीव्ही, मोबाईल इ.) वॉलपेपर्स मिळतील. आर्टिस्ट्स आणि टॅग्जनुसार सर्व वॉलपेपर्सचे वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला आवडीचे वॉलपेपर शोधण्यासाठी फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. या साईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर विंडोज आणि मॅकिन्तोषसाठी लागणारे आयकॉन्स आणि थीम्सही उपलब्ध आहेत.



Read the full story

, ,

वषर्षातील ८० तास वाचवायचेत?

December 20, 2008 2 comments

नव्या वषर्षात हिशेब मांडून ठेवण्याचा निश्चय केल्यानंतर शैलेशने आणखी एक निश्चय केलाय. टेलिफोन बिल, मोबाईल बिल आणि इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यात त्याचा अर्धा गुरूवार गेल्याने तो जाम वैतागला सेफ्टी, सिक्युरिटी सर्व काही बाबी तपासून शक्य तेवढी बिलं अॉनलाईन भरायची असा निर्णय त्याने घेतलाय. तुम्ही अजूनही रांगेत उभे राहत असल्यास, अॉनलाईन बिल पेमेंटचा विचार करावयास हरकत नाही. तुम्ही म्हणाल, आपल्याकडे (भारतात) हे फारसं चालत नाही - पण जरा खालील आकड्यांवर नजर टाका, म्हणजे याचा अंदाज तुम्हाला येईल.

- मुंबईतील २८ टक्के, दिल्लीतील २२ टक्के, चेन्नईतील १२.५ टक्के, बेंगळुरूतील १२ टक्के लोक त्यांची बिलं अॉनलाईन भरतात.
- प्रमुख १० शहरांतील एकूण पोस्टपेड मोबाईलधारकांपैकी ७५ टक्के मोबाईलधारक, ७० टक्के क्रेडिट कार्डधारक, ६० टक्के वीजधारक संबंधित सेवांची बिलं अॉनलाईन भरतात, असे असोचॅमने केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे.

- अॉनलाईन बिल भरणाऱ्यांमध्ये १८ ते ३६ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक असल्याचेही (६८ टक्के ) या अभ्यासात म्हटले आहे. ३६ ते ६० या वयोगटातील सुमारे ३१ टक्के लोक अॉनलाईन बिलाचा पयर्याय स्वीकारतात.
- सवर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अॉनलाईन बिलिंगचा पयर्याय स्वीकारलेली व्यक्ती वषर्षाला तब्बल ८० तासांचा वेळ वाचवते...

आता बोला!
अॉनलाईन बिलिंगसाठी तुमच्याजवळ डेबिट अथवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बॅकिंगची सुविधा असणे गरजेचे आहे. तुमच्या बॅकेतफर्फे इंटरनेट बॅंकिंगची सुविधा मिळत असल्यास त्यासाठी अर्ज करा. क्रेडिट कार्डचे पेमेंट, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन, मोबाईल बिल याशिवाय प्रॉपटर्टी टॅक्स, पाणीपट्टी आदी सर्व तुम्ही अॉनलाईन भरू शकता. त्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही सेवेचा वापर करता येऊ शकतोः

याखेरीज इन्शुरन्स पॉलिसीजचे प्रीमियमदेखील अॉनलाईन भरता येते. टाटा स्काय किंवा डिश टीव्ही सारख्या डीटीएच सेवादेखील अॉनलाईन रिचार्ज करता येतात.
Read the full story

, ,

‘पॅसेंजर’ इंटरनेटला ‘एक्स्प्रेस’ कसं करणार?

December 18, 2008 5 comments

काही कारणांमुळे कधी-कधी इंटरनेटचा स्पीड कमी होतो. त्यामुळे घरीही काम होत नाही आणि अॉफिसमध्येही तीच परिस्थिती होते. अशा वेळी काही ट्विक्स वापरून आपण हा स्पीड वाढवू शकतो. वास्तविक इंटरनेट सर्विस प्रोव्हायडरकडून किंवा नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटरकडून मिळणारा स्पीड वाढवता येत नाही; परंतु ही छोटी टिप वापरून आपण इंटरनेट एक्स्प्लोररचा ब्राऊजिंग स्पीड नक्कीच वाढवू शकतो.

या ट्विकमध्ये विंडोज कॉन्फिगरेशन डेटा (रजिस्ट्री) एडिट करायचा आहे. त्यात गोंधळ होण्याची शक्यता असल्याने अगोदर रजिस्ट्री बॅक-अप करून ठेवा.
रजिस्ट्री बॅक-अप करण्यासाठी:
स्टार्ट > प्रोग्राम्स > अॅक्सेसरीज > सिस्टीम टूल्स > सिस्टीम रिस्टोर
रिस्टोर पॉईंट सिलेक्ट केल्यानंतर त्याविषयीची माहिती एंटर करा असा बॉक्स ओपन होईल. नेक्स्टवर क्लिक करून पुढे जा. रिस्टोर पॉईंट तयार होईल.

रजिस्ट्री रिस्टोर करण्यासाठीः

स्टार्ट > प्रोग्राम्स > अॅक्सेसरीज > सिस्टीम टूल्स > सिस्टीम रिस्टोर
Restore my computer to an earlier time सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक करा.
बॅक-अप घेतल्याची तारिख आणि रिस्टोर पॉईंट सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक केल्यास रजिस्ट्री रिस्टोर होईल.

आता मुख्य टिपकडे वळूया. इंटरनेट एक्स्प्लोररकडून दोन स्ट्रीमद्वारे डेटा फेच केला जातो. आपण या स्ट्रीमची संख्या दोनवरून सहावर नेणार आहोत. यामुळे तुम्ही वेगाने ब्राऊजिंग करू शकाल. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
१. स्टार्ट > रन
२. regedit टाईप करून अोकेवर क्लिक करा


३. नव्याने ओपन झालेल्या विंडोमध्ये डाव्या बाजूस HKEY_CURRENT_USER\Software\Microsoft\Windows\CurrentVersion\Internet Settings मध्ये जा.
४. त्यासमोर उजव्या भागात MaxConnectionsPerServer आणि MaxConnectionsPer1_0Server शोधा.
५. त्यावर राईट क्लिक करून मॉडिफायवर क्लिक करा. आता डेसिमल सिलेक्ट करून व्हॅल्यू फील्डमध्ये ६ एंटर करा. MaxConnectionsPerServer आणि MaxConnectionsPer1_0Server साठी ही प्रोसेस फॉलो करा.
६. या दोन व्हॅल्यूज (MaxConnectionsPerServer आणि MaxConnectionsPer1_0Server) सापडल्या नाहीत तर उजव्या भागातील व्हाईट पोर्शनमध्ये राईट क्लिक करून NEW > DWORD सिलेक्ट करा. या नव्या DWORD व्हॅल्यूचे नाव MaxConnectionsPerServer असे देऊन एंटर करा. ही स्टेप रिपीट करून MaxConnectionsPer1_0Server अशा नावाने आणखी एक DWORD व्हॅल्यू तयार करा.


७. आता स्टेप ५ मध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हॅल्यूज मॉडिफाय करा.


८. regedit बंद करून सिस्टीम रिस्टार्ट करा.

हे बदल करण्यापूवर्वी एखादी साईट ओपन होण्यासाठी किती वेळ लागतो, हे नोंदवून ठेवा. Cache क्लिअर करून बदल केल्यानंतर तीच साईट ओपन होण्यास किती वेळ लागतो हे पाहा.

आपला अनुभव अवश्य कळवा.

Read the full story

,

अॉनलाईन हिशेब

December 16, 2008 0 comments

शैलेशच्या डायरीतले एक पानः
पुढच्या वषर्षापासून (म्हणजे १ जानेवारी, २००९ पासून) डेली एक्स्पेन्सेस लिहून ठेवायचं ठरवलं आहे. त्यासाठी नवी डायरी आज आणली-‘व्हीनस’मधून. मग येता-येता दीपकसोबत ‘रुपाली’त बसून इडली-वडा, फिंगर चिप्स आणि कॉफीपान असा कार्यक्रम झाला. गुडलक चौकातून काही नवी पुस्तके आणि मासिके घेतली आणि पेट्रोल भरून सरळ घरी आलो.

शैलेशप्रमाणेच तुम्हीदेखील नव्या वषर्षापासून हिशेब लिहून ठेवायचे ठरवले असेल. अगदी गेल्या वषर्षी ठरवले होते, तसेच. हिशेब लिहून ठेवणे ही खूप चांगली सवय असली तरी ती जमणाऱ्यांनाच जमते. तुमच्या-आमच्यासारखे फार तर आठवडाभर हिशेब लिहून ठेवू शकतात. कंटाळा केला की डायरी पुढे वर्षभर कोरीच राहते. तुमच्यासारख्या नेट सॅव्ही लोकांना तर डायरी वगैरे सांभाळणे अाणखीनच कठीण जाते. कल्पना करा, हिशेब मांडण्यासाठी तुम्ही जी-टॉक किंवा याहू मेसेंजर किंवा ई-मेल वापरू शकलात तर?


एक्स्पेन्सर ही अशीच एक सेवा. मंदीच्या काळात तर एकेका पैशाचा हिशेब लिहून ठेवण गरजेचे होणार आहे. तुम्ही जर इंटरनेटचा भरपूर वापर करीत असाल तर एक्स्पेन्सर ही सेवा वापरून तुम्ही तुमचे डेली एक्स्पेन्सेस अॉनलाईन स्टोअर करून ठेवू शकता. एक्स्पेन्सरवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही याहू, गुगल, एओएल आणि एमएसएन इन्स्टा मेसेंजर वापरून तुमचा दैनंदिन हिशेब नोंदवून ठेवू शकता. Xpenserbot तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये अॅड केल्यानंतर तुम्ही Petrol on 16th Dec. Rs. 100 असा मेसेज पाठवला की याची नोंद थेट एक्स्पेन्स रिपोर्टमध्ये केली जाते. तुम्ही ट्विटरवरूनही हिशेब नोंदवू शकता. d xpn Petrol on 16th Dec. Rs. 100 असे टाईप करून तुमचा हिशेब पाठवू शकाल. d xpn म्हणजे direct message to Xpenser. याखेरीज तुम्ही ई-मेलच्या Subject लाईनमध्ये Petrol on 16th Dec. Rs. 100 असे टाईप करून e@xpenser.com यावर ई-मेलही पाठवू शकता. अमेरिका आणि कॅनडातील रहिवासी EXP टाईप करून 66937 (MOZES) ला एसएमएस पाठवून हिशेब नोंदवू शकतात. त्यांच्यासाठी व्हाईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे.



एक्स्पेन्सर वापरायला लागल्यानंतर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी एक्स्प्लोअर करता येतील. महिन्यांनुसार कीवर्ड करून त्या-त्या महिन्याचे एक्स्पेन्स रिपोर्ट अपडेट करता येतात. उदा. DEC 08 Petrol on 16th Dec. Rs. 100 असा मेसेज पाठवल्यास तो आपोआप डिसेंबरच्या रिपोर्टमध्ये नोंदवला जाईल. तेव्हा नव्या वषर्षापासून नव्हे; तर आजपासूनच हिशेब नोंदवायला लागा.

Stay connected with SasoQuick toolbar. Click here to know more.
Read the full story