अप-टू-डेट!

May 29, 2008 Leave a Comment

नव्याने येणाऱया सर्व मोबाईल हॅंडसेटमध्ये तुम्हाला आरएसएस रीडर असे एक अॅप्लीकेशन दिसून येईल. नेटसॅव्ही लोकांना त्याचे महत्त्व कळेल, परंतु जे फारसे नेटसॅव्ही नाहीत त्यांनी त्यावर कधी क्लिकही केले नसेल. आरएसएस - अथर्थात रियली सिंपल सिंडिकेशनद्वारे आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर एखाद्या साईटवरील कंटेंट पाहू शकतो. उदा. तुम्ही दी न्यूयॉर्क टाईम्स डॉट कॉमवरील टेक्नॉलॉजी सेक्शनला नेहमी भेट देता. या सेक्शनच्या आरएसएस फीडला सबस्क्राईब केल्यास त्यात नव्याने येणार््या सर्व बातम्या तुम्हाला तुमच्या गुगल रीडर किंवा आऊटलुकमध्ये पाहता येतात. जवळपास सर्व न्यूज साईट्स आणि ब्लॉग्जवर आरएसएस म्हणजे एक्सएमएल फीड उपलब्ध असतो. त्याला फक्त सबस्क्राईब करायचं.


लाईटफीड्स - ब्लॅकबेरीसाठी

स्मार्टफोनसाठी

पॉकेट पीसीसाठी
तुमच्या मोबाईलवरील आरएसएस रीडरमधून तुम्ही नेमकं हेच करू शकता. ज्यांच्या मोबाईलमध्ये आरएसएस रीडर नाहीये किंवा ज्यांना अॅडव्हान्स्ड सुविधा हव्यात, त्यांच्यासाठी लाईटफीड्स ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे. लाईटफीड्स डॉट कॉमवर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तेथे उपलब्ध असलेल्या विषयांमधून (जवळपास सर्व विषय यावर उपलब्ध आहेत) काही विषय निवडू शकता. हीच सेवा मोबाईलवर मिळविण्यासाठी http://litefeeds.com/m ही साईट तुमच्या मोबाईलवरून अॅक्सेस करा व लाईटफीड्स अॅप्लीकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. हीच फाईल तुम्ही लाईटफीड्स डॉट कॉमवरूव कॉम्प्युटरवरही डाऊनलोड करू शकता. त्यानंतर ती फाईल डेटाकेबल अथवा ब्लूटूथने मोबाईलवर ट्रान्सफर करून इन्स्टॉल करा. लक्षात ठेवा, ही सेवा मोबाईलवर मिळविण्यासाठी तुमचे जीपीआरएस अॅक्टीव्ह असले पाहिजे, तसेच तुमचा मोबाईल सिंबियन अथवा जावा अॉपरेटिंग सिस्टिमवर चालणारा असला पाहिजे. लाईटफीड्स ब्लॅकबेरीसाठीही उपलब्ध आहे. जे फीड्स तुम्हाला मोबाईलवर येणे अपेक्षित आहे, त्यावर अॅड मोबाईल असे क्लिक करावे. जगातील सर्व बातम्या एका क्षणात तुमच्या मोबाईलवर हजर होतील!

Related Posts :



0 comments »