तीन मुली, एक बाई आणि सुप्त इच्छा (?)
बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेली एक कथा. पुसटशी आठवतेय. तीन मुलींची ती कथा होती. एक मॉडेल असते, एक डान्सर आणि एक कथालेखक. तरुणपणी जीवलग मैत्रिणी असलेल्या या तिघींची कालांतराने ताटातूट होते आणि त्या थेट म्हातारपणी भेटतात. आपापल्या आयुष्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी असतात आणि त्या सोडविण्यासाठी त्या एका बाईकडे जातात. ती बाई त्यांना भूतकाळात नेते...बस्स एवढंच मला आठवतंय. या पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव मला हवंय. कोणी सांगू शकेल का प्लीज?
अशा अनेक पुस्तकांची, कादंबर््यांची नावं आपल्याला लक्षात राहत नाहीत आणि मग कधी मित्र-मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करताना विषय निघाला की अस्वस्थ व्हायला होतं. ते नाव आठवत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. अशावेळी चटकन नेटवर जा आणि व्हॉट्सदॅटबुक डॉट कॉमवर लॉग इन व्हा. व्हॉट्सदॅटबुक ही एक फ्री सर्व्हीस असून त्यावर तुम्ही तुम्हाला जितकी आठवतीय तितकी माहिती पोस्ट करायची. त्यावरून दुसर््या एखाद्यास त्या पुस्तकाचे नाव माहिती असेल तर तो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. किंवा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास त्याचे उत्तरही देता येते. व्हॉट्सदॅटबुकचा आणखी एक फायदा म्हणजे येथे तुम्हाला माहित नसलेल्या अनेक पुस्तकांची माहिती मिळते. त्यात काय आहे याची थोडक्याती माहितीही वाचायला मिळते. तुम्हीही पुस्तकांचे शौकिन असाल तर करा जॉईन ही कम्युनिटी!
(बाय द वे, त्या तीन मुलींच्या पुस्तकाचे नाव आहेः द समरहाऊस आणि ते लिहिलं होतं ज्यूड डेव्हेरॉने!)
0 comments »
Post a Comment