डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस
ज्या लोकांना नव्या अॉनलाईन सेवा ट्राय करून पाहण्याचा नाद आहे त्यांचे मेलबॉक्सेस कायम ओसंडून वाहत असतात. शंभर वेबसाईट्सवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसरं काय होणार? शिवाय अनेक ठिकाणी ई-मेल अॅड्रेसेस दिल्यामुळे स्पॅम मेल्सचीही संख्या वाढते. स्पॅमचे मूळ हे ई-मेल अॅड्रेसमध्ये आहे. ई-मेल अॅड्रेसच्या ट्रिक्स वापरून स्पॅमपासून बचाव कसा करता येईल, याची माहिती तुम्ही स्टे अवे फ्रॉम स्पॅम या पोस्टमध्ये वाचली असेल. पण त्यापुढे जाऊन डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस वापरला तर?
डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस? ही काय भानगड आहे? होय. स्पॅम बायपास करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे डिस्पोजेबल मेल अॅड्रेस वापरणे. मेलिनेटर ही सेवा वापरून तुम्ही स्पॅम बायपास करू शकता. मेलिनेटरद्वारे डिस्पोजेबल मेल अॅड्रेस तयार करून त्यावर येणारे मेल अॅक्सेस करण्याची सुविधा दिली जाते. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नसेल, त्यावेळी bigbangboom किंवा mylifeissohappy असे कोणतेही रॅंडम नाव जनरेट करून पुढे @mailinator.com जोडले की तुमचा डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस तयार होतो. आता मेलिनेटर डॉट कॉमवर जाऊन चेक युवर मेलबॉक्समध्ये तुमचा आयडी एंटर केला की मेलिनेटर मेलबॉक्स ओपन होतो. यावरून तुम्हाला मेल पाठवता येत नाही किंवा आलेला मेल डिलीटही करता येत नाही. यात एकावेळी केवळ १० ई-मेल्स दिसतात. काही वेळानंतर ते आपोआप डिलीट होतात. त्यामुळे स्पॅम मेल असले तरी तुम्हाला प्रत्येक मेल चेक करण्याची गरज उरत नाही. मेलिनेटर वापरण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही. मेलिनेटरच्या इनबॉक्समध्ये आलेले मेल चेक करण्यासाठी तुम्ही आरएसएस रीडर किंवा मेलिनेटर विजेटही वापरू शकता.
मेलिनेटर वापरताना एक गोष्ट ध्यानात ठेवावीः
तुम्ही तयार केलेला ई-मेल अॅड्रेस कुणीही अॅक्सेस करू शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या मेलसाठी मेलिनेटर ई-मेल अॅड्रेस वापरू नये. एखादी नवी अॉनलाईन सेवा किंवा सॉफ्टवेअर रजिस्ट्रेशनसाठी अथवा एखाद्या फोरमवर, ब्लॉगवर डिस्कशन करण्यासाठी मेलिनेटर वापरू शकता. काही साईट्स मेलिनेटरचे ई-मेल अॅड्रेस अॅक्सेप्ट करत नाहीत. अशा वेळी पुढे दिलेल्या डोमेनपैकी कोणतेही नाव तुम्ही वापरू शकता.
mailinator2.com
sogetthis.com
mailin8r.com
mailinator.net
spamherelots.com
thisisnotmyrealemail.com
0 comments »
Post a Comment