,

स्टे अवे फ्रॉम स्पॅम...

July 16, 2008 Leave a Comment


याहू असो, रेडिफ असो किंवा स्पॅम मेल फिल्टर करणारे जी-मेल असो - सर्व मेल सेवांतून स्पॅम मेल्स येतच राहतात. बरेच लोक स्पॅमला कंटाळून एखादे अकाऊंट अक्षरशः बंद करून टाकतात. कारण दिवसाला कामाचे मेल्स १० आणि स्पॅम मेल्स १००, असे प्रमाण असल्यावर करणार तरी काय? आपण अनेक ठिकाणी आपला ई-मेल अॅड्रेस देत असतो. स्पॅमर्सना स्पॅम पाठविण्यासाठी असे पब्लीकली डिस्प्ले केलेले ई-मेल अॅड्रेसंच हवे असतात. एखाद्या ब्लॉगवर किंवा पर्सनल साईटवर आपला ई-मेल अॅड्रेस दिसला की स्पॅम पाठविणाऱ्या स्क्रिप्ट्स तो कॅप्चर करतात आणि स्पॅम पाठवण्यास सुरवात करतात. अशा अनवॉन्टेड मेल्सपासून वाचण्यासाठी आपण पुढील टीपचा वापर करू शकतो.

स्पॅमर्सपासून आपला ई-मेल अॅड्रेस लपवून ठेवण्यासाठी अनेक जण पब्लीक डिस्प्ले करताना @ हे चिन्ह वापरायचे टाळतात. म्हणजे myname (at) example (dot) com अशाप्रकारे ई-मेल अॅड्रेस दिला जातो. स्पॅमर्सने तयार केलेल्या स्क्रिप्ट्सना (रोबोट्स) हा ई-मेल अॅड्रेस आयडेंटिफाय होत नाही. त्यामुळे त्यातून आपण सुटतो. पण ही ट्रिक काही प्रमाणापर्यंतच कामास येते. याहून अधिक सुरक्षित ट्रिक अशीः
पर्सनल साईट, ब्लॉग किंवा सोशल नेटवर्क प्रोफाईलवर (अॉरकुट, फेसबुक, मायस्पेस इ.) आपला ई-मेल अॅड्रेस जसाच्या तसा देऊ नये. mailto:myname@example.com हा फॉरमॅट वापरून आपल्या ई-मेल अॅड्रेसची शॉर्ट यूआरएल तयार करावी (उदा. वरील ई-मेल अॅड्रेससाठी शॉर्ट केलेली यूआरएल अशी असेल - http://tinyurl.com/5tpzqb). यासाठी तुम्ही टायनीयूआरल सारखी सेवा वापरू शकता. (यासारख्या इतर सेवांच्या माहितीसाठी वाचाः शॉर्ट अॅण्ड स्वीट). आता ही यूआरल तुम्ही ई-मेल अॅड्रेसच्या ठिकाणी वापरा. ही लिंक नसून ई-मेल अॅड्रेस आहे, हे स्पॅमर्सच्या स्क्रिप्ट्सना कळू शकणार नाही. यावर क्लिक केल्यास क्लिक करणाऱ्याची डिफॉल्ट मेल सेवा ओपन होऊन तुमचा मेल आयडी ‘To’ मध्ये तुमचा खरा मेल अॅड्रेस डिस्प्ले होईल.

Related Posts :



3 comments »

  • Anonymous said:  

    tumchya srvach post khup chhan aahet....aani aamhala khup shikayla milat..thnx :)


    majha pc khupach slow chalto kay karu..??...aani majha sound driver hi chalat nahi aahe...mi jar new installation kela tar majha modem cha installation nighun jail..kay karu mi..pls ...sangu shakta ka tumhi mala....plsss...????

  • Anonymous said:  

    एका ब्लाँगवर , तो लावल्यावर remove virus अशी सुचना येते तो व्हायरस mutant:exploit.HTML.Agent.H अशी सुचना माझ्या pc tool anti-virus वर आली की तो नेहमी प्रमाणे manually remove केला तरी पण दुस-यांदा नेटवर पुन्हा तो ब्लाँग चालु केला की पुन्हा वरील सुचना येते तेव्हा ब्लाँगवरचा हा व्हायरस कसा शोधुन काढावा आणि तो कोणत्या topic मध्ये घुसला आहे अन तो कसा काढावा याचे मार्गदर्शन करावे.
    धन्यवाद ...
    सचिन पाटील.

  • Amit Tekale said:  

    Dear Sachin Patil,
    Please download the update for PC Tools Anti-Virus.
    The company claims that this update will fix the problems related to
    exploit.HTML.Agent.H

    http://tinyurl.com/559ozd

    Thanks
    Amit Tekale