,

सबकुछ मोबाईल!

December 13, 2008 0 comments

मध्यप्रदेशची लोकसंख्या किती किंवा साबरमती आश्रम केव्हा बांधला गेला होता असे प्रश्न कोणी रस्त्यात विचारले तर आपली पुरती फजिती होते. लोकसंख्या वगैरे या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या वगैरे मुळीच नाहीत. शिवाय गुगल, विकिपेडियाची सवय झाल्यामुळे इंटरनेट अॉन असताना आपण एक सेकंदात सांगतो असे म्हणून पाठ असल्यागत मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तरप्रदेश, झारखंडची लोकसंख्या सांगून मोकळे होतो. पण असं रस्त्यात वगैरे विचारल्यावर. अॉफिसमधला ‘शेर’ रस्त्यात असा ‘ढेर’ होतो...

पण असं ढेर होऊन कसं चालेल? माहिती आपण खिशात घेऊन चालत असतो. तुमच्याकडे जीपीआरएस एनेबल्ड मोबाईल असेल तर तुम्ही गुगल, विकिपेडिया अॉनलाईन अॅक्सेस करून तितक्याच तत्परतेने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. गुगलचे मोबाईल सर्च तुम्ही वापरून पाहिलं असेलच. विकिपेडियाचीही मोबाईल एडिशन उपलब्ध आहेत. mobile.wikipedia.org असे टाईप करून तुम्ही मोबाईलसाठी तयार केलेले विकिपेडिया अॅक्सेस करू शकता. मोबाईल विकिपेडिया वापरण्यास कठीण जाते, असा माझा अनुभव आहे. डेस्कटॉपवर दिसणारे अखंड पेज मोबाईलवर विभागले जाते. त्यामुळे तुम्हाला अनेक वेळा Continue असे म्हणावे लागते. यात वेळ वाया जातो. मोबाईल विकिपेडिया एेवजी तुम्ही वॅपेडिया डॉट मोबी (www.wapedia.mobi) ही सेवा वापरल्यास तुम्ही तेच रिझल्ट्स एकाच पेजवर पाहू शकाल.


शिवाय यात विकिपेडिया, गुगल इमेजेस आणि ताप्तू (मोबाईल इंटरटेन्मेंट सर्च इंजिन) यापैकी कोणतीही सेवा वापरून रिझल्ट्स फेच करू शकता. याव्यतिरिक्त In the news, Featured content, Did you know? आदी व्हॅल्यू अॅडेड सेक्शन्सही यात पाहायला मिळतात. वॅपिपेडिया (www.wapipedia.org) ही याच प्रकारातील आणखी एक सेवा. मोबाईलसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या साईट्सची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीदेखील तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये feedm8.com/sasotechnology असे टाईप करून बुकमार्क करा.
Read the full story

,

फ्लिकर अॉन मोबाईल

December 12, 2008 0 comments

सुट्यांमध्ये मस्त भटकंतीला गेलेल्या शैलेशने मोबाईलवर भरपूर फोटो काढले. परत आल्यानंतर एकेक फोटो डाऊनलोड करून फ्लिकर, अॉरकुट, फेसबुकवर अपलोड करत बसलेला असताना त्याला जाणवले की, त्याचवेळी आपल्या मित्रांना फोटो पाठवता आले असते तर? मोबाईलवरून थेट फोटो पाठवायचे म्हटले तर एमएमएस हा सोपा आणि खात्रीलायक पयर्याय. पण त्याला पैसे अधिक मोजावे लागतात. तुमच्याकडे जीपीआरएसचा अनलिमिटेड डेटा ट्रान्स्फर प्लॅन असेल तर तुम्ही विशिष्ट अॅप्लीकेशन वापरून थेट मोबाईलवरून फोटो इतरांशी शेअर करू शकता.

फोटो शेअरिंग साईटमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या फ्लिकरवर तुमचे अकाऊंट असेल आणि जीपीआरएस अॅक्टिव्ह फोन असेल तर तुम्ही हे काम चुटकीसरशी करू शकता. मोबाईलच्या ब्राऊजरमध्ये जाऊन m.flickr.com (किंवा m.yahoo.com) असे टाईप करा किंवा येथे जाऊन तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. तुम्हाला आलेल्या मेसेजमध्ये एक लिंक असेल त्यावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवर तुमचा याहूचा आयडी आणि पासवर्ड एंटर करा. तुम्ही फ्लिकरच्या मोबाईल व्हर्जनमध्ये एंटर झालेला आहात. ‘अपलोड न्यू फोटो’वर क्लिक करून फोन मेमरी किंवा मेमरी कार्डवरील फोटो सिलेक्ट करा. काही क्षणांत तुमचा फोटो फ्लिकरवर अपलोड होईल.



या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सिटीझन जर्नलिस्टही होऊ शकता. ज्या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे वातर्ताहर तात्काळ पोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी तुम्ही असाल तर तेथील फोटो तुम्ही फ्लिकरवर अपलोड करून संबंधितांना कळवू शकता. प्रसारमाध्यमेदेखील आपल्या वेबसाईटवरून असे आवाहन करू शकतात. त्यासाठी त्यांनी आपला फ्लिकर आयडी देऊन प्रेक्षकांना अथवा वाचकांना आपल्या फ्लिकर कॉन्टॅक्ट्समध्ये अॅड करण्यास सांगावे. असे केल्याने फोटो अपलोड करताना शेअर विथ कॉन्टॅक्ट्स असे म्हणून फोटो थेट त्यांच्यापर्यंत पोचवता येऊ शकतो.

  • नोकियाच्या एन सिरीज फोन्सवर फ्लिकर हे अॅप्लीकेशन अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहे.
  • ब्लॅकबेरी वापरणाऱ्यांनी येथे क्लिक करावे.
  • याहूच्या इतर सेवा मोबाईलवर अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही याहू गो वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा.
साधी-सोपी टेक्नॉलॉजीदेखील तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. त्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये feedm8.com/sasotechnology असे टाईप करून बुकमार्क करा.
Read the full story

, ,

हायपरलिंक्सचे ट्रेलर

December 9, 2008 0 comments

तुमचा माहितीचा प्राथमिक स्रोत कोणता, असे विचारल्यास आज १० पैकी आठ जण इंटरनेट असेच उत्तर देतील. आपण दररोज किमान पाच-पन्नास साईट्सना नक्कीच भेट देत असू. एखाद्या साईटवर असलेल्या लिंक्स इंटरेस्टिंग वाटल्या तर तेथेही जाऊन आपण अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही साईट्स आणि ब्लॉग्जवर तर अशा रिलेटेड पोस्ट्स आणि साईट्सचा खजिनाच दडलेला असतो. या पद्धतीने माहिती गोळा करताना मूळ साईटवरून इतके भरकटायला होते, की आपण काय वाचत होतो, हेच लक्षात राहत नाही. शिवाय अनेक लिंक्स क्लिक केल्यामुळे विंडोज (किंवा टॅब्ज)ची गर्दी होते. मोठ्या अपेक्षा ठेवून क्लिक केलेल्या लिंक बऱ्याच वेळा अपेक्षाभंग करतात. त्यामुळे आपला वेळही वाया जातो. त्या लिंकवर नेमकं काय आहे, याचा क्लू मिळाला तर?

इंटरक्लू हे फायरफॉक्सचे एक्स्टेंशन वापरून तुम्ही तुमची सर्फिंग प्रॉडक्टिव्हिटी वाढवू शकता. इंटरक्लू तुम्हाला लिंकचे टीझर किंवा ट्रेलर दाखवते. कसे ते सांगतो. इंटरक्लू इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जेव्हा एखाद्या साईटला भेट द्याल (उदा. न्यूयॉर्क टाईम्स) तेव्हा हायपरलिंक केलेल्या प्रत्येक इलेमेंटचे ट्रेलर तुम्हाला पाहता येईल. संबंधित लिंकवर माऊस पॉईंट केल्यानंतर काही मिलिसेकंदात त्यासमोर इंटरक्लूचा किंवा त्या साईटचा फेव्ह-आयकॉन दिसायला लागेल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मूळ विंडोत एक छोटी विंडो ओपन होईल व त्या लिंकवर काय आहे याची थोडक्यात माहिती पाहावयास मिळेल. त्यानंतर तुम्ही संबंधित लिंकवर जायचे किंवा नाही, हे ठरवू शकता.

इंटरक्लू टेक्स्ट, व्हिडीओ, पीडीएफ, इमेजेस आदी सगळ्यांचे ट्रेलर तुम्हास दाखवू शकतो. तसेच इंटरक्लूच्या छोट्या विंडोतून तुम्ही संबंधित लिंक फेव्हरेटमध्ये अॅड करू शकता, ई-मेल करू शकता, कॉपी करून घेऊ शकता, डिग, न्यूजव्हाईन, डेलिशियस किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता आणि प्रिंटही करू शकता. या छोट्या विंडोचा आकार कमी-जास्त करण्यापासून ते लिंकचे स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले करण्यापर्यंत अनेक कस्टमायजेशन्स तुम्ही यात करू शकता. त्यासाठी इंटरक्लूच्या सेटिंग्ज पाहा. थोडक्यात काय तर, मस्ट हॅव, असे हे एक्स्टेंशन आहे.
इंटरक्लू इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

शोध - लो-कॉस्ट कॅरिअर्सचा

December 8, 2008 0 comments

आर्थिक मंदीमुळे जागतिक तसेच भारतीय विमान कंपन्यांना मोठा फटका बसत असल्याच्या बातम्या सध्या रोज वाचायला मिळताहेत. खालील लिंक्सवर जरा नजर टाका, म्हणजे तुम्हाला याचे गांभीर्य लक्षात येईल.
Airlines See Big Traffic Drop and Expect More Bad News
Airlines record sharp drop in business travel
Meltdown effect: Airlines grounded, Rlys take wings

कॉपर्पोरेट हाऊसेस आणि वैयक्तिक पातळीवरदेखील कॉस्ट कटिंग सुरू झाल्याने काही महिन्यांपूवर्वी सहज विमानाने प्रवास करणारे आता एक तर प्रवास रद्द करीत असल्याचे दिसून येतेय. अगदीच अपरिहार्य असल्यास विमानाचा पयर्याय घेतला जातोय. अन्यथा लोक रेल्वेचा अॉप्शन पसंत करताहेत. काही महिन्यांपूवर्वी एव्हिएशन फ्युएलच्या किमती गगनाला भिडल्याने लो-कॉस्ट कॅरिअर देखील परवडत नव्हते. आता फ्युएल सरचार्ज कमी केल्याने लोक पुन्हा लो-कॉस्ट कॅरिअरचा अॉप्शन ठेवतील अशी चिन्हे आहेत. ही झाली भारतातील परिस्थिती. परदेशातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. अशावेळी खासगी किंवा कायर्यालयीन कामाकरिता परदेशात प्रवास करावयाचा झाल्यास आपण देखील सर्वप्रथम लो-कॉस्ट कॅरिअर शोधण्याचा प्रयत्न करू.

अॉनलाईन बुकिंगची सेवा जवळपास सर्वच विमान कंपन्या देतात. पण कुठल्या कंपनीचा तिकिट दर तुलनेने कमी आहे, हे शोधण्यासाठी सर्व कंपन्यांच्या साईटला भेट देणे म्हणजे वेळखाऊ काम आहे. अशा वेळी तुम्ही यात्रा किंवा मेक माय ट्रिप किंवा ट्रिपिटसारख्या साईटचा आधार घेता. यातून सर्व कंपन्यांचे फ्लाईट प्लॅन्स पाहून निर्णय घेता येतो व सवलतीत तिकिट बुकही करता येते. भारतात प्रवास करावयाचा असेल तर आपण थेट स्पाईस जेट किंवा इंडिगो एअरलाईन्सच्या साईटवर जाऊनही तिकिट बुक करू शकतो. पण समजा तुम्हाला दक्षिण अाफ्रिकेत किंवा अॉस्ट्रेलियात जायचं असेल तर? तेथील लो-कॉस्ट कॅरिअर आपल्याला सहसा माहित नसतात. अशावेळी तुम्ही एअर निन्जा या साईटची मदत घेऊ शकता. जगभरातील लो-कॉस्ट कॅरिअरची माहिती या साईटवर साठवलेली आहे. तुम्हाला ज्या ठिकाणाहून प्रवास सुरू करावयाचा आहे त्या देशाचे व ठिकाणाचे नाव आणि जिथे जायचे आहे त्या देशाचे आणि ठिकाणाचे नाव ड्रॉपडाऊन मेनूतून सिलेक्ट केल्यानंतर संबंधित मार्गांवरील लो-कॉस्ट कॅरिअर्स डिस्प्ले होतील. तुम्ही ठराविक कॅरिअरच्या साईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता व तिकिटही बुक करू शकता.




Read the full story

गुगल इंडिया ब्लॉग वाचलात का?

December 4, 2008 1 comments

गेल्या महिन्याभरात गुगलने अनेक नवी प्रॉडक्ट्स लॉंच केली. भारतीय ग्राहक समोर ठेवून लॉंच केलेल्या काही खास प्रॉडक्ट्सकडून (उदा. एसएमएस चॅनेल्स आणि एसएमएस सर्च) गुगलच्या अधिक अपेक्षा असणार. एकूण काय, तर भारतीय बाजारपेठेवर गुगलने आता लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी गेल्या अॉक्टोबरमध्ये गुगल इंडिया ब्लॉगही सुरू केला आहे.

या ब्लॉगवर अद्याप फारशी अॅक्टिव्हिटी पाहायला मिळालेली नसली तरी आगामी काळात गुगल इंडिया ब्लॉग भारतीय नेटिझनांच्या फेव्हरेट साईट्समध्ये नक्कीच पाहावयास मिळेल. गुगल इंडिया ब्लॉगवरील पहिल्या पोस्टमध्ये एम.टी.रघुनाथ हा सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणतोः



Namaste, India!

Google has a lot going on in India: We have offices in four cities. We're building some new, interesting products—like Google Map Maker and many others on India Labs — for Indian users. We have great aloo parathas in our cafes. And we have the largest number of Googlers outside the United States. But ... we didn't have an official blog where we could talk about the exciting things we're working on.

(संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

गुगलचे आणखी काही ब्लॉगः
अॉफिशियल गुगल ब्लॉग
जी-मेल ब्लॉग
गुगलच्या सर्व ब्लॉगची यादी येथे पाहा.
गुगलच्या विविध प्रॉडक्ट्सच्या यादीसाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

िंपग फॉर इव्हेंट!

December 3, 2008 1 comments

मुलाचा पहिला वाढदिवस शैलेशने जोरदार साजर करायचा ठरविला. हॉटेल बुक केले, निमंत्रितांची यादी तयार झाली, सगळं काही व्यवस्थित झालं. पण निमंत्रण पत्रिकात प्रचंड घोळ झाले. डिझायनरने केलेल्या चुका सुधारण्यात दिवस गेला, त्यानंतर प्रिंटरने घोळ घातले. त्यामुळे अध्यर्ध्या छापून झाल्यानंतर पुन्हा छापावयास घेतल्या. त्यात एक दिवस महाराष्ट्र बंद असल्यामुळे पत्रिका हातात मिळावयासच बुधवार उजाडला. कार्यक्रम दोन दिवसांवर आला असल्यामुळे सगळ्यांना घरी जाऊन पत्रिका देणे शक्यच नव्हते. शेवटी सगळ्यांना फोनवरच आमंत्रण दिले. त्यामुळे प्रत्येकाला हॉटेलचा पत्ता सांगणे, वेळ सांगणे, अडचण आल्यास भावाच्या मोबाईलवर फोन करावयास सांगणे, त्याचा नंबर देणे अशी सगळी माहिती द्यावी लागत होती. शेवटी एकदाचा कार्यक्रम पार पडला...पिंग वापरले असते, तर असे घोळ झाले नसते. पिंग? व्हॉट इज पिंग?



इव्हेंट इन्फॉर्मेशन आणि इन्व्हिटेशनसाठी अनेक अॉनलाईन सेवा उपलब्ध आहेत. अगदी अॉरकुट, फेसबुकचा वापर करूनही तुम्ही एखाद्या इव्हेंटचे इन्व्हाईट पाठवू शकता. पण त्यात ओलावा नसतो. सॉफिस्टिकेशन नसते. सध्या उपलब्ध असणाऱ्या अनेक सेवांमध्ये पिंग ही सेवा सवर्वोत्तम आहे. पिंग या मोफत सेवाचा वापर करून तुम्ही पुढील गोष्टी करू शकताः
१. इन्व्हिटेशन कार्ड डिझाईनः उपलब्ध असलेल्या अनेक डिझाईन्समधून तुम्ही एखादे डिझाईन निवडू शकता किंवा तुम्ही स्वतः केलेले डिझाईन अपलोड करू शकता. पिंगचे प्रीमियम डिझाईन वापरायचे असल्यास १० डॉलर खर्च येईल. कार्डचा ले-आऊटही हवा तसा बदलता येतो.



२. इव्हेंट डिटेल्सः यात दिनांक, वेळ, टाईम झोन, ठिकाण, सविस्तर पत्ता आणि निमंत्रितांना द्यावयाचा संदेश आदी गोष्टींचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणाचा नकाशाही (गुगल मॅप) जोडता येतो.
३. गेस्ट लिस्टः पिंग वापरण्यासाठी अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही विविध कार्यक्रमांसाठीच्या निमंत्रितांसाठी लिस्ट्स तयार करून ठेवू शकता - उदा. शाळेतले मित्र, कॉलेजातले मित्र, अॉफिसमधले सहकारी, नातेवाईक, अगदी जवळचे काही खास लोक इ. या तयार असलेल्या लिस्टमधील सर्वांना तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवू शकता. तुमच्या मेलबॉक्समधील (याहू, जी-मेल, हॉटमेल, प्लॅक्सो इ.) कॉन्टॅक्ट्सही इम्पोर्ट करता येतात. व्ही-कार्ड किंवा सीएसव्ही फॉरमॅटमधील कॉन्टॅक्ट्सही इम्पोर्ट करता येतात. हेच इन्व्हिटेशन तुम्ही ट्विटरवर देखील पोस्ट करू शकता.
४. आरएसव्हीपीः कार्यक्रमापूवर्वी रिमाईंडर मेसेजेसही पाठविता येतात. निमंत्रण स्वीकारल्यानंतर थॅंक यू नोटही पाठवली जाते.
५. इव्हेंट वेब पेजः सदर कार्यक्रमासाठी स्वतंत्र वेब पेजही तयार करून निमंत्रितांना पाठवता येते.
६. फोटो आणि व्हिडीओः कार्यक्रमानच्या वेबपेजवर फोटो आणि व्हिडीओही अपलोड करता येतात. फ्लिकरवरून फोटो किंवा अल्बमही इम्पोर्ट करू शकता.
७. इव्हेंट फंड आणि गिफ्ट रजिस्ट्रीः माजी विद्याथर्थी मेळावा किंवा अशाच इतर काही कार्यक्रमासाठी निधी गोळा करावा लागतो. त्यात घोळ होण्याची शक्यता असते. पे-पालच्या साह्याने तुम्ही निमंत्रितांकडून निधी संकलनाचे कामही करू शकता. त्याचप्रमाणे अॅमेझॉनसारखी गिफ्ट व्हाऊचरही निमंत्रकास गिफ्ट म्हणून देऊ शकता.

एवढं सगळं केल्यानंतर ई-मेल, एसएमएस आणि प्रिंटच्या माध्यमातून तुम्ही निमंत्रण पाठवू शकाल. २० एसएमएससाठी दीड डॉलर एवढा खर्च येतो. त्याएेवजी तुम्ही गुगल एसएमएस चॅनेल वापरून मोफत एसएमएस पाठवू शकता. कार्यक्रमापूवर्वी तुम्हाला इव्हेंट रिपोर्टही मिळतो.
Read the full story