,

से बाय टू शॉर्टकोड्स, वेलकम गुगल एसएमएस सर्च

November 19, 2008 Leave a Comment

गुगल इंडियाने एसएमएस सर्चची आज घोषणा केली. भारतातील जीपीआरएसधारकांची संख्या सातत्याने वाढत असली तरी एकूण मोबाईलधारकांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. जीपीआरएस न वापरणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून गुगल इंडियाने सर्चची प्रक्रिया आणखी सोपी करून टाकली आहे. ही सेवा भारतातील सर्व जीएसएम आणि सीडीएमए ग्राहकांना वापरता येईल.

इंटरनेटवरील गुगल सर्च आणि एसएमएसवरील गुगल सर्च यात मोठा फरक असल्याचे कंपनीने सांगितले आहे. एसएमएसवरील सर्च रिझल्ट संबंधित कीवर्डसाठी अत्यंत रिलेव्हन्ट असतील, याची खात्री गुगल इंडियाने दिली आहे. या सेवेमुळे 58888 सारख्या शॉर्टकोड सेवांवर नक्कीच परिणाम होणार आहे.

एसएमएस सर्च कसा करावा?
उदा. तुम्हाला ताजा क्रिकेट स्कोअर जाणून घ्यायचा असेल, तर Cricket India असा मेसेज 9-77-33-00000 या क्रमांकावर पाठवून द्या. हा क्रमांक शॉर्टकोड नसल्यामुळे या मेसेजसाठी नॉर्मल एसएमएस चार्ज पडेल.


याच पद्धतीने तुम्ही शहरातील सिनेमे, ट्रेनचे शेड्यूल, भविष्य, पंचांग, फ्लाईट स्टेटस, पीएनआर स्टेटस, ताज्या बातम्या आदी सर्व माहिती मिळू शकेल. थोडक्यात ज्या गोष्टींसाठी तुम्ही गुगल ओपन करता, त्या सर्व गोष्टी आता एसएमएसवरून मिळणार आहे. तेव्हा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये 9-77-33-00000 हा नंबर गुगल सर्च म्हणून अॅड करावयास विसरू नका.

Related Posts :0 comments »