,

स्पाईस अप युवर मोबाईल!

November 29, 2008 4 comments

तुम्हाला कायम अपडेट राहण्याची सवय असेल आणि मोबाईल फोनशिवाय तुमचे पानही हलत नसेल, तर तुमच्यासाठी एक परफेक्ट मोबाईल अॅप्लीकेशन तयार झाले आहे. पत्नीपासून प्लंबरपर्यंत आणि नोकरीपासून न्यूज अपडेटपर्यंत सर्वकाही मोबाईलवर एकाच ठिकाणी मिळण्याची सोय यात केली आहे.

स्पाईस टेलिव्हेंचर्सने मोबीसॉक या नव्या कंपनीची स्थापना केली असून याच नावाने पहिले मोबाईल
अॅप्लीकेशन नुकतेच (सॉफ्ट) लॉंच केले आहे. यात फायनान्शियल एक्स्प्रेस, सुलेखा, क्रिकबझ, जीवनसाथी, मेकमायट्रिप आणि नोकरी डॉट कॉम या सहा सेवांसाठीची अॅप्लीकेशन्स उपलब्ध आहेत. मेकमायट्रिप आणि क्रिकबझ वगळता इतर सर्व अॅप्लीकेशन्स एकाच पॅकेजमध्ये उपलब्ध आहेत.



उदा. तुम्ही सुलेखा डॉट कॉम डाऊनलोड केल्यास फायनान्शियल एक्स्प्रेस, जीवनसाथी आणि नोकरी डॉट कॉम आपोआप डाऊनलोड होतील. याचा इंटरफेस अत्यंत साधा आणि वापरण्यास सोपा आहे. संबंधित सेवेच्या लोगोवर क्लिक करून तुम्ही माहिती मिळवू शकता. मोबीसॉकमध्ये भविष्यात आणखी अनेक कंपन्यांच्या सेवा इंटिग्रेट केल्या जाण्याची शक्यता आहे.
मोबीसॉक डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये wap.mobisoc.com टाईप करा किंवा येथे क्लिक करा.
Read the full story

मुंबईने आणखी किती सहन करायचे?

November 27, 2008 0 comments


वीस तासांहून अधिक काळ लोटला तरी मुंबईतील दहशतीचे वातावरण अजून कायम आहे. हॉटेल ताज पॅलेस, ट्रायडेन्ट टॉवर्स (पूवर्वीचे अोबेरॉय) व नरिमन हाऊस येथे अजूनही काही अतिरेकी अाहेत. या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा दल, नौसेना आणि मुंबई पोलिस यांची संयुक्त कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही सुरू होऊनही आता सुमारे आठ ते दहा तासांचा कालावधी लोटला आहे. काल रात्री सुरू झालेल्या या भयनाट्यात पोलिस दलातील तीन खंदे वीर - राज्य अतिरेकी विरोधी दलाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसातील अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर धारातीथर्थी पडले. या तीन वीरांसह ११ पोलिस आणि १०० हून अधिक नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबईला आणि मुंबईकरांना सलाम करण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबई हल्ल्याची छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Read the full story

सर जो तेरा चकराये...

विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या बहुतेकांचे डेस्कटॉप एकसारखेच दिसतात. स्क्रीनच्या डाव्या बाजूस झालेली आयकॉन्सची गदर्दी हा नेहमीचा सीन. काहीजणांचे अख्खे डेस्कटॉप आयकॉन्सने भरलेले असते. डेस्कटॉपवर अगदी मोजक्या प्रोग्रामचे शॉर्टकट्स आणि नेहमी लागणारी डॉक्युमेंट्स ठेवण्याची प्रथा आहे. पण आपण याला न जुमानता वाट्टेल ते डॉक्युमेंट डेस्कटॉपवर स्टोअर करतो आणि मग एक वेळ अशी येते की त्या गदर्दीत महत्त्वाचे डॉक्युमेंट सापडत नाही. डेस्कटॉपवरील गदर्दी कमी करण्यासाठी विंडोज वापरणारे ‘ट्रे’चा आधार घेतात. या ‘ट्रे’चे मॉडिफाईड व्हर्जन म्हणजे मॅकिन्तोषवरील डॉक. मॅकिन्तोषच्या डॉकचे अनुकरण करणारे अनेक प्रोग्राम्स (उदा. रॉकेट डॉक, अॉब्जेक्ट डॉक) प्रचलित आहेत, पण त्यात इंटेलिजन्स दिसून येत नाही. एरिक वॉंग या गृहस्थाने शक्कल लढवून डॉकची संकल्पनाच बदलली आहे. जाणून घेऊयात त्याची ही नवी कल्पना...

जिथे माऊस, ितथे डॉक ही सर्कल डॉक मागील प्रमुख संकल्पना. मॅकिन्तोषमधील डॉकप्रमाणे विंडोजसाठीदेखील अनेक डॉक तयार झाले. पण हे सगळे डॉक स्क्रीनच्या कोणत्यातरी एका बाजूस प्लेस करावे लागतात. त्यामुळे एखाद्या आयकॉनवर क्लिक करायचे झाल्यास माऊस त्यावर न्यावा लागतो. सर्कल डॉक अॅक्टिव्हेट करायचे झाल्यास केवळ एक हॉट-की (उदा. F1) दाबल्यास जिथे माऊस पॉईंटर आहे, त्याभोवती सर्कल डॉक डिस्प्ले होईल. आकाराने गोल असल्यामुळे हा डॉक स्क्रीनवर कुठेही प्लेस झाला तरी अॅक्सेसिबल होतो. स्क्रीनच्या एका बाजूस गेला तरी न दिसणाऱ्या भागातील आयकॉन्स स्क्रोल व्हीलच्या साह्याने डेस्कटॉपवर आणता येतात.



सर्कल डॉकमध्ये ड्रॅग करून अॉयकॉन्स अॅड करता येतात. उदा. तुम्हाला इंटरनेट एक्स्प्लोरर सर्कल डॉकमध्ये अॅड करायचे आहे. संबंधित प्रोग्रामचा आयकॉन प्रोग्राम फाईल्समधून थेट सर्कल डॉकवर ड्रॅग केला की त्याचा शॉर्टकट तयार होतो. अशा पद्धतीने तुम्ही हव्या त्या प्रोग्रामचे अथवा डॉक्युमेंटचे शॉर्टकट सर्कल डॉकवर तयार करू शकता. सर्कल डॉकमध्ये अनेक कस्टमायजेशन्स शक्य आहेत. सर्कल डॉक एक ओपन सोर्स प्रोजेक्ट असल्यामुळे यातील फीचर्समध्ये व्हॅल्यू अॅडिशन होण्याची शक्यता अधिक आहे.
विंडोज एक्सपी आणि विंडोज वापरणाऱ्याना सर्कल डॉक वापरता येईल. विंडोज एक्सपीवर मायक्रोसॉफ्ट डॉट नेट फ्रेमवर्क नसेल तर येथून डाऊनलोड करता येईल.
सर्कल डॉक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तुमचा अनुभव शेअर करण्यास विसरू नका.
Read the full story

,

ओन्ली कीबोर्ड!

November 26, 2008 0 comments

तुम्हाला माऊसपेक्षा कीबोर्ड वापरणे अधिक आवडत असेल तर जर्मनीच्या एका तरुणाने तयार केलेले नवे मेटा-सर्च इंजिन तुम्हाला नक्कीच आवडेल. माऊसलेस सर्चिंगचे उद्दिष्ट ठेवून २१ वषर्षीय ज्युलिअस एकर्टने कीबोर्डर ही साईट सुरू केली आहे. Navigate with arrow keys. Open with enter, असे या साईटचे ब्रीदवाक्य आहे.

इंटरॅक्टिव्ह इंटरफेस ही कीबोर्डरची खासियत. कीबोर्डरचे होमपेज अगदी गुगलप्रमाणेच स्वच्छ आहे. पेजच्या मध्यभागी डिजिटल घड्याळ आहे. होमपेजवर अगदी वर डाव्या बाजूस सर्च बॉक्स आहे. सर्च क्वेरी दिल्यानंतर घड्याळ नाहीसे होऊन गुगल, गुगल इमेजेस, विकिपेडिया, यू ट्यूब आदी साईट्सवरून फेच केलेले रिझल्ट्स दिसतात. कीबोर्डवरील अॅरो कीजने तुम्ही नेव्हिगेट करू शकता. एंटर केल्यास संबंधिक रिझल्ट ओपन होईल. All Results वर क्लिक केल्यास तुम्ही संबंधित साईटच्या (उदा. गुगल) रिझल्ट पेजवर जाऊ शकाल. भविष्यात फ्रेंडफीड, डेलिशियस, फ्लिकर, गुगल डॉक्स आणि आणखी बऱ्याच साईट्सवरील रिझल्ट्स फेच करण्याची एकर्टची योजना आहे.

कीबोर्डरचे होमपेज

कीबोर्डरचे रिझल्टपेज


टिपः कोणतीही साईट केवळ कीबोर्डच्या आधाराने ओपन करण्यासाठी तुम्हा फायरफॉक्सचे माऊसलेस ब्राऊजिंग हे एक्स्टेंशन वापरू शकता.
Read the full story

, ,

क्विक एटीएम लोकेटर

November 25, 2008 0 comments

कायर्यालयीन किंवा खासगी कामानिमित्त आपल्याला अनेकदा बाहेरगावी जावं लागतं. अशावेळी गरजेपुरते पैसे (कॅश) आपण जवळ ठेवतो आणि काही लागलेच तर एटीएममधून काढता येतील, असे समजून बाहेर पडतो. आपली भेट एक-दोन दिवसांची असेल तर धावपळ होणे साहजिक असते. मग एेनवेळी पैसे कमी पडतात, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करता येत नाही, एटीएम कुठे आहे हे माहित नसतं, गाडी सुटायची वेळ झालेली असते...थोडक्यात सांगायचं तर आपली पुरती वाट लागते.

आपल्या बॅंकेचं एटीएम संबंधित गावात असेलच असं नाही. त्यामुळे अनेक वेळा सहयोगी बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात. जगातील बहुतांश एटीएममध्ये व्हिसा कार्ड चालतात. तुमच्याकडे व्हिसा कार्ड असेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरूनही नजीकच्या एटीमएमची माहिती मिळवू शकता.


व्हिसा ग्लोबलने ही सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. देशाचे नाव आणि गावाचे नाव एंटर केल्यानंतर तेथील सर्व एटीएम केंद्रांची यादी पाहावयास मिळते. तुम्हाला विशिष्ट बॅंकेचे एटीएम शोधायचे असेल तर अॅडव्हान्स्ड सर्चमध्ये जाऊन शोधू शकता. एकूण १७० देशांतील व्हिसा एटीएम्सचा यात समावेश आहे. ही सेवा वापरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://visa.via.infonow.net/locator/global/

ही लिंक लांबलचक आणि लक्षात ठेवण्यास अवघड आहे. मात्र, टायनीयूआरएल वापरून कस्टमाईज केल्यास हीच साईट तुम्ही पुढील लिंकवरून देखील अॅक्सेस करू शकताः http://tinyurl.com/VisaATM
Read the full story

‘आतला’ आवाज

November 24, 2008 2 comments

शैलेशकडे कुठलंतरी भन्नाट गाणं होतं. लॅटिन अमेरिकेतील असावं बहुदा. बोल कळत नव्हते, त्यातील व्यक्ती ओळखीच्या नव्हत्या, पण गाणं ठेका धरायला लावणारं होतं. त्याने मोबाईलवर दाखवलं आणि सगळ्यांनी ते गाणं पटापट ट्रान्स्फर करून घेतलं. काहींनी रिंगटोन म्हणून सेट करण्याचा असफल प्रयत्नही केला. असफलंच होणार होता तो प्रयत्न - कारण ते गाणं व्हिडीओ फॉरमॅटमध्ये होतं. आता व्हिडीओ फाईलला एमपीथ्रीमध्ये कसं कन्व्हर्ट करणार?

काहीवेळा असा प्रसंग येतो. एखादा व्हिडीओ आपल्याला अॉडिओ फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करून हवा असतो. व्हिडीओची साईज १०० एमबीपर्यंत असेल तर तुम्ही झमझारसारखी (वाचाः दमदार फाईल कन्व्हर्टर) अॉनलाईन फाईल कन्व्हर्टर सेवा वापरू शकता. त्याहून अधिक फाईल साईजसाठी अॉफलाईन कन्व्हर्टर सोयीचे जाते. अशावेळी तुम्ही Video to MP3 Converter वापरू शकता. हे कन्व्हर्टर वापरून व्हिडीओ फाईल एमपीथ्रीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः

१. Video to MP3 Converter डाऊनलोड करून इन्स्टॉल करा
२. अॅप्लीकेशनमधून हवी ती व्हिडीओ फाईल ओपन करा
३. आऊटपूट फोल्डर सिलेक्ट करा (या फोल्डरमध्ये कन्व्हर्टेड फाईल स्टोअर होईल)
४. व्हिडीओतील पोर्शन ट्रिम करायचा असल्यास तो सिलेक्ट करा
५. कन्व्हर्टवर क्लिक केल्यानंतर फाईल कन्व्हर्ट होईल



या कन्व्हर्टरचा वापर करून तुम्ही पॉप्युलर व्हिडीओ शोज (उदा. लाफ्टर चॅलेंज, हास्यसम्राट, सारेगमप, व्हॉईस अॉफ इंडिया आदी.) यूट्यूब किंवा इतर साईट्सवरून डाऊनलोड करून (वाचाः झटपट डाऊनलोड) एमपीथ्रीमध्ये कन्व्हर्ट करू शकता. ही फाईल तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्या एमपीथ्रीप्लेयरमध्ये एेकू शकता.
Read the full story