‘दमदार’ फाईल कन्व्हर्टर!
‘ब्लॉगर ओन्ली अॅक्सेप्ट्स jpg, gif, bmp and png इमेजेस,’ असा मेसेज आल्यानंतर शैलेशचा मूडच गेला. गेल्या तासाभरापासून मेहनत करून लिहिलेल्या ब्लॉगपोस्टसाठी त्याने शोधलेली इमेज नेमकी tiff एक्स्टेन्शनची होती. आता काय करणार? बरं त्याच्याकडे फोटोशॉप सारखं प्रोफेशनल सॉफ्टवेअर पण नव्हतं. आता काय करणार?
रमेशला अर्जंट एक डॉक्युमेंट पाठवायचं होतं आणि त्याने वापरलेले फॉन्ट्स ज्याला पाठवायचं होतं त्याच्या लॅपटॉपवर नव्हते. त्यामुळे त्याला ते पीडीएफ करून पाठवावं लागणार होतं. त्याच्याकडेही अॅक्रोबॅट सारखं प्रोफेशनल सॉफ्टवेअर नव्हतं. आता काय करणार?
शैलेश आणि रमेशच्या अडचणींवर एक उत्तर आहे - आणि हे असं उत्तर आहे जे तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी उपयोगाला येणार आहे. त्याचं नाव आहे, झमझार.
झमझार म्हणजे फाईल कन्व्हर्जन फॅक्टरीच आहे. यात तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्स, इमेजेस, अॉडिओ, व्हिडीओ फाईल्स त्यांच्या विविध एक्स्टेंशनमध्ये कन्व्हर्ट करू शकता. उदा. .doc to .html, .pdf, .png, .txt किंवा .jpg to .bmp, .tiff, .pcx, .ico वगैरे. कोणते फाईल फॉरमॅट्स तुम्ही कशाकशांत कन्व्हर्ट करू शकता याची संपूर्ण यादी येथे पाहायला मिळेल. झमझार ही अॉनलाईन सेवा आहे. मोफत सेवा वापरण्यासाठी तुम्हाला रजिस्टर होण्याचीदेखील गरज नाही. तुम्हाला जी फाईल कन्व्हर्ट करायची आहे ती सिलेक्ट करायची, त्यानंतर ती फाईल ज्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करायची आहे तो फॉरमॅट सिलेक्ट करायचा आणि तुमचा ई-मेल आयडी सबमिट करायचा. कन्व्हर्ट केलेल्या फाईलची लिंक काही मिनिटांत तुमच्या ई-मेलवर पाठविली जाते. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही ती फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता. अॅज सिंपल अॅज दॅट!
झमझारच्या पेड व्हर्जन्समध्ये तुम्हाला काही जीबींपर्यंतचे अॉनलाईन स्टोरेजही मिळते. शिवाय इतर अनेक सुविधाही त्यात मिळतात. तेव्हा शैलेश आणि रमेशसारखे तुम्हीही कधी अडचणीत सापडलात तर आता तुमच्याकडे दमदार उत्तर आहे - झमझार!
0 comments »
Post a Comment