,

‘अधिक’ माहितीसाठीः टेकटर्म्स, फाईलइन्फो आणि चॅटरेफ डॉट कॉम

June 29, 2009 1 comments

कॉम्प्युटर किंवा इंटरनेटशी संबंधित एखादी संज्ञा (उदा. ActiveX) अडल्यास तुम्ही काय करता? त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करता की तसेच पुढे जाता? हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय, आपल्याला काही घेणं-देणं नाही, असं म्हणून अनेक जण ती संज्ञा समजावून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. वास्तविक एका साध्या गुगल सर्चवरून आपल्याला त्या संज्ञेची हवी ती माहिती मिळू शकते. पण अनेकांना यात फारसा रस नसतो. त्यामुळे एवढी तसदी कोणी घेत नाही. पण ActiveX म्हणजे नेमकं काय, हे चारेक ओळींत आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर? शार्पन्ड डॉट कॉम ही साईट गेल्या दहा वर्षांपासून अविरतपणे असं ज्ञानदानाचं काम करीत आहे.

मे २००९ मध्ये शार्पन्ड डॉट कॉमला दहा वर्ष पूर्ण झाली. पेर ख्रिस्तनसन याने सुरू केलेल्या या साईटभोवती आज अाणखी तीन साईट्स उभ्या राहिल्या आहेत. कॉम्प्युटर आणि इंटरनेटशी संबंधित संज्ञांसाठी टेकटर्म्स, चॅटिंगमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दांची उकल करून सांगणारी चॅटरेफ आणि विविध फाईल एक्स्टेन्शनची माहिती देणारी फाईलइन्फो डॉट कॉम या त्या तीन साईट्स.

हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट विश्वातील ए टू झेड संज्ञांची माहिती असलेली टेकटर्म्स डॉट कॉम ही साईट तुमचे या विषयांतील ज्ञान वाढवण्यास नक्कीच मदत करेल.

एखाद्या विचित्र फॉरमॅटमधील (उदा. .jcz) फाईल समोर आल्यास तिचा आगा-पिछा जाणून घेण्यासाठी आणि ती नेमकी कोणत्या प्रोग्राममध्ये ओपन होईल ही माहिती मिळवण्यासाठी फाईल इन्फो डॉट कॉम ही साईट खूप उपयोगाची ठरते. या साईटवरील फाईल एक्स्टेन्सशन्स पाहून गरगरायला होतं!

*$ म्हणजे ‘स्टार आणि डॉलर’ असं उत्तर दिलंत तर तुम्ही मूर्ख ठराल. *$ याचा अर्थ ‘स्टारबक्स’ असा होतो. 143 आणि 143444 अशा सांकेतिक भाषेत चॅट करणाऱ्या नव्या पिढीला पाहून तुम्ही नक्कीच बुचकाळ्यात पडाल. ही मुलं नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा करताहेत, हे समजण्याच्या आत ती तुम्हाला गुंडाळून ठेवतील - एवढे सांकेतिक शब्द त्यांच्या डोक्यात फिट असतात. यातील 143 म्हणजे ‘आय लव्ह यू’ आणि 143444 म्हणजे ‘आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच’! चॅटिंगच्या विश्वात अशा शेकडो शब्दांचा सर्रास वापर केला जातो. असे शब्द आणि त्यांचे अर्थ जाणून घेण्यासाठी चॅटरेफ डॉट कॉम ही साईट नक्कीच उपयोगी ठरते. (एखाद्या अनोळख्या व्यक्तीने अचानक 143 म्हटलं तर किमान गोंधळायला तरी होऊ नये, म्हणून असे कोड वर्ड एकदा नजरेखालून तरी घाला. :-))
Read the full story

, ,

प्रोफेशनल ब्लॉगर टेम्प्लेट्सचा मिनी-खजिना!

June 26, 2009 1 comments

नव्याने ब्लॉगिंगमध्ये उतरणाऱ्या व्यक्तीसाठी ब्लॉगर हा एक अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे. केवळ तीन स्टेपमध्ये ब्लॉग तयार करून एखादी व्यक्ती लिहिण्यास सुरवात करू शकते. त्यानंतरही तो मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. पण एकदा का ब्लॉगरवर हात बसला की मग ‘काड्या’ कराव्याशा वाटतात. लोगो बदलता येतो का ते पाहणे, बॅकग्राऊंड बदलून पाहणे, नव-नवे विजेट्स किंवा गॅजेट्स अॅड करणे अशा विविध लेव्हलच्या ‘काड्या’ आपण करून पाहतो. ‘एचटीएमएल’ची माहिती असेल तर मग ही लेव्हल आणखी पुढे जाते; पण ‘काड्या’ करून पाहिल्या ना तरीसुद्धा ‘एचटीएमएल’ थोडेबहुत कळायला लागते आणि मग ब्लॉगमध्ये हवे तसे बदल करणे शक्य होते.

एकदा का यशस्वीरित्या काही बदल करणं जमलं की आत्मविश्वास वाढतो आणि आपण अजून पुढे जायला लागतो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण टेम्प्लेट किंवा थीम बदलायचा विचार करतो. पण इतरांहून जरासं वेगळं टेम्प्लेट मिळणं, ते आवडणं आणि ते यशस्वीरित्या ब्लॉगला अप्लाय करणं तितकसं सोपं नाही. मुळात ब्लॉगरसाठी फार क्रिएटिव्ह टेम्प्लेट तयार करणं तांत्रिक मर्यादांमुळे शक्य होत नाही. हे खरं असलं तरी इस्तंबूलच्या ओरक (Ooruc चा उच्चार बहुदा असाच असावा) नावाच्या एका तरूणाने उच्च दर्जाचे प्रोफेशनल ब्लॉगर टेम्प्लेट्स तयार केले आहेत.



themes.ooruc.com वर ही टेम्प्लेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ब्लॉगरवर उपलब्ध असणारी रटाळ टेम्प्लेट्स किंवा इतर उपलब्ध असणारी दोन, तीन, चार किंवा पाच कॉलममधील टेम्प्लेट्स पाहून आणि वापरून कंटाळा आला असेल आणि सिरियस ब्लॉगिंग करायचं असेल तर ओरकने तयार केलेली टेम्प्लेट्स वापरून पाहायला हरकत नाही. वर्डप्रेसवरून प्रेरणा घेत मूळ वर्डप्रेससाठी तयार केलेली मॅगझिन स्टाईल टेम्प्लेट्सही कन्व्हर्ट करून ब्लॉगरसाठी वापरली जातात; पण ओरकच्या प्रीमियम टेम्प्लेट्सना खरंच तोड नाहीये. ही टेम्प्लेट्स वापरून तयार केलेला ब्लॉग पाहिल्यास तो ब्लॉगरवर होस्ट केलाय, यावर खरंच विश्वास बसत नाही. मॅगझिन, न्यूजपेपर, म्युझिक, गॅजेट्स, ई-कॉमर्स आदींसाठी वापरता येण्याजोगे टेम्प्लेट्स ओरकने तयार केले आहेत. यातील काही टेम्प्लेट्स मोफत डाऊनलोड करता येतात; तर काही टेम्प्लेट्ससाठी पैसे मोजावे लागतील. त्यांच्या किमती बारा डॉलरपासून पुढे आहेत. पण पन्नास-शंभर डॉलरच्या गुंतवणुकीत एखाद्या छोट्या वर्तमानपत्राची किंवा मासिकाची वेबसाईट सहज तयार होऊ शकत असेल तर काय हरकत आहे? जर तुम्हीसुद्धा सिरियसली असा काही विचार करत असाल आणि तुमच्या दृष्टीने ब्लॉगर हे सर्वांत सोपे माध्यम असेल तर ओरकचे एखादे टेम्प्लेट नक्की वापरा आणि तुमच्या साईटला किंवा ब्लॉगला एक खास प्रोफेशनल लूक द्या.
Read the full story

, , , ,

िसग्नेचर स्टाईल!

June 25, 2009 3 comments

ई-मेल सिग्नेचर्स हा एक प्रचंड इंटरेस्टिंग प्रकार आहे. तुम्हाला आलेल्या ई-मेल्स एकदा चेक करा. प्रत्येकाच्या ई-मेलमध्ये मेसेजनंतर एक वेगळ्याच प्रकारची सिग्नेचर तुम्हाला दिसून येईल. काही जण नुसतं नाव लिहिणं पसंत करतात, तर काही जणांना नाव, गाव, पत्त्यासह ब्लॉग, वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रोफाईल्सच्या लिंक्स देणंही आवडतं. पण अत्यंत सपक वाटणाऱ्या या सिग्नेचर्स आकर्षक करता आल्या तर? येस. वाईज स्टँप नावाचे फायरफॉक्स अॅड-अॉन वापरून तुम्ही ई-मेल सिग्नेचर्सने तुमची नवी ओळख तयार करू शकता.

जी-मेल, याहू मेल, हॉटमेल आणि एओएल मेल आणि इतर अनेक ई-मेल सेवांमध्ये तुम्ही वाईज स्टँपची मदत घेऊन तयार केलेल्या सिग्नेचर्स वापरू शकता. वाईज स्टँप डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर फायरफॉक्समध्ये खाली उजव्या कोपऱ्यात स्टँपचा आयकॉन दिसायला लागेल. असाच आयकॉन तुम्हाला जी-मेलच्या कॉम्पोझ मेन्यूमध्येही दिसेल. हा आयकॉन वापरून तुम्ही अगोदर तयार करून ठेवलेल्या पर्सनल किंवा बिझनेस सिग्नेचर्स ई-मेलमध्ये अॅड करू शकाल.

वाईज स्टँपमध्ये सिग्नेचर तयार करणे एकदम सोपे आहे. यासाठी तुम्ही एकतर तयार टेम्प्लेट वापरू शकता किंवा थेट तुम्हाला हवी तशी सिग्नेचर तयार करू शकता. पन्नासहून अधिक सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर, इ.) आणि इन्स्टन्ट मेसेंजर (जी-टॉक, स्काईप, इ.) सेवांसाठीचे छोटे आयकॉन्स तुम्ही सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. याशिवाय तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटचा प्रसार करण्यासाठीसुद्धा ई-मेल सिग्नेचर वापरता येऊ शकते. वाईज स्टँपमध्ये आरएसएस फीड एंटर करून तुमच्या ब्लॉगवरील ताज्या पोस्टचे हेडिंगदेखील ई-मेल सिग्नेचरमध्ये दिसू शकते, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य. याच पद्धतीने लास्ट एफएमवर तुम्ही ऐकलेले गाणे, यू ट्यूबवरील एखादा व्हिडीओ किंवा ट्विटर, फेसबुकवरील स्टेटस मेसेजसुद्धा ई-मेल सिग्नेचरमध्ये अॅड करू शकता. या सिग्नेचर एचटीएमएल फॉरमॅटमध्ये असल्याने तुम्ही त्या इतर ठिकाणीही (उदा. गुगल डॉक्स) वापरू शकता.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीतले बदलः

मित्रांनो,
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या साधी-सोपी टेक्नॉलॉजी या ब्लॉगमध्ये तुमच्या सोयीसाठी काही बदल करत आहे. यापूर्वी या ब्लॉगसाठी मी 'अर्थेमिया' ही मूळ वर्डप्रेससाठी तयार केलेली थीम वापरत होतो. आता याच थीमचे 'मॉडिफाईड व्हर्जन' उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ते वापरण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही फीचर्स (उदा. Headline) आता तरी अडचणीचे वाटत आहेत; पण त्यावर काही तरी उपाय नक्कीच सापडेल. अर्थात यातील कॅटेगरी नेव्हिगेशन आणि फीचर्ड पोस्ट्स हा प्रकार उत्तम आहे. त्यामुळे साधी-सोपी टेक्नॉलॉजीचे हे नवे रूप तुम्हाला आवडेल, अशी अपेक्षा आहे. sasotechnology@gmail.com वर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
Read the full story

, , ,

गुगलचे ‘अॉल-इन-वन’ मोबाईल अॅप्लिकेशन

June 22, 2009 1 comments

आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या गुगलच्या अनेक सेवा आपण रोज वापरत असतो. गुगल सर्च खेरीज, जी-मेल, यू ट्यूब, गुगल रीडर, अॉर्कुट, गुगल कॅलेंडर, न्यूज, ब्लॉगर आदी सेवाही कमी-अधिक प्रमाणात निश्चित वापरल्या जातात. भारतात ज्या वेगाने कॉम्प्युटर आणि इंटरनेटचा प्रसार होतोय त्याहून कित्येक जास्त पटीने मोबाईल आणि मोबाईल इंटरनेटचा प्रसार होतोय. फिडेलिटी इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण मोबाईलधारकांपैकी १० टक्के लोक मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात.

हा आकडा जवळपास सव्वाचार कोटींवर जातो. यातील सुमारे ८० लाख लोक नियमित (म्हणजे अगदी दररोज) मोबाईलवर इंटरनेट सर्फ करतात, अशी आकडेवारीही फिडेलिटीने जाहीर केली आहे. थोडक्यात काय तर, अख्खा भारतंच इंटरनेटसाठी आता मोबाईलवर अवलंबून राहणार आहे. आकडेवारीतून बाहेर पडून आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात.

मोबाईलचे महत्त्व ओळखून गुगलने त्यांच्या एकेक सेवेसाठीचे मोबाईल अॅप्लिकेशन्स लाँच करणे सुरूच ठेवले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी अॉर्कुटचे मोबाईल अॅप्लिकेशन सादर केले. जी-मेल, यूट्यूब, गुगल मॅप्स आदी अॅप्लिकेशन्स अगोदर उपलब्ध होते. पण प्रत्येक अॅप्लिकेशनचा आयकॉन शोधून त्यावर क्लिक करायची गरज आता उरली नाहीये. सिंबियन (S60) अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या मोबाईल फोनसाठी गुगलचे मास्टर मोबाईल अॅप्लिकेशन (गुगल मोबाईल अॅप) नुकतेच सादर करण्यात आले आहे. आयफोन, ब्लॅकबेरी आणि विंडोज मोबाईलसाठी हे अॅप्लिकेशन अगोदरंच उपलब्ध होते.
गुगलच्या तमाम सेवा तुम्ही या मास्टर अॅप्लिकेशनमधून अॅक्सेस करू शकता. अर्थात, त्यातील विविध अॅप्लिकेशन्स अगोदर इन्स्टॉल करून घ्यावे लागतील. सर्च क्वेरी सजेशन्स आणि लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स ही मोबाईलची अॅपची खास वैशिष्ट्ये. हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर अगोदर तुमचा देश सिलेक्ट करावा लागतो. यात तुम्ही भारत सिलेक्ट केल्यास गुगलच्या सर्व अॅप्लिकेशनचा (उदा. यू ट्यूब) अॅक्सेस मिळणार नाही. तो हवा असल्यास देश विचारल्यास यूनायटेड स्टेट्स सिलेक्ट करा. या सेटिंग्ज तुम्ही नंतर बदलू शकता. लोकेशन बेस्ड सर्च रिझल्ट्स हवे असल्यास मात्र तुम्हाला तुम्ही राहत असलेला देशंच सिलेक्ट करावा लागेल.

गुगल मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये m.google.com असे टाईप करा.
सोनी-एरिक्सन, सॅमसंग मोबाईलधारकांसाठी स्वतंत्र अॅप्लिकेशन नसले तरी हीच लिंक वापरून एका ठिकाणाहून गुगलच्या सर्व सेवा अॅक्सेस करता येऊ शकतील.

अधिक माहितीसाठीः

Official Google Mobile Blog
Google Mobile Page
Read the full story

,

पुन्हा एकदा बालचित्रवाणी...

June 18, 2009 0 comments

लहानपणी बालचित्रवाणीचे कार्यक्रम म्हणजे माझा 'वीक पॉईंट' होता. विविध पुस्तकं, कॉमिक्स आणि सोबतीला बालचित्रवाणीचे कार्यक्रम असले की दिवस मजेत जायचा. बालचित्रवाणीत कागदी खेळांच्या मदतीने भागाकारपासून बाष्पीभवनापर्यंतचे अवघड प्रकार समजावून सांगितले जायचे. विज्ञानातील कठीण संकल्पना सोप्या करून सांगण्याचा तो प्रकार अफलातून होता. आता बालचित्रवाणीचे कार्यक्रम बघण्यात येत नाहीत. कदाचित सुरू असतील. पण आज एक साईट पाहण्यात आली आणि बालचित्रवाणीची प्रकर्षाने आठवण झाली.

आज दिवसागणिक एक नवी संकल्पना उदयास येते. सर्वसामान्य लोकांना यातील अनेक संकल्पना माहितदेखील नसतात. मग चारचौघांत बोलताना किंवा मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देताना फजिती होते. अशा लोकांसाठी अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेत आणि कागदी खेळांच्या साह्याने अनेक नव्या संकल्पना समजावून सांगणारे खास व्हिडीओ ‘कॉमन क्राफ्ट’ या साईटवर उपलब्ध आहेत. पर्यावरण, बँकिंग, समाजव्यवस्था आणि टेक्नॉलॉजी या विषयांतील विविध संकल्पना अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. सोशल मीडिया म्हणजे काय, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातो, सीएफएल आणि साध्या बल्बमध्ये नेमका काय फरक आहे, असे व्हिडीओज या साईटवर उपलब्ध आहेत. व्यावसायिक वापरासाठी या साईटवरील व्हिडीओ खरेदी करावे लागतात.


सिएटलमधील आपल्या छोट्याशा घरात बसून साची आणि ली हे जोडपे ही साईट चालवतात. साची आणि ली यांनी गुगल, लिंक्डइन, फोर्ड आदी कंपन्यांसाठीही खास व्हिडीओ तयार केले आहेत. 'कॉमन क्राफ्ट'वरील विविध व्हिडीओज अॅमेझॉनच्या किंडल ई-बुक रीडरवरदेखील उपलब्ध आहेत.
Read the full story

,

िवझो ः एक स्पेशल पर्पज ब्राऊजर

June 17, 2009 0 comments

सर्वसामान्य इंटरनेट युजरला इंटरनेट एक्स्प्लोअररपलीकडे कुठले ब्राऊजर असते, याची कल्पनाच नसते. e असं लिहिलेल्या आयकॉनवर क्लिक केलं की इंटरनेट सुरू होतं, अशी अनेकांची समजूत असते. पण या ब्राऊजरच्या विश्वात प्रचंड मारामारी सुरू असते, याची कल्पना तुम्हाला असेलंच. या ब्राऊजरचा प्रवास मात्र अतिशय रंजक आहे. आज इंटरनेट एक्प्लोअरर पाठोपाठ फायरफॉक्स, सफारी, अॉपेरा, क्रोमसारखे ब्राऊजर्सही वापरले जातात. पण यापुढे जाऊन केवळ सोशल नेटवर्किंगसाठी तयार केलेले फ्लॉकसारखे ब्राऊजर्सही ठराविक लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. आज आपण अशाच एका ‘स्पेशल पर्पज ब्राऊजर’ची माहिती घेणार आहोत.

ब्रिटनमधील 'रॅडिकल सॉफ्ट' या कंपनीने मोझिला फायरफॉक्सचाच आधार घेत 'विझो' हे स्पेशल पर्पज ब्राऊजर विकसित केले. हळू-हळू विकसित होत या ब्राऊजरचे अॅडव्हान्स्ड व्हर्जन (विझो ३) आता उपलब्ध झाले आहे. या ब्राऊजरमध्ये असणारी सर्व वैशिष्ट्ये फायरफॉक्समध्ये आहेतच; असं प्रथमदर्शनी तुम्हाला वाटू शकतं. एका अर्थाने ते खरंही आहे; पण या ब्राऊजरची उद्दिष्टं वेगळी आहेत. फास्टर डाऊनलोड्स आणि स्मार्टर ब्राऊजिंगसाठी तयार केलेले ब्राऊजर, अशी विझोची प्रतिमा तयार करण्यात आली आहे.



एखादी फाईल डाऊनलोड करताना मूळ सर्व्हरशी मल्टिपल कनेक्शन्स एस्टॅब्लिश करून विझो डाऊनलोडचा स्पीड १० पटीने वाढवते. यामुळे डाऊनलोडिंगमध्ये जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. या ब्राऊजरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इनबिल्ट टोरेंट डाऊनलोडर. (साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांनी ‘टोरेन्ट्स’ या विषयावर लिहिण्याची मागणी केली होती; पण या विषयावर लिहिणे अजून झाले नाही. याविषयी एक सविस्तर पोस्ट नक्की लिहीन.) तुम्ही टोरेंट क्लाएंट वापरून मोठ्या फाईल्स (सॉफ्टवेअर्स, मूव्हीज) डाऊनलोड करत असाल तर आता वेगळा टोरेंट क्लाएंट वापरायची अजिबात गरज नाही. विझोतून तुम्ही थेट टोरेंट फाईल्स डाऊनलोड करू शकता. याकरता फायर टोरेंट हा क्लाएंट या ब्राऊजरमध्येच समाविष्ट केलेला आहे. याव्यतिरिक्त फायरफॉक्ससाठी उपलब्ध असणारे अनेक लोकप्रिय अॅड-अॉन्स किंवा एक्स्टेंशन्स यात अगोदरच समाविष्ट करण्यात अाले आहेत.

सुरवातीला केवळ विंडोज अॉपरेटिंग सिस्टिमसाठी उपलब्ध असणारे हे ब्राऊजर आता मॅकिन्तोषसाठीही उपलब्ध झाले आहे. याची लिनक्स आवृत्तीही लवकरच येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या उपलब्ध असलेली विझोची आवृत्ती खरोखर देखणी आहे. क्रोमच्या धर्तीवर यातील फीचर्सची पुनर्रचना करण्यात आल्याने हा ब्राऊजर एक वेगळाच आनंद देऊन जातो. विझो डाऊनलोड करा, वापरा आणि तुमच्या प्रतिक्रियाही अवश्य द्या.
Read the full story

, , , ,

इसको लगा डाला, तो लाईफ ‘जिंगा’लाला!

June 4, 2009 0 comments

एखाद्या आवडत्या साईटवरील विशिष्ट सेक्शन कॅप्चर करण्यासाठी तुम्ही काय करता? विंडोज वापरणारे प्रिंट स्क्रीन किंवा मॅकिन्तोष वापरणारे Command+Shift+3 वापर असतील. पण यातून हवा तो सेक्शन वेगळा काढण्यासाठी ‘इमेज एडिट’ करावी लागते. त्याऐवजी जे सेक्शन कॅप्चर करायचं आहे तेवढंच करा. यासाठी या क्षेत्रातील दिग्गज ‘टेकस्मिथ’ने एक फ्री स्क्रीन कॅप्चर सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ‘स्नॅग-इट’ आणि ‘कॅमटाशिया स्टुडियो’चे निर्माते असलेल्या ‘टेकस्मिथ’ने सर्वसामान्य ग्राहकांसाठी ‘जिंग’ हा नवा आणि मोफत पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
‘जिंग’च्या माध्यमातून तुम्ही स्टिल आणि व्हिडीओ अशा दोन्ही प्रकारांत स्क्रीन कॅप्चर करू शकता. हव्या त्या आकार स्क्रीनचे कॅप्चर घेणे किंवा स्क्रीनवरील अॅक्टिव्हिटीचे पाच मिनिटांपर्यंत रेकॉर्डिंग करणे याद्वारे शक्य होते. स्टिल स्क्रीन कॅप्चरसाठी वापरले जाणारे ‘स्नॅग-इट’ (५० डॉलर्स) आणि स्क्रीन रेकॉर्डिंसाठी वापरले जाणारे ‘कॅमटाशिया स्टुडिओ’ (२९९ डॉलर्स) ही दोन्ही सॉफ्टवेअर्स प्रोफेशनल गटात मोडतात. ‘जिंग’चेही प्रोफेशनल व्हर्जन (१५ डॉलर्स प्रतिवर्ष) उपलब्ध
आहे; पण मोफत व्हर्जनमध्ये सर्वसामान्य ग्राहकाच्या सर्व गरजा भागू शकतात.

‘जिंग’ विंडोज (एक्सपी, व्हिस्टा) आणि मॅकिन्तोषसाठी उपलब्ध आहे. साधारण आठ एमबीचे हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एका कोपऱ्यात ‘जिंग’चा सूर्य (Sun) तळपू लागतो. त्यावर कर्सर नेल्यास कॅप्चर, हिस्ट्री आणि मोअर असे अॉप्शन्स दिसतात. नवीन स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर कॅप्चर म्हणून हवा तेवढा स्क्रीन एरिया सिलेक्ट करा व ‘कॅप्चर अॅन इमेज’ किंवा ‘कॅप्चर ए व्हिडीओ’वर क्लिक करा. कॅप्चर झालेली इमेज (यावर टेक्स्ट आणि बॉक्सेसही अॅड करता येतात) किंवा व्हिडीओ तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर स्टोअर करून ठेऊ शकता किंवा ‘स्क्रीनकास्ट डॉट कॉम’वर थेट अपलोड करू शकता. ‘स्क्रीनकास्ट डॉट कॉम’ ही ‘टेकस्मिथ’चीच आणखी एक सेवा. ‘जिंग’ वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमचे अकाऊंट अोपन करावे लागते. याच अकाऊंटचा वापर करून तुम्ही ‘स्क्रीनकास्ट’वर दोन जीबी पर्यंतचा डाटा स्टोअर करून ठेऊ शकता. हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत कॅप्चर केलेल्या इमेजेस आणि व्हिडीओ दिसतात. मोअरमध्ये जाऊन तुम्ही ‘जिंग’च्या सेटिंग्ज बदलू शकता. उदा. कॉम्प्युटर स्टार्ट केल्यानंतर ‘जिंग’ अॅक्टिव्हेट व्हायला हवे की नको वगैरे सेटिंग्ज इथून बदलता येतात. ‘जिंग’च्या मोफत व्हर्जनमध्ये व्हिडीओ केवळ फ्लॅश फॉरमॅटमध्ये (swf) सेव्ह करता येतात; प्रोफेशनल व्हर्जनमध्ये ते mpeg4 फॉरमॅटमध्येही सेव्ह करता येऊ शकतात - एवढाच काय तो फरक! ट्युटोरियल, प्रेझेंटेशन वगैरे तयार करण्यासाठी या सेवेचा मोठा उपयोग होतो.

See How Jing Works
See a Video Capture
Read the full story

, , ,

इंटेलिजंट बिझनेससाठी...

June 3, 2009 4 comments

डेंटिस्टपासून ते मोबाईल स्टोअर शोधण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी ‘गुगल’ वापरणे आजकाल सोयीचे जाते. या अशा साऱ्या गोष्टी असतात यलो पेजेसमध्ये मिळतात; पण तुमच्या-माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं अशी जाडजूड यलो पेजेस डिरेक्टरी बाळगत नाहीत. एखादं चांगलं चायनीज रेस्टॉरंट शोधण्यासाठी आपण मोबाईलचा पर्याय अधिक पसंत करू. तुमच्या मोबाईलवर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही गुगल लोकलच्या आधारे सर्च करू शकता. यासाठी गुगलने ठिकठिकाणच्या आघाडीच्या यलो पेजेस कंपन्यांशी अगोदरंच टाय-अप्स केले आहेत. पण गल्लीतला पानवाला, इस्त्रीवाला, किरकोळ किराणा दुकानदार, हेअर कटिंग सलून, गॅरेजेस, पंक्चर काढून देणारे आदींची माहिती या ‘यलो पेजेस’मध्येदेखील नसते. अशा प्रकारच्या कोणत्याही व्यावसायिकास आपला व्यवसाय गुगल लोकल आणि गुगल मॅप्सवर आणण्याची सुविधा गुगलने लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून अगोदरंच उपलब्ध करून दिली आहे. आता अशा व्यावसायिकांसाठी गुगलने अॅनालिटिक्ससारखी नवी सेवाही देऊ केली आहे.
लोकल बिझनेस सेंटरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दुकानाची किंवा सेवेची माहिती देऊन (उदा. Anil Fruit Shop, Kumar Parisar Society, Kothrud, Pune) तुमचा व्यवसाय गुगल लोकल वर लिस्ट करू शकता. यानंतर संबंधित शहरातील किंवा प्रभागातील व्यक्तीने त्या अनुषंगाने सर्च केल्यास (Fruit Shop Kothrud) त्याला रिझल्टपेजवर तेथील व्यावसायिकांची माहिती व नकाशावर त्यांचे ठिकाण दिसेल. तुम्ही मोबाईलवरून सर्च करत असाल तर रिझल्टमध्ये डिस्प्ले झालेल्या टेलिफोन किंवा मोबाईल नंबरवर तुम्हाला थेट कॉलही करता येतो. तुम्हाला काही अॉफर्स द्यायच्या असतील तर त्याही यातून देता येतात. येणारे ग्राहक तुमच्या सेवेबद्दल त्यांच्या प्रतिक्रियाही येथे देऊ शकतात. या माध्यमातून सर्च करून हवे ते दुकान किंवा सेवा शोधणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढतंच जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही तुमचा व्यवसाय किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा व्यवसाय (उदा. तुमचे फॅमिली डॉक्टर, तुमचा किराणा दुकानदार, ठरलेला पाणीपुरीवाला वगैरे) गुगल लोकलवर लिस्ट करू शकता.


या सेवेत गुगलने नुकतेच अॅनालिसिस डॅशबोर्डही अॅड केले आहे. याचा मुख्य फायदा असा की कोणत्या कीवर्डसाठी किती लोक तुमच्या लिस्टिंगवर आले, कुठून आले याची थेट माहिती तुम्हाला मिळू शकते. म्हणजे फ्रुट शॉपसाठी लोकांनी Fresh Fruits, Fruits, Vegetable and Fruits, Apple, Alphonso, Mangoes यापैकी कोणत्या कीवर्डने सर्च केले हेही तुम्हाला समजू शकते. यावरून तुम्हाला एखाद्या वस्तूच्या मागणीचा अंदाजही येऊ शकतो. म्हणजे एखादे महागडे फळ तुमच्या दुकानात नसेल आणि त्या फळाच्या नावाने सर्वाधिक सर्च होतोय, असे लक्षात आले तर तुम्ही ते फळ तुमच्या दुकानात ठेऊन चांगला व्यवसाय करू शकता. याचप्रमाणे लोक कोणत्या भागातून तुमच्या दुकानात येतात, हेही या डॅशबोर्डवरून कळू शकते. ज्या भागातून सर्वात जास्त लोक येतात त्या भागात एखादी शाखा सुरू करण्यास हरकत नाही, असा अंदाजही तुम्ही लावू शकता. स्थानिक व्यावसायिकांसाठी गुगलची ही सेवा नक्कीच उपयोगाची ठरणार आहे. या गटात मोडणाऱ्या किती लोकांकडे इंटरनेट असेल याबद्दल शंका असली तरी तुम्ही-आम्ही आपल्या जवळच्या लोकांना ही सेवा वापरून पाहण्याचा सल्ला देऊन मार्गदर्शन नक्कीच करू शकतो!

(माझाच अनुभव सांगतो. मागे एकदा डेंटल क्लिनिंगसाठी मी माझ्याच एरियातील डेंटिस्ट्स शोधत होतो. सर्चमध्ये त्या एरियातील पाच-सहा डेंटिस्ट्स सापडले. त्यापैकी दोन-तीन जणांकडे मी जाऊन आलो. पण त्यातील दोन बंद होते आणि एक डॉक्टर क्लिनिंग करत नव्हते. फिरता-फिरता मला आणखी एक डेंटिस्ट सापडले. मी त्यांच्याकडे गेलो. क्लिनिंग झाल्यानंतर मी डॉक्टरांना म्हणालो की, डॉक्टर, तुमच्या शेजारच्या तीन-चार डॉक्टरांची नावं गुगल सर्चमध्ये येतात; पण तुमचं नाव त्यात नाहीये. त्यांना याचा काही गंध नव्हता. पण त्यांच्या डेस्कवर लॅपटॉप होता. नशीबाने इंटरनेटही होते. मी त्यांचे क्लिनिक गुगल लोकलवर लिस्ट केले. डॉक्टर खूश झाले. त्यांनी माझ्याकडून शंभर रुपये कमी घेतले आणि पुढच्या दिवाळीला ग्रिटींगही पाठवले!)

आणखी एकः
मित्रांनो, २७ मे रोजी साधी-सोपी टेक्नॉलॉजीला एक वर्ष पूर्ण झाले. जानेवारीपर्यंत जोमाने लिहिल्यानंतर थोडासा ब्रेक हवा होता. त्यामुळे ‘गुगल लॅटिट््यूड’ या शेवटच्या पोस्टनंतर लिखाण केले नाही. पण ब्लॉगला रोज भेट देणाऱ्यांची संख्या उत्साहवर्धक होती. त्यानंतरच्या चार महिन्यांत दरमहा हजारभर हिट्स ब्लॉगला मिळत होत्या. आजपासून पुन्हा एकदा नव्याने लिखाण करण्याचा विचार आहे.
तुमच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत...
Read the full story