प्रोफेशनल ‘अॉनलाईन’ फोटो-एडिटर...

October 9, 2008 0 comments

मध्यंतरी माझा एक मित्र मला सांगत होता की त्याने गेल्या दीड-दोन महिन्यांत मायक्रोसॉफ्ट अॉफिसपेक्षा गुगल डॉक्सचाच अधिक वापर केला आहे. डेस्कटॉप अॅप्लीकेशन्सपेक्षा वेब अॅप्लीकेशन्स अधिक लवचिक असतात. त्यात शेअरिंगसारख्या सुविधा मिळतात. त्यामुळे आजकाल अनेक जण विविध वेब अॅप्लीकेशन्स वापरताना आढळून येतात. मागे मी मोबाईल वॉलपेपर आणि प्रोफाईल पिक्चर तयार करण्यासाठी दोन वेब अॅप्लीकेशन्सची माहिती दिली होती. त्याचा वापर केल्यानंतर तुम्हालाही वेब अॅप्लीकेशन्सचे महत्त्व पटले असेल. आज मी अॉनलाईन फोटो एडिटिंगच्या काही वेब अॅप्लीकेशन्सची माहिती देणार आहे.

अनेकवेळा आपल्याला फोटो एडिट करण्याची गरज भासते. पण आपण प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा ग्राफिक डिझायनर नसल्यामुळे त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअर (उदा. फोटोशॉप) आपल्याकडे नसते. असले तरी त्याचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती नसते. अशावेळी आपण अॉनलाईन फोटो एडिटिंग अॅप्लीकेशन्स वापरू शकतो. विशेष म्हणजे पुढे दिलेली सर्व अॅप्लीकेशन्स मोफत वापरता येतात.

पिक्सलरः
फोटोशॉपसारखाच युजर इंटरफेस असणारे हे फ्लॅश वेब अॅप्लीकेशन आहे. बहुतांश टूल्स फोटोशॉपमधील टूल्सप्रमाणेच आहेत. त्यामुळे फोटोशॉपची बेसिक माहिती असल्यास वापरण्यात अत्यंत सोपे.


स्प्लॅशअपः हे देखील फ्लॅश वेब अॅप्लीकेशन आहे. यातून तुम्ही फेसबुक, फ्लिकर, पिकासा, किंवा तुमच्या वैयक्तिक वेबसाईटवरील इमेजेस थेट एडिट करू शकता. याचा इंटरफेसही फोटोशॉपशी मिळता-जुळता आहे.


फिनिक्सः अॅव्हिअॅरी कंपनीने लॉंच केलेल्या या वेब-बेस्ड इमेज एडिटरमध्ये इतरांपेक्षा अधिक फीचर्स आहेत. अॅव्हिअरीचीच पिकॉक, रॅव्हन आणि टोकन ही तीन इतर अॅप्लीकेशन्स वापरून अगदी प्रोफेशनल क्वालिटी इमेज एडिटिंग करणे शक्य होते.


पिक्सरः
क्रॉप, रिसाईझ, फ्लिप, रोटेट आणि इफेक्ट्स एवढी मोजकी फीचर्स हवी असतील तर तुम्ही पिक्सर वापरू शकता. इमेज क्रॉपिंग आणि रिसायजिंगसाठी हे अॅप्लीकेशन सर्वोत्तम आहे.

72फोटोजः अॉनलाईन एडिट करून अॉनलाईन स्टोअर करण्यासाठी ही उत्तम सेवा आहे.

आणखी काही फोटो एडिटिंग वेब अॅप्लीकेशन्सः
फोटो फ्लेक्सर
सुमोपेंट
पिकमॅजिक
पिकनिक

Thanks Jacob
Read the full story

, ,

अनोळखी मोबाईल नंबर कसा लोकेट कराल?

October 7, 2008 2 comments

सकाळी-सकाळी कुठूनतरी कॉल आल्याने शैलेशची झोपमोड झाली. पुन्हा झोप लागते न लागते तो पुन्हा एकदा कॉल. उचलेपर्यंत कट झाल्याने शैलेशने त्या अनोळखी मोबाईल नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने रिस्पॉन्स न दिल्याने त्याला काही कळेना. अशा सिच्युएशनमध्ये आपण बऱ्याचवेळा सापडतो. अनोळखी नंबर. कोण असेल? कुठून फोन केला असेल? कशासाठी फोन केला असेल? आपला फोन का उचलला नसेल? अशा अनेक शंका उपस्थित होतात. तो नंबर कुठला आहे, हे कळाले तरी आपण किमान एका दिशेने विचार करू शकतो. पण तसा कोणताच क्लू न मिळाल्याने अस्वस्थता आणखीच वाढत जाते. शैलेशकडे मात्र त्यावर एक उपाय होता.

मोबाईल नंबर लोकेटर हे छोटेसे अॅप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करून भारतातील कोणताही मोबाईल नंबरचा ट्रेस तुम्ही लावू शकता. उदा. तुम्हाला ९००४५xxxxx या नंबरवरून फोन आला आणि कट झाला किंवा त्यावरून एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते आहे. सदर नंबर कोणत्या कंपनीचा आणि कोणत्या महानगरातील किंवा राज्यातील आहे, हे तुम्हाला मोबाईल नंबर लोकेटरच्या आधारे शोधून काढता येईल. तुमचा फोन जावा टेक्नॉलॉजीला सपोर्ट करत असेल तर याचे अॅप्लीकेशन तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. अन्यथा www.internet4mobile.com या साईटवरूनही तुम्ही नंबर लोकेट करू शकता. आलेल्या नंबरमधील पहिले चार डिजिट्स एंटर करताच तुम्हाला पुढील माहिती मिळेल:
Mobile Code : 9004
State : Maharashtra
City : Mumbai
Service Provider : Airtel [ GSM ]



सदर नंबर कुणाचा आहे, हे शोधून काढण्यासाठी मात्र संबंधित मोबाईल कंपनीचाच आधार घ्यावा लागेल. ज्यांचे मोबाईल हॅंडसेट्स कम्पॅटिबल नसतील ते लोक थेट साईटवरून मोबाईल नंबर लोकेट करू शकतात. याचप्रमाणे लॅंडलाईनवरून आलेला अनोळखी नंबर शोधून काढण्यासाठी याच साईटवर एसटीडी कोड फाईंडरही उपलब्ध आहे.
Read the full story

गो ग्रीनः यूज अॉनलाईन व्हाईटबोर्ड

October 6, 2008 1 comments

बोर्डरूम मिटिंग्ज म्हणजे काही वेळा अत्यंत सिरीयस तर काही वेळेला मजेशीर अशा असतात. कंपनीच्या स्वभावानुसार बोर्डरूम मिटिंग्जचे स्वरूप बदलते. आयटी कंपन्यांतील मिटिंग रूम्स आणि एखाद्या केमिकल फॅक्टरीतील मिटिंग रूम यांच्यात प्रचंड मोठे अंतर असते. पण मिटिंग रूम म्हटलं की दोन गोष्टी कॉमन असतात. एक म्हणजे प्रोजेक्टर आणि दुसरी म्हणजे व्हाईटबोर्ड. मिटिंगरूमसाठी मस्ट असणाऱ्या या दोन गोष्टी. पण ज्या कंपन्या आकाराने लहान असतात किंवा एखाद्या खोलीतून किंवा फ्लॅटमधून चालवल्या जातात त्यांना एवढी चैन परवडणारी नसते. अशा लोकांसाठी आज मी काही अॉनलाईन व्हाईटबोडर्ड्स संदभर्भात माहिती देणार आहे.
अॉनलाईन व्हाईटबोर्ड म्हटलं की प्लेन व्हाईटबोर्ड असं नाही. व्हाईटबोर्डची बेसिक फीचर्स या साईट्समध्ये आहेतच; परंतु अॉनलाईन कोलॅबरेशन टूल्स म्हणून या सेवांचे महत्त्व अधिक आहे. कल्पना करा की तुम्ही मिटिंगमध्ये प्रेझेंटेशन देत आहात. तुमच्या बॉसने त्यातील एका मुद्द्यावर काही शंका उपस्थिक केल्या आहेत. आता त्याचे स्पष्टीकरण देताना तुम्हाला व्हाईटबोर्डचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी प्रेझेंटेशन क्लोज करणार. त्यानंतर लाईट्स अॉन करणार. मग व्हाईटबोर्डकडे जाणार. मार्कर्स शोधणार आणि मग स्पष्टीकरणे देण्यास सुरवात करणार. त्यानंतर पुन्हा लाईट्स अॉफ करून जागेवर येणार व प्रेझेंटेशन पुढे सुरू करणार. या सगळ्या स्टेप्स एका प्रेझेंटेशनदरम्यान चार-पाच वेळा कराव्या लागल्या तर?



हे टाळण्यासाठी तुम्ही अॉनलाईन व्हाईटबोडर्ड्स आणि कोलॅबरेशन टूल्सचा वापर करू शकता. या सेवा अॉनलाईन असल्याने तुम्ही संबंधित साईटवर जाऊन थेट व्हाईटबोर्डचा वापर करू शकता. व्हाईटबोर्ड वापरण्यासाठी आवश्यक ती सर्व टूल्स (पेन, ब्रश, इरेझर, शेप्स, टेक्स्ट इ.) उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला काहीही ड्रॉ करता येते. थोडक्यात सर्वसाधारण व्हाईटबोर्डसारखा या व्हाईटबोर्डचा वापर करता येतो आणि त्यासाठी सतत उठबसही करावी लागत नाही. तुम्ही प्रेझेंटेशन स्विच करून अॉनलाईन व्हाईटबोर्ड प्रोजेक्ट करू शकता. याचा आणखी एक फायदा म्हणजे या तुम्ही तुमचा व्हाईटबोर्ड इतरांशी शेअर करून अॉनलाईन मिटींग घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही इतर ठिकाणी बसलेल्या तुमच्या सहकाऱ्यांना अॅड करून व्हॉईस कॉन्फरन्सही करू शकता. त्याचवेळी व्हाईटबोर्डचा वापर करणेही शक्य होते आणि फाईल्सही ट्रान्स्फर करता येतात.
खालीलपैकी कोणतीही सेवा तुम्ही ट्राय करून पाहू शकताः

डॅबलबोर्ड

ट्विडला
बुक्गू
स्क्रिबलिंक
स्टिक्सी

यातील बहुतांश सेवांची प्रीमियम व्हर्जन्स पेड स्वरूपात उपलब्ध आहेत.
साधी-सोपी टेक्नॉलॉजी सजेस्ट्सः ट्विडला
Read the full story

, ,

हवे ते म्युझिक करा चुटकीसरशी रेकॉर्ड!

October 3, 2008 3 comments

Web 18 च्या In.com या नव्या पोर्टलच्या जाहिराती तुम्ही सध्या पाहत असाल. टेलिव्हिजन आणि अॉनलाईन मीडियातून या पोर्टलचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अॉडिओ, व्हिडीओ, गेम्स, मेल, न्यूज, सर्च अशा सर्व गोष्टी एका ठिकाणी आणून अधिकाधिक लोकांच्या जवळ जाण्याचा In.com चा प्रयत्न दिसतोय. असो. ही साईट एक्स्प्लोअर करताना मला आजच्या पोस्टचा विषय सुचला. तो म्हणजे स्ट्रिमिंग रेकॉर्डरचा - अथर्थात अॉनलाईन प्ले होणारे गाणे रेकॉर्ड करून एमपीथ्री किंवा इतर फॉरमॅटमध्ये सेव्ह करणारी सेवा (किंवा अॅप्लीकेशन).

यापूवर्वीच्या एका पोस्टमध्येमी गाणी डाऊनलोड न करता अॉनलाईन एेकण्याबद्दल (वाचा - नवे धोरणः एेका आणि विसरा) माहिती दिली होती. काही वेळा एखादे गाणे आपल्याला डाऊनलोड करून हवे असते किंवा त्याचा दुसरीकडे कुठेतरी वापर करावयाचा असतो. त्यासाठी संबंधित गाण्याची एमपीथ्री फाईल आपल्याजवळ असावी लागते. काही वेळा एखाद्या व्हिडिओमधील विशिष्ट म्युझिक पीस आपल्याला हवा असतो आणि तो व्हिडिओ डाऊनलोडेबल नसतो. अशा वेळी अॉनलाईन प्ले होणारा कोणताही आवाज रेकॉर्ड करणाऱ्या दोन सेवा आपण वापरू शकतो.

फ्रीकॉर्डर टूलबारः



याहू किंवा गुगल टूलबारप्रमाणे फ्रीकॉर्डर टूलबार फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. फ्रीकॉर्डर टूलबार विंडोजच्या सर्व व्हर्जन्सवर (व्हिस्टासह) इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि फायरफॉक्स या ब्राऊजरमध्ये वापरता येऊ शकतो. साऊंडकार्डच्या साह्याने फ्रीकॉर्डर स्ट्रिमिंग साऊंड्स रेकॉर्ड करण्याचे काम करतो. मायक्रोफोन आणि लाईन-इन इनपुट वापरूनही रेकॉर्ड करणे शक्य आहे. फ्रीकॉर्डर टूलबार इन्स्टॉल केल्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन रेकॉर्डिंग सोर्स सिलेक्ट करा.



या ठिकाणी Record From Freecorder Audio Driver हा अॉप्शन डिफॉल्ट सेट केलेला असेल. हा अॉप्शन वापरून तुमच्या स्पीकरमधून येणारा कोणताही आवाज तुम्ही रेकॉर्ड करू शकता. इतर सोर्स वापरायचे असल्यास हा अॉप्शन डिसिलेक्ट करून इतर दोन अॉप्शन्सपैकी एक सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अाऊटपूट फॉरमॅट (एमपीथ्री किंवा डब्लूएव्ही) आणि डेस्टिनेशन आदी अॉप्शन्स निवडा. आता तुम्ही एखादे गाणे स्ट्रीम करून रेकॉर्डवर क्लिक करा. साऊंड म्यूट करूनही तुम्ही गाणे रेकॉर्ड करू शकता. स्टॉप म्हटल्यावर निवडलेल्या फॉरमॅटमध्ये फाईल सेव्ह होईल.

फ्रीकॉर्डर टूलबार डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डरः




ब्राऊजरबेस्ड रेकॉर्डर नको असल्यास किंवा ब्राऊजरमध्ये टूलबार्सची गदर्दी नको असल्यास तुम्ही डेस्कटॉप अॅप्लीकेशन वापरू शकता. स्ट्रिमिंग साऊंड्स रेकॉर्ड करण्यासाठी एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डरचा वापर करता येतो. तथापि, गाणे रेकॉर्ड करताना साऊंड म्यूट करता येत नाही. स्ट्रिमिंग साऊंड रेकॉर्ड करण्यापूर्वी सोर्स सेटिंग्जमध्ये जाऊन स्टिरिओ मिक्स हा अॉप्शन सिलेक्ट करा. रेकॉर्डिंग संपल्यावर स्टॉपवर क्लिक करा. आता तुम्ही रेकॉर्डेड साऊंड एमपीथ्री किंवा डब्लूएव्ही फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकता.

एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

स्पीडी ‘डिफ्रॅगलर’

October 2, 2008 0 comments


कॉम्प्युटर जरा स्लो वाटायला लागला की आपण डिस्क डिफ्रॅगमेंट करायला घेतो. हार्डडिस्कवर वेगवेगळ्या पार्टिशन्सवर असंख्य फाईल्स सतत स्टोअर केल्या जात असतात, अॅक्सेस केल्या जात असतात किंवा डिलीट केल्या जात असतात. कॉम्प्युटरच्या भाषेत शेकडो फाईल्स ठराविक हार्डडिस्कवरील ठराविक जागा व्यापून बसेलेल्या असतात. यातील काही फाईल्स डिलीट झाल्या तर त्यांची जागा भरण्यासाठी कॉम्प्युटर दिलेल्या सूचनांनुसार काम करत असतो. पण काही वेळा त्यात अडचणी आल्या तर ती जागा रिकामी राहते. अशा अनेक जागा रिकाम्या राहिल्या तर हार्डडिस्कची इफेक्टिव्ह मेमरी कमी होते. अशावेळी या सगळ्या जागा मोकळ्या कराव्या लागतात. त्यास डिफ्रॅगमेंटेशन म्हणतात. कॉम्प्युटरमध्ये डिस्क डिफ्रॅगमेंटेशनची सोय असते. पण डिस्क डिफ्रॅगमेंट होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. एखादे फोल्डर किंवा फाईल डिफ्रॅगमेंट करायची असेल तर?

फाईल किंवा फोल्डर डिफ्रॅगमेंटेशनची गरज ओळखून पिरिफॉर्म या कंपनीने (सीसीक्लीनरचे निमर्माते) डिफ्रॅगलर हे अॅप्लीकेशन तयार केले. डिफ्रॅगलर विंडोज अॉपरेटिंग सिस्टिमवर (व्हिस्टापर्यंतच्या सर्व व्हर्जन्सवर) रन होते. डिफ्रॅगलरचा वापर करून तुम्ही एखादे विशिष्ट फोल्डर किंवा फाईल काही सेकंदात डिफ्रॅगमेंट करू शकता. तुम्हाला संपूर्ण ड्राईव्ह डिफ्रॅगमेंट करायचा असेल तर ते देखील याद्वारे करणे शक्य आहे. डिफ्रॅगलर डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. अॅप्लीकेशन रन केल्यानंतर ड्राईव्ह सिलेक्ट करा. अॅनालाईझ केल्यानंतर त्या ड्राईव्हसंदर्भातील डिफ्रॅगमेंटेशनची माहिती दिसेल. आता तुम्ही थेट ड्राईव्ह डिफ्रॅगमेंट करू शकता किंवा त्यातील फाईल सिलेक्ट करून राईट-क्लिक करा. डिफ्रॅग म्हटल्यानंतर त्या फाईल्स डिफ्रॅगमेंट होतील.
डिफ्रॅगलर कसे वापरावे?



डिफ्रॅगलर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

पर्सनलाईज्ड रेडिओः स्टिचर

October 1, 2008 0 comments

काही वेळा बातम्या वाचण्याचा देखील कंटाळा येतो. मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर लहानशा फॉंटमध्ये वाचून डोळे दुखतात. अशा वेळी कोणी बातम्या एेकवल्या किंवा आपल्याला हव्या त्या विषयाची माहिती वाचून दाखवली तरी किती बरे होईल ना? तुम्ही म्हणाल, मग सरळ रेडिओ एेका. पण रेडिओवर आपल्याला चॉईस नसते. जो कार्यक्रम लागला असेल तो एेकावा लागतो. अशावेळी कोणी तुमच्या आवडी-निवडीप्रमाणे रेडिओवरील कार्यक्रम देऊ केले तर?

स्टिचर ही अशीच एक सेवा. स्टिचर म्हणजे पर्सनलाईज्ड इंटरनेट रेडिओ. सेलेब्रिटीज, अमेरिकन इलेक्शन कॅम्पेनिंग, लोकल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, टेक्नॉलॉजी आदी विविध विषयांवरील कार्यक्रम तुम्हाला स्टिचरच्या माध्यमातून एेकता येतात. हे कार्यक्रम तुम्ही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर एेकू शकता.


स्टिचरने अायफोनसाठी विशेष अॅप्लीकेशनही तयार केले आहे. स्टिचरवर तुम्ही केवळ काही सेकंदात रजिस्टर होऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हवा तो विषय निवडून एेकू शकता. स्टिचरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध स्रोतांमधून जमवलेली माहित प्रत्यक्षात वाचून रेकॉर्ड केली जाते. याचसारख्या इतर सेवांमध्ये कॉम्प्युटर जनरेटेड व्हॉईसचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात कृत्रिमपणा जाणवतो. स्टिचरवरील कार्यक्रम एेकावेसे वाटतात.

Stitcher company profile provided by TradeVibes

Read the full story