,

पाच मिनिटांत मोबाईल वॉलपेपर

July 8, 2008 Leave a Comment


चोवीस तास आपल्या सोबत असणारा आपला सखा म्हणजे आपला मोबाईल. याच्याशिवाय जगणं जवळपास अशक्यच आहे. मोबाईल जवळ नसला की आपण बेचैन होतो. अनेकांना याचा अनुभव आला असेल. अशा या मोबाईलला फ्रेश ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. कधी त्याला कव्हर घाल, कधी स्क्रीनसेव्हर चेंज कर आणि वॉलपेपर तर दररोज बदलण्याचा प्रयत्न करतो. एखादा आवडलेला वॉलपेपर आपल्या मोबाईलसाठी अॅडजस्ट करताना मात्र आपली तारांबळ उडते. अनेकदा तो डिस्टॉर्ट होतो. कारण तो तयार केलेला असतो डेस्कटॉपसाठी आणि आपण तो तसाच्या तसा मोबाईलसाठी वापरण्याचा प्रयत्न करतो. अशा लोकांसाठीच मोबोपिक ही अत्यंत साधी-सोपी सेवा निर्माण करण्यात आली आहे.


मोबोपिकचा वापर करून अगदी तीन स्टेप्समध्ये आपण आपल्या मोबाईलसाठी वॉलपेपर तयार करू शकतो. पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला हवे असलेले चित्र सिलेक्ट करा. त्यासाठी ते तुमच्या कॉम्प्युटरवर असले पाहिजे किंवा तुम्ही एखाद्या साईटवरील चित्राची लिंकही देऊ शकता. हे चित्र दोन एमबीहून अधिक साईझचे नसावे. चित्र अपलोड केल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या हॅंडसेटची कंपनी आणि मॉडेल नंबर सिलेक्ट करायचा. त्यानंतर संबंधित हॅंडसेटसाठीची वॉलपेपर साईझ आपोआप घेतली जाते. आता मोबोपिक इट असं म्हटलं की तुम्ही सदर वॉलपेपर थेट मोबाईलवर डाऊनलोड करू शकता (यासाठी एक लिंक दिली जाते) किंवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करून ब्लुटूथ अथवा डेटा केबलने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता.

वाचाः दररोज बदला प्रोफाईल पिक्चर

Related Posts :



2 comments »

  • अमोल केळकर said:  

    अमित साहेब !

    अतीशय चांगली माहिती/ सॉफ्ट्वेअर इथे देत आहात.

    या आपल्या उपक्रमाबद्दल धन्यवाद !!

    यु ट्युब मधील विडीओ डाऊनलोड करण्यासंबंधी माहिती तसेच ..flv फाईल windo media player मधे लावण्यासाठी कशी convert करावी यासंबंधी माहिती मिळाल्यास मी आपला आभारी राहीन

  • Amit Tekale said:  

    Dear Amol,
    Thanks for your compliments. You can download YouTube videos using ExtractTube. For more info please read this:
    http://sasotechnology.blogspot.com/2008/06/blog-post_951.html

    You can convert .flv files to .wmv using Zamzar. For more info please read this:
    http://sasotechnology.blogspot.com/2008/06/blog-post_14.html