,

नवे धोरणः एेका आणि विसरा

July 28, 2008 Leave a Comment

आजकालची गाणी काही कळतंच नाहीत साहेब. कोण गातंय, काय गातंय, कशाला गातंय हे गाणं संपेपर्यंत कळत नाही नाही. हातातली आणि तोंडाची कात्री तो एकाचवेळी चालवत तो सांगत होता. फिलिप्सच्या कुठल्यातरी भल्या मोठ्या (म्हणजे ७५० वॅट पीएमपीओ) म्युझिक सिस्टिमवर एफएम लावले होते. गाणं सुरू होतं, सध्याची हिट फिल्म जाने तू या जाने ना मधलं - पप्पू कान्ट डान्स साला. मी मानेनेच त्याच्या भावनांना प्रतिसाद देत होतो. एका अर्थाने त्याच्या बोलण्यात तथ्य होतं. पप्पू कान्ट डान्स साला हे गाणं आज हिट असलं तरी दोन महिन्यांनंतर असं गाणं होतं, हे कुणाच्या लक्षातही राहणार नाही. अशा वेळी त्याच्या सीडीज घेणं तर दूरंच, ते डाऊनलोड करून मौल्यवान मेमरी तरी आपण वाया का घालावी? अशा वेळी यूज अॅंड थ्रोचा फंडा वापरावा. एेका आणि विसरून जा. त्यासाठी उपयुक्त ठरतात म्युझिक सर्च इंजिन्स.

संपूर्ण भारतीय ‘बनावटी’चे (?) सर्च इंजिन गुरूजी डॉट कॉमने सध्या म्युझिक सर्चवर आपला भर दिला आहे. म्युझिक सर्च हा नवा प्रकार नसला तरी, वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या याची अधिक गरज आहे. म्युझिक सर्च इंजिनची खासियत म्हणजे, बहुतांश सर्व जण सर्च रिझल्ट्समधूनच गाणं एेकण्याची सुविधा देतात. त्यामुळे ते डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही. आपण शक्यतो मोफत गाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे या पोस्टमध्ये अशांच सेवांबद्दल माहिती देणार आहे. इंग्लिश गाण्यांच्या फॅन्ससाठी शेकडो पेड आणि फ्री सेवा उपलब्ध आहेत, पण हिंदी गाणी सहसा मिळत नाहीत. पुढे दिलेल्या सेवा वापरून नव्या-जुन्या हिंदी गाण्यांचाही आनंद घेता येईल. तुम्ही ब्रॉडबॅंड वापरत असाल तर बफरही लवकर होईल व पूर्ण गाणं स्पष्ट एेकता येईल.

गुरूजीः भारतीय संगीत शोधण्यासाठी गुरूजी अत्यंत उपयुक्त ठरते. अल्बम, चित्रपट, गायक कलाकार, संगीतकार, गीतकार, नायक, नायिका आदी कोणत्याही प्रकारच्या कीवर्डने तुम्ही गाणी शोधू शकता. सर्च रिझल्ट्स डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही गाणी थेट एेकू शकता. तेथेच माय फेव्हरेट्स सेक्शन आहे. पुन्हा एेकायचे झाल्यास माय फेव्हरेट्समध्ये अॅड करू शकता. गाणं प्ले केल्यानंतर ते एका पॉप-अपमध्ये उघडते. ही एक बाब सोडली तर बाकी सेवा उत्तम आहे.


फुलकीः बॉलीवूडमधील कोणतीही गाणी शोधण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे फुलकी. यावरदेखील अल्बम, चित्रपट, गायक कलाकार, संगीतकार, गीतकार, नायक, नायिका आदी कोणत्याही प्रकारच्या कीवर्डने तुम्ही गाणी शोधू शकता. सर्च रिझल्ट्सच्या डाव्या बाजूस फुलकी प्लेअर आहे. Add To Player म्हणून तुम्ही गाणी प्लेअरमधून एेकू शकता. यावरून गाणी डाऊनलोड करणेही शक्य होते.


सॉंगझाः फ्लॅश आणि अजॅक्सचा उत्तम वापर केल्यामुळे ही साईट लुक्स आणि परफॉरमन्समध्ये इतरांपेक्षा कित्येक पटींनी सरस आहे. अॅपलचे सहसंस्थापक जेफ रस्किन यांचा २४ वर्षीय मुलगा अझा आणि त्याचा मित्र स्कॉट रॉबिन यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये ही साईट लॉंच केली. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली ही साईट बॉलीवूडमधील सर्चसाठीही चांगली आहे.


आणखी काही उल्लेखनीय प्लेयेबल म्युझिक सर्च इंजिन्सः
सीकपॉड
मिक्स टर्टल
व्ह्यूझी (वाचाः सर्च विथ ‘एक्स्पीरियंस’)

Related Posts :2 comments »

  • रुचिरा said:  

    wow Amit..mala hey search engines mahit ch navhate..aata new songs search karayla kahi wel lagnar nahi..

    thanks

  • Amit Tekale said:  

    Hey Ruchira,
    Thanks for your kind words. Keep reading.