,

मस्ट हॅव!

June 14, 2008 Leave a Comment

तुम्ही जर विंडोज अॉपरेटिंग सिस्टीम (९८ आणि त्यापुढील) वापरत असाल तर खालील तीन अॅप्लीकेशन्स तुमच्यासाठी मस्ट आहेत.

ट्वीक यूआयः विंडोजचा तोच-तो लूक पाहून तुम्ही कंटाळला असाल, तर ट्वीक यूआय इन्स्टॉल करा. ट्वीक यूआयच्या माध्यमातून तुम्ही विंडोजमधील अनेक हिडन टूल्स वापरू शकाल. विंडोजचे लूक अॅंड फील बदलण्यासाठी याचा फायदा होईल.
ट्वीक यूआय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मदरबोर्ड मॉनिटरः डेस्कटॉप किंवा लॅपटॉपचा मदरबोर्ड म्हणजे त्याचे जीवन. त्यामुळे मदरबोर्डची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तो जास्त तापू नये म्हणून फॅन दिलेला असतो, तरीही भारतात अनेक लोक एअरकंडिशन्ड वातावरणात डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरत नसल्याने त्यावर ताण येतो. आपला मदरबोर्ड किती तापला आहे, प्रोसेसरची कंडिशन काय आहे, फॅन कसा आहे वगैरे गोष्टींची माहिती घेण्यासाठी मदरबोर्ड मॉनिटर अत्यंत उपयुक्त ठरते. ज्यांनी पीसी असेंबल करून घेतला असेल, त्यांच्यासाठी हे अॅप्लीकेशन अत्यावश्यक आहेत.
मदरबोर्ड मॉनिटर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सीसीक्लीनरः आजकाल आपण सतत इंटरनेटवरून काहीतरी डाऊनलोड करत असतो. वेगवेगळे प्रोग्राम्स रन करण्यासाठी लागणारे शेकडो प्लग-इन्स आपोआप इन्स्टॉल होत असतात. विविध फाईल एक्स्टेन्शन्स टेम्पररी इंटरनेट फाईल्समध्ये साचून बसलेले असतात. पण केवळ बाऊजर कॅश डिलीट करून आपला पीसी साफ होतो, असं नाही. अनेक प्रोग्राम्समध्येही (उदा. अॅडोबचे सर्व प्रोग्राम्स) कॅश आणि अनयूज्ड फाईल्स असतात. हा सर्व कचरा साफ करून पीसीची प्रोसेसिंग स्पीड वाढविण्यासाठी सीसीक्लीनर आवश्यक आहे.
विंडोज एक्सपी आणि व्हिस्टासाठी सीसीक्लीनर येथून डाऊनलोड करा.

Related Posts :



3 comments »

  • Ravi Amale said:  

    सीसी क्लिनर मी वापरत आहे. मला त्याचा चांगलाच उपयोग होतोय.

  • sachin patil said:  

    आपण सांगितलेले cc cleaner मला आवडले.काही व्हायरस हे tempotary internet file मध्ये लपून असतात अस instruction virus infected असल्यावर काँम्पूटवर येतात.आपण दिलेल्या
    cc cleaner ला मी काँम्पूटवर download केले आहे.
    धन्यवाद
    प्रा.सचिन पाटील

  • Satish said:  

    yes ..ccleaner is good .. also I am using ebooster as suggested by you.

    After installing above softwares there is significant speed improvements in my pc.

    Thanks a ton for starting this blog.

    Satish