, ,

गणपती बाप्पा मोरया!

August 31, 2008 5 comments


जगभर विखुरलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणणारा गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. मायदेशापासून शेकडो मैल दूर असलेल्यांना गजाननाची आराधना करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ई-सकाळने मोरया हे नवे दालन काल सुरू केले आहे. गणपतीसंदभर्भात इत्थंभूत माहिती असलेल्या या दालनात गणपतीचे सुरेख वॉलपेपर्सही उपलब्ध आहेत. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांसाठी यातील निवडक वॉलपेपर्स अायफोन आणि आयपॉड टचच्या साईझमध्ये उपलब्ध करून देत आहेत. (सौजन्यः ई-सकाळ आणि किरण वेल्हाणकर)

गणपतीचे आयफोन वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
गणपतीचे डेस्कटॉप वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हेच वॉलपेपर्स इतर मोबाईलसाठी रिसाईझ करून वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी वाचाः पाच मिनिटांत मोबाईल वॉलपेपर

आयफोनसाठीचे इतर वॉलपेपर्स तुम्ही येथून किंवा येथून डाऊनलोड करू शकता.
Read the full story

,

िरपीट टेलिकास्ट

August 30, 2008 0 comments

As per our telecon, forwarding you the details of XYZ project. Please find the file attached.
किंवा
Nice to meet you this afternoon at your premises.
अशी अनेक वाक्ये आपल्याला जवळपास सर्वच मेलमध्ये रिपीट करावी लागतात. दरवेळी तीच वाक्ये लिहिण्याचा अक्षरशः कंटाळा येतो. पण सांगणार कुणाला? काही वेळा ड्राफ्ट करून अापण मार्केटिंग किंवा तत्सम कार्याशी संबंधित मेल्स पाठवू शकतो. पण ज्यात काही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात किंवा पर्सनलाईज्ड मेल्स पाठवावी लागतात अशा वेळी ड्राफ्ट मेल्स उपयोगास येत नाहीत. अॉनलाईन फॉर्म्स भरतानादेखील तीच-ती माहिती पुनःपुन्हा भरावी लागते.

अशा वेळी आपण टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर्सची मदत घेऊ शकतो. टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर्स विशिष्ट टेक्स्टसाठी कीवर्ड्स वापरण्याची सुविधा देतात. उदा. अॉफिसच्या पत्त्यासाठी तुम्ही Addr1 आणि घराच्या पत्त्यासाठी तुम्ही Addr2 असे कीवर्ड्स वापरू शकता. याचा उपयोग केवळ मेल पाठवतानाचा होत नाही तर कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये तुम्ही टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर वापरू शकता. सेल्स आणि मार्केटिंग प्रतिनिधी, कॉल सेंटरमधील कर्मचारी, पब्लीशर्स आदी लोकांना यांना फायदा होऊ शकतो. ShortKeys Lite आणि Yadabyte Subtext ही दोन टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर्स तुम्ही वापरू शकता. ही दोन्ही सॉफ्टवेअर्स फ्री आहेत.





Yadabyte Subtext डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ShortKeys Lite डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

नो टेंशन ट्रॅव्हल प्लॅनिंग

August 29, 2008 2 comments



मी जेव्हा-जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा माझ्याकडे संपूर्ण ट्रॅव्हल प्लॅन तयार असतो. गाडी किंवा फ्लाईट किती वाजता आहे, त्यासाठी किती अगोदर घरातून निघावे लागेल, प्रवास किती तासांचा आहे, परदेशात जाणार असल्यास कनेक्टिंग फ्लाईटमध्ये किती वेळाचे अंतर आहे, तेथील हवामान कसे आहे, तेथे शहरांतर्गत प्रवासाची काय सोय आहे, हॉटेल कुठे आहे, परतीचा प्रवास कसा आहे वगैरे सर्व बाबींचा अभ्यास करून त्याचे प्रिंटआऊट्स जवळ ठेवण्याची माझी सवय आहे. सुरक्षित प्रवास करायचा असेल तर हे सर्व करणे अत्यावश्यक आहे. तुमच्यापैकीही अनेक जण हे सर्व करत असतील. खरं सांगायचं तर यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि तेवढाच वेळही द्यावा लागतो. उच्चपदस्थ व्यक्तींना हे सर्व करून देण्यासाठी पर्सनल सेक्रेटरी असते. सर्वसामान्य व्यक्ती किंवा बिझी आंत्रप्रिन्युअरना मात्र ही सर्व कामे स्वतःच करावी लागतात. पण ट्रिपइट ही अॉनलाईन सेवा वापरून आंत्रप्रिन्युअर्स बहुमोल वेळेची बचत करू शकतात.




ट्रिपइट ही सेवा तुमच्यासाठी ट्रॅव्हल अॉर्गनायझरचे काम करते. ट्रिपइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही फक्त तुमचा फायनल ट्रॅव्हल प्लॅन (बुकिंग कन्फर्मेशन्स) plans@tripit.com या ई-मेल आयडीवर पाठवायचा. बस्स... ट्रिपइटकडे इटिनरेटर नावाची एक भन्नाट सिस्टिम आहे. या सिस्टिममध्ये तुमचा ट्रॅव्हल प्लॅन एंटर केला जातो. त्यानंतर इटिनरेटर इंटरनेटवर सर्व अतिरिक्त माहिती सर्च करून एक मास्टर ट्रॅव्हल प्लॅन तयार करतो. यात हवामान, नकाशे, ड्रायव्हिंग डायरेक्शन्स, सिटी गाईड, हॉटेल इन्फो आदी सर्व गोष्टींचा समावेश असतो. यासाठी Eventful, Flickr, Google Maps, SeatGuru, Wikipedia आदी साईट्सची मदत घेतली जाते.

Sample TripIt Itinerary




थोडक्यात काय तर जे काम तुम्हाला करावे लागते ते इटिनरेटरतफर्फे केले जाते आणि तुमच्या हातात तयार ट्रॅव्हल प्लॅन येतो. हा ट्रॅव्हल प्लॅन वापरून तुम्ही फ्लाईटसाठी अॉनलाईन चेक-इन देखील करू शकता. हा ट्रॅव्हल प्लॅन प्रिंट स्वरूपात तुमच्या सोबत राहू शकतो किंवा तो तुम्ही मोबाईलवरदेखील अॅक्सेस करू शकता.
Read the full story

,

टिनआयः अॉनलाईन इमेजेसचा बिग बॉस!

August 28, 2008 0 comments



मध्यंतरी गोव्यातल्या एका ब्लॉगरने भारतीय तसेच परदेशी माध्यमांच्या अकलेचं चांगलंच दिवाळं काढलं होतं. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या देण्याची इतकी चढाओढ लागलेली अाहे की जणू यांना उसेन बोल्टचा विश्वविक्रमंच मोडायचा आहे, असे वाटते. यांची ही खोड मोडून काढण्यासाठी पेनप्रिक्स हा ब्लॉग चालवणाऱ्यांनी अगदी खरी वाटेल अशी एक बातमी प्लॅंट केली आणि ती काही निवडक प्रसारमाध्यमांकडे पाठवली. त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ती तशीच्या तशी छापली. लोकल वाटणारी ही बातमी पाहता पाहता नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावरदेखील जाऊन पोचली आणि मग प्रसारमाध्यमांना आपली चूक कळली. पण तोवर ‘बूंद से गयी...’ अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यानंतर पेनप्रिक्सने ती बातमी कशी तयार केली, त्यासाठी कुठली माहिती वापरली, कोणते फोटो वापरले वगैरे बाबींबद्दल ब्लॉगवर सविस्तर पोस्ट लिहिली. एखादी बाब तपासून पाहताना आपण सर्वप्रथम त्यातील तथ्यांची खातरजमा करतो. माहितीत काही फेरफार केला असल्यास आपल्या लक्षात येण्याची शक्यता अधिक असते, पण फोटोमध्ये काही गोंधळ असल्यास ते सहसा ध्यानात येत नाही किंवा आल्यास खातरजमा करण्यात अडचणी येतात. उदा. पेनप्रिक्सने पाठवलेल्या फोटोतील व्यक्ती ही योहान बाशंच आहे, हे कसं ओळखणार?

टिनआय ही सेवा वापरून तुम्ही रिव्हर्स फोटो सर्च देऊ शकता. म्हणजे गुगल इमेज सर्च वापरून आपण हिलरी क्लिंटनचे शेकडो फोटो मिळवू शकतो. पण ज्यावेळी फोटोतील अॉब्जेक्टबद्दल माहिती हवी असते त्यावेळी आपल्याकडे अंदाज बांधण्याखेरीज दुसरा कोणताही पयर्याय नसतो. अशा वेळी टिनआय कामास येऊ शकते. टिनआय च्या आधारे तुम्ही एखादा फोटो अपलोड करून तो इंटरनेटच्या मायाजालात कुठे आणि कसा वापरला आहे याची माहिती मिळवू शकता. उदा. पेनप्रिक्सने वापरलेला योहान बाशचा फोटो अपलोड केल्यास तो बाश आहे याची कुठेच माहिती मिळत नाही. ओल्ड मॅन अशा नावाने दोन-तीन साईट्सवर संबंधित फोटो वापरला गेला आहे. यावरून तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.



हा झाला टिनआयचा एक फायदा. याचा दुसरा फायदा म्हणजे, तुम्ही जर फोटोग्राफर किंवा क्रिएटिव्ह आर्टिस्ट असाल तर तुमचे फोटो किंवा इतर आर्टवर्क तुमच्या परवानगीशिवाय इतर कुठे व्यावसायिक कामासाठी वापरले जात अाहे किंवा कसे, याची माहितीही तुम्हाला मिळू शकते. यासाठी टिनआयतर्फे sophisticated pattern recognition algorithm ही प्रणाली वापरली जाते. यात प्रत्येक फोटोचे पिक्सेल-बाय-पिक्सेल विश्लेषण करून बोटांच्या ठशाप्रमाणे एक विशिष्ट आकृती तयार केली जाते. या आकृतीशी मिळती-जुळती आकृती इंटरनेटवर शोधली जाते. त्यामुळे तुम्ही अपलोड केलेला फोटो इतर कुठल्या फोटोशी जुळत असल्यास तो १०० टक्के टिनआयच्या रिझल्ट्समध्ये दिसतो. तो तुमच्या मूळ फोटोशी कितपत जुळतो हेही तुम्ही कम्पेअर करू शकता. क्रॉप केलेले, मिक्स केलेले किंवा करेक्शन केलेले फोटोही टिनआयच्या नजरेतून सुटत नाहीत.
टिनआयचे फायरफॉक्स एक्स्टेंशनही उपलब्ध आहे.

Read the full story

,

आवाज की दुनिया!

August 27, 2008 0 comments



तुमच्यापैकी अनेक जण कॉम्प्युटरवर काही ना काही प्रयोग करत असणार, याची मला खात्री आहे. प्रयोग म्हणजे, एकतर कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअर्स एक्स्प्लोअर करणे किंवा त्यांचा वापर करून काहीतरी क्रिएटिव्ह वर्क तयार करणे. उदा. तुमच्या ट्रिपचा स्लाईडशो तयार करणे किंवा व्हिडीओ एडिट करणे, एखादा नव्या डिझाईनचा ब्लॉग तयार करून पाहणे वगैरे. प्रोफेशनल्सची गोष्ट निराळी असते. नवशिक्यांना निर्मितीचा आनंद अधिक होतो. आता अॉडिओ-व्हिडीओशी संबंधित असे काही प्रयोग करायचे म्हणजे वेगवेगळ्या साऊंड क्लिप्स लागणार. अशा शेकडो क्लिप्स साठवून ठेवणाऱ्या साऊंडस्नॅप या सेवेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

नवशिके आणि प्रोफेशनल्स या दोघांसाठीही साऊंडस्नॅप ही सेवा अतिशय उपयोगी ठरते. सोळा गटांत विभागलेल्या साऊंड क्लिप्स तुम्ही साऊंडस्नॅपवरून डाऊनलोड करू शकता. साऊंडस्नॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे साऊंड लव्हर्सचे एक नेटवर्क आहे. साऊंडस्नॅपचे सदस्य झाल्यानंतर तुम्ही तुमच्याकडील क्लिप्स अपलोड करू शकता.





साऊंडस्नॅपवरील क्लिप्स एमपीथ्री, डब्लूएव्ही आणि इतरही फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. साऊंडस्नॅप लवकरंच पेड मेंबरशीप मॉडेलचा अवलंब करणार असून अपलोड करणाऱ्यांनाही विशिष्ट मोबदला देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे मोफत डाऊनलोड करणाऱ्यांनी आताच साईटवर जाऊन हव्या त्या क्लिप्स डाऊनलोड करून घ्याव्यात.
Read the full story

,

क्लिक अॅण्ड कन्व्हर्ट...

August 26, 2008 0 comments

साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या अनेक वाचकांनी अॉडिओ आणि व्हिडीओ कन्व्हर्टरबद्दल विचारणा केली आहे. इंटरनेटवर अनेक अॉनलाईन सेवा (उदा. झमझार) उपलब्ध आहेत. पण प्रोफेशनल्सना डेस्कटॉप कन्व्हर्टर असणे अधिक सोयीचे जाते. याविषयी सर्च केल्यास अनेक अॉडिओ, व्हिडीओ कन्व्हर्टर्स सापडतात, पण त्यातील बरीचशी फ्री नसतात. काहींचे ट्रायल व्हर्जन उपलब्ध असते. काही सेवांमध्ये वेळेची मयर्यादा असते, काहींमध्ये लोगो किंवा डेमो अशी अक्षरे येतात. या सवर्वांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही क्विक मीडिया कन्व्हर्टर वापरून पाहा.



परवा इंटरनेटवर यासंदभर्भात सर्च करताना डेलीग्यान या ब्लॉगवर क्विक मीडिया कन्व्हर्टरबद्दल (QMC) माहिती वाचली. अॉडिओ आणि व्हिडीओ कन्व्हर्टर्सचा इंटरफेस साधा आणि सोपा असणे आवश्यक असते. या बाबतीत िक्वक मीडिया कन्व्हर्टर बाजी मारून जातो. िक्वक मीडिया कन्व्हर्टरमध्ये ईझी आणि एक्स्पर्ट असे दोन मोड अाहेत. तुम्हाला कन्व्हर्जनमधील तांत्रिक बाबी समजत नसतील तर तुम्ही ईझी मोड वापरून अॉडिओ किंवा व्हिडीओ कन्व्हर्ट करू शकता. यात फ्रेम रेट, आस्पेक्ट रेश्यो, कोडेक्स आदी पॅरामीटर्स िक्वक मीडिया कन्व्हर्टर स्वतःच ठरवतो. एक्स्पर्ट मोडमध्ये हे पॅरामीटर्स तुम्ही ठरवू शकता.

क्विक मीडिया कन्व्हर्टर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Read the full story