लहानग्यांसाठीचे ‘गुगल’
अग्गोबाई...ढग्गोबाईसारख्या बडबडगीतांमध्ये जरी मुलं रमत असली तरी त्याच वयाच्या मुलांना मोबाईल, लॅपटॉपसारख्या गोष्टींमध्येही तितकाच रस अाहे. त्यांना या गोष्टींची लहानपणापासूनच सवय होतेय. अशी सवय होणे चांगले की वाईट, हा मुद्दा वेगळा. पण चारचौघांत माझा मुलगा कस्सा बरोब्बर बाबांचा नंबर डायल करतो, वगैरे सांगण्यात पालक आघाडीवर असतात. असो.
मुलांच्या मनातली उत्सुकता शमविताना आणि त्यांच्या विचित्र प्रश्नांना उत्तरं देताना पालकांची कशी त्रेधा-तिरपिट होते, हे वेगळं सांगायला नको. मुलांच्या याच मानसिकतेचा विचार करून क्विन्टुरा या व्हिज्युअल सर्च इंजिन कंपनीने सुरू केलेल्या क्विन्टुरा किड्स या व्हिज्युअल सर्च इंजिनला भरपूर प्रतिसाद लाभत आहे.
रशियास्थित क्विन्टुराने व्हिज्युअल सर्चमध्ये आपला दबदबा राखला असून क्विन्टुरा किड्स हे लहान मुलांसाठी अत्यंत सुरक्षित सर्च इंजिन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यात न्यूरल नेटवर्किंग या तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना उपयोगी अशा गोष्टींचे टॅग क्लाऊड तयार करण्यात आले आहे. यावरील कोणत्याही टॅगवर माऊस पॉईंटर नेल्यास त्या टॅगशी संबंधित कीवर्ड्स डिस्प्ले होतात (डेमो व्हिडीओसाठी येथे क्लिक करा). प्रत्येक संबंधित कीवर्ड्ससाठीचे रिझल्ट्स त्या पेजवर दिसतात. मुलांना लहानपणापासूनच सर्चची सवय लावायची असेल किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरं द्यायची असतील तर क्विन्टुरा किड्स ट्राय करून पाहा...
Read the full story
Hot Launches!