, , ,

मल्टिपल जी-टॉक!

August 4, 2008 2 comments



एकावेळी दोन किंवा अनेक जी-मेल अकाऊंट्स कशी अॅक्सेस करावीत, यासंदभर्भातील माहिती मी या अगोदर दिली होती (वाचाः दोघांत तिसरा...). तुम्ही दोन किंवा त्याहून अधिक जी-मेल अकाऊंट्स वापरत असाल तर त्या-त्या अकाऊंट्ससाठी जी-टॉक अॅक्सेस करताना तुमची नक्कीच पंचाईत होत असेल. म्हणजे, एका अकाऊंटवरून लॉग अाऊट होऊन दुसऱ्यावर लॉग-इन व्हावं लागत असेल. यावर उपाय आहे. एकावेळी मल्टिपल जी-टॉक अकाऊंट्स अॅक्सेस करण्यासाठी पुढे दिलेली साधी-सोपी ट्रिक वापरा.



ही ट्रिक म्हणजे इथिकल हॅकिंग आहे. जी-मेल, जी-टॉकसाठी असे अनेक हॅक्स उपलब्ध आहेत. या हॅकला GTalk Polygamy असे म्हणतात. यात तुम्ही एकदा डाऊनलोड केलेला जी-टॉक क्लाएंट एकाचवेळी मल्टिपल अकाऊंट्स अॅक्सेस करण्याससाठी वापरू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो कराः
सवर्वांत अाधी जी-टॉक क्लाएंट डिफॉल्ट लोकेशनला (म्हणजे c:\program files\google\google talk\googletalk.exe येथे) सेव्ह आहे किंवा कसे, हे तपासून घ्या

१. डेस्कटॉपवर जाऊन राईट-क्लिक करा. त्यानंतर ‘न्यू’वर कर्सर नेऊन ‘शॉर्टकट’ सिलेक्ट करा.
२. आता टेक्सबॉक्समध्ये पुढील ओळ पेस्ट करा (अवतरणचिन्हासह)
"c:\program files\google\google talk\googletalk.exe" /nomutex
३. नेक्स्टवर क्लिक करा.
४. या शॉर्टकटला तुम्ही हवे ते नाव देऊ शकता. उदा. जी-टॉक १, जी-टॉक २ किंवा तुमचे यूजरनेम
त्यानंतर ओकेवर क्लिक करा.
५. आता तुमच्याकडे जी-टॉकचे दोन स्वतंत्र शॉर्टकट आहेत. त्यावरून तुम्ही दोन वेगवेगळ्या अकाऊंट्सवर लॉग-इन होऊ शकता.
Read the full story

,

रविवारची साफसफाई

August 3, 2008 0 comments

रविवार म्हणजे साफसफाईचा दिवस. घरातल्या साफसफाईसोबत आपण आपल्या गॅजेट्सची, कॉम्प्युटरची, मेलबॉक्सेसची आणि सोशल नेटवर्किंगवरील आपल्या प्रोफाईल्सचीही साफसफाई करणे आवश्यक आहे. यासाठी मी अगोदरच्या काही पोस्ट्समध्ये माहिती दिली होती. ज्यांचे फेसबुकवर अकाऊंट आहे आणि ज्यांचा मित्रपरिवार दांडगा आहे, त्यांना दररोज ढिगाने अॅप्लीकेशन रिक्वेस्ट्स येत असणार. प्रत्येक रिक्वेस्ट पाहून ती अॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट करायची म्हणजे वेळही तितकाच लागणार. पण आता तुम्ही एक क्लिकवर सगळ्या रिक्वेस्ट्स (फ्रेंड, इव्हेंट आणि ग्रुप इन्व्हाईट्स वगळून) इग्नोअर करू शकता.

अनेक सदस्यांच्या तक्रारींची दखल घेऊन फेसबुकने जानेवारीत Ignore All हे फीचर अॅड केले. एका ब्लॉगरने दिलेल्या माहितीनुसार २५ किंवा त्याहून अधिक रिक्वेस्ट्स अाल्यानंतरच हे फीचर अॅक्टीव्ह होते. पंचवीसहून कमी रिक्वेस्ट्स असणाऱ्यांनी Ignore All हे बुकमार्कलेट वापरावे. हे वापरणे अतिशय सोपे आहे. Ignore All वर राईट क्लिक करून ते तुमच्या बुकमार्क फेव्हरेट्समध्ये अॅड करा. फेसबुक रिफ्रेश केल्यानंतर रिक्वेस्टच्या शेजारी Ignore All अशी लिंक दिसू लागेल.



कॉम्प्युटरची सफाई करण्यासाठी वाचाः मस्ट हॅव (सीसीक्लीनर)
डुप्लीकेट फाईल्स डिलीट करण्यासाठी वाचाः हार्डडिस्कला घेऊ द्या मोकळा श्वास!
मेल बॉक्समध्ये स्पॅम नको असल्यास वाचाः स्टे अवे फ्रॉम स्पॅम
Read the full story

,

डबल राईट क्लिक

August 2, 2008 0 comments

ब्रिटनमधील एका विद्यापीठाने केलेल्या सर्व्र्र्र्वेक्षणानुसार डेस्कटॉप वापरणारे सुमारे ९० टक्के तर लॅपटॉप वापरणारे सुमारे ६४ टक्के लोक माऊसचा वापर करतात. केवळ ३६ टक्के लोक कीबोर्ड शॉर्टकट्सचा वापर करतात, असेही या सर्व्र्र्र्वेक्षणात दिसून आले आहे. नव्वद टक्के लोक माऊसचा वापर करत असतील तर माऊसचा वापर करून प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, यासाठी अनेक कंपन्या काम करत असतात. त्यात माऊसच्या आकार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे बाजारात गेल्यास विविध आकारांत तुम्हाला माऊस पाहायला मिळतील. माऊस वापरणाऱ्यांना सिंगल क्लिक, डबल क्लिक, ट्रिपल क्लिक (वाचाः ट्रिपल क्लिकचा फंडा) माहित असेल. या सगळ्या क्लिक्स अर्थातच लेफ्ट बटनसाठी आहेत. पण राईट बटनही डबल क्लिक करून प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येते.


होय. तुमच्या माऊसवरील राईट बटन डबल क्लिक करून तुम्हाला हवी ती अॅक्शन पार पाडू शकता. यासाठी क्लिकझॅप नावाचे अगदी छोटेसे अॅप्लीकेशन कामास येते. विंडोज २००० आणि एक्सपी वापरणारे या अॅप्लीकेशनचा उपयोग करू शकतात. व्हिस्टा वापरणाऱ्यांनी ट्राय करून पाहण्यास हरकत नाही. क्लिकझॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. क्लिकझॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही माऊसचे राईट बटन दोन वेळा क्लिक करून खालीलपैकी कोणतीही एक अॅक्शन पार पाडू शकताः

Lock the computer
Logoff the computer
Shutdown the computer
Minimize active window
Minimize all windows
Close active window
Close all windows
Mute the sound



क्लिकझॅप वापरणारे बहुतांश जण अॅक्टिव्ह विंडो मिनिमाईझ करण्यासाठी किंवा कॉम्प्युटर लॉक करण्यासाठी डबल राईट क्लिकचा वापर करतात. प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर क्लिकझॅप ट्राय करून पाहा.
Read the full story

,

रॅम एक्स्प्रेस - भाग २

August 1, 2008 0 comments


अॅप्लीकेशन्सची संख्या वाढली की आपला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप धापा टाकायला लागतो. अॅडोबचे एखादे अॅप्लीकेशन (विशेषतः फोटोशॉप किंवा ड्रीमवीव्हर) क्लिक करून ओपन होईपर्यंत आपण एक कप चहा तयार करून घेऊ शकतो. रॅम म्हणजे काय चीज असते, हे त्यावेळी आपल्याला कळतं. त्यामुळे एखाद्याने नवा लॅपटॉप घेतला आणि त्याची रॅम २ जीबी आहे असं कळलं की अस्वस्थ व्हायला लागतं - कारण आपण ५१२ एमबीवर कामाचा गाडा ओढत असतो. विंडोज व्हिस्टा वापरणाऱ्यांना रेडीबुस्ट या फीचरमुळे रॅमच्या कटकटीतून मुक्ती मिळाली आहे. या अॅप्लीकेशनचा वापर करून व्हिस्टाचे ग्राहक साधा पेनड्राईव्ह वापरून रॅम बूस्ट करू शकतात. पण रेडीबुस्ट हे फक्त व्हिस्टासाठी आहे. एक्सपी वापरणाऱ्यांचे काय?

रेडीबुस्टच्याच धतर्तीवर तयार केलेले ईबुस्टर हे अॅप्लीकेशन एक्सपीसाठी रॅम बुस्टर म्हणून वापरता येऊ शकते. पेनड्राईव्हमधील फ्लॅश मेमरी वापरून तुमच्या मशीनची स्पीड वाढविण्याचे काम ईबुस्टरद्वारे केले जाते. रेडीबुस्टचा एक तोटा म्हणजे त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या पेनड्राईव्ह्जची गरज असते. ईबुस्टरसाठी तुम्ही कोणताही साधारण पेनड्राईव्ह वापरू शकता. इतकेच नव्हे तर, डिजिटल कॅमेरा आणि मोबाईल फोनमध्ये वापरले जाणारे फ्लॅश मेमरी कार्डही (CF, SD/SDHC, MMC, xD, इ.) तसेच एक्स्टर्नल हार्ड डिस्कही यासाठी वापरता येते. नेहमी वापरल्या जाणाऱ्या अॅप्लीकेशन्सच्या आकडेवारीचे विश्लेषण ईबुस्टरद्वारे केले जाते. या आकडेवारीच्या आधारे सदर अॅप्लीकेशन ओपन करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या फाईल्स कॅश मेमरीत ठेवल्या जातात. त्यामुळे अॅप्लीकेशन ओपन होताना लागणारा वेळ वाचतो. यामुळे मशीन बूट होण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही लक्षणीय घट होते.



ईबुस्टरचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही एकावेळी चार एक्स्टर्नल डिव्हायसेस वापरून रॅम बूस्ट करू शकता. आणि प्रत्येक डिव्हाईसवर ४ जीबीपर्यंत कॅश मेमरी राहू शकते.
ईबुस्टर हे पेड अॅप्लीकेशन असले तरी ट्रायल व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ते अनंत काळासाठी वापरू शकता. एकदा मशीन बूट केल्यानंतर केवळ चार तास हे अॅप्लीकेशन वापरता येते. म्हणजे दिवसातून केवळ एकदा रिस्टार्ट करून तुम्ही अॉफिसमध्ये हे अॅप्लीकेशन वापरू शकता. तेव्हा वाट न बघता ईबुस्टर डाऊनलोड करा. आणि तुमच्या २५६, ५१२ एमबीच्या मशीनला समुद्र पार करण्यासाठी या नव्या ‘रॅम’सेतूचा आधार द्या.

रॅम बुस्ट करण्यासाठी आणखी एक ट्रिक, वाचाः रॅम एक्स्प्रेस
Read the full story

मॅजिक ट्रान्स्फरची जादू!

July 31, 2008 0 comments

क्लाएंटसमोर प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी शैलेशने लॅपटॉप काढला आणि अॉन करण्याचा प्रयत्न केला. तो अॉन झाला नाही. त्याला वाटलं बॅटरी डाऊन असेल. त्याने चार्जर लावून पुन्हा अॉन करण्याचा प्रयत्न केला. तरीही काही झालं नाही. आता मात्र त्याला घाम फुटला. सर्व डेटा, सेटिंग्ज, बुकमार्क, अाऊटलूक मेल्स सारं काही त्यात होतं. आता जर याला काही झालं, तर सगळं संपल्यात जमा होतं. आणि नेमकं तसंच झालं. लॅपटॉप फॉरमॅट करावा लागेल, असं आयटी डिपार्टमेंटने सांगितलं. त्यासाठी किमान दोन दिवस तरी लॅपटॉप त्यांच्याकडे ठेवावा लागणार होता. आता हे दोन दिवस त्याला डेस्कटॉपवर काम करावं लागणार होतं. पण त्याच्याकडील डेटाशिवाय आणि सेटिंग्जशिवाय त्याला काम करणं शक्यच नव्हतं. अशावेळी मॅजिक ट्रान्स्फर हे फ्री सॉफ्टवेअर कामास येतं.

काही कारणानिमित्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉप फॉरमॅट करावा लागला किंवा बदलावा लागला किंवा तुम्ही अॉफिसमध्ये एक आणि घरी एक डेस्कटॉप वापरत असाल तर फाईल्स, ब्राऊजर बुकमार्क, विंडोजमध्ये केलेल्या सेटिंग्ज, महत्त्वाच्या फाईल्स आदी गोष्टी सिंक्रोनाईझ करून ठेवणे केव्हाही चांगले. असे सिंक्रोनायझेशन करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स आणि अॉनलाईन सेवा उपलब्ध आहेत. परंतु त्या वापरण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागते. मॅजिक ट्रान्स्फर हे सॉफ्टवेअर मोफत मिळते.



मॅजिक ट्रान्स्फर इन्स्टॉल केल्यानंतर बॅक-अपवर क्लिक करा. आता तुम्ही सिस्टिम सेटिंग्ज (अॅपिअरंस सेटिंग्ज, माऊस/कीबोर्ड सेटिंग्ज, स्टार्ट मेनू, इ.), आऊटलूक सेटिंग्ज आणि मेल्स, फायरफॉक्स (सेटिंग्ज, बुकमार्क, प्लगईन्स), इंटरनेट एक्सप्लोरर (सेटिंग्ज, फेव्हरेट्स) आणि हार्डडिस्कवरील फाईल्स एका फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता.



त्यानंतर हे बॅकअप फोल्डर एखाद्या सीडी/डीव्हीडीवर किंवा पेनड्राईव्हवर कॉपी करा. या सेटिंग्ज दुसऱ्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वापरण्यासाठी तुम्हाला त्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर अगोदर मॅजिक ट्रान्स्फर इनस्टॉल करायला लागेल. त्यानंतर बॅकअप फोल्डर त्यावर स्टोअर करा. आता मॅजिक ट्रान्स्फरवर क्लिक करून रिस्टोअर म्हणा. तुमच्या सर्व सेटिंग्ज नव्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्षणार्धात रिस्टोअर होतील.

केवळ Windows NT/2000/XP/2003 साठी.
मॅजिक ट्रान्स्फर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

रजा-सुट्यांचा अॉनलाईन ताळेबंद

July 30, 2008 0 comments


अश्विनने न सांगता अॉफिसला दांडी मारल्याने त्याचा टीम लीडर प्रचंड संतापला होता. तशात सचिनही दोन दिवस रजेवर असल्याचे लक्षात आल्याने तो स्वतःवरच चिडचिड करू लागला. साहजिक आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत १५-२० जणांची टीम लीड करत असाल तर असा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ताणात आपण रजा-सुट्या या गोष्टी विसरतो आणि मग प्रोजेक्ट्सना उशीर होतो. अशा वेळी एचआर काहीही करू शकत नाही. कारण रजा-सुट्या या अत्यंत वैयक्तिक गोष्टी असतात, आणि त्या आपण आपल्या पातळीवरंच हाताळल्या पाहिजेत. तुमची छोटी कंपनी असेल किंवा तुम्ही एखादी टीम लीड करत असाल तर हूज अॉफ ही अॉनलाईन सेवा तुम्हाला मदत करू शकते.

सध्या जमाना सोशल नेटवर्किंगचा आहे. हूज अॉफ हे आपल्या सहकाऱ्यांचे एकप्रकारचे सोशल नेटवर्कंच असल्यासारखे आहे. याचा उद्देश केवळ रजा-सुट्ट्यांचे नियोजन हा असेल. हूज अॉफवर तुम्ही कितीही मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या रजा-सुट्या मॅनेज करू शकता. आपण लहान उदाहरण घेऊ. समजा तुम्ही २५ जणांची एक टीम लीड करत आहात. हूज अॉफवर तुम्ही अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर तुम्ही तुमच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची नावे अॅड करू शकता. त्यांचा ई-मेल अॅड्रेस हे त्यांचे यूजरनेम असेल. या सहकाऱ्यांना पासवर्ड तुम्ही द्यायचे आहेत. एकदा का सर्व सहकाऱ्यांची नावे डेटाबेसमध्ये अॅड केली की तुम्ही त्यांना वर्षभरात किती सुट्ट्या घेता येतात, एकाच पदावरील दोन व्यक्ती एकाच दिवशी सुटी घेऊ शकतात की नाही, तुमच्या व्यतिरिक्त इतर कोण रजा-सुट्या मंजूर करू शकतात वगैरे माहिती एंटर करायची. तुमचे हूज अॉफ नेटवर्क आता तयार आहे.

आता तुम्ही अॉनलाईन पाहू शकता की आज कोणाची सुटी आहे, कोण रजेवर आहे, कोण केव्हा परत येणार आहे वगैरे. तुमच्या सोबत काम करणारे सहकारीही अॉनलाईन लीव्ह अॅप्लीकेशन देऊ शकतात. ही सेवा इंग्लंडमधील कंपनीने तयार केली असल्यामुळे भारतीय कंपन्यांत बऱ्यापैकी कामास येते. अनेक मोठ्या कंपन्यांत अशा प्रकारची सुविधा तेथील एचआरने उपलब्ध करून दिलेली असते. परंतु लहान आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांत अशी सुविधा सहसा उपलब्ध नसते. अशा कंपन्यांसाठी आणि आंत्रप्रिन्युअर्ससाठी ही सेवा उपयोगास येते.
Read the full story