रॅम एक्स्प्रेस
आजकाल सर्व डेस्कटॉप आणि लॅपटॉप किमान १ जीबी रॅमसह येतात. त्यामुळे कोणतेही हेवी प्रोग्राम्स रन करण्यास स्पीडची कसलीच अडचण येत नाही. पण ज्यांचे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जुने (जुने म्हणजे सहा महिन्यांपूर्वीचे) आहेत व ज्यांची रॅम २५६ किंवा ५१२ एमबी आहे, त्यांना हेवी प्रोग्राम रन करायचे म्हणजे पोटात गोळाच येत असेल. विंडोज व्हिस्टासाठी तुम्ही रेडीबूस्ट वापरून रॅम वाढवू शकतो. एक्सपी वापरणाऱ्यांनी काय करायचे असा प्रश्न येतो. त्यांच्यासाठी एक साधी-सोपी ट्रिक आहे.
तुमच्या स्लो झालेल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला स्पीडबूस्ट देण्यासाठी पुढे दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो कराः
१. सर्वप्रथम नोटपॅड ओपन करून (नोटपॅड अॅक्सेसरीजमध्ये असते) त्यात MYSTRING=(80000000) असे टाईप करा (आठावर सात शून्य द्या).
२. ही फाईल तुमच्या डेस्कटॉपवर RAM.VBE या नावाने सेव्ह करा.
३. आता ज्यावेळी तुम्हाला प्रोसेसिंग स्पीड कमी झाल्यासारखी वाटेल त्यावेळी या फाईलवर डबलक्लिक करा. तुमच्या रॅमला आवश्यक तेवढा बूस्ट मिळेल.
ज्यांची रॅम १२८ एमबी आहे त्यांनी स्ट्रिंगमध्ये आठ एेवजी १६ लिहावे. ही ट्रिक व्हिस्टासाठीही कामास येते.
Thanks Paul
अमित,
अतिशय छान ब्लॉग आहे. नावाप्रमाणेच साध्या सोप्या शब्दांत तंत्रज्ञानाची माहीती दिली आहे. या ब्लॉगमुळे अनेक नव्या संकेतस्थळांची, सोयींची माहिती कळली. धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा
आपल्या शुभेच्छांबद्दल शतशः आभार. आपण हा ब्लॉग असाच वाचत राहाल, अशी अपेक्षा.
धन्यवाद!
अमित.