हार्डडिस्कला घेऊ द्या मोकळा श्वास!

June 23, 2008 Leave a Comment

आजकाल सगळ्यांच्या हार्डडिस्क्स किमान ८० ते १२० जीबी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या असतात. त्यामुळे आपण कसलाही विचार न करता फाईल्स स्टोअर करत जातो. तुम्ही व्यवस्थित पाहणी केली तर तुम्हाला तुमच्या हार्डडिस्कमध्ये मस्तपणे पहुडलेल्या एमपीथ्री फाईल्स (ज्यातील अनेक गाणी तुम्ही वर्षातून एकदा वगैरे एेकत असाल), व्हिडीओ फाईल्स, असंख्य फोटोज आणि शेकडो डॉक्युमेंट्स दिसतील. यातील अनेक गोष्टी डिलीट करण्यासारख्या असतात, पण आपण त्या करत नाहीत. त्यामुळे अनावश्यक फाईल्सचा कचरा वाढत जातो आणि एक दिवस, ‘यूवर सी ड्राईव्ह हॅज व्हेरी लिटल स्पेस. प्लीज डिलीट सम डेटा’ अशा आशयाचा मेसेज आल्यानंतर आपल्याला जाग येते. मग आपण नको असलेल्या फाईल्स डिलीट करायला घेतो. त्यावेळी लक्षात येतं की, अरे आपण एकच फाईल तीन ठिकाणी सेव्ह करून ठेवलेली आहे. अशी वेळ येऊ नये किंवा आल्यास डुप्लीकेट फाईल्स शोधून पटकन डिलीट करता याव्यात यासाठी एक उत्तम टूल आहे. इझी डुप्लीकेट फाईंडर हे त्याचं नाव.



इझी डुप्लीकेट फाईंडर हे डुप्लीकेट फाईल शोधून डिलीट करण्यासाठीचे एक मोफत टूल आहे. केवळ ७३८ केबीचा हा प्रोग्राम इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमधील डुप्लीकेट झालेल्या फाईल्स चुटकीसरशी डिलीट करू शकता. हा प्रोग्राम केवळ फाईल नेमवर न जाता बाईट टू बाईट कम्पॅरिझन करतो. त्यामुळे एकसारखा कन्टेन्ट (टेक्स्ट, इमेजेस, अॉडिओ, व्हिडिओ) असणाऱ्या कोणत्या फाईल्स डुप्लीकेट झालेल्या आहेत, हे लगेच समजते. बऱ्याच वेळा आपल्याला माहित असतं की या दोन फोल्डर्समध्ये किंवा दोन ड्राईव्ह्जमध्ये डुप्लीकेट फाईल्स असण्याची शक्यता आहे. अशावेळी केवळ संबंधित फोल्डर्स किंवा ड्राईव्ह्जमधून डुप्लीकेट फाईल्स शोधता येतात. डुप्लीकेट झालेल्या फाईल्स एका क्लिकमध्ये डिलीट करता येतात. इझी डुप्लीकेट फाईंडर विंडोजच्या सर्व व्हर्जन्सना (विंडोज ९५ ते विंडोज व्हिस्टा) सपोर्ट करतो. तुमच्या हार्डडिस्कला जरा मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी इझी डुप्लीकेट फाईंडर वापरा आणि अनावश्यक व डुप्लीकेट झालेल्या फाईल्स डिलीट करा.

इझी डुप्लीकेट फाईंडर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
इझी डुप्लीकेट फाईंडर संदर्भात अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Related Posts :



3 comments »

  • Sunil Jadhav said:  

    Nice information Amit. Thanks for it. i really need this tool.

  • Anonymous said:  

    Thank you Sunil. I am happy that you are utilizing the information posted on my blog. Keep reading for more.

  • Anonymous said:  

    buts its not freeware and i found this http://www.ashisoft.com application have more features and power...