ट्रिपल क्लिकचा फंडा...

June 7, 2008 Leave a Comment


तुम्हाला माऊसमधील सिंगल आणि डबल क्लिक माहित असेल. पण त्यात ट्रिपल क्लिकही असते, हे माहितीये का?
ज्यांना भरपूर वेळ कॉम्प्युटर वापरायची सवय आहे ते लोक माऊसचा वापर टाळतात. कारण कीबोर्डवरील शॉर्टकट्स अधिक सोपे आहेत. पण ज्यांना माऊस वापरण्याची सवय आहे त्यांना थोडा अधिक वेळ लागला तरी माऊसशिवाय कॉम्प्युटर अॉपरेट करणं जमत नाही. अशा लोकांनी वेळ वाचविण्यासाठी काय करावे?
माऊस वापरणाऱ्यांसाठी काही क्विक टिप्स...

१. एखादी न्यूजसाईट किंवा एखादा मोठा रिपोर्ट वाचायाचा असेल तर सारखं स्क्रोल करत बसण्यापेक्षा तुमच्या माऊसवरील स्क्रोल व्हीलवर क्लिक करा. स्क्रीनवर एक स्क्रोल आयकॉन येईल. आता तुम्ही माऊस ज्या दिशेने (वरच्या किंवा खालच्या) फिरवाल त्या दिशेने ते पेज आपोआप स्क्रोल होईल.
२. स्क्रोलिंग करताना तुम्ही नीट लक्ष दिलंत तर दिसेल की एका वेळी त्या पेजवरील केवळ तीन किंवा चार ओळीच खाली किंवा वर जातात. स्क्रोलिंग स्पीड वाढविण्यासाठी पुढील स्टेप्स वापराः
a. विंडोजमध्ये स्टार्टवर क्लिक करा.
b. रन कमांड देऊन regedit टाईप करा.
c. एंटर केल्यानंतर HKEY_CURRENT_USER\Control Panel\Desktop येथे जा.
d. त्यात WheelScrollLines वर जाऊन एडिक करा.
e. तिथे जी व्हॅल्यू असेल ती कमी केल्यास स्क्रोलिंग स्पीड वाढेल. ती व्हॅल्यू वाढविल्याल स्क्रोलिंग स्पीड कमी होईल. (म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू ४ असताना १ केली तर स्क्रोलिंग अधिक सेन्सिटिव्ह होईल)
f. कॉम्प्युटर रिस्टार्ट केल्याशिवाय फरक जाणवणार नाही.
3. वेबपेज किंवा डॉक्युमेंटमधील एखादी ओळ किंवा पॅराग्राफ कॉपी करायच्या असेल तर तीन वेळा लेफ्ट क्लिक केल्यास ती ओळ किंवा पॅराग्राफ सिलेक्ट होईल. तो तुम्ही कॉपी करू शकाल.
Thanks FriedBeef

Related Posts :



2 comments »

  • sachin patil said:  

    ट्रिपल क्लिकचा फंडा..."
    Really good and fantastic ...जबरदस्त आहे . गाईड केल्ल्याबद्दल धन्यवाद.

    प्रा.सचिन पाटील.

  • Amit Tekale said:  

    Thank you Prof. Sachin Patil. Keep reading Sasotechnology for tips, tricks and more.