आता कशाला 'बिला'ची बात...

May 31, 2008 Leave a Comment


भारतातील मोबाईलधारकांची संख्या एव्हाना अमेरिकेच्यापुढे गेली असेल (रिपोर्ट वाचा). मार्चअखेर भारतात सुमारे २५ कोटी मोबाईलधारक होते. चीनमध्ये एकूण ५४ कोटी मोबाईलधारक असून अमेरिकेत २५.६ कोटी मोबाईलधारक आहेत. भारतात दरमहा किमान ८० ते ९० लाख ग्राहकांची भर पडते, त्यामुळे एप्रिल महिन्यात भारताने अमेरिकेस मागे टाकले असण्याची शक्यता आहे. एका आकडेवारीनुसार शहरी भागातील सुमारे १० टक्के आणि ग्रामीण भागातील तीन टक्के मोबाईलधारक जीपीआरएस सेवेचा वापर करतात - अर्थात मोबाईलवरून इंटरनेट सर्फ करतात. वरचे आकडे पाहिल्यास ही संख्या प्रचंड असल्याचे तुमच्या लक्षात आलेच असेल. मोबाईलवरून इंटरनेट सर्फ करण्याचे प्रमाण वरचेवर वाढतच जाणार आहे. सध्या त्याचे दर फारसे आकर्षक नसले तरी भविष्यात मात्र ते मोबाईलच्या कॉलदराप्रमाणेच वेगाने घसरतील अशी अपेक्षा आहे.

मोबाईलवरून इंटरनेट सर्फ करणाऱ्यांसाठी डेटा डाऊनलोड ही मोठी चिंतेची बाब असते. म्हणजे तुम्ही मोबाईलवरून रेडीफ डॉट कॉम सर्फ करत असाल तर तुमचा मोबाईल ब्राऊजर आधी सगळ्या इमेजेस डाऊनलोड करेल, मग टेक्स्ट आणि तुमचा जीपीआरएस प्लॅन जर पर केबी डेटा साठीचा असेल तर तुमचे बिल वाढलेच म्हणून समजा. अशा वेळी फोनिफायर ही सेवा कामाला येते.

तुमच्या मोबाईल फोनच्या ब्राऊजरमध्ये जाऊन www.phonifier.com असे टाईप करा आणि त्यातील अॅड्रेसबारमध्ये तुम्हाला हव्या त्या साईटचा अॅड्रेस द्या. तुमच्या बिलाचा विचार करून फोनिफायर ती साईट ओपन करेल. विथ इमेजेस अॉर विदाऊट इमेजेस, तुम्हाला वाटेल त्या अॉप्शनसह. एकदा ट्राय तर करून पाहा...

Related Posts :



0 comments »