, ,

िडक्शनरी इन चॅट

July 8, 2009 4 comments

‘डिक्शनरी’ची गरज कोणाला, केव्हा आणि कुठे भासेल याचा नेम नाही. बुकशेल्फमधील जाडजूड अॉक्सफर्ड डिक्शनरी तशी केव्हाही कामाला येते, पण कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर वाढल्यामुळे आपण साहजिकच या माध्यमातील डिक्शनरीज वापरायला लागतो. वर्डमध्ये काम करत असताना आपण तिथली डिक्शनरी वापरतो, मोबाईलसाठीही डिक्शनरीचे अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. सर्चचा वापर करूनही आपण एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ शकतो. ई-मेल वाचताना किंवा लिहिताना एखादा शब्द अडला तरीदेखील तुम्ही तिथल्या तिथे त्याचा अर्थ जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही गुगल बोट वापरू शकता. बोट म्हणजे वेब रोबोट्स अर्थाच एखाद्या कमांडसाठी ठरवून दिलेले काम करणारे अॅप्लिकेशन्स.

गुगल टॉक किंवा जी-मेल चॅटमधून lookup@bot.im या ई-मेल अॅड्रेसला चॅटिंगसाठी इन्व्हाईट केल्यानंतर तुम्ही ही सेवा वापरू शकता. dict असे टाईप करून त्यापुढे तुम्हाला ज्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचाय तो शब्द Lookup ला पाठवला की पुढच्या सेकंदाला तुम्हाला त्याचा अर्थ मिळेल.

उदा. तुम्हाला Deprecate या शब्दाचा अर्थ माहित करून घ्यायचा असल्यास dict deprecate असा मेसेज पाठवा.
या बोटचा वापर करून तुम्ही कठीण हिंदी शब्दांचे अर्थही समजून घेऊ शकता. उदा. dict गहरा असा मेसेज केल्यानंतर या शब्दाचा इंग्लिशमधील अर्थ तुमच्यासमोर येईल.





याच पद्धतीने इंग्लिशमधील शब्द हिंदीत भाषांतरित करायचे असतील तर तुम्ही en2hi.translit@bot.talk.google.com या बोटचा वापर करू शकता.

अधिक बोट्ससाठी वाचाः
Useful Google Talk Bots That You Must Add as Friends
Read the full story

,

डाऊनलोडः Nokia N97 आणि E75 च्या रिंगटोन्स!

July 4, 2009 0 comments

नोकिया N97 या नव्या मोबाईल फोनची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. हा मोबाईल गेल्या आठवड्यात भारतात लाँच झाला खरा; पण ३५ हजार रुपये किमतीचा टॅग पाहून किती लोक त्याकडे वळतील याबद्दल शंकाच आहे. अर्थात, या मोबाईलची थेट स्पर्धा आयफोनशीच असणार आहे, त्यामुळे याची किंमत ३०-३२ हजारांच्या पुढे असेल, असे वाटत होतेच. कोणताही नवा मोबाईल बाजारात आला की तो घ्यावासा वाटतोच. एक-दोन हजारांनी बजेट पुढे-मागे करून तो फोन विकत घेण्याची आपली तयारीही असते. पण आकडा तीस हजारांच्या पुढे गेला की मागे सरकायला होतं. मग सध्याचा मोबाईल काय वाईट आहे, असं वाटायला लागतं.

यात जे आहे तेच नव्या मोबाईलमध्ये आहे. शिवाय नवा मोबाईल जरा मोठा आणि जड वाटतोय, असे म्हणून आपणंच आपल्या मनाची समजूत काढत राहतो. तर, ज्यांना N97 किंवा त्याच्या अगोदर आलेला E75 यापैकी एखादा मोबाईल आवडलेला आहे, घेण्याची इच्छाही होतेय, पण ‘बायको’ किंवा ‘खिसा’ परवानगी देत नाहीये, अशांसाठी एक खास अॉफर आहे - या दोन्ही मोबाईल फोनकरता तयार केलेल्या रिंगटोन्स तुम्ही तुमच्या सध्याच्या मोबाईलवर वापरू शकता.

कधी-कधी दुधाची तहान ताकावर भागवावी लागते, त्यातलाच हा प्रकार. सिंबियन ब्लॉगने या दोन्ही फोनसाठीच्या रिंगटोन्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात काही रिंगटोन्स नेहमीच्याच असल्या तरी त्यात जरासे बदल केल्याचे ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल. सर्वसाधारण रिंगटोन्सपेक्षा या रिंगटोन्स अधिक मॉडर्न आणि पॉलिश्ड वाटतात. N97 च्या पॅकेजमध्ये भारतीय बाजाच्या काही रिंगटोन्सही आहेत.

या सर्व रिंगटोन्स .aac फॉरमॅटमध्ये आहेत. तुमच्या मोबाईलवर या फॉरमॅटमधील रिंगटोन्स चालत असतील तर तुम्ही N97 आणि E75 च्या रिंगटोन्सचा आनंद घेऊ शकता.

Download:
Nokia N97 Ringtones
Nokia E75 Ringtones
Also Download:
Nokia N97 Theme by_Mandeep

Read the full story

, , ,

फास्ट, फास्टर, फास्टेस्ट फायरफॉक्ससाठी...

July 1, 2009 0 comments

नेट फारंच स्लो झालंय का रे? - शैलेशचा प्रश्न
नेट व्यवस्थित आहे. तुझं ब्राऊजर गंडलंय... - श्रीचे उत्तर

शैलेश फायरफॉक्सचा भक्त. कितीही सुंदर दिसणारं, सोयी-सुविधांनी युक्त असं नवं ब्राऊजर आलं तरी हा गडी फायरफॉक्सलाच चिकटून होता. शैलेशसारख्या फायरफॉक्सपंथीयांची ही नेहमीची तक्रार. हा ब्राऊजर प्रचंड मेमरी खातो, एक्स्टेन्शन्स वाढली की हा पार ढपतो इथपासून ते पेज लोड होण्यास प्रचंड वेळ लागतो इथपर्यंत अनेक तक्रारी सारख्या सुरू असतात. पण तरीदेखील हे लोक दुसऱ्या ब्राऊजरकडे वळत नाहीत. अशा फायरफॉक्सपंथीयांसाठीच आजची ही पोस्ट लिहितोय.

फायरफॉक्सच्या Configuration फाईलमध्ये किंचित बदल करून तुम्ही तुमच्या फायरफॉक्सला जोरदार पळवू शकता. अर्थात, यासाठी तुम्हाला Configuration चेंज करावे लागेल. पुढे दिलेल्या स्टेप्स अत्यंत काळजीपूर्वक फॉलो कराः

Cache फीचरसाठी राखून ठेवलेली RAM कमी करण्यासाठीः

सर्फिंगदरम्यान कॅशिंगसाठी फायरफॉक्सतर्फे ठराविक RAM वापरली जाते. यामुळे अनेकदा इतर प्रोसेसेस आणि फायरफॉक्सही स्लो होण्याची शक्यता असते. ही RAM कमी करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः

  • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
  • आता वरच्या बाजूस Filter नावाने एक सर्च बार येईल. त्यात browser.sessionhistory.max_total_viewer असा सर्च द्या.
  • Value वर क्लिक करून ती 0 अशी सेट करा (Default Value: -1)
पेज लोड स्पीड वाढवण्यासाठीः
फायरफॉक्समध्ये आपण जेव्हा एखाद्या साईटचा अॅड्रेस एंटर करतो तेव्हा त्या साईटच्या सर्व्हरला केवळ एकच रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यामुळे साहजिकच पेज लोड होण्यास वेळ लागतो. एकावेळी अनेक रिक्वेस्ट्स पाठवण्यासाठी पुढील बदल कराः
  • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
  • Filter मध्ये network.http.pipelining असे टाईप करून व्हॅल्यूवर क्लिक करा व ती True अशी सेट करा. (Default Value: False)
  • याच पद्धतीने network.http.proxy.pipelining असे टाईप करा. ही व्हॅल्यूही True अशी सेट करा. (Default Value: False)
  • आता network.http.pipelining.maxrequests असे टाईप करून ही व्हॅल्यू 10 अशी सेट करा. (Default Value: 4)
  • आता याच विंडोत राईट-क्लिक करून New > Integer असे सिलेक्ट करा. याला nglayout.initialpaint.delay असे नाव द्या आणि त्याची व्हॅल्यू 0 अशी सेट करा.
फायरफॉक्स मिनिमाईझ्ड असताना RAM दहा एमबीपर्यंत कमी करण्यासाठीः
फायरफॉक्स वापरताना बरीचशी RAM वापरली जाते. त्यामुळे इतर अॅप्लिकेशन्स अनेक वेळा हँग होण्याची किंवा स्लो होण्याची शक्यता असते. अशा वेळी फायरफॉक्स बंद केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. पण फायरफॉक्स मिनिमाईझ करून ठेवल्यास होणारा RAM चा वापर आपण कमी करू शकतो. असे करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
  • अॅड्रेस बारमध्ये about:config असे टाईप करा. एंटर केल्यानंतर एक धोक्याचा इशारा येईल. त्याकडे दुर्लक्ष करून I’ll be careful, I promise वर क्लिक करा.
  • आता याच विंडोत राईट-क्लिक करून New > Boolean असे सिलेक्ट करा.
  • याला config.trim_on_minimize असे नाव देऊन एंटर करा.
  • नव्या बॉक्समध्ये याची व्हॅल्यू True अशी सेट करा.
या सगळ्या स्टेप्सनंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करा व नव्या स्पीडचा अनुभव घ्या! तुमचा अनुभव कॉमेंट्सच्य माध्यमातून इतराशी जरूर शेअर करा.
Source: http://www.zixpk.com/
Read the full story