िदवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

October 25, 2008 5 comments



उद्या (२६ अॉक्टोबर, २००८) दिवाळीचा पहिला दिवस. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या दरम्यान तुमच्यापैकी अनेकजण नातेवाईकांच्या घरी किंवा मौजमजेसाठी बाहेरगावी जाणार असतील. काही जण घरीच दिवाळी साजरी करणार असतील. तुम्हाला आणि मलाही थोडासा ब्रेक हवाय. अगदी चार-पाच दिवसांचा. तुम्हाला ही दिवाळी आणि नवीन वर्ष आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो. तोवर तुम्ही मिस केलेल्या पोस्ट्सचा आनंद घेऊ शकता.

तुमच्या माहितीसाठी कोणत्या दिवशी काय आहे, हे पुढे दिले आहे. (सौजन्यः कालनिर्णय)











अॉनलाईन दिवाळी अंकः
ई-सकाळ दीपोत्सव

जाता-जाताः दिवाळीत आपल्या नातेवाईकांना मराठीत ई-ग्रीटिंग पाठवा. त्यासाठी क्विलपॅड या साईटला भेट द्या. वर दिलेले ग्रीटिंग या साईटच्या आधारेच तयार केले आहे. Read the full story

,

न्यू, इम्प्रूव्ह्ड जी-मेल मोबाईल २.०

October 24, 2008 1 comments

तुमच्यापैकी अनेक जण मोबाईलवर ई-मेल पाहण्यासाठी जी-मेल अॅप्लीकेशन वापरत असतील. ज्यांनी अद्याप हे अॅप्लीकेशन वापरले नसेल त्यांच्यासाठी आणि जे वापरत अाहेत, त्यांच्यासाठीही खूषखबर आहे. जी-मेल मोबाईलचे लेटेस्ट व्हर्जन काल लॉंच झाले. या व्हर्जनबद्दल मी आज माहिती देणार आहे.

जी-मेल फॉर मोबाईल २.० असे या नव्या व्हर्जनचे नामकरण करण्यात आले आहे. या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या डेरेक फिलीप्स या अभियंत्याने जी-मेल आणि गुगल मोबाईल ब्लॉगवर या व्हर्जनच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली आहे. या अगोदरच्या व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी होत्या - उदा. स्क्रोलिंगमध्ये अडचणी येत असत, एक वेळी केवळ एकच ई-मेल ड्राफ्ट ठेवता येत असे, एका वेळी एकच जी-मेल अकाऊंट configure करता येत असे वगैरे. नव्या व्हर्जनमध्ये यातील अनेक त्रुटी दूर करून मोबाईलवर कम्प्लीट ई-मेल एक्स्पीरिअंस देण्याचा प्रयत्न केला आहे.



जी-मेल फॉर मोबाईल २.०ची काही वैशिष्ट्येः
१. स्पीड इम्प्रूव्हमेंटः स्क्रीन फ्रीझ होण्याचे प्रकार कमी, पूवर्वीपेक्षा अधिक स्मूद स्क्रोलिंग
२. मल्टिपल अकाऊंट्सः एकावेळी अनेक जी-मेल अकाऊंट्स configure करण्याची सुविधा. अगोदरच्या व्हर्जनमध्ये एकावेळी एकच अकाऊंट वापरता येत असे.
३. अॉफलाईन सपोर्टः सिग्नल नसतानादेखील नव्याने आलेले ई-मेल्स अॅक्सेस करता येतात.
४. मल्टिपल ई-मेल ड्राफ्ट्सः एकावेळी अनेक ड्राफ्ट्स सेव्ह करून ठेवता येतात.
५. शॉर्टकट कीजः QWERTY कीबोर्डचा मोबाईल असल्यास शॉर्टकट कीज वापरता येतात. उदा. Undoसाठी Z, New conversationसाठी k, old conversationसाठी j वगैरे. अधिक शॉर्टकट्ससाठी अॅप्लीकेशनमध्ये जाऊन Menu/Help वर क्लिक करा.
६. ३५ भाषांचा सपोर्टः तुमच्या मोबाईलच्या डिफॉल्ट लॅंग्वेजनुसार जी-मेल फॉर मोबाईल २.० लॅंग्वेज सिलेक्ट करतो. यात हिंदीसह ३५ जागतिक भाषांचा समावेश आहे.

जी-मेल फॉर मोबाईल २.० डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल ब्राऊजरमध्ये जाऊन m.google.com/mail ही लिंक अॅक्सेस करा. तुम्ही अगोदरचे व्हर्जन वापरत असाल तर याच लिंकवर जाऊन नवे व्हर्जन डाऊनलोड करा व अाधीचे व्हर्जन रिप्लेस करा.
Read the full story

,

जस्ट प्रिंटेबल्सः कॅलेंडर्स, लिस्ट्स, गेम्स आणि बरंच काही...

October 23, 2008 0 comments

भविष्य, मेनू, आरोग्य, ज्ञान;
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान

ही कशाची जाहिरात आहे, हे वेगळं सांगायला नको. तुम्ही देशात असा की परदेशात, सण, तिथी, मुहूर्त पाहण्यासाठी कालनिर्णय किंवा तत्सम कोणतेही मराठी कॅलेंडर भिंतीवर असायलाच हवे. काळाबरोबर कालनिर्णयने देखील योग्य निर्णय घेऊन कार कालनिर्णय वगैरे प्रकार बाजारात आणले. असो. नोव्हेंबर, डिसेंबर आला की आपल्याला पुढील वषर्षाच्या कॅलेंडरचे वेध लागता. हल्ली कॉम्प्युटर, मोबाईलमुळे भिंतीवरच्या कॅलेंडरची फारशी गरज भासत नाही. पण तरीदेखील आपल्यापैकी अनेकांना डेस्क कॅलेंडर किंवा पॉकेट कॅलेंडरची सवय असते. आपल्याला हवे तसे, हव्या त्या आकारातले कॅलेंडर बाजारात काही केल्या मिळत नाही.

अशावेळी तुम्ही ई-प्रिंटेबल कॅलेंडर्स ही सेवा वापरू शकता. काही सेकंदात तुम्हाला हव्या त्या महिन्याचे किंवा वषर्षाचे कॅलेंडर हव्या त्या आकारात तयार करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तुम्ही फक्त महिना, वर्ष, आकार आणि रंग निवडायचा, िक्रएट वर क्लिक करायचे आणि तयार कॅलेंडर थेट प्रिंट करून घ्यायचे.



Create:



And print:




याच साईटवर प्रिंट करून घेण्याजोग्या अनेक गोष्टींची यादी आणि तयार टेम्प्लेट्स आहेत. उदा. नेहमी लागणाऱ्या किराणा सामानाची यादी तुम्ही कस्टमाईज करून प्रिंट करू शकता. या शिवाय टू-डू लिस्ट, वीकली प्लॅनर, बॉडी वेट चार्ट, लोन रिपेमेंट चार्ट, फ्लॅश कार्ड्स, गेम्स आदी अनेक गोष्टी यात तुम्हाला सापडतील.
Read the full story

,

कॉम्प्रेस अॉल लिंक्स

October 22, 2008 0 comments

टायनी यूआरएलसारख्या यूआरएल शॉर्टनिंग सेवा तुम्ही नक्कीच वापरत असाल. अशा सेवांच्या उपयुक्ततेबद्दल नव्याने सांगण्यासारखे काही नाही. समोरच्या व्यक्तीस चटकन लक्षात राहील, यासाठी एखादी भली मोठी यूआरएल (लिंक) लहान करण्यासाठी या सेवा वापरल्या जातात. यात चालणाऱ्या स्पधर्धेबद्दल मी या अगोदर माहिती (वाचाः शॉर्ट अॅंड स्वीट) दिलेली आहे. आज मी याच पठडीतल्या आणखी एका भन्नाट सेवेची माहिती देणार आहे.

काही वेळा आपल्याला एका विषयासंबंधीच्या अनेक लिंक्स शेअर करावयाच्या असतात. अशा वेळी जवळपास सर्वच लिंक्स हातभर मोठ्या असतात. त्यातील प्रत्येक लिंक टायनी यूआरएल किंवा तत्सम सेवा वापरून छोट्या करत बसण्यात काही अर्थ नसतो. कारण त्याने कन्फ्युजन (सर्व लिंक्स सारख्याच दिसतात) वाढण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी झिप फाईलसारख्या एकाच लिंकमध्ये सगळ्या लिंक्स कॉम्प्रेस करून देता आल्या तर? येस्स...असे करणे शक्य आहे. श्रिंक टू वन (shrink2one.com) या सेवेचा वापर करून तुम्ही अनेक लिंक्स एका लिंकमध्ये कॉम्प्रेस करू शकता.




उदा. तुम्हाला टेक्नॉलॉजीसंदर्भातील टॉप ५ साईट्सच्या लिंक्स एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करावयाच्या अाहेत. या पाचही साईट्सच्या लिंक्स देण्याएेवजी तुम्ही केवळ खालील लिंक शेअर कराः
http://Shrink2One.com/943
या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित पाचही साईटच्या लिंक्स मिळतील. एवढेच नव्हे तर, त्या साईट्सचे थंबनेल्सही पाहावयास मिळतील. या पद्धतीने कॉम्प्रेस केलेल्या लिंक्स तुम्ही इन्स्टन्ट मेसेंजर्स किंवा एसएमएसवरही शेअर करू शकता.
Read the full story

, ,

राज ठाकरेंचे काय होणार?

October 21, 2008 0 comments

आजचा सबंध दिवस महाराष्ट्रातील लोक राज ठाकरेंकडे लक्ष ठेवून होते. पहाटे अडीच वाजता राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक झाल्यानंतर दुपारी वांद्र्याच्या कोटर्टात आणले. त्यांच्यावर दाखल करण्यात अालेल्या विविध गुन्ह्यांत एका कोटर्टाने त्यांना जामीन दिला, तर एका कोटर्टाने नाकारला. त्यामुळे अगोदरच धास्तावलेले सर्वसामान्य लोक दिवसभर न्यूज चॅनेल्स आणि वेबसाईट्सवर नजर ठेवून होते. साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर अचानक राज ठाकरे कसे अवतरले? हा ब्लॉग कोणी हॅक तर नाही ना केला?

नाही. साधी-सोपी टेक्नॉलॉजी सुरक्षित आहे. केवळ एका नव्या अॉनलाईन सेवेची माहिती करून देण्यासाठी साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर राज ठाकरेंच्या अटकेचे उदाहरण घेतले आहे. काही प्रसंगी आपण वेबसाईट्सला अगदी चिकटून बसतो. १०-१० सेकंदांनी वेबसाईट रिफ्रेश करतो. कारण सतत काही ना काही अपडेट मिळत असतात. पण सतत रिफ्रेश करणं म्हणजे...काही वेळाने कंटाळा यायला लागतो आणि नेमक्या तेवढ्याच वेळात काहीतरी महत्त्वाची घटना घडते. क्रिकेट स्कोअर देणाऱ्या साईट्समध्ये अॉटो रिफ्रेशची सोय असते. बऱ्याच ब्राऊजरमध्येही अॉटो-रिफ्रेशची सोय असते. नसल्यास तसे प्लग-इन्स किंवा अॅड-अॉन्स असतात. उदा. फायरफॉक्ससाठी रिलोड एव्हरी हे अॅड-अॉन उपलब्ध आहे. पण अशी अॅड-अॉन्स वापरल्यामुळे ब्राऊजरमधील सर्व साईट्स सतत रिफ्रेश होत राहतात. याची आपल्याला गरज नसते. केवळ न्यूज साईट्स किंवा सतत अपडेट होणाऱ्या साईट्स रिफ्रेश व्हाव्यात, ही आपली गरज असते. त्यावेळी तुम्ही साईट रिलोडर ही अॉनलाईन सेवा वापरू शकता.




साईट रिलोडरमध्ये तुम्हाला हव्या त्या साईट्सची यादी तुम्ही तयार करून ठेवू शकता. साईट रिलोडरवर साईन इन होण्यासाठी तुम्ही गुगलचे अकाऊंट वापरू शकता. साईन इन झाल्यानंतर तुम्ही हव्या त्या साईटची यादी तयार करून सेव्ह करू शकता. साईट रिलोडर वापरण्यापूवर्वी पॉप-अप ब्लॉकर डिअॅक्टिव्हेट करावे लागेल किंवा अॉल्वेज अलो पॉप-अप्स फ्रॉम साईट रिलोडर असा अॉप्शन वापरावा लागेल. एखादी साईट किती वेळाने रिफ्रेश व्हावी, यासाठी तुम्ही पाच सेकंदांपासून ३० मिनिटांपर्यंतचा पयर्याय निवडू शकता.
Read the full story

,

झटपट आणि मोफत बिझनेस कार्ड!

October 20, 2008 0 comments

स्वतःचा व्यवसाय असल्यास बिझनेस कार्ड किंवा व्हिजिटिंग कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण आपल्याला हवं तसं बिझनेस कार्ड तयार करायचं म्हटलं की डिझायनिंग कॉस्ट आली. बऱ्याचशा नवउद्योजकांचा कल खर्च कमी करण्याकडे असतो. तथापि, समोरच्या व्यक्तीवर (आणि ती व्यक्ती पोटेंशियल क्लाएंट असेल तर) छाप पाडण्यासाठी तुमचे व्यक्तीमत्त्व आणि बिझनेस कार्ड यांचा सवर्वाधिक उपयोग होतो. आजच्या पोस्टमधील सेवांचा आधार घेऊन तुम्ही अगदी दहा मिनिटांत तुमचे बिझनेस कार्ड तयार करू शकता.

१. बिझनेस कार्ड लॅंड


तुम्हाला तुमच्या अलाईड अॅक्टीव्हिटीजसाठी - म्हणजे सामाजिक सेवा, एखाद्या संस्थेतील सदस्यत्त्व, फ्रीलान्सिंग, हॉबीज वगैरे - कार्ड तयार करायचे असल्यास बिझनेस कार्ड लॅंड ही साईट उपयोगाची ठरते. यात ठराविक बिझनेस कार्डसाठीची ठराविक टेम्प्लेट्स आहेत. काही अत्यंत साधी तर काही डिझायनर टेम्प्लेट्स उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यातील कोणतेही टेम्प्लेट निवडून स्टॅंडर्ड अमेरिकन किंवा स्टॅंडर्ड इंटरनॅशनल साईजमध्ये तुम्ही बिझनेस कार्ड तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे पर्सनल डिटेल्स एंटर करून कार्ड पूर्ण करू शकता. या सेवेतून तयार झालेले पीडीएफ रेडी टू प्रिंट असते. ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागत नाही

२. डे (Deyey)


तुमच्या कंपनीचा लोगो वापरून किंवा तुमची क्रिएटिव्हिटी वापरून कार्ड डिझाईन करायचे असल्यास तुम्ही डे ही सेवा वापरून शकता. ही सेवा म्हणजे पॉवरपॉईंटसारखी आहे. पॉवरपॉईंटची स्लाईड करताना आपण ज्याप्रमाणे इमेजेस, टेक्स्ट प्लेस करून आपल्याला हवं तिथे हलवू शकतो अगदी तसेच कन्ट्रोल्स वापरून आपण डेमध्ये आपले बिझनेस कार्ड तयार करू शकतो. तयार झालेले बिझनेस कार्ड जेपीजी फॉरमॅटमध्ये सेव्ह करता येते. ही फाईलदेखील रेडी टू प्रिंट असते. ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते.

लोगो तयार करण्यासंबंधीच्या टिप्ससाठी वाचाः उत्तम लोगो तयार करण्यासाठी...
Also read:
How to design business cards?
How important are business cards?

Read the full story

,

इमेजेससाठी ‘वेट’ रिडक्शन Formula!

October 18, 2008 0 comments

एखादी साईट अोपन होताना खूप वेळ लागला तर समजायचं की त्या साईटवर खूप हेवी फाईल्स आहेत. या सर्व फाईल्स डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागतो. टेक्स्टची साईज इतर कन्टेन्टपेक्षा कमी असते. इमेजेसची साईज कमी न केल्यास वेबसाईट ओपन होण्यास वेळ लागतो. सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील इमेजेस अपलोड करताना फाईल साईज अमूक एमबीपर्यंत असावी असा मेसेज दिला जातो. त्याहून अधिक साईजच्या इमेजेस अॅक्सेप्ट केल्या जात नाहीत. इमेजेसची फाईल साईज कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचा दजर्जा कमी होऊ शकतो. पण दजर्जा कमी न करतादेखील ‘हेवी’ इमेजेसचे ‘वजन’ कमी करता येते...

स्मश ईट ही सेवा वापरून आपण इमेजेसची फाईल साईज कमी करू शकतो. या सेवेचा फायदा म्हणजे फाईलचा दजर्जाही कायम राहतो आणि फाईल साईज किती टक्क्यांनी कमी झाली हे कळते. फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरून तुम्ही या गोष्टी लीलया करू शकता. पण त्यात इमेजचा दजर्जा घसरण्याची शक्यता असते. स्मश ईटमध्ये विशिष्ट इमेज अॉप्टिमायझेशन तंत्रज्ञान वापरून बाईट्स रिड्यूस केले जातात. त्यामुळे इमेजच्या व्हिज्युअस क्वालिटीला धक्का लागत नाही. स्मश ईटचा वापर तीन मागर्गांनी करता येतोः
१. स्मश ईटवर जाऊन एक किंवा अनेक इमेजेस अपलोड करणे
२. इमेज कुठे होस्ट केलेल्या असतील तर त्यांच्या लिंक्स देणे
३. फायरफॉक्स एक्स्टेंशनचा वापर करून इमेज साईज कमी करणे.




साईज कमी केलेल्या इमेजेस तुम्ही झिप स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता. वेबसाईट डिझायनर्स किंवा अपलोडर्स यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयोगी ठरते.
Read the full story

युजरनेम क्रायसिस!

October 16, 2008 0 comments

Desired Username: coolguy2008

coolguy2008 is not available, but the following usernames are:
coolguy183
coolguy665
coolguy454
coolguy934

coolguy2008 हे युजरनेम उपलब्ध नसल्यामुळे जी-मेलने दिलेले हे अॉप्शन्स पाहून शैलेशला हसावे की रडावे हे कळेना. आपल्याबाबतीतही असे अनेकदा घडते. आपल्याला एका ठराविक युजरनेमची सवय झालेली असते. त्यामुळे आवश्यक त्या सर्व सेवांसाठी रजिस्ट्रेशन करताना आपण तेच युजरनेम वापरण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या ठिकाणी हवे ते युजरनेम उपलब्ध नसल्यास अगदी किरकोळ बदल करून आपण तेच युजरनेम वापरतो. पण असे काहीतरी भलतेच अॉप्शन आल्यास काय करणार?

युजरनेमचेक या सेवेचा वापर करून आपल्याला हवे ते युजरनेम कोण-कोणत्या सेवेसाठी उपलब्ध आहे, हे एका ठिकाणी चेक करू शकतो. म्हणजे त्यासाठी प्रत्येक साईटवर जाऊन availability चेक करण्याची गरज नाही. आता आपण coolguy2008 हेच युजरनेम कुठे-कुठे उपलब्ध आहे ते चेक करू.



युजरनेमचेक डॉट कॉमवर जाऊन तेथे केवळ तुम्हाला चेक करावयाचे असलेले युजरनेम एंटर करा. सुमारे ६८ सोशल शेअरिंग, सोशल बुकमार्किंग, सोशल नेटवर्किंग आणि ई-मेल साईट्सवर संबंधित युजरनेम उपलब्ध आहे किंवा कसे याची माहिती लगेचच तुम्हाला मिळते. प्रत्येक साईटवरून डेटा फेच करून ही माहिती पुरवली जाते. यासाठी किमान २ ते ३ मिनिटे लागतात.
त्यानंतर तुम्ही युजरनेम बदलण्याचा विचार करू शकता किंवा ज्या साईट्ससाठी ते युजरनेम उपलब्ध आहे त्यावर रजिस्टर होऊ शकता.
Read the full story

, ,

फ्रेश वॉलपेपर्स!

October 15, 2008 0 comments

तुमच्यापैकी अनेकांकडे आयफोन किंवा आयपॉड टच असेल. मोबाईल फोनवर नवे, फ्रेश वॉलपेपर टाकण्यासाठी आपण कायम उत्सुक असतो. त्यामुळे एखाद्याकडे सुंदर वॉलपेपर दिसला की लगेच तो ब्लुटूथवरून ट्रान्स्फर करून घेतो. आयफोन किंवा आयपॉड टचमध्ये ब्लुटूथची सुविधा नसल्यामुळे आयट्यून्स चा वापर करून डेटा ट्रान्स्फर करावा लागतो. आयफोनची स्क्रीन साईज इतरांपेक्षा मोठी असल्याने सर्वसाधारण इमेजेस वॉलपेपर म्हणून वापरता येत नाहीत. त्यासाठी इमेज रिसाईज करून घ्यावी लागते. पण आज मी तुम्हाला आयफोन, अायपॉड आणि इतर सर्व मोबाईल फोनसाठी वापरता येण्यासारख्या वॉलपेपर्सच्या खजिन्याची किल्ली देणार आहे.

पूल्गा या वेबसाईटवर तुम्हाला आयफोन आणि आयपॉडसाठी तयार केलेले असंख्य वॉलपेपर्स मिळतील.
हौशी कलाकारांनी तयार केलेले वॉलपेपर्स या साईटवरून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता. संबंधित वॉलपेपर आयफोन किंवा आयपॉड टचवर घेण्यासाठी आयट्यून्सला जोडून सिंक्रोनाईज करा आणि फोटोज आयकॉनवर क्लिक करून वॉलपेपर म्हणून सेट करू शकता. तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्हीदेखील तुमच्या कलाकृती पूल्गावर ठेऊ शकता. त्यासाठी तुमच्याकडे इन्व्हिटेशन लागते. इन्व्हिटेशनसाठी इथे क्लिक करा.



हे झाले आयफोन आणि आयपॉड टचसाठी. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे आयफोन नाही. आम्ही काय करायचे? त्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही मोबोपिक या सेवेचा वापर करून आयफोनसाठी तयार केलेले वॉलपेपर तुमच्या मोबाईलच्या आकारात रिसाईज करून वापरू शकता. मोबोपिकच्या डिरेक्टरीत तुमचा फोन नसेल तर अगोदर फोनची स्क्रीन साईज (पिक्सेल्स) माहित करून घ्या. त्यानंतर पिक्सलर या सेवेचा वापर करून संबंधित वॉलपेपर रिसाईज किंवा क्रॉप करून तुमच्या फोनसाठी कन्व्हर्ट करा.

पूल्गावरून डाऊनलोड केलेली इमेज



िपक्सलर वापरून नोकिया E71साठी कन्व्हर्ट केलेली इमेज (३२० बाय २४० पिक्सेल्स)


Read the full story

,

न्यू, एम्प्रूव्ह्ड १२३ ग्रीटिंग्ज!

October 14, 2008 2 comments

तुम्ही पोस्टाने पाठवलेलं शेवटचं दिवाळी ग्रीटिंग आठवतंय? साधारण तीन वषर्षांपूवर्वी मी पोस्टाने शेवटचं दिवाळी ग्रीटिंग पाठवलं होतं. त्यानंतर दसरा, दिवाळी, वाढदिवस, अॅनिव्हर्सरी आदी प्रसंगी ग्रीटिंग पाठवतो, पण अॉनलाईन! अॉनलाईन ग्रीटिंग पाठवण्यासाठी शेकडो सेवा उपलब्ध आहेत, पण सवर्वांना माहित असलेली आणि सवर्वाधिक वापरली जाणारी सेवा म्हणजे १२३ग्रीटिंग्ज डॉट कॉम. या साईटने यंदा कात टाकली आहे.



वेब २.० तंत्रज्ञानाचा वापर करून रिडिझाईन केलेल्या १२३ग्रीटिंग्ज डॉट कॉमने इरिटेटिंग पॉप-अप आणि पॉप-अंडर अॅड्सना रामराम ठोकला आहे. या माध्यमातून उत्पन्न मिळत असले तरी पॉप-अप आणि पॉप-अंडर अॅड्समुळे तुमच्याकडे येणाऱ्या युजर दुरावण्याची शक्यता असते. १२३ग्रीटिंग्ज डॉट कॉमचा वापर करून सुमारे १२ कोटी लोक एकमेकांना ग्रीटिंग्ज पाठवत असतात. या सवर्वांना अधिक चांगला एक्स्पीरिअंस देण्यासाठी कंपनीने अनेक नवी फीचर्स अॅड केली आहेत.

सुटसुटीत मांडणी, विविध प्रसंगांसाठी उपलब्ध असलेल्या ग्रीटिंग्जचे व्यवस्थित वगर्गीकरण, प्रत्येक ग्रीटिंग कार्डवर मत मांडण्याची सुविधा, रेटिंग्ज, ब्लॉग किंवा साईटमध्ये एम्बेड करण्याची सोय, पर्सनलाईज्ड काडर्ड्स, कूल टूल्स आदी विविध फीचर्समुळे ही साईट अधिक आकर्षक झाली आहे. कमीत-कमी स्टेप्समध्ये ग्रीटिंग कसे पाठवता येईल, यावर कंपनीने भर दिला अाहे.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा!


Send this eCard !



Also Read: Nokia's Diwali Dhamaka!
Read the full story

,

टेन्शन फ्री ट्रॅव्हल

October 13, 2008 0 comments


तुम्हाला भटकंती करायला आवडतं? आवडत असल्यास तुमच्यासाठी एका भन्नाट साईटची माहिती मी आज देणार आहे. तुम्हाला एखाद्या ठिकाणी व्हॅकेशन किंवा बिझनेससाठी जायचं असेल तर तुम्ही अगोदर इंटरनेटवर सर्च करून संबंधित ठिकाणाबद्दल आवश्यक ती माहिती गोळा करता. त्या ठिकाणापर्यंत जाण्याचे मार्ग, हवामान, हॉटेल्स, ट्रान्स्पोर्ट, बाजार, सेफ्टी आदी सगळ्या गोष्टी आपल्याला विविध साईट्सवरून किंवा ब्लॉग्जवरून गोळा कराव्या लागतात. ही सर्व माहिती एका ठिकाणी मिळाली तर?

विकास, संजय आणि करन या तीन तरुणांनी मिळून मस्ट सी इंडिया ही साईट लॉंच केली आहे. या साईटचे प्रमोशन झाले नसल्यामुळे ती अजून फारशी लोकप्रिय झालेली नाही. तथापि, या साईटची उपयुक्तता पाहता ती लवकरच लोकप्रिय होईल असे वाटते. भारतात कुठेही पर्यटनास जाणाऱ्या व्यक्तीस टेन्शन फ्री ठेवण्याच्या उद्देशाने या तिघांनी मस्ट सी इंडिया ही साईट डेव्हलप केली.



ही साईट सध्या बीटा फेजमध्ये असल्याने यावर रजिस्टर होण्यासाठी इन्व्हिटेशन लागणार आहे. तुम्ही इन्व्हिटेशनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकता. त्यासाठी इथे क्लिक करा. रजिस्ट्रेशन न करता देखील या साईटवरील माहिती अॅक्सेस करता येते. यात विविध राज्यातील पर्यटनस्थळांची यादी आहे. त्यापुढे ते स्थळ कोणत्या गटात मोडते (उदा. तीर्थक्षेत्र, थंड हवेचे ठिकाण, समुद्रकिनारा इ.) तेही दिलेले आहे. संबंधित ठिकाणावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणाबद्दलची सर्वसाधारण माहिती, तेथील विशेष अाकर्षणे, हवामान, जाण्याचे मार्ग, नकाशे, फोटो आणि ट्रॅव्हल ब्लॉग्ज आदी सर्व माहिती एका पेजवर मिळते. तेथील आकर्षणांची कॅटेगरीवाईज लिस्टही पाहायला मिळते. त्यावरून तुम्ही काय पाहायचे हे ठरवू शकता. शिवाय त्या ठिकाणाजवळ असणाऱ्या इतर पर्यटनस्थळांची माहितीही मिळते. एक-दोन दिवसांत जाऊन येण्यासारख्या वीकेन्ड गेटवेजचादेखील स्वतंत्र सेक्शन यात आहे.

मस्ट सी इंडियातून केवळ भारतातील पर्यटनस्थळांची माहिती मिळते. परदेशातील पर्यटनस्थळांची अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एनट्रिप या साईटला भेट देऊ शकता. लंडनस्थित एनट्रिप या कंपनीने पुण्यात अापले डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे.

Read the full story

भली मोठी रिसर्च ई-लायब्ररी!

October 11, 2008 0 comments

कल्पना करा की, तुम्ही एखाद्या विषयावर रिसर्च करत अाहात आणि तुमच्या विषयाशी संबंधित एक रिसर्च पेपर अमूक एका साईटवर उपलब्ध आहे, अशी मािहती तुम्हाला एका मित्राने दिली. तुम्ही म्हणाल काहीही कर पण मला त्या साईटचं नाव सांग. त्यावेळी नेमकं त्याला त्या साईटचं नाव आठवत नाही. तो काहीतरी उलटं-सुलटं नाव सांगतो. भलतीच साईट ओपन झाल्याने तुमची फजिती होते. एकूण काय तर, उपयुक्त माहिती असूनही एेनवेळी सापडत नाही. रिसर्चच्या बाबतीत असं कायम होतं. अनेकवेळा बिनकामाची माहिती समोर येते. तासभर सर्च केल्यानंतर चार ओळी हातास लागतात. तुमच्यासारख्या रिसर्चरसाठी माहितीचा खजिना म्हणजे सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क.

एसएसआरएन अथर्थात सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क म्हणजे सुमारे दीड लाखांहून अधिक रिसर्च पेपरची ई-लायब्ररी. जरा खालील आकडेवारीवर नजर टाका...म्हणजे तुम्हाला या नेटवर्कच्या ताकदीचा अंदाज येईल.



सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क १६ विषयांत विभागलेले आहे. अकाउंटींग, इकॉनॉमिक्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट आदी विषयांतील सुमारे एक लाखाहून अधिक रिसर्चर्सने केलेले काम या नेटवर्कमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. यातील बहुतांश रिसर्च पेपर्स डाऊनलोड करता येऊ शकतात. काही मोजके पेपर्स तुम्हाला विकत घ्यावे लागतात. तुम्हाला हव्या त्या रिसर्च कॅटेगरीत जाऊन तुम्ही कीवर्डने क्विकसर्च करून त्या विषयातील रिसर्च वर्क पाहू शकता.



संबंधित पेपर कोणी आणि कधी सबमिट केला आहे, तो आतापर्यंत किती जणांनी डाऊनलोड केला आहे, आदी माहिती यावर उपलब्ध असते. सोशल सायन्स रिसर्च नेटवर्कवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही अनेक फीचर्स वापरू शकता. तुमचे रिसर्च पेपरही तुम्ही सबमिट करू शकता.

Read the full story

World’s Best Presentations!

October 10, 2008 0 comments

पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करणे ही खरंच एक कला आहे. मोजक्या शब्दात प्रभावीपणे मेसेज पोचवणे आणि आपल्या प्रेझेंटेशनची प्रेक्षकांवर छाप पाडणे हे सर्वांनाच जमत नाही. स्लाईडशेअर या प्रेझेंटेशन शेअरिंग साईटने आयोजित केलेल्या World’s Best Presentation Contest 2008 यातील विजेत्यांची प्रेझेंटेशन्स पाहिल्यानंतर आपण थक्क होऊन जातो.

विषयांची निवड, मांडणी, संदेश आदी निकषांवर जगप्रसिद्ध ब्लॉगर, कम्युनिकेशन आणि डिझाईन एक्स्पटर्ट्सने विजेत्यांची यादी जाहीर केली. एकूण सहा कॅटेगरीत (Business, Picture Slideshows, Technology, Educational, Creative / Offbeat, About Me) ही स्पर्धा घेण्यात आली होती. यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारविजेती प्रेझेंटेशन्स एकदा तरी पाहावीत अशीच आहेत.
प्रथम

THIRST
View SlideShare presentation or Upload your own. (tags: crisis design)


द्वितीय
Foot Notes
View SlideShare presentation or Upload your own. (tags: design inspirational)


तृतीय
Zimbabwe in Crisis
View SlideShare presentation or Upload your own. (tags: refugee hyperinflation)


कॅटेगरीवाईज बेस्ट प्रेझेंटेशन्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

प्रोफेशनल ‘अॉनलाईन’ फोटो-एडिटर...

October 9, 2008 0 comments

मध्यंतरी माझा एक मित्र मला सांगत होता की त्याने गेल्या दीड-दोन महिन्यांत मायक्रोसॉफ्ट अॉफिसपेक्षा गुगल डॉक्सचाच अधिक वापर केला आहे. डेस्कटॉप अॅप्लीकेशन्सपेक्षा वेब अॅप्लीकेशन्स अधिक लवचिक असतात. त्यात शेअरिंगसारख्या सुविधा मिळतात. त्यामुळे आजकाल अनेक जण विविध वेब अॅप्लीकेशन्स वापरताना आढळून येतात. मागे मी मोबाईल वॉलपेपर आणि प्रोफाईल पिक्चर तयार करण्यासाठी दोन वेब अॅप्लीकेशन्सची माहिती दिली होती. त्याचा वापर केल्यानंतर तुम्हालाही वेब अॅप्लीकेशन्सचे महत्त्व पटले असेल. आज मी अॉनलाईन फोटो एडिटिंगच्या काही वेब अॅप्लीकेशन्सची माहिती देणार आहे.

अनेकवेळा आपल्याला फोटो एडिट करण्याची गरज भासते. पण आपण प्रोफेशनल फोटोग्राफर किंवा ग्राफिक डिझायनर नसल्यामुळे त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअर (उदा. फोटोशॉप) आपल्याकडे नसते. असले तरी त्याचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती नसते. अशावेळी आपण अॉनलाईन फोटो एडिटिंग अॅप्लीकेशन्स वापरू शकतो. विशेष म्हणजे पुढे दिलेली सर्व अॅप्लीकेशन्स मोफत वापरता येतात.

पिक्सलरः
फोटोशॉपसारखाच युजर इंटरफेस असणारे हे फ्लॅश वेब अॅप्लीकेशन आहे. बहुतांश टूल्स फोटोशॉपमधील टूल्सप्रमाणेच आहेत. त्यामुळे फोटोशॉपची बेसिक माहिती असल्यास वापरण्यात अत्यंत सोपे.


स्प्लॅशअपः हे देखील फ्लॅश वेब अॅप्लीकेशन आहे. यातून तुम्ही फेसबुक, फ्लिकर, पिकासा, किंवा तुमच्या वैयक्तिक वेबसाईटवरील इमेजेस थेट एडिट करू शकता. याचा इंटरफेसही फोटोशॉपशी मिळता-जुळता आहे.


फिनिक्सः अॅव्हिअॅरी कंपनीने लॉंच केलेल्या या वेब-बेस्ड इमेज एडिटरमध्ये इतरांपेक्षा अधिक फीचर्स आहेत. अॅव्हिअरीचीच पिकॉक, रॅव्हन आणि टोकन ही तीन इतर अॅप्लीकेशन्स वापरून अगदी प्रोफेशनल क्वालिटी इमेज एडिटिंग करणे शक्य होते.


पिक्सरः
क्रॉप, रिसाईझ, फ्लिप, रोटेट आणि इफेक्ट्स एवढी मोजकी फीचर्स हवी असतील तर तुम्ही पिक्सर वापरू शकता. इमेज क्रॉपिंग आणि रिसायजिंगसाठी हे अॅप्लीकेशन सर्वोत्तम आहे.

72फोटोजः अॉनलाईन एडिट करून अॉनलाईन स्टोअर करण्यासाठी ही उत्तम सेवा आहे.

आणखी काही फोटो एडिटिंग वेब अॅप्लीकेशन्सः
फोटो फ्लेक्सर
सुमोपेंट
पिकमॅजिक
पिकनिक

Thanks Jacob
Read the full story

, ,

अनोळखी मोबाईल नंबर कसा लोकेट कराल?

October 7, 2008 2 comments

सकाळी-सकाळी कुठूनतरी कॉल आल्याने शैलेशची झोपमोड झाली. पुन्हा झोप लागते न लागते तो पुन्हा एकदा कॉल. उचलेपर्यंत कट झाल्याने शैलेशने त्या अनोळखी मोबाईल नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने रिस्पॉन्स न दिल्याने त्याला काही कळेना. अशा सिच्युएशनमध्ये आपण बऱ्याचवेळा सापडतो. अनोळखी नंबर. कोण असेल? कुठून फोन केला असेल? कशासाठी फोन केला असेल? आपला फोन का उचलला नसेल? अशा अनेक शंका उपस्थित होतात. तो नंबर कुठला आहे, हे कळाले तरी आपण किमान एका दिशेने विचार करू शकतो. पण तसा कोणताच क्लू न मिळाल्याने अस्वस्थता आणखीच वाढत जाते. शैलेशकडे मात्र त्यावर एक उपाय होता.

मोबाईल नंबर लोकेटर हे छोटेसे अॅप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करून भारतातील कोणताही मोबाईल नंबरचा ट्रेस तुम्ही लावू शकता. उदा. तुम्हाला ९००४५xxxxx या नंबरवरून फोन आला आणि कट झाला किंवा त्यावरून एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते आहे. सदर नंबर कोणत्या कंपनीचा आणि कोणत्या महानगरातील किंवा राज्यातील आहे, हे तुम्हाला मोबाईल नंबर लोकेटरच्या आधारे शोधून काढता येईल. तुमचा फोन जावा टेक्नॉलॉजीला सपोर्ट करत असेल तर याचे अॅप्लीकेशन तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. अन्यथा www.internet4mobile.com या साईटवरूनही तुम्ही नंबर लोकेट करू शकता. आलेल्या नंबरमधील पहिले चार डिजिट्स एंटर करताच तुम्हाला पुढील माहिती मिळेल:
Mobile Code : 9004
State : Maharashtra
City : Mumbai
Service Provider : Airtel [ GSM ]



सदर नंबर कुणाचा आहे, हे शोधून काढण्यासाठी मात्र संबंधित मोबाईल कंपनीचाच आधार घ्यावा लागेल. ज्यांचे मोबाईल हॅंडसेट्स कम्पॅटिबल नसतील ते लोक थेट साईटवरून मोबाईल नंबर लोकेट करू शकतात. याचप्रमाणे लॅंडलाईनवरून आलेला अनोळखी नंबर शोधून काढण्यासाठी याच साईटवर एसटीडी कोड फाईंडरही उपलब्ध आहे.
Read the full story

गो ग्रीनः यूज अॉनलाईन व्हाईटबोर्ड

October 6, 2008 1 comments

बोर्डरूम मिटिंग्ज म्हणजे काही वेळा अत्यंत सिरीयस तर काही वेळेला मजेशीर अशा असतात. कंपनीच्या स्वभावानुसार बोर्डरूम मिटिंग्जचे स्वरूप बदलते. आयटी कंपन्यांतील मिटिंग रूम्स आणि एखाद्या केमिकल फॅक्टरीतील मिटिंग रूम यांच्यात प्रचंड मोठे अंतर असते. पण मिटिंग रूम म्हटलं की दोन गोष्टी कॉमन असतात. एक म्हणजे प्रोजेक्टर आणि दुसरी म्हणजे व्हाईटबोर्ड. मिटिंगरूमसाठी मस्ट असणाऱ्या या दोन गोष्टी. पण ज्या कंपन्या आकाराने लहान असतात किंवा एखाद्या खोलीतून किंवा फ्लॅटमधून चालवल्या जातात त्यांना एवढी चैन परवडणारी नसते. अशा लोकांसाठी आज मी काही अॉनलाईन व्हाईटबोडर्ड्स संदभर्भात माहिती देणार आहे.
अॉनलाईन व्हाईटबोर्ड म्हटलं की प्लेन व्हाईटबोर्ड असं नाही. व्हाईटबोर्डची बेसिक फीचर्स या साईट्समध्ये आहेतच; परंतु अॉनलाईन कोलॅबरेशन टूल्स म्हणून या सेवांचे महत्त्व अधिक आहे. कल्पना करा की तुम्ही मिटिंगमध्ये प्रेझेंटेशन देत आहात. तुमच्या बॉसने त्यातील एका मुद्द्यावर काही शंका उपस्थिक केल्या आहेत. आता त्याचे स्पष्टीकरण देताना तुम्हाला व्हाईटबोर्डचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आधी प्रेझेंटेशन क्लोज करणार. त्यानंतर लाईट्स अॉन करणार. मग व्हाईटबोर्डकडे जाणार. मार्कर्स शोधणार आणि मग स्पष्टीकरणे देण्यास सुरवात करणार. त्यानंतर पुन्हा लाईट्स अॉफ करून जागेवर येणार व प्रेझेंटेशन पुढे सुरू करणार. या सगळ्या स्टेप्स एका प्रेझेंटेशनदरम्यान चार-पाच वेळा कराव्या लागल्या तर?



हे टाळण्यासाठी तुम्ही अॉनलाईन व्हाईटबोडर्ड्स आणि कोलॅबरेशन टूल्सचा वापर करू शकता. या सेवा अॉनलाईन असल्याने तुम्ही संबंधित साईटवर जाऊन थेट व्हाईटबोर्डचा वापर करू शकता. व्हाईटबोर्ड वापरण्यासाठी आवश्यक ती सर्व टूल्स (पेन, ब्रश, इरेझर, शेप्स, टेक्स्ट इ.) उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला काहीही ड्रॉ करता येते. थोडक्यात सर्वसाधारण व्हाईटबोर्डसारखा या व्हाईटबोर्डचा वापर करता येतो आणि त्यासाठी सतत उठबसही करावी लागत नाही. तुम्ही प्रेझेंटेशन स्विच करून अॉनलाईन व्हाईटबोर्ड प्रोजेक्ट करू शकता. याचा आणखी एक फायदा म्हणजे या तुम्ही तुमचा व्हाईटबोर्ड इतरांशी शेअर करून अॉनलाईन मिटींग घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर तुम्ही इतर ठिकाणी बसलेल्या तुमच्या सहकाऱ्यांना अॅड करून व्हॉईस कॉन्फरन्सही करू शकता. त्याचवेळी व्हाईटबोर्डचा वापर करणेही शक्य होते आणि फाईल्सही ट्रान्स्फर करता येतात.
खालीलपैकी कोणतीही सेवा तुम्ही ट्राय करून पाहू शकताः

डॅबलबोर्ड

ट्विडला
बुक्गू
स्क्रिबलिंक
स्टिक्सी

यातील बहुतांश सेवांची प्रीमियम व्हर्जन्स पेड स्वरूपात उपलब्ध आहेत.
साधी-सोपी टेक्नॉलॉजी सजेस्ट्सः ट्विडला
Read the full story

, ,

हवे ते म्युझिक करा चुटकीसरशी रेकॉर्ड!

October 3, 2008 3 comments

Web 18 च्या In.com या नव्या पोर्टलच्या जाहिराती तुम्ही सध्या पाहत असाल. टेलिव्हिजन आणि अॉनलाईन मीडियातून या पोर्टलचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. अॉडिओ, व्हिडीओ, गेम्स, मेल, न्यूज, सर्च अशा सर्व गोष्टी एका ठिकाणी आणून अधिकाधिक लोकांच्या जवळ जाण्याचा In.com चा प्रयत्न दिसतोय. असो. ही साईट एक्स्प्लोअर करताना मला आजच्या पोस्टचा विषय सुचला. तो म्हणजे स्ट्रिमिंग रेकॉर्डरचा - अथर्थात अॉनलाईन प्ले होणारे गाणे रेकॉर्ड करून एमपीथ्री किंवा इतर फॉरमॅटमध्ये सेव्ह करणारी सेवा (किंवा अॅप्लीकेशन).

यापूवर्वीच्या एका पोस्टमध्येमी गाणी डाऊनलोड न करता अॉनलाईन एेकण्याबद्दल (वाचा - नवे धोरणः एेका आणि विसरा) माहिती दिली होती. काही वेळा एखादे गाणे आपल्याला डाऊनलोड करून हवे असते किंवा त्याचा दुसरीकडे कुठेतरी वापर करावयाचा असतो. त्यासाठी संबंधित गाण्याची एमपीथ्री फाईल आपल्याजवळ असावी लागते. काही वेळा एखाद्या व्हिडिओमधील विशिष्ट म्युझिक पीस आपल्याला हवा असतो आणि तो व्हिडिओ डाऊनलोडेबल नसतो. अशा वेळी अॉनलाईन प्ले होणारा कोणताही आवाज रेकॉर्ड करणाऱ्या दोन सेवा आपण वापरू शकतो.

फ्रीकॉर्डर टूलबारः



याहू किंवा गुगल टूलबारप्रमाणे फ्रीकॉर्डर टूलबार फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. फ्रीकॉर्डर टूलबार विंडोजच्या सर्व व्हर्जन्सवर (व्हिस्टासह) इंटरनेट एक्स्प्लोअरर आणि फायरफॉक्स या ब्राऊजरमध्ये वापरता येऊ शकतो. साऊंडकार्डच्या साह्याने फ्रीकॉर्डर स्ट्रिमिंग साऊंड्स रेकॉर्ड करण्याचे काम करतो. मायक्रोफोन आणि लाईन-इन इनपुट वापरूनही रेकॉर्ड करणे शक्य आहे. फ्रीकॉर्डर टूलबार इन्स्टॉल केल्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन रेकॉर्डिंग सोर्स सिलेक्ट करा.



या ठिकाणी Record From Freecorder Audio Driver हा अॉप्शन डिफॉल्ट सेट केलेला असेल. हा अॉप्शन वापरून तुमच्या स्पीकरमधून येणारा कोणताही आवाज तुम्ही रेकॉर्ड करू शकता. इतर सोर्स वापरायचे असल्यास हा अॉप्शन डिसिलेक्ट करून इतर दोन अॉप्शन्सपैकी एक सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अाऊटपूट फॉरमॅट (एमपीथ्री किंवा डब्लूएव्ही) आणि डेस्टिनेशन आदी अॉप्शन्स निवडा. आता तुम्ही एखादे गाणे स्ट्रीम करून रेकॉर्डवर क्लिक करा. साऊंड म्यूट करूनही तुम्ही गाणे रेकॉर्ड करू शकता. स्टॉप म्हटल्यावर निवडलेल्या फॉरमॅटमध्ये फाईल सेव्ह होईल.

फ्रीकॉर्डर टूलबार डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डरः




ब्राऊजरबेस्ड रेकॉर्डर नको असल्यास किंवा ब्राऊजरमध्ये टूलबार्सची गदर्दी नको असल्यास तुम्ही डेस्कटॉप अॅप्लीकेशन वापरू शकता. स्ट्रिमिंग साऊंड्स रेकॉर्ड करण्यासाठी एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डरचा वापर करता येतो. तथापि, गाणे रेकॉर्ड करताना साऊंड म्यूट करता येत नाही. स्ट्रिमिंग साऊंड रेकॉर्ड करण्यापूर्वी सोर्स सेटिंग्जमध्ये जाऊन स्टिरिओ मिक्स हा अॉप्शन सिलेक्ट करा. रेकॉर्डिंग संपल्यावर स्टॉपवर क्लिक करा. आता तुम्ही रेकॉर्डेड साऊंड एमपीथ्री किंवा डब्लूएव्ही फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकता.

एमपीथ्री माय एमपीथ्री रेकॉर्डर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story