मॅजिक ट्रान्स्फरची जादू!

July 31, 2008 0 comments

क्लाएंटसमोर प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी शैलेशने लॅपटॉप काढला आणि अॉन करण्याचा प्रयत्न केला. तो अॉन झाला नाही. त्याला वाटलं बॅटरी डाऊन असेल. त्याने चार्जर लावून पुन्हा अॉन करण्याचा प्रयत्न केला. तरीही काही झालं नाही. आता मात्र त्याला घाम फुटला. सर्व डेटा, सेटिंग्ज, बुकमार्क, अाऊटलूक मेल्स सारं काही त्यात होतं. आता जर याला काही झालं, तर सगळं संपल्यात जमा होतं. आणि नेमकं तसंच झालं. लॅपटॉप फॉरमॅट करावा लागेल, असं आयटी डिपार्टमेंटने सांगितलं. त्यासाठी किमान दोन दिवस तरी लॅपटॉप त्यांच्याकडे ठेवावा लागणार होता. आता हे दोन दिवस त्याला डेस्कटॉपवर काम करावं लागणार होतं. पण त्याच्याकडील डेटाशिवाय आणि सेटिंग्जशिवाय त्याला काम करणं शक्यच नव्हतं. अशावेळी मॅजिक ट्रान्स्फर हे फ्री सॉफ्टवेअर कामास येतं.

काही कारणानिमित्त लॅपटॉप किंवा डेस्कटॉप फॉरमॅट करावा लागला किंवा बदलावा लागला किंवा तुम्ही अॉफिसमध्ये एक आणि घरी एक डेस्कटॉप वापरत असाल तर फाईल्स, ब्राऊजर बुकमार्क, विंडोजमध्ये केलेल्या सेटिंग्ज, महत्त्वाच्या फाईल्स आदी गोष्टी सिंक्रोनाईझ करून ठेवणे केव्हाही चांगले. असे सिंक्रोनायझेशन करण्यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स आणि अॉनलाईन सेवा उपलब्ध आहेत. परंतु त्या वापरण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरावी लागते. मॅजिक ट्रान्स्फर हे सॉफ्टवेअर मोफत मिळते.



मॅजिक ट्रान्स्फर इन्स्टॉल केल्यानंतर बॅक-अपवर क्लिक करा. आता तुम्ही सिस्टिम सेटिंग्ज (अॅपिअरंस सेटिंग्ज, माऊस/कीबोर्ड सेटिंग्ज, स्टार्ट मेनू, इ.), आऊटलूक सेटिंग्ज आणि मेल्स, फायरफॉक्स (सेटिंग्ज, बुकमार्क, प्लगईन्स), इंटरनेट एक्सप्लोरर (सेटिंग्ज, फेव्हरेट्स) आणि हार्डडिस्कवरील फाईल्स एका फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता.



त्यानंतर हे बॅकअप फोल्डर एखाद्या सीडी/डीव्हीडीवर किंवा पेनड्राईव्हवर कॉपी करा. या सेटिंग्ज दुसऱ्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर वापरण्यासाठी तुम्हाला त्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर अगोदर मॅजिक ट्रान्स्फर इनस्टॉल करायला लागेल. त्यानंतर बॅकअप फोल्डर त्यावर स्टोअर करा. आता मॅजिक ट्रान्स्फरवर क्लिक करून रिस्टोअर म्हणा. तुमच्या सर्व सेटिंग्ज नव्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्षणार्धात रिस्टोअर होतील.

केवळ Windows NT/2000/XP/2003 साठी.
मॅजिक ट्रान्स्फर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

रजा-सुट्यांचा अॉनलाईन ताळेबंद

July 30, 2008 0 comments


अश्विनने न सांगता अॉफिसला दांडी मारल्याने त्याचा टीम लीडर प्रचंड संतापला होता. तशात सचिनही दोन दिवस रजेवर असल्याचे लक्षात आल्याने तो स्वतःवरच चिडचिड करू लागला. साहजिक आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत १५-२० जणांची टीम लीड करत असाल तर असा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ताणात आपण रजा-सुट्या या गोष्टी विसरतो आणि मग प्रोजेक्ट्सना उशीर होतो. अशा वेळी एचआर काहीही करू शकत नाही. कारण रजा-सुट्या या अत्यंत वैयक्तिक गोष्टी असतात, आणि त्या आपण आपल्या पातळीवरंच हाताळल्या पाहिजेत. तुमची छोटी कंपनी असेल किंवा तुम्ही एखादी टीम लीड करत असाल तर हूज अॉफ ही अॉनलाईन सेवा तुम्हाला मदत करू शकते.

सध्या जमाना सोशल नेटवर्किंगचा आहे. हूज अॉफ हे आपल्या सहकाऱ्यांचे एकप्रकारचे सोशल नेटवर्कंच असल्यासारखे आहे. याचा उद्देश केवळ रजा-सुट्ट्यांचे नियोजन हा असेल. हूज अॉफवर तुम्ही कितीही मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या रजा-सुट्या मॅनेज करू शकता. आपण लहान उदाहरण घेऊ. समजा तुम्ही २५ जणांची एक टीम लीड करत आहात. हूज अॉफवर तुम्ही अॅडमिनिस्ट्रेटर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर तुम्ही तुमच्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची नावे अॅड करू शकता. त्यांचा ई-मेल अॅड्रेस हे त्यांचे यूजरनेम असेल. या सहकाऱ्यांना पासवर्ड तुम्ही द्यायचे आहेत. एकदा का सर्व सहकाऱ्यांची नावे डेटाबेसमध्ये अॅड केली की तुम्ही त्यांना वर्षभरात किती सुट्ट्या घेता येतात, एकाच पदावरील दोन व्यक्ती एकाच दिवशी सुटी घेऊ शकतात की नाही, तुमच्या व्यतिरिक्त इतर कोण रजा-सुट्या मंजूर करू शकतात वगैरे माहिती एंटर करायची. तुमचे हूज अॉफ नेटवर्क आता तयार आहे.

आता तुम्ही अॉनलाईन पाहू शकता की आज कोणाची सुटी आहे, कोण रजेवर आहे, कोण केव्हा परत येणार आहे वगैरे. तुमच्या सोबत काम करणारे सहकारीही अॉनलाईन लीव्ह अॅप्लीकेशन देऊ शकतात. ही सेवा इंग्लंडमधील कंपनीने तयार केली असल्यामुळे भारतीय कंपन्यांत बऱ्यापैकी कामास येते. अनेक मोठ्या कंपन्यांत अशा प्रकारची सुविधा तेथील एचआरने उपलब्ध करून दिलेली असते. परंतु लहान आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांत अशी सुविधा सहसा उपलब्ध नसते. अशा कंपन्यांसाठी आणि आंत्रप्रिन्युअर्ससाठी ही सेवा उपयोगास येते.
Read the full story

,

नाऊ डू धिस...

July 29, 2008 1 comments

दिवसभरातील सगळी महत्त्वाची कामं झाली का, असे आठवून पाहत असताना अचानक लक्षात येतं की मुंबईतील एका एजन्सीला दुपारी दोन वाजता फोन करायचा होता. टू-डू लिस्ट्स किंवा स्टिकीनोट्सचा एक तोटा म्हणजे त्यात सगळ्या टास्क्स एकाच वेळी दिसतात. त्यामुळे एकतर दडपण येतं किंवा त्यातील सगळ्यांत सोप्या टास्क्स अगोदर पूर्ण केल्या जाण्याची शक्यता असते. याचा दुसरा अर्थ असा, की दिवसभरातल्या टास्क्सचा प्राधान्यक्रम आपण ठरवलेला नसतो. प्राधन्यक्रम ठरवला नाही तर वर उल्लेख केल्याप्रमाणे इतर कामं होतात, पण महत्त्वाचे काम राहून जाते. असाच काहीचा प्रॉब्लेम जेकब लॉडविक आणि विल्यम कॉटन यांना जाणवत होता. त्यावर त्यांनी एक साधे-सोपे सोल्यूशन काढले. नाऊ डू धिस.

हो, नाऊ डू धिस. हे त्या सोल्यूशनचे नाव. २२ जुलै २००८ रोजी या संकल्पनेचा जन्म झाला. संकल्पना अगदी साध्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. एका वेळी एक काम. पटण्यासारखं आहे हे तत्त्वज्ञान. आपण एका वेळी शंभर कामं करायला जातो आणि तिथेच आपली पंचाईत होते. जेकब आणि विल्यमने एका दिवसात ही संकल्पना नाऊ डू धिस या सेवेद्वारे जगासमोर मांडली आणि दोन दिवसांत सुमारे ६००० लोकांनी त्यांच्या या साईटला भेट दिली आहे.
टास्कलिस्ट एंटर करा

एकेक काम पूर्ण करा

काम पूर्ण झाल्याचा आनंद!

नाऊ डू धिस डॉट कॉमवर तुम्ही तुमची टास्क लिस्ट एंटर करू शकता. त्यानंतर ब्राऊजरच्या एका विंडोत किंवा टॅबमध्ये नाऊ डू धिस ओपन ठेवा. तुम्ही एंटर केलेल्या लिस्टमधील पहिले काम ठळकपणे दिसेल. ते पूर्ण झाल्यास 'डन'वर क्लिक करा. आता तुम्ही एंटर केलेले दुसरे काम ठळकपणे दिसायला लागेल. अशा पद्धतीने सगळी कामे झाल्यानंतर 'अॉल डन' असा मेसेज येईल. हा मेसेज पाहूनच थांबणे, असे दिवसाचे लक्ष्य ठेवले तर कोणतेच काम अपूर्ण राहणार नाही. ही साधी-सोपी वापरून पाहा. तुम्हाला नक्कीच आवडेल.
Read the full story

,

नवे धोरणः एेका आणि विसरा

July 28, 2008 2 comments

आजकालची गाणी काही कळतंच नाहीत साहेब. कोण गातंय, काय गातंय, कशाला गातंय हे गाणं संपेपर्यंत कळत नाही नाही. हातातली आणि तोंडाची कात्री तो एकाचवेळी चालवत तो सांगत होता. फिलिप्सच्या कुठल्यातरी भल्या मोठ्या (म्हणजे ७५० वॅट पीएमपीओ) म्युझिक सिस्टिमवर एफएम लावले होते. गाणं सुरू होतं, सध्याची हिट फिल्म जाने तू या जाने ना मधलं - पप्पू कान्ट डान्स साला. मी मानेनेच त्याच्या भावनांना प्रतिसाद देत होतो. एका अर्थाने त्याच्या बोलण्यात तथ्य होतं. पप्पू कान्ट डान्स साला हे गाणं आज हिट असलं तरी दोन महिन्यांनंतर असं गाणं होतं, हे कुणाच्या लक्षातही राहणार नाही. अशा वेळी त्याच्या सीडीज घेणं तर दूरंच, ते डाऊनलोड करून मौल्यवान मेमरी तरी आपण वाया का घालावी? अशा वेळी यूज अॅंड थ्रोचा फंडा वापरावा. एेका आणि विसरून जा. त्यासाठी उपयुक्त ठरतात म्युझिक सर्च इंजिन्स.

संपूर्ण भारतीय ‘बनावटी’चे (?) सर्च इंजिन गुरूजी डॉट कॉमने सध्या म्युझिक सर्चवर आपला भर दिला आहे. म्युझिक सर्च हा नवा प्रकार नसला तरी, वर उल्लेख केल्याप्रमाणे सध्या याची अधिक गरज आहे. म्युझिक सर्च इंजिनची खासियत म्हणजे, बहुतांश सर्व जण सर्च रिझल्ट्समधूनच गाणं एेकण्याची सुविधा देतात. त्यामुळे ते डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही. आपण शक्यतो मोफत गाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे या पोस्टमध्ये अशांच सेवांबद्दल माहिती देणार आहे. इंग्लिश गाण्यांच्या फॅन्ससाठी शेकडो पेड आणि फ्री सेवा उपलब्ध आहेत, पण हिंदी गाणी सहसा मिळत नाहीत. पुढे दिलेल्या सेवा वापरून नव्या-जुन्या हिंदी गाण्यांचाही आनंद घेता येईल. तुम्ही ब्रॉडबॅंड वापरत असाल तर बफरही लवकर होईल व पूर्ण गाणं स्पष्ट एेकता येईल.

गुरूजीः भारतीय संगीत शोधण्यासाठी गुरूजी अत्यंत उपयुक्त ठरते. अल्बम, चित्रपट, गायक कलाकार, संगीतकार, गीतकार, नायक, नायिका आदी कोणत्याही प्रकारच्या कीवर्डने तुम्ही गाणी शोधू शकता. सर्च रिझल्ट्स डिस्प्ले झाल्यानंतर तुम्ही गाणी थेट एेकू शकता. तेथेच माय फेव्हरेट्स सेक्शन आहे. पुन्हा एेकायचे झाल्यास माय फेव्हरेट्समध्ये अॅड करू शकता. गाणं प्ले केल्यानंतर ते एका पॉप-अपमध्ये उघडते. ही एक बाब सोडली तर बाकी सेवा उत्तम आहे.


फुलकीः बॉलीवूडमधील कोणतीही गाणी शोधण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे फुलकी. यावरदेखील अल्बम, चित्रपट, गायक कलाकार, संगीतकार, गीतकार, नायक, नायिका आदी कोणत्याही प्रकारच्या कीवर्डने तुम्ही गाणी शोधू शकता. सर्च रिझल्ट्सच्या डाव्या बाजूस फुलकी प्लेअर आहे. Add To Player म्हणून तुम्ही गाणी प्लेअरमधून एेकू शकता. यावरून गाणी डाऊनलोड करणेही शक्य होते.


सॉंगझाः फ्लॅश आणि अजॅक्सचा उत्तम वापर केल्यामुळे ही साईट लुक्स आणि परफॉरमन्समध्ये इतरांपेक्षा कित्येक पटींनी सरस आहे. अॅपलचे सहसंस्थापक जेफ रस्किन यांचा २४ वर्षीय मुलगा अझा आणि त्याचा मित्र स्कॉट रॉबिन यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये ही साईट लॉंच केली. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली ही साईट बॉलीवूडमधील सर्चसाठीही चांगली आहे.


आणखी काही उल्लेखनीय प्लेयेबल म्युझिक सर्च इंजिन्सः
सीकपॉड
मिक्स टर्टल
व्ह्यूझी (वाचाः सर्च विथ ‘एक्स्पीरियंस’)
Read the full story

मॅराथॉन ‘रन’ कमांड्स

July 27, 2008 0 comments

विंडोज अॉपरेटिंग सिस्टिममध्ये एखादे अॅप्लीकेशन किंवा डॉक्युमेंट चटकन ओपन करायचे असेल, तर आपण बिनदिक्कत रन कमांड वापरतो. रन कमांड म्हणजे एका ओळीत दिलेला आदेश. उदा. कॅल्क्युलेटर ओपन करायचे झाल्यास माऊसने प्रोग्राम्स, अॅक्सेसरीज आणि मग कॅल्क्युलेटर असा मोठा प्रवास करावा लागतो.



त्याएेवजी रनमध्ये Calc अशी कमांड दिली की कॅल्क्युलेटर ओपन होते. अशाच काही महत्त्वाच्या रन कमांड्सची यादी तुमच्यासाठी येथे देत आहे. त्यातील तुम्हाला लागतील त्या रन कमांड्स तुम्ही लक्षात ठेवून वापरू शकता.
Accessibility Controls >> access.cpl
Accessibility Wizard >> accwiz
Add Hardware Wizard >> hdwwiz.cpl
Add/Remove Programs >> appwiz.cpl
Administrative Tools >> control admintools

दीडशेहून अधिक महत्त्वाच्या रन कमांड्सची यादी येथून डाऊनलोड करा.
Read the full story

, ,

‘राईट’-क्लिकचा ‘रॉंग’ वे!

July 26, 2008 0 comments


काही वेळा आपण एखाद्या साईटमध्ये किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये वापरण्यासाठी महत्प्रयासाने शोधलेली इमेज सेव्ह करायला जातो आणि Right-Click Function Disabled! असा मेसेज येतो. अशा वेळी त्या साईटला आणि साईट अॅडमिनिस्ट्रेटरचा उद्धार करून आपण पुन्हा एकदा शोधप्रक्रिया सुरू करतो. इमेज सापडते, पण याला त्या इमेजची सर नाही, असे म्हणत नाईलाजाने ती इमेज वापरावी लागते. अशा वेळी जावास्क्रिप्टची एक ओळ वापरून ‘रॉंग’ वेने तुम्ही ‘राईट’-क्लिक करू एनेबल करू शकता.

राईट-क्लिक फंक्शन डिसेबल करण्यासाठी साईट अॅडमिनिस्ट्रेटर जावास्क्रिप्टचा वापर करतात. सर्वसामान्य वेब यूजरना राईट-क्लिक करून इमेज सेव्ह करण्याची सवय असते. त्यामुळे राईट-क्लिक डिसेबल्ड असा मेसेज आल्यानंतर इमेज सेव्ह करण्याचे सर्व मार्ग संपले, असे म्हणून ते त्यापासून दूर जातात. बऱ्याच साईट्स सुरक्षिततेसाठी राईट-क्लिक डिसेबल करतात किंवा त्यांनी सदर इमेजेस अधिकृतरित्या विक्रीस ठेवालेल्या असतात. त्यामुळे ज्यांना त्या वापरायच्या आहेत त्यांनी त्या अॉनलाईन विकत घ्याव्या, अशी त्यांची अपेक्षा असते. पण काही कारणांमुळे ते शक्य नसल्यास आपण त्या साईटसाठी राईट-क्लिक एनेबल करू शकतो. तसे करण्याची पद्धत अशीः
१. सर्वप्रथम तुम्हाला जी इमेज सेव्ह करायची आहे, त्या पेजवर जा. इमेजवर राईट-क्लिक केल्यास फंक्शन डिसेबल्ड असा मेसेज येईल.
२. त्याच पेजवरील अॅड्रेसबार मध्ये पुढे दिलेला कोड पेस्ट करून एंटर करा -
javascript:void(document.oncontextmenu=null)

३. आता पुन्हा राईट-क्लिक करून पाहिल्यास ते फंक्शन अॅक्टिव्ह झाल्याचे लक्षात येईल. सेव्ह इमेज वर क्लिक केल्यास हवी ती इमेज तुम्ही हार्डडिस्कवर सेव्ह करू शकाल.

(वि.सू.ः या पद्धतीचा अवलंब करून इमेज सेव्ह केल्यानंतर कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात, याची जाणीव ठेवावी.)

Read the full story

, ,

आऊटलुक आणि डोकेदुखी...

July 25, 2008 0 comments

एखाद्या साईटला किंवा ब्लॉगला भेट देताना त्यात साईट अॅडमिनिस्ट्रेटरचे ई-मेल अायडी दिलेले असतात. साईटसंदभर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण त्या अॅड्रेसवर थेट ई-मेल करू शकतो. त्या आयडीवर क्लिक केलं की तो ई-मेल अॅड्रेस आपल्या डिफॉल्ट मेल क्लाएंटमध्ये ओपन होतो. बहुतांश वेळा आपण वापरत नसलेला डेस्कटॉप ई-मेल क्लाएंट (उदा. आऊटलुक) आपला डिफॉल्ट मेल क्लाएंट म्हणून सेट झालेला असतो. तुम्ही जर नियमितपणे जी-मेल वापरत असाल आणि तुमच्याकडे फायरफॉक्स असेल तर पुढील ट्रिक वापरून तुम्ही ही डोकेदुखी थांबवून जी-मेलला तुमचा डिफॉल्ट मेल क्लाएंट म्हणून सेट करू शकता.

ही ट्रिक फायरफॉक्सच्या सर्व व्हर्जनसाठी लागू पडते.

१. सर्वप्रथम तुमच्या जी-मेलच्या अकाऊंटवर लॉग-इन व्हा.
२. आता याच विंडोतील अॅड्रेस बारमध्ये पुढे दिलेला कोड पेस्ट करून एंटर करा.

javascript:window.navigator.registerProtocolHandler("mailto","https://mail.google.com/mail/?extsrc=mailto&url=%s","Gmail")

३. Add Gmail as an application to mailto links? अशा आशयाचा एक पॉप-अप येईल. त्यातील अॅड अॅप्लीकेशन यावर क्लिक करा.
४. जी-मेलला डिफॉल्ट मेल क्लाएंट सेट करण्यासाठी येथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर उपलब्ध मेल क्लाएंट्सची लिस्ट दाखवणारा एक बॉक्स प्रॉम्प्ट होईल. त्यातील जी-मेल सिलेक्ट करा व Remember my choice for mailto links यावर चेक करा. ओके म्हटल्यानंतर जी-मेल हा तुमचा डिफॉल्ट मेल क्लाएंट म्हणून सेट होईल.


५. "Tools" > "Options" (किंवा मॅकिन्तोशसाठी "Firefox" > "Preferences") येथे जाऊन तुम्ही डिफॉल्ट मेल क्लाएंट केव्हाही बदलू शकता.
Read the full story

,

बहुपयोगी पेन्सिल बटन!

July 24, 2008 0 comments


तुम्ही नोकियाचा हॅंडसेट वापरत असाल आणि तुमच्या हॅंडसेटवर एक छोटासे पेन्सिल अायकॉन असलेले बटन असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. मला सांगा, हा बटन तुम्ही कधी वापरले आहे? वापरले असेल तर कशासाठी? बऱ्याच जणांना हे बटन कशासाठी दिले आहे, हेच मुळी माहित नसते.पण, हे अनावश्यक वाटणारे बटन बहुपयोगी आहे. कसे ते पाहा.


पेन्सिल या आयकॉनवरून हे बटन रायटिंग मोडमध्ये (म्हणजे मेसेज टाईप करताना, ई-मेल लिहिताना, कॉन्टॅक्ट अॅड किंवा एडिट करताना वगैरे) कामास येते हे स्पष्ट होते. तुम्ही रायटिंग मोडमध्ये असताना हे बटन प्रेस केले की खालील मेनू पॉप अप होतोः
# Dictionary on
# Number mode
# Paste
# Insert symbol
# Writing language

रायटिंग मोडमध्ये या पाच गोष्टी सतत लागतात. त्यामुळे हा शॉर्टकट दिलेला आहे. टी९ मोड अॉन/अॉफ करण्यासाठी डिक्शनरी, नंबर इनपुट करण्यासाठी नंबर, स्पेशल सिंबॉल अॅड करण्यासाठी इन्सर्ट सिंबॉल आणि इतर भाषेत (उदा. हिंदी, मराठी) लिहिण्यासाठी रायटिंग लॅंग्वेज हे अॉप्शन्स उपयोगी ठरतात. पण यातील सर्वाधिक उपयोगास येणारा अॉप्शन म्हणजे कॉपी-पेस्टचा! हा अॉप्शन वापरायचा कसा ते आपण एका उदाहरणाने पाहू. समजा, तुम्ही एखादा मेसेज टाईप करत आहात. त्यातील काही भाग तुम्हाला कॉपी करून त्यात मेसेजमध्ये किंवा इतर कुठे (दुसऱ्या डॉक्युमेंट किंवा अॅप्लीकेशनमध्ये) पेस्ट करायचा आहे.
१. सर्वप्रथम पेन्सिल बटन दाबून स्क्रोल की डावीकडे किंवा उजवीकडे सरकवून हवे ते टेक्स्ट सिलेक्ट करा.
२. हे करत असताना तुम्हाला “Copy” आणि “Paste” असे अॉप्शन्स तुमच्या स्क्रीनवर दिसायला लागतील.
३. कॉपीवर क्लिक करून पुन्हा पेन्सिल बटन प्रेस करा. तुम्हाला जिथे टेक्स्ट पेस्ट करायचे आहे तेथे किंवा दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये कर्सर न्या व पेस्टवर क्लिक करा.
Read the full story

,

लांबच...लांब, पसरलेला डेस्कटॉप!

July 23, 2008 2 comments



शैलेश एक नंबरचा आळशी. त्याची अॉफिस बॅग म्हणजे अक्षरशः पोतं. कोणे एके काळी भरलेल्या वस्तू त्यात अाजही तशाच पडलेल्या असतील. पण या महाशयांना ती बॅग साफ करायला वेळ कधीच मिळत नाही. परवा मेल चेक करण्यासाठी त्याच्या डेस्कटॉपवर लॉग इन झालो आणि चूक केली असं पुढच्याच क्षणाला लक्षात आलं. अख्ख्या डेस्कटॉपवर विविध आयकॉन्सची रांगोळी होती. वॉलपेपर ठेवण्याची गरजच नव्हती, असं त्यावरून वाटत होतं. क्षणभर वाटलं, हा माणूस सगळा डेटा डेस्कटॉपवरंच ठेवतो की काय? शैलेशला डेटा ठेवण्यासाठी १७ इंची डेस्कटॉप पुरेनासा झाला होता. डेस्कटॉपवर फाईल्सची रांगोळी काढण्यापेक्षा याच्या डेस्कटॉपचा कॅनव्हासंच मोठा केला तर? होय. ३६०डेस्कटॉप या अॅप्लीकेशनद्वारे तुम्ही तुमचा डेस्कटॉप स्पेस वाढवू शकता.


वेब आणि डेस्कटॉपचे अद्भुत कॉन्व्हर्जन्स म्हणजे ३६०डेस्कटॉप. संस्थापक इव्हान जोन्स यांनी मेलबर्नमध्ये (अॉस्ट्रेलिया) २००५ चा हा प्रोजेक्ट सुरू केला. भारतात तिरुवनंतपुरम येथेही या कंपनीचे डेव्हलपमेंट सेंटर आहे.
गेल्या वषर्षी सप्टेंबरमध्ये पब्लिक बीटा लॉंच केल्यानंतर आता कंपनीने मार्केंटिंगसाठीचे प्रयत्न सुरू केले आहे. ३६०डेस्कटॉप म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कल्पना करा, की तुमच्या डेस्कटॉपवर मुंबई शहराची स्कायलाईन दाखवणारा वॉलपेपर आहे. आता यातील केवळ मरीन ड्राईव्ह काही भाग तुमच्या समोर दिसतोय. तुम्ही हा डाव्या बाजूस सरकवला तर, त्यापुढचा आणखी काही भाग दिसेल. अजून डावीकडे सरकवला तर आणखी पुढचा भाग दिसेल. एरवी आपल्यासाठी डेस्कटॉप म्हणजे एका वॉलपेपरएवढीच जागा. पण ३६०डेस्कटॉप या अॅप्लीकेशनमुळे तुमचा डेस्कटॉप एका वर्तुळात कन्व्हर्ट होतो. आणि तुमच्यासाठी नेहमीपेक्षा कित्येक पटीने अधिक जागा उपलब्ध होते. म्हणजे, शैलेशसारखी व्यक्ती डेस्कटॉपवरील फाईल्स थोड्या पसरून ठेवू शकेल.

३६० डेस्कटॉपने खास पॅनोरमिक वॉलपेपर्स तयार केले आहेत. ते डाऊनलोड करून तुम्ही वापरू शकता. ३६०डेस्कटॉप हे अॅप्लीकेशन सध्या केवळ विंडोज एक्सपी आणि विंडोज व्हिस्टासाठी उपलब्ध आहे. ३६०डेस्कटॉप इन्स्टॉल केल्यानंतर स्क्रीनच्या वरच्या भागात उजव्या कोपऱ्यात नेव्हिगेशन कंट्रोल उपलब्ध होते. त्यातून किंवा स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस माऊस नेऊन तुम्ही डेस्कटॉप स्क्रोल करू शकाल. ३६०डेस्कटॉपवर विविध गॅजेट्स आणि विजेट्स ठेवता येतात. हे अॅप्लीकेशन मोफत असून याचे बिझनेस मॉडेल डेस्कटॉपवरील जाहिरातींमध्ये दडलेले आहे. घाबरू नका...तुमच्या डेस्कटॉपवर नको असलेल्या पॉप-अप अॅड्स येणार नाहीत. ३६० डेस्कटॉपप्रमाणेच त्यातील जाहिरातीसुद्धा नावीन्यपूर्ण आहेत.

३६० डेस्कटॉप कसे दिसते, त्यातील जाहिराती कशा आहेत, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
३६० डेस्कटॉप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

फेव्ह-आयकॉनः साईट आणि ब्लॉगसाठी

July 22, 2008 2 comments

गुगल किंवा याहू! आपण केवळ लेटरिंग किंवा लोगोवरून ओळखू शकतो. म्हणजे गुगलमधील केवळ G हे लेटर दाखवले तरी आपण ओळखू शकू की हे गुगलचे G आहे. आपल्या साईटसाठी एक आयडेंटिटी तयार झालीये, याचे हे उदाहरण. लोकांनी आपला ब्लॉग लक्षात ठेवावा किंवा आपली साईट चटकन ओळखावी यासाठी जवळपास सर्वच जण ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये दिसेल असा छोटासा आयकॉन तयार करतात. याला फेव्ह-आयकॉन किंवा फेव्हरेट आयकॉन असे म्हणतात. फेव्ह-आयकॉन तयार करणे आणि तो आपल्या साईट किंवा ब्लॉगवर अॅड करणे अत्यंत सोपे काम आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आज या पोस्टमध्ये घेऊ.

साधी-सोपी टेक्नॉलॉजीचा नवा फेव्ह-आयकॉन



तुम्ही आर्टिस्ट किंवा डिझायनर असाल तर तुम्हाला हवा तसा आयकॉन फोटोशॉपमध्ये तयार करा किंवा कागदावर ड्रॉ करून स्कॅन करा. स्कॅनिंगची सुविधा नसेल तर फोटो काढून थेट वापरू शकता. फेव्ह-आयकॉनसाठी १६ बाय १६ पिक्सेल ही स्टॅंडर्ड साईझ आहे. १६ बाय १६ मध्ये क्रिएटिव्हिटी दाखवणं अवघड आहे. त्यामुळे तुम्ही मोठ्या आकारात इमेज तयार करून नंतर रिसाईज करू शकता. ही इमेज PNG, GIF किंवा ICO यापैकी एका फॉरमॅटमध्ये असायला हवी. इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये PNG आणि GIF फॉरमॅटमधील फेव्ह-आयकॉन्स डिस्प्ले होण्यात अडचणी येतात. त्यामुळे आयकॉन्ससाठी असलेला ICO हा स्टॅंडर्ड फॉरमॅटंच वापरावा. फोटोशॉपमध्ये ICO फॉरमॅट ओपन करण्यासाठी एका प्लग-इनची गरज भासेल. ते प्लग-इन येथून डाऊनलोड करावे.
तुमच्याकडे फोटोशॉप नसेल तर फेव्ह-आयकॉन डॉट सीसी या साईटवर जाऊन तुम्ही पाच-दहा मिनिटांत तुमच्या साईट किंवा ब्लॉगसाठी फेव्ह-आयकॉन तयार करू शकाल. यावर १६ बाय १६ पिक्सेल्सचा कॅनव्हास आहे. त्यात तुम्ही हवा तसा आयकॉन तयार करू शकता. डाऊनलोड म्हटल्यानंतर तुम्ही तयार केलेला आयकॉन थेट ICO फॉरमॅटमध्येच सेव्ह होतो. एकदा का तुम्ही आयकॉनची फाईल तयार केली की ती साईट किंवा ब्लॉगवर अपलोड करणे बाकी राहते.

साईटवर फेव्ह-आयकॉन अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तयार केलेला फेव्ह-आयकॉन Favicon.ico या नावाने सेव्ह करा. ही फाईल तुमच्या साईटच्या सरव्हरवरील रूट डिरेक्टरीत प्लेस करा. लक्षात ठेवाः ज्या डिरेक्टरीत index फाईल आहे, त्याच डिरेक्टरीत ही फाईल असली पाहिजे. पॉप्युलर ब्राऊजर्स Favicon.ico ही फाईल शोधून अॅड्रेसबार शेजारी डिस्प्ले करतात. बरेच ब्राऊजर्स HTML कोडमध्ये सर्च करतात. त्यासाठी खालील कोड साईटमधील प्रत्येक पेजच्या हेडमध्ये () इन्सर्ट करावा.


तुम्ही PNG किंवा GIF फॉरमॅट वापरणार असाल तर खालील कोड हेडमध्ये प्लेस करावा.
or


ब्लॉगमध्ये फेव्ह-आयकॉन अॅड करण्यासाठी सर्वप्रथम फेव्ह-आयकॉन फाईल एखाद्या साईटवर होस्ट करावी लागेल. त्यासाठी गुगल पेजेस वापरणे सोपा मार्ग आहे. गुगल पेजेसमध्ये उजव्या नेव्हीगेशन पॅनेलमध्ये जाऊन तुमचा फेव्ह-आयकॉन अपलोड करावा. त्यानंतर राईट-क्लिक करून लिंक लोकेशन कॉपी करा. आता ब्लॉगरमध्ये Template > Edit HTML येथे जाऊन Expand widget template यावर चेक करा. आता CTRL + F करून त्यात टॅग सर्च करा. HTML टेम्प्लेटमध्ये नंतर पुढील कोड पेस्ट करा:

<link href='URL of your icon file' rel='shortcut icon'/>


या कोडमध्ये लाल रंगात लिहिलेल्या URL of your icon file च्या जागी गुगल पेजेसवर तुम्ही अपलोड केलेल्या फेव्ह-आयकॉनची लिंक पेस्ट करा. टेम्प्लेट सेव्ह करा. ब्लॉग रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला अॅड्रेसबार शेजारी तुमचा फेव्ह-आयकॉन दिसेल.
Read the full story

,

रिफ्रेशिंग पिक्स व्ह्यूअर

July 21, 2008 0 comments


फ्रेश न्यू फॉंट्सची माहिती घेतल्यानंतर या आठवड्याची सुरवात आपण एका रिफ्रेशिंग साईटने करणार आहोत. स्वतःचे फोटो काढण्याची आपल्यापैकी अनेकांना (विशेषतः मुलींना) आवड असेल. असे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पोझमध्ये काढलेले फोटो आपण फ्लिकर किंवा इतर तत्सम साईट्सवर वेळोवेळी अपलोडही करत असतो. यातील बहुतांश फोटो इतरांना पाहण्यासाठी आपण खुले ठेवतो. त्याच ठराविक साच्यात फोटो पाहणे कालांतराने कंटाळवाणे वाटू लागते आणि मग आपण फोटो अपलोड करायचा आणि पाहायचा कंटाळा करू लागतो. अशावेळी पिक्स व्ह्यूअरचा एक्स्पीरियंस घेतलाच पाहिजे.

पिक्स व्ह्यूअर ही एक मोफत अॉनलाईन सेवा आहे. याद्वारे तुमच्या फ्लिकरवरील फोटोंना स्लाईडशोमध्ये कन्व्हर्ट करण्याचे काम केले जाते. हे स्लाईडशो सात भिन्न आणि रिफ्रेशिंग फॉरमॅटमध्ये पाहता येतात. पिक्स व्ह्यूअर लॉंच होऊन केवळ तीन-चार महिने झाले असल्याने सध्या केवळ सात टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. जसजशी ही सेवा पॉप्युलर होत जाईल, तशी यातील टेम्प्लेट्सची संख्या वाढेल. सध्या tiltviewer (मस्त!), polaroid, dfgallery, flashapi, slide, grey, dark आणि pictobrowser ही टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही फोटोची क्वालिटी एसडी (Standard Definition) किंवा एचडी (High Definition) अशी स्पेसिफाय करू शकता. आणखी एक विशेष बाब म्हणजे, ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागत नाही. तुमचे फ्लिकरचे यूजरनेम वापरून तुम्ही तुमचे फोटो पिक्स व्ह्यूअरमधून पाहू शकता. उदा. www.picsviewr.com/photos/username हा फॉरमॅट वापरून तुम्ही पिक्स व्ह्यूअरचा आनंद घेऊ शकता. या पद्धतीने अॅक्सेस करताना काही अडचण आल्यास फ्लिकरवर लॉग-इन होऊन फोटोस्ट्रीमवर क्लिक करा. त्यानंतर लिंकमधील फोटोस्ट्रीमचा आयडी कॉपी करून यूजरनेमच्या ठिकाणी वापरा.

पिक्स व्ह्यूअरचा आनंद घेण्यासाठी तुमचे फ्लिकरचे यूजरनेम पुढे दिलेल्या बॉक्समध्ये एंटर कराः


http://www.flickr.com/photos/

Direct url: www.picsviewr.com/photos/username



Read the full story

, ,

प्रोटेक्ट युवर पिक्स

July 20, 2008 0 comments


फोटो शेअरिंग साईट्सवर तुम्ही अपलोड केलेले फोटो एखाद्या साईटवर विदाऊट क्रेडिट वापरले गेले तर काय कराल? सध्या जमाना आहे इंटेलेक्च्युल प्रॉपटर्टी राईट्सचा. त्यामुळे तुम्ही काढलेला फोटो कितीही कॅज्युअल वाटला तरी दुसऱ्या कोणासाठी तो मौल्यवान ठरू शकतो (किंवा तसा भासवला जाऊ शकतो. उदा. ई-बे या साईटवर एकाने जगातील सर्वांत लांब फ्रेंच फ्राय असे सांगून साधे फिंगर चिप काही शे डॉलर्सला विकल्याचे मी कुठेसे वाचले होते.) त्यामुळे आपले क्रिएटिव्ह वर्क पब्लिक करण्यापूर्वी आर्टिस्ट्स लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांसाठी पिकमार्कर ही सेवा उपयोगी ठरू शकते.

पिकमार्करचा वापर करून तुम्ही कोणत्याही फोटोवर वॉटरमार्क अॅड करू शकता. वॉटरमार्क अॅड करण्याच्या प्रक्रियेस केवळ एक मिनिटाचा कालावधी लागतो. पिकमार्करचा वापर करून तुम्ही कॉम्प्युटरवर असलेल्या कोणत्याही फोटोवर वॉटरमार्क अॅड करू शकता. तुम्ही फ्लिकर वापरत असाल तर फ्लिकरवरील फोटो थेट इम्पोर्ट करून वॉटरमार्क अॅड करता येतो. टेक्स्ट किंवा इमेज स्वरूपातील वॉटरमार्क सिंगल आणि टाईल्ड फॉरमॅटमध्ये अॅड करता येतात.
Read the full story

,

कॅच देम यंग!

July 19, 2008 0 comments


अनेक लहान-मोठ्या शहरांत अॉथोराईज्ड रिसेलर्सचे नेटवर्क उभे करून अॅपलने आता भारतावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. या रिसेलर्सकडे आयमॅक (डेस्कटॉप), मॅकबुक (लॅपटॉप), अॅपल सॉफ्टवेअर्स आणि विविध अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. रिलायन्स रिटेलतर्फेही देशभरात सुमारे ५० आयस्टोअर्सची चेन उभारण्यात येत आहे. प्रोफेशनल कोर्सेसला अॅडमिशन घेणारे विद्याथर्थी आजकाल डेस्कटॉपपेक्षा लॅपटॉप घेणेच अधिक पसंत करतात. अशा एज ग्रुपला टारगेट करून
अॅपलने आता भारतातील निवडक शैक्षणिक संस्थांमधील विद्याथर्थ्यांना ना मॅकबुक आणि मॅकबुक प्रो सवलतीत उपलब्ध करून दिले आहे. ही सवलत सुमारे १२ टक्क्यांपर्यंत आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध प्रॉडक्ट्सच्या किमती खाली दिल्या आहेतः


तुम्ही खालीलपैकी कोणत्याही संस्थेत शिकत असाल, किंवा शिकवत असाल किंवा संबंधित असाल तर ३० अॉगस्ट २००८ पर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताः




ही पोस्ट तुमच्या मित्रांना ई-मेलवर पाठविण्यासाठी डावीकडे असलेल्या Friend Forward यावर क्लिक करा.

या योजनेत सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

फ्रेश न्यू Fawnt!


तुम्हाला वर्डमध्ये किंवा इतर कोणत्याही टेक्स्ट प्रोसेसरमध्ये काम करावे लागत असेल किंवा तुमचा जॉब डिझायनिंगशी संबंधित असेल तर फॉंट्स हा तुमचा जिव्हाळ्याचा विषय असणार. एखादे डॉक्युमेंट तयार करताना एक किंवा दोनच फॉंट्स वापरावेत असा सल्ला दिला जातो. पण काही वेळा त्याच-त्या फॉंट्सचा कंटाळा येतो किंवा एखादा विषय असा असतो की त्यासाठी नेहमी वापरले जाणारे टाईम्स न्यू रोमन किंवा एरियल हे फॉंट्स सूट होत नाहीत. अशा वेळी आपण आपल्या सिस्टिममध्ये उपलब्ध असलेले फॉंट्स ट्राय करतो. पण त्यापैकी एकही सूट होत नाही. आता काय करणार?

ज्या-ज्या इंडस्ट्रीत फॉंट्स लागतात (उदा. पब्लीशिंग, ब्रॉडकास्टिंग, अॅडव्हर्टायझिंग इ.) त्या एकतर फॉंट तयार करतात किंवा अॉनलाईन विकत घेतात. फॉंट विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे फॉंट ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही, हे तुमच्या लक्षात आले असेल. पण Fawnt या साईटवरून तुम्ही अगदी नवे, ताजे आणि डिसेंट फॉंट्स डाऊनलोड करू शकता - तेही अगदी मोफत. मोफत फॉंट देणाऱ्या इतरही काही साईट्सच्या तुलनेत Fawnt चा इंटरफेस अत्यंत क्लीन आहे.

Fawnt वर तुमच्यासाठी तब्बल दहा हजार (१०,०००) फॉंट्स उपलब्ध अाहेत. यावरील फॉंट्स ओपन टाईप (otf) असल्यामुळे विंडोज आणि मॅकिन्तोशसाठीही वापरता येतात. फॉंट डाऊनलोड केल्यानंतर तो तुमच्या फॉंट डिरेक्टरीत सेव्ह करणे आवश्यक आहेत. त्यानंतरच तुम्ही तो अॅप्लीकेशन्समध्ये वापरू शकाल.
Read the full story

,

टेक्स्ट सेव्हर, टाईम सेव्हर

July 18, 2008 0 comments

एखाद्या मेलला उत्तर देताना किंवा एखाद्या ब्लॉगपोस्टवर कॉमेंट देताना आपण इतकं गुंग होतो की आपण किती लिहितोय याचं भान राहत नाही. सगळं लिहून झाल्यानंतर (पुन्हा एकदा वाचून, करेक्शन्स करून) आपण सेन्ड किंवा पोस्ट म्हणतो आणि...सेशन एक्स्पायर्ड किंवा सेशन टाईमआऊट असा भलो मोठा मेसेज येतो. झालं...एवढा विचार करून, एवढा वेळ घालून लिहिलेलं सगळं गेलं...ते परत मिळवण्याच्या प्रयत्नात डेस्परेट होऊन आपण भलत्या कोणत्यातरी कीज प्रेस करून होतं-नव्हतं तेही घालवतो. आता परत तेच लिहिण्याचा मूड राहत नाही किंवा लिहिलंच तर ते मनासारखं होत नाही. तुम्ही फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल, तर अशा प्रसंगी गेलेले टेक्स्ट परत मिळविण्यासाठी एक नवे एक्स्टेंशन वापरू शकता.

टेक्स्ट सेव्हर हे त्या एक्स्टेंशनचे नाव. टेक्स्ट सेव्हर इन्स्टॉल केल्यानंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करा. आता तुम्ही टेक्स्ट सेव्हर वापरू शकाल. फायरफॉक्सच्या स्टेटसबारमध्ये (तळात) पेपर आणि फ्लॉपी असा आयकॉन दिसेल. हा टेक्स्ट सेव्हरचा आयकॉन आहे. कोणत्याही साईटवरील टेक्स्ट एरियात टाईप करताना तुम्ही लिहिलेल्या मजकुरावर जाऊन राईट-क्लिक करा व Add this text to TextSaver यावर क्लिक करा. तुम्ही टाईप करत असलेले सर्व टेक्स्ट आता टेक्स्ट सेव्हरमध्ये सुरक्षित आहे. टेक्स्ट अॅड झाल्यानंतर साईडबार तयार होईल. त्यासोबतच एक बॉक्स प्रॉम्प्ट होईल. यात तुम्ही नुकतेच अॅड केलेल्या टेक्स्टसाठी एखादा कीवर्ड देऊ शकता. सेव्ह केलेले टेक्स्ट पुन्हा शोधण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही काम करत असताना सेशन टाईमआऊट झाले किंवा कनेक्टिव्हिटी गेली तर टेक्स्ट सेव्हर ओपन करून सेव्ह केलेले टेक्स्ट रिट्राईव्ह करू शकता.

हे टेक्स्ट तुम्ही ड्रॅग करून पुन्हा वापरू शकता. टेक्स्ट सेव्हर अजूनही प्रायोगिक अवस्थेत असल्यामुळे ते इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला मोझिलावर रजिस्टर व्हावे लागेल. पण हे अगदी दोन मिनिटांचे काम आहे.
मोझिलावर रजिस्टर होण्यासाठी येथे क्लिक करा.
टेक्स्ट सेव्हर इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
आणखी एका भन्नाट एक्स्टेंशनसाठी वाचाः शब्द खाली पडू न देणारे ‘हायपरवड्‌र्ड्स’
Read the full story

,

चेंज युवर टोन

July 17, 2008 0 comments

मोबाईल हा प्रकार जेव्हा नवा होता, तेव्हा हॅंडसेटनंतर रिंगटोन्स हा प्रचंड मोठा आकर्षणाचा भाग होता. तुझ्याकडे कोणत्या रिंगटोन्स आहेत हे पाहण्यासाठी आणि त्या एेकण्यासाठी मित्रांची भांडणं होत असत. मोबाईल हा प्रकार कॉमन होत गेला आणि रिंगटोन्सचे आकर्षणही...असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. रिंगटोन्स आजही तितक्याच पॉप्युलर आहेत. जरा तुमच्या आजूबाजूला पाहा. प्रत्येकाच्या फोनच्या वेगवेगळ्या टोन्स एेकू येतील. कुणाच्या मोबाईलवर भजन वाजतंय, कुणाकडे हिमेश रेशमिया, कुणी पक्ष्यांचा किलबिलाट एेकतोय तर कुणी बासरी. अशा भिन्न रिंगटोन्स एेकल्या की तुम्हालाही पटेल, रिंगटोन्स अजूनही पॉप्युलर आहेत. मग तुम्हीही हळूच ब्लुटूथ अॉन कराल आणि म्हणाल, अरे ती मघाशी वाजलेली बासरीची रिंगटोन पाठव ना मला...अशा रिंगटोन लव्हर्ससाठी एका उत्तम साईटची माहिती मी आज देणार आहे.


ईस्ट लंडनस्थित एका कंपनीने एम-जेली ही सेवा सुरू करून रिंगटोन लव्हर्सची मोठी सोय केली आहे. अनेकवेळा आपण इतरांपेक्षा ‘हटके’ रिंगटोनच्या शोधात असतो. रोज एकच एक टोन एेकून कंटाळा येतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी एम-जेली उत्तम मार्ग आहे. एम-जेलीवर एमपीथ्री फॉरमॅटमधील रिंगटोन्स आणि मेसेज टोन्स उपलब्ध आहेत. यातील जवळपास सर्वच टोन्स मोफत डाऊनलोड करता येतात. या टोन्स तुम्ही थेट तुमच्या मोबाईलवर जीपीआरएस कनेक्टिव्हिटी वापरून डाऊनलोड करू शकता. कॉम्प्युटरवर डाऊनलोड करायचे झाल्यास एम-जेली डॉट कॉम एेवजी एम डॉट एम-जेली डॉट कॉम असा अॅड्रेस टाईप करा. आता तुम्ही तुम्हाला हव्या त्या रिंगटोन्स थेट कॉम्प्युटरवर डाऊनलोड करू शकता. या फाईल्स तुम्ही डेटा केबल किंवा ब्लुटूथच्या साह्याने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता. एम-जेलीवर रिंगटोन एेकण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक नसले तरी रजिस्टर्ड मेंबर म्हणून तुम्ही रिंगटोन्सना रेट करू शकता किंवा त्यावर कॉमेंटही देऊ शकता.

अपडेटः रिफ्रेशिंग रिंगटोन्ससाठी अाणखी एक साईट - टोनशेअर्ड

साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर मोबाईलसंदर्भात आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

स्टे अवे फ्रॉम स्पॅम...

July 16, 2008 3 comments


याहू असो, रेडिफ असो किंवा स्पॅम मेल फिल्टर करणारे जी-मेल असो - सर्व मेल सेवांतून स्पॅम मेल्स येतच राहतात. बरेच लोक स्पॅमला कंटाळून एखादे अकाऊंट अक्षरशः बंद करून टाकतात. कारण दिवसाला कामाचे मेल्स १० आणि स्पॅम मेल्स १००, असे प्रमाण असल्यावर करणार तरी काय? आपण अनेक ठिकाणी आपला ई-मेल अॅड्रेस देत असतो. स्पॅमर्सना स्पॅम पाठविण्यासाठी असे पब्लीकली डिस्प्ले केलेले ई-मेल अॅड्रेसंच हवे असतात. एखाद्या ब्लॉगवर किंवा पर्सनल साईटवर आपला ई-मेल अॅड्रेस दिसला की स्पॅम पाठविणाऱ्या स्क्रिप्ट्स तो कॅप्चर करतात आणि स्पॅम पाठवण्यास सुरवात करतात. अशा अनवॉन्टेड मेल्सपासून वाचण्यासाठी आपण पुढील टीपचा वापर करू शकतो.

स्पॅमर्सपासून आपला ई-मेल अॅड्रेस लपवून ठेवण्यासाठी अनेक जण पब्लीक डिस्प्ले करताना @ हे चिन्ह वापरायचे टाळतात. म्हणजे myname (at) example (dot) com अशाप्रकारे ई-मेल अॅड्रेस दिला जातो. स्पॅमर्सने तयार केलेल्या स्क्रिप्ट्सना (रोबोट्स) हा ई-मेल अॅड्रेस आयडेंटिफाय होत नाही. त्यामुळे त्यातून आपण सुटतो. पण ही ट्रिक काही प्रमाणापर्यंतच कामास येते. याहून अधिक सुरक्षित ट्रिक अशीः
पर्सनल साईट, ब्लॉग किंवा सोशल नेटवर्क प्रोफाईलवर (अॉरकुट, फेसबुक, मायस्पेस इ.) आपला ई-मेल अॅड्रेस जसाच्या तसा देऊ नये. mailto:myname@example.com हा फॉरमॅट वापरून आपल्या ई-मेल अॅड्रेसची शॉर्ट यूआरएल तयार करावी (उदा. वरील ई-मेल अॅड्रेससाठी शॉर्ट केलेली यूआरएल अशी असेल - http://tinyurl.com/5tpzqb). यासाठी तुम्ही टायनीयूआरल सारखी सेवा वापरू शकता. (यासारख्या इतर सेवांच्या माहितीसाठी वाचाः शॉर्ट अॅण्ड स्वीट). आता ही यूआरल तुम्ही ई-मेल अॅड्रेसच्या ठिकाणी वापरा. ही लिंक नसून ई-मेल अॅड्रेस आहे, हे स्पॅमर्सच्या स्क्रिप्ट्सना कळू शकणार नाही. यावर क्लिक केल्यास क्लिक करणाऱ्याची डिफॉल्ट मेल सेवा ओपन होऊन तुमचा मेल आयडी ‘To’ मध्ये तुमचा खरा मेल अॅड्रेस डिस्प्ले होईल.
Read the full story

,

गुप्त संदेशांसाठी...


आजच्या इंटरनेट युगात माहितीला सवर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. माहिती शोधण्यासाठी आणि माहितीच्या देवाण-घेवाणीसाठीच इंटरनेटचा प्रामुख्याने वापर केला जातो. आपल्याकडे असणारी बहुमूल्य माहिती इतरांपासून सुरक्षित कशी ठेवता येईल, यासाठी सतत संशोधन सुरू आहे. सरकार, मोठ्या कंपन्या, वित्तीय संस्था आदींसाठी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अत्यंत महत्त्वाची असते. अशा सिक्युरिटी सेवांमध्ये डेटा एन्क्रिप्शन टेक्निक्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. तुम्ही म्हणाल, आम्हाला काय उपयोग याचा? उपयोग आहे. आपणही एकमेकांना अनेकदा महत्त्वाचे किंवा गोपनीय मेसेजेस पाठवत असतो. अशा वेळी सदर माहिती इतरांच्या हातास लागली तर अनर्थ घडू शकतो. त्यामुळे असे मेसेजेस एन्क्रिप्ट करून पाठवावेत. आपले मेसेजेस आणि फाईल्स एन्क्रिप्ट करून पाठविण्यासाठी अनेक अॉनलाईन सेवा उपलब्ध आहेत.

एन्क्रिप्शनसाठी उपलब्ध असलेल्या बहुतांश सर्व अॉनलाईन सेवा मोफत आहेत. या सेवा वापरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनदेखील करावे लागत नाही. उपलब्ध सेवेतील मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला पाठवायचा असलेला मेसेज टाईप करून तो डिक्रिप्ट करण्यासाठी पासवर्ड तयार केल्यानंतर तुमचा मेसेज एन्क्रिप्ट होऊन त्याच मेसेज बॉक्समध्ये डिस्प्ले होईल. आता हा एन्क्रिप्टेड मेसेज तुम्ही समोरच्या व्यक्तीस पाठवू शकता. ज्या सेवेचा वापर करून मेसेज एन्क्रिप्ट केला आहे त्याच सेवेचा वापर करून तो डिक्रिप्ट करावा लागेल. डिक्रिप्शनसाठी वापरावा लागणारा पासवर्ड मात्र एन्क्रिप्टेड मेसेजसोबत पाठवू नये. पासवर्ड पाठविण्यासाठी तुम्ही एसएमएस किंवा फोन कॉलचा वापर करू शकता. मेसेजेस एन्क्रिप्ट करण्यासाठी तुम्ही एनकोडर किंवा इन्फोएन्क्रिप्ट या सेवा वापरू शकता. एनकोडरमध्ये ४०० शब्दांची मयर्यादा आहे.

मेसेजसप्रमाणे एखादी फाईलही तुम्ही एन्क्रिप्ट करून पासवर्ड प्रोटेक्ट करू शकता. यासाठी अॉनलाईन आणि अॉफलाईन सेवाही उपलब्ध आहेत. अॉनलाईन फाईल एन्क्रिप्शनसाठी फाईल एन्क्रिप्टर, तर अॉफलाईन एन्क्रिप्शनसाठी ट्रूक्रिप्ट हे अॅप्लीकेशन वापरू शकता. विंडोज एक्सपी, विंडोज व्हिस्टा, मॅकिन्तोश आणि लिनक्स अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांनी ट्रूक्रिप्ट येथून डाऊनलोड करावे.
Read the full story

,

ई-कॅल्सीः अॉनलाईन सायंटिफिक कॅल्क्युलेटर

July 15, 2008 0 comments

विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणारे एखादे झटपट कॅल्क्युलेशन करायचे असेल तर रन वर क्लिक करून Calc अथर्थात कॅल्क्युलेटर असं टाईप करतात आणि कॅल्क्युलेटरचे अॅप्लीकेशन रन होते. ज्यांना रन वापरण्याची तितकीशी सवय नाही ते लोक प्रोग्राम्स > अॅक्सेसरीज येथून कॅल्क्युलेटर अॅक्सेस करतात. मॅकिन्तोश वापरणारे डॅशबोर्डमधून कॅल्क्युलेटर अॅक्सेस करू शकतात. पण हे कॅल्क्युलेटर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी आदी बेसिक अॉपरेशन्ससाठीच उपयोगाला येतात. याद्वारे सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स शक्य होत नाहीत. इंजिनिअरिंगचे विद्याथर्थी किंवा इंजिनिअर्सना छोट्या-मोठ्या कॅल्क्युलेशन्ससाठीही सायंटिफिक कॅल्क्युलेटर्स लागते. अशांसाठी ई-कॅल्सी हे अॉनलाईन कॅल्क्युलेटर हा सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे.

ई-कॅल्सीद्वारे बेसिक आणि सायंटिफिक अशी दोन्ही प्रकारची कॅल्क्युलेशन्स करता येतात. बेसिक कॅल्क्युलेटरचा वापर करून नेहमीच्या कॅल्क्युलेशन्स व्यतिरिक्त वर्ग, वर्गमूळ काढता येणे शक्य होते. सायंटिफिक कॅल्क्युलेटरचा वापर सर्व प्रकारचे सायंटिफिक फंक्शन्स आणि अलजेब्रिक इक्वेशन्स सोडवण्यासाठी करता येतो. यात युनिट कन्व्हर्टरची सुविधा देण्यात आली आहे. ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट फाईल करताना किंवा एखादी असाईनमेंट पूर्ण करताना आता कॅल्क्युलेटर शोधण्याची गरज नाही. तुम्ही अॉनलाईनदेखील कॅल्क्युलेशन्स करू शकता!



आणखी एका अॉनलाईन कॅल्क्युलेटरच्या माहितीसाठी वाचाः अचूक कॅल्क्युलेशन!

Read the full story

,

सर्च करा, पैसे कमवा...


भारतीय मोबाईल व्यवसायात एक काळ असा होता जेव्हा लोकल इनकमिंग कॉलसाठीही पाच रुपये मोजावे लागत. आज भारतातील मोबाईल सेवा जगातील सर्वांत स्वस्त सेवा म्हणून ओळखली जाते. अशात रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या ‘व्हर्जिन मोबाईल’ने भारतात ‘टाटा इंडिकॉम’च्या मदतीने सेवा सुरू केली आणि ‘गेट पेड फॉर इनकमिंग’ या योजनेने तरुणवगर्गास आकर्षित केले. या नावीन्यपूर्ण योजनेस कितपत यश मिळाले, याची आकडेवारी उपलब्ध नसली तरी सहा-सात मोबाईल कंपन्यांसोबत स्पर्धा करायची म्हटल्यावर अशा योजना महत्त्वाची भूमिका निभावतात. असाच काहीसा प्रकार आता सर्च इंजिन्सच्या बाबतीत घडताना दिसतोय. तुम्ही महिन्याला जर ६५०० सर्चेस करत असाल तर बसल्या-बसल्या २५ डॉलर्स कमवू शकता...

इंटरनेटच्या मायाजालात सर्च इंजिन्सच्या माध्यमातून किती कमाई करता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गुगल होय. केवळ आठ-नऊ वषर्षांच्या कालावधीत १६ बिलीयन डॉलर्सची उलाढाल करून गुगलने हे सिद्ध केले आहे. सर्च इंजिन म्हणजे गुगल हे समीकरण आता लहान मुलांच्या डोक्यातही पक्कं झालंय. अशा परिस्थितीत इतर सर्च इंजिन्सना नावीन्यपूर्ण योजना राबवून इंटरनेट ट्रॅफिक आपल्याकडे वळवणे भाग आहे. स्कोर या सोशल सर्च इंजिनने नेमकी हीच स्ट्रॅटेजी अवलंबलेली आहे. स्कोरवर केलेल्या प्रत्येक सर्च आणि कॉमेंटसाठी तसेच दिलेल्या प्रत्येक व्होटसाठीही पॉईंट्स मिळतात. सर्चसाठी १, व्होटसाठी २ आणि कॉमेंटसाठी ३ पॉईंट्स मिळतात.



तुम्ही तुमच्या िमत्रांना स्कोर वापरण्यासाठी इन्व्हाईट केल्यास त्यांनी कमविलेल्या एकूण पॉईंट्सच्या २५ टक्के पॉईंट्स तुम्हाला मिळतात. स्कोरवर रजिस्टर झाल्यानंतर स्कोरमधून सर्च करून तुम्ही हे पॉईंट्स कमवू शकता. असे एकूण ६५०० पॉईंट्स कमवल्यानंतर २५ डॉलरचे व्हिसा गिफ्ट कार्ड तुम्हाला घरपोच मिळते. हे गिफ्ट कार्ड वापरून तुम्ही कोणत्याही दुकानांत खरेदी करू शकता.
स्कोर हे वास्तविक सर्च इंजिन अॅग्रीगेटर आहे. यात तुम्ही कोणताही सर्च दिल्यास गुगल, याहू आणि एमएसएन यावर मिळणारे रिझल्ट्स एकत्रित दाखवले जातात. यात तुम्ही हवा तो प्राधान्यक्रम निवडू शकता. तेव्हा याहू, गुगल विसरा आणि स्कोर बुकमार्क करा!

सर्च इंजिनबाबत साधी-सोपी टेक्नॉलॉजीवर आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

जी-मेल ट्रॅकर

July 14, 2008 5 comments

तुम्ही जी-मेलचे फॅन असाल आणि पर्सनल तसेच अॉफिशियल कम्युनिकेशनसाठी जी-मेलचाच वापर करत असाल, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी गुगलने नवे फीचर सुरू केले आहे. नेहमीप्रमाणेच कुठलाही गाजावाजा न करता गुगलने हे नवे फीचर जी-मेलमध्ये अॅड केले आहे. तुमचे अकाऊंट तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणी अॅक्सेस करतंय का, याचा शोध घेण्यासाठी हे फीचर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

तुमच्या जी-मेलच्या अकाऊंटमध्ये अगदी तळात हे फीचर तुम्हाला पाहायला मिळेल. You are currently using 1300MB (18%) of your 6925MB अशा प्रकारची माहिती जिथे असते, त्याखाली आता ‘लास्ट अकाऊंट अॅक्टिव्हिटी’ हे नवे फीचर तुम्हाला दिसेल.

त्यात शेवटी डिटेल्स अशी लिंक आहे. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या अकाऊंटवरील लेटेस्ट पाच अॅक्टिव्हिटीज पाहायला मिळतील. गेल्या पाच अॅक्टिव्हिटी कोणत्या आयपी अॅड्रेसवरून झालेल्या आहेत, त्या ब्राऊजरवरून झालेल्या आहेत की मोबाईलवरून की आऊटलूकसारख्या एखाद्या POP3 सेवेवरून याबद्दलची इत्थंभूत माहिती मिळेल. एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक ठिकाणी तुमचे अकाऊंट ओपन असेल, तर तशी सूचनाही तुम्हाला मिळेल.

केवळ शेवटच्या पाच अॅक्टिव्हिटीजची माहिती देणे तितकेसे उपयोगी नसले तरी गुगल किमान दोन ते तीन महिन्यांची अकाऊंट हिस्ट्री उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.

गुगलच्या विविध सेवांबद्दल साधी-सोपी टेक्नॉलॉजीमध्ये आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

सुपर इनबॉक्सः मो-मेल


तुमच्या साध्या फोनला ब्लॅकबेरीत कसं कन्व्हर्ट करायचं याबद्दल सविस्तर माहिती मी यापूवर्वीच्या एका पोस्टमध्ये (वाचाः गिफ्ट युवरसेल्फ अ ब्लॅकबेरी!) दिली होती. त्यात दिलेल्या सेवांपैकी एखादी सेवा वापरून काही जणांनी आपल्या स्मार्टफोनला ब्लॅकबेरीत कन्व्हर्ट केलंही असेल. तुम्ही मिळणाऱ्या सेवेबाबत आनंदी असाल तर उत्तम. पण नसाल तर त्याहून साधा आणि सोपा मार्ग आता उपलब्ध झाला आहे. आता तुम्ही जी-मेल, हॉटमेल,याहू आदी अकाऊंटवर येणारे मेल थेट मोबाईलवर पाहू शकता. पुश-मेल टेक्नॉलॉजी वापरून मास्टर इनबॉक्स तयार करण्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे मो-मेल!

मोबाईल मेल अथर्थात मो-मेल ही सेवा सध्या बीटा फेजमध्ये असून तिचा वापर करण्यासाठी तुम्हाला बीटा पासवर्ड मागावा लागेल. बीटा पासवर्ड रिक्वेस्टसाठी मो-मेल डॉट कॉमवर जावे लागेल. बीटा पासवर्ड मागितल्यानंतर साधारण पाच-सहा दिवसांत मिळतो. त्यानंतर तो पासवर्ड वापरून तुम्ही मो-मेल इंडिया या साईटवर रिडायरेक्ट व्हाल. स्वीडनस्थित मो-मेल जगातल्या ३५ देशांत आपली सेवा देते. पुश-मेल सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत मो-मेलचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे अॅप्लीकेशन इन्स्टॉल करावे लागत नाही. मो-मेलवर रजिस्टर होताना तुम्हाला मोबाईल नंबर, मोबाईल अॉपरेटर आणि फोनचे मॉडेल एवढी माहिती द्यावी लागते. तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा यूजर आयडी होतो. रजिस्टर झाल्यानंतर मो-मेलच्या सेटिंग्ज तुमच्या मोबाईलवर थेट येतात. त्या फक्त सेव्ह करायच्या. त्यानंतर तुम्हाला ज्या अकाऊंटमधील मेल्स मोबाईलवर हव्या आहेत त्यातील सेटिंग्जमध्ये किरकोळ बदल करावे लागतात. त्यानंतर तुमचे मो-मेल पुश-मेल अॅक्टीव्हेट होते.

तुम्ही यात जी-मेल, हॉटमेल, एमएसएन, मॅक, याहू आणि इतर अकाऊंट्स अॅड करू शकता. तुम्ही जेव्हा मो-मेलवर अकाऊंट तयार करता त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर अॅट मो-मेल असा एक नवा ई-मेल अॅड्रेस तयार होतो आणि तुम्ही इतर अकाऊंटवरील मेल्स मो-मेलवर फॉरवर्ड करता. पण मो-मेलवर आलेल्या मेलला उत्तर देताना तो ई-मेल ज्या अकाऊंटवरून आलेला असेल त्याच नावाने उत्तर जाते. मो-मेलमधील इंटेलिजन्समुळे हे शक्य होते. मो-मेलसाठी तुमचे जीपीआरएस अॅक्टीव्ह असणे आवश्यक आहे. तुम्हाला जीपीआरएस वापरल्याचा आर्थिक फटका बसू नये याची पुरेपूर काळजी मो-मेलने घेतली आहे. मो-मेलद्वारे मेल आणि सोबत आलेल्या अॅटॅचमेंट्सचा साईझ जवळ-जवळ ९५ ते ९९ टक्क्यांपर्यंत कमी केला जातो. उदा. एखादा ३ एमबीचा फोटो मो-मेलवर आल्यानंतर १४ केबींचा होतो आणि तो तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने रिसाईझ केला जातो. मो-मेल ही सेवा आयफोनवरदेखील वापरता येते.
Read the full story

,

सेफ पासवडर्ड्स

July 13, 2008 0 comments


पासवर्ड लक्षात ठेवणे, यापेक्षाही तो तयार करणे हे कठीण काम आहे. इंटरनेट तज्ज्ञांच्या मते पासवर्डची स्ट्रेन्थ ही त्याच्या लांबीवर नव्हे तर त्यातील कॅरेक्टर्स, न्युमरल्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स यांच्या कॉम्बिनेशनवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही तयार केलेले पासवडर्ड्स तुम्हाला स्ट्रॉंग वाटत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी असू शकते. आता असे विचित्र कॉम्बिनेशन तयार करणे आणि ते लक्षात ठेवणे, हे कठीण काम करण्यासाठी आपण इंटरनेटचाच आधार घेऊ शकतो.

सेफ पासवर्ड ही सेवा अशा प्रकारचे स्ट्रॉंग पासवर्ड तयार करण्यासाठी उपयोगास येते. सेफ पासवर्ड डॉट कॉमवर जाऊन फक्त जनरेट पासवर्ड यावर क्लिक केलं की तुम्हाला नवा पासवर्ड मिळतो. हा पासवर्ड तुम्ही तुमच्याही कोणत्याही अॉनलाईन अकाऊंटसाठी वापरू शकता.
या पासवर्डची स्ट्रेन्थ चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी वाचाः पासवर्ड फटीग
Read the full story

,

मॅकिन्तोशसाठी साईट स्पेसिफिक ब्राऊजर

July 12, 2008 0 comments


नेहमी लागणाऱ्या साईट्स (उदा. जी-मेल, फेसबुक, अॉरकुट, गुगल न्यूज वगैरे) ओपन करण्यासाठी एखादा शॉर्टकट उपलब्ध झाला तर? असा शॉर्टकट उपलब्ध आहे. त्यास साईट स्पेसिफिक ब्राऊजर (एसएसबी) असे म्हणतात. विंडोजसाठी बबल्स नावाचे एसएसबी उपलब्ध आहे. बबल्सबद्दल अधिक माहितीसाठी वाचाः क्विक ब्राऊजिंगचा नवा मंत्र. आता विंडोजसाठी एखादे अॅप्लीकेशन उपलब्ध आहे आणि मॅकिन्तोशसाठी नाही, असं कसं चालेल?

फ्लुईड हे मॅकिन्तोशसाठीचे साईट स्पेसिफिक ब्राऊजर. फ्लुईड इन्स्टॉल केल्यानंतर एका छोट्या विंडोत तुम्ही नवे वेब अॅप्लीकेशन तयार करू शकता. तुम्हाला ज्या वेबसाईटसाठी शॉर्टकट तयार करायचा आहे त्याची लिंक आणि आयकॉन एंटर करून तुमच्या डॉकसाठी एक नवे अॅप्लीकेशन तयार होते.

यावर क्लिक केल्यास तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरमध्ये ती साईट ओपन होईल. याचा फायदा असा, की तुम्हाला जी-मेल, फेसबुक, गुगल रीडर आदी नेहमी लागणाऱ्या साईट्ससाठी ब्राऊजरमधील टॅब एंगेज करण्याची गरज नाही. तुम्ही इंटरनेटला कनेक्ट असलात की एसएसबीमधून तुम्हाला या साईटवरील अॅक्टिव्हिटीजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील.

Read the full story

,

अडीच एमबीत १६ अॅप्लीकेशन्स!

July 11, 2008 0 comments

लॅपटॉप न वापरणारे किंवा असूनही महत्त्वाच्या वेळी सोबत न ठेवणारे लोक अनेक वेळा अडचणीत येतात. एखाद्या क्लाएंटकडे जाताना सोय म्हणून आपण एखादी फाईल पेन ड्राईव्हवर स्टोअर करून घेऊन जातो आणि तिथेच आपली पंचाईत होते. आपण नेमकी ती फाईल पीडीएफ केलेली असते. आता समोरील सदगृहस्थाच्या लॅपटॉपवर अॅडोब अॅक्रोबॅट नसते आणि इंटरनेटवरून डाऊनलोड करणेही त्यावेळी शक्य नसते. पण यांच्या लॅपटॉपवर अॅडोब अॅक्रोबॅट नाही, तर आम्ही काय करावे? तुमच्यासाठी आम्ही सगळी सॉफ्टवेअर्स खिशात घेऊन फिरायचे का? त्या क्षणी स्वतःवर चिडचिड करण्यापेक्षा दुसरं काहीही आपण करू शकत नाही.

आपल्या खिशात किमान १ जीबीचा पेन ड्राईव्ह तर नक्कीच असतो. आता यातील केवळ अडीच एमबी इतक्या जागेत नेहमी लागणारी १५-१६ अॅप्लीकेशन्स ठेवली तर तुमची काही हरकत? तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? अडीच एमबीत १५-१६ अॅप्लीकेशन्स? शक्यच नाही...पण हे शक्य आहे. टायनी यूएसबी अॉफिस हे पेन ड्राईव्हसाठी तयार केलेले पोर्टेबल प्रॉडक्टिव्हीटी सूट आहे.

याची तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपशी तुलना होऊ शकत नसली तरी अडचणीच्या वेळी टायनी यूएसबी नक्कीच कामाला येऊ शकते. याचा वापर करून तुम्ही वर्ड, एक्सेल फाईल्स तयार करू शकता, त्या पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करू शकता आणि एमएसएनवरून चॅटही करू शकता. यात मिळणाऱ्या संपूर्ण सेवांची यादी पुढे दिली आहेः

* Database Creation - with CSVed
* Data Encryption - with DScrypt
* Email Client Software - with NPopUK
* File Compression - with 100 Zipper
* File Sharing - with HFS
* File Transfer - with FTP Wanderer
* Flowchart Creation - with EVE Vector Editor
* MSN Messenger Client - with PixaMSN
* Tree-Style Outliner Software - with Mempad
* PDF Creation - with PDF Producer
* Password Recovery - with XPass
* Secure Deletion - with DSdel
* Spreadsheet Creation - with Spread32
* Text Editing - with TedNotepad
* Word Processing - with Kpad
* Program Launching - with Qsel

टायनी यूएसबी अॉफिस डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

ट्रॅक युवर पॅकेज

July 10, 2008 0 comments


तुमची स्वतःची कंपनी असेल तर तुम्हाला ई-मेलबरोबर स्नेल मेलही पाठवावे लागत असतील. भारतीय डाक विभागाने कितीही कात टाकली असेल तरी आपण खासगी कुरियर कंपन्यांचाच अधिक वापर करतो. परदेशात एखादे महत्त्वाचे कुरियर पाठवायचे असेल तर भारतीय डाक विभागापेक्षा आपण यूपीएस किंवा फेडएक्सलाच प्राधान्य देऊ. असो. तर ई-मेलच्या जमान्यातही आपल्याला काही महत्त्वाच्या कामांसाठी कुरियर सेवा वापरावीच लागते. बहुतांश खासगी कुरियर कंपन्या पॅकेज ट्रॅक करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक देतात. त्यांच्या साईटवर जाऊन सदर पॅकेज सध्या कुठे आहे ते ट्रॅक करू शकतो. पण आपल्याला दिवसाला वेगवेगळ्या कंपन्याची १५-२० पॅकेजेस ट्रॅक करायला सांगितली तर? तुम्ही म्हणाल, केवळ अशक्य! यासाठी पुन्हा इंटरनेटच आपल्या कामाला येतं. विविध कंपन्याची पॅकेजेस एकाच ठिकाणाहून ट्रॅक करण्यासाठी अनेक अॉनलाईन सेवा वापरू शकता. ट्रॅक द पॅक ही त्यापैकीच एक...

ट्रॅक द पॅकचा या साध्या-सोप्या सेवेच्या माध्यमातून तुम्ही यूपीएस, फेडएक्स, डीएचएल आणि यूएसपीएसचे (युनायटेड स्टेट्स पोस्टल सव्हर्व्हीस) पॅकेजेस ट्रॅक करू शकता. यात तुमचे पॅकेज पोस्ट केल्यापासूनच्या प्रत्येक अॅक्शनची माहिती तुम्हाला नकाशासह मिळते. ही सेवा मोफत असून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही एसएमएस अलर्टही मागवू शकता. तुम्हाला दिवसांत ट्रॅक करायला लागणाऱ्या पॅकेजेसची संख्या खूप मोठी असेल तर तुम्ही फायरफॉक्ससाठी असलेले एक्स्टेंशनही वापरू शकता. ट्रॅक द पॅकचे फायरफॉक्स एक्स्टेंशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



पॅकेजट्रॅकर ही देखील अशीच एक सेवा असून याचे गुगल गॅजेट, व्हिस्टा साईडबार गॅजेटही उपलब्ध आहे.
पॅकेजमॅपिंग या सेवेत तुम्ही यूपीएस, फेडएक्स, डीएचएल आणि यूएसपीएसचे पॅकेजेस ट्रॅक आणि मॅप करू शकता.
पॅकट्रॅक ही या गटात मोडणारी आणखी एक सेवा.

या सर्व सेवा थोड्याबहुत फरकाने एकसारख्याच आहेत. तुम्हाला अशा प्रकारच्या सेवेची गरज असेल तर यापैकी कोणतीही सेवा तुम्ही निवडू शकता.
Read the full story

,

मुलांसाठी ज्ञानरंजन - टूटपप

July 9, 2008 0 comments



नेहमीच्या टिप्स आणि अॅप्लीकेशन्सपासून आज थोडा ब्रेक घ्यावा असा विचार केला. तुम्हालाही थोडा ब्रेक हवाच असेल ना? योग्य वापर केला तर नवी टेक्नॉलॉजी किती साधी-सोपी आणि आपल्या गरजेची आहे, याची प्रचिती तुम्हाला येत असेल. यावर लिहावे तेवढे थोडेच आहे. असो. तर काही वेळा आपल्याला अवघड वाटणाऱ्या गोष्टी लहान मुलं अगदी लीलया करून दाखवतात. उदा. मोबाईलमधले अनेक फंक्शन्स - जी आपन कधी ओपन करूनही पाहत नाही - ती ही मुलं सहज हाताळतात. लॅपटॉप, इंटरनेट याबाबतीतही हे असंच होतं. त्यामुळे मुलांना या गोष्टींपासून दूर कधीही ठेवू नका. त्यांना वापरू द्या. त्यातली गंमत त्यांना कळू द्या. एका गमतीशीर आणि मुलांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या साईटची मी आज ओळख करून देणार आहे.

गणित म्हटलं की मुलांना कायम भीती वाटते. पण ही भीती घालवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही मुलांना टूटपप या साईटची ओळख करून देऊ शकता. यात गणिताशी संबंधित तीन आणि स्पेलिंगचा एक असे एकूण चार गेम्स आहेत.



तुम्ही गेस्ट म्हणूनही खेळू शकता किंवा रजिस्टर्ड मेंबर म्हणूनही खेळू शकता. तुमच्यासोबत त्याक्षणी अॉनलाईन असलेला इतर कोणीही प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असतो. यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकारावर आधारित तीन गेम्स आहे. पैकी एकामध्ये केवळ एक क्रिया असलेले, दुसऱ्यात एकाहून अधिक क्रिया असलेले तर तिसऱ्यात केवळ गुणाकार असलेले प्रश्न आहेत. यापैकी एखादा गेम सिलेक्ट केल्यास त्यात आणखी काही पयर्याय आहेत. त्यानंतर लेव्हल सिलेक्ट करावी लागते व स्टार्ट म्हटल्यानंतर ठराविक वेळेत जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील तितकी द्यायची. स्पेलिंगच्या गेममध्ये एखादा शब्द उच्चारला जातो, त्यावरून तो स्पेल करायचा. हसत-खेळत ज्ञानरंजन करण्यासाठी ही साईट खूप उपयोगी ठरते.
या साईटचा वापर हा सर्वस्वी पालकांवर अवलंबून आहेत. तुम्ही सात दिवसांनंतर आलेल्या ई-मेलवरून कन्फर्मेशन दिले नाही तर आठव्या दिवसापासून ही साईट तुमच्या मुलाला अॅक्सेस करता येणार नाही. त्यामुळे मुलं याच्या आहारी जातील, अशी भीती बाळगू नका. उलट तुम्हीच याच्या आहारी जाण्याची शक्यता आहे...

वाचाः लहानग्यांसाठीचे ‘गुगल’
Read the full story

,

पाच मिनिटांत मोबाईल वॉलपेपर

July 8, 2008 2 comments


चोवीस तास आपल्या सोबत असणारा आपला सखा म्हणजे आपला मोबाईल. याच्याशिवाय जगणं जवळपास अशक्यच आहे. मोबाईल जवळ नसला की आपण बेचैन होतो. अनेकांना याचा अनुभव आला असेल. अशा या मोबाईलला फ्रेश ठेवण्यासाठी आपण काय-काय करत असतो. कधी त्याला कव्हर घाल, कधी स्क्रीनसेव्हर चेंज कर आणि वॉलपेपर तर दररोज बदलण्याचा प्रयत्न करतो. एखादा आवडलेला वॉलपेपर आपल्या मोबाईलसाठी अॅडजस्ट करताना मात्र आपली तारांबळ उडते. अनेकदा तो डिस्टॉर्ट होतो. कारण तो तयार केलेला असतो डेस्कटॉपसाठी आणि आपण तो तसाच्या तसा मोबाईलसाठी वापरण्याचा प्रयत्न करतो. अशा लोकांसाठीच मोबोपिक ही अत्यंत साधी-सोपी सेवा निर्माण करण्यात आली आहे.


मोबोपिकचा वापर करून अगदी तीन स्टेप्समध्ये आपण आपल्या मोबाईलसाठी वॉलपेपर तयार करू शकतो. पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला हवे असलेले चित्र सिलेक्ट करा. त्यासाठी ते तुमच्या कॉम्प्युटरवर असले पाहिजे किंवा तुम्ही एखाद्या साईटवरील चित्राची लिंकही देऊ शकता. हे चित्र दोन एमबीहून अधिक साईझचे नसावे. चित्र अपलोड केल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या हॅंडसेटची कंपनी आणि मॉडेल नंबर सिलेक्ट करायचा. त्यानंतर संबंधित हॅंडसेटसाठीची वॉलपेपर साईझ आपोआप घेतली जाते. आता मोबोपिक इट असं म्हटलं की तुम्ही सदर वॉलपेपर थेट मोबाईलवर डाऊनलोड करू शकता (यासाठी एक लिंक दिली जाते) किंवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करून ब्लुटूथ अथवा डेटा केबलने मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता.

वाचाः दररोज बदला प्रोफाईल पिक्चर
Read the full story

, ,

‘कोट’-अन‘कोट’

July 7, 2008 1 comments


रिसर्चर्स, ब्लॉगर्स आणि कॉर्पोरेट जगतातील जवळपास सरळ्यांना रेफरन्सेस अत्यंत महत्त्वाचे असतात. यासंदर्भात अमुक एका संस्थेने किंवा ब्लॉगरने असे म्हटले होते की..., असे दाखले सगळीकडे द्यावे लागतात. अशावेळी आपल्याला संबंधित दाखल्यांचे थेट स्क्रीनशॉट मिळतात. पण ते प्रेझेंटे करता येत नाहीत. म्हणजे त्यांच्या इमेजेस तयार करण्यासाठी भली मेहनत घ्यावी लागते. एखाद्या साईटवरील माहिती आहे त्या स्वरुपात द्यायची झाली तर आधी प्रिंट स्क्रीन करा, मग ती इमेज फोटोशॉप किंवा पेंटब्रशमध्ये न्या, हवा तो पोर्शन सिलेक्ट करा. एवढ्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर ‘कोट’ (Kwout) ही सेवा वापरायलाच हवी.

‘कोट’ या सुटसुटीत सेवेच वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ज्या साईटमधील पोर्शन जसाच्या तसा हवा आहे त्या साईटचा अॅड्रेस ‘कोट’मध्ये एंटर केलात की ‘कोट’तफर्फे त्या साईटचा एक स्क्रीनशॉट घेतला जाते. त्यानंतर तुम्ही त्यातील हवा तो पोर्शन सिलेक्ट करून कट आऊटवर क्लिक करायचं. तुम्हाला हवा असलेला पोर्शन तुम्ही थेट इमेज म्हणून सेव्ह करू शकता, किंवा थेट तुमच्या फ्लिकर अकाऊंटवर अपलोड करू शकता किंवा त्याचा एचटीएमएल कोड तुमच्या साईट किंवा ब्लॉगमध्ये टाकू शकता - अॅज सिंपल अॅज दॅट!
('कोट'चाच वापर करून 'कोट'च्या साईटवरून ही इमेज कट केली आहे!)

‘कोट’चे फायरफॉक्स अॅड-अॉनही उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही फायरफॉक्स वापरत असाल तर दरवेळी ‘कोट’वर जाऊन साईट एंटर करण्याची गरज नाही. फायरफॉक्समध्ये खाली उजव्या कोपऱ्यात ‘कोट’चा आयकॉन असतो. त्यावर क्लिक करून साईटवरील पोर्शन सिलेक्ट करा व कट आऊट म्हणा. इतर ब्राऊजरसाठी ‘कोट’चे बुकमार्कलेट उपलब्ध आहे. तुमच्या साईट अथवा ब्लॉगमधील माहिती इतरांनी ‘कोट’ करावी असे वाटत असल्यास तुम्ही ‘कोट’चा कोड तुमच्या साईट किंवा ब्लॉगमध्ये इंटिग्रेट करू शकता.
Read the full story

,

पॅराग्राफ टू लिंक

July 6, 2008 0 comments


इन्स्टा मेसेंजरवरून चॅट करत असताना अनेकदा आपण कुठलेतरी रेफरन्सेस समोरच्या व्यक्तीस पाठवत असतो. बऱ्याच वेळा आपण एखाद्या वेबपेजती लिंक पाठवतो, पण आपल्याला सांगायची असलेली माहिती त्या पेजवर तळातील चार अोळी असतात. बरं, त्या चार ओळी कॉपी करून पाठवाव्यात तर इन्स्टा मेसेंजरची छोटीशी विंडो अगदीच भरून जाते. अशावेळी टाईनीयूआरएलसारखी एक नवी सेवा आपल्या कामास येऊ शकते. टाईनीपेस्ट हे त्या सेवेचे नाव.


एखाद्या वेबपेजमधला किंवा एखाद्या डॉक्युमेंटमधला उतारा कॉपी करून तो टायनीपेस्ट डॉट कॉमवर असलेल्या जागेत पेस्ट करायचा. त्यानंतर सबमिटवर क्लिक केलं की तो उतारा एका लिंकमध्ये कन्व्हर्ट केला जातो. ही लिंक तुम्ही समोरच्या व्यक्तीस पाठवू शकतो. त्या व्यक्तीने लिंकवर क्लिक केलं की ती लिंक पुन्हा टायनीपेस्टवर जाऊन मूळ उताऱ्याच्या स्वरूपात ओपन होते. टायनीपेस्टचे फायरफॉक्स एक्स्टेंशनही उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
भल्यामोठ्या लिंक लहान करण्यासाठी वाचाः शॉर्ट अॅण्ड स्वीट
Read the full story

,

बॅक-अप युवर मोबाईल कन्टेन्ट

July 5, 2008 0 comments

दर दोन महिन्यांनी मोबाईल हॅंडसेट बदलणाऱ्या एका तरुणाची बातमी परवाच कुठेतरी वाचली. मनात अालं, नव्या मोबाईलच्या नादात त्याला बिचाऱ्याला किती कष्ट करावे लागत असतील...एका मोबाईलमधला डेटा दर दोन महिन्यांनी दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्स्फर करायचा. त्यात परत कम्पॅटिबिलीटी इश्यू आले. नंबर उलटे-सुलटे होणार. एसएमएसचं काय? सिमकार्डवर स्टोअर केलेले एसएमएस तसेच राहतात, पण फोन मेमरीवरील एसएमएसचं काय? नोट्स, रिमाईंडर्स आदी सगळ्या गोष्टी परत फीड कराव्या लागणार...कितीही म्हटलं तरी हा एक वेळखाऊ प्रकार आहे. सारखा हॅंडसेट बदलणं टाळलं तरी आहे तो हॅंडसेट चोरीला गेल्यावर तर आपल्या हातात काहीच उरत नाही. ना नंबर्स, ना एसएमएस, ना रिमांईंडर्स. या परिस्थितींचा सामना करण्यासाठी काही अत्यंत सोप्या आणि मोफत अॉनलाईन सेवांचा वापर आपण करू शकतो. 


मोबाईलमधील डेटा आहे तसा अॉनलाईन ठेवण्यासाठी व भविष्यात इतर कोणत्याही हॅंडसेटवर ट्रान्स्फर करण्यासाठी मोबीकॉल ही एक उत्तम सेवा आहे. मोबीकॉल वापरण्यासाठी आपल्याकडे सिंक-एनेबल्ड मोबाईल आणि जीपीआरएस कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. सिंबियन किंवा विंडोज मोबाईल अॉपरेटिंग सिस्टिम असलेल्या हॅंडसेट्समध्ये सिंक्रोनायझेशनची सुविधा असते. तुमच्या हॅंडसेटवर मोबीकॉलची सेवा वापरता येऊ शकते किंवा नाही हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा. असल्यास तुम्हाला सर्वप्रथम मोबीकॉलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही एसएमएसद्वारे फोन सेटिंग्ज मागवू शकता किंवा मॅन्युअलीही सेटिंग्ज करू शकता. मॅन्युअल सेटिंग्ज करताना काळजीपूर्वक सर्व गोष्टी एंटर कराव्यात. त्यानंतर तुमच्या सिंक मेनूमध्ये मोबीकॉल नावावर क्लिक केल्यास तुमच्या फोनमधील माहिती मोबीकॉलच्या सर्व्हरशी सिंक्रोनाईझ होण्यास सुरवात होते. हा सर्व डेटा तुम्ही तुमच्या मोबीकॉल अकाऊंटवरून अॅक्सेस करू शकता. जेव्हा तुम्ही हॅंडसेट बदलता तेव्हा मोबीकॉलवर जाऊन हॅंडसेट चेंज करायचा व पुन्हा सेटिंग्ज करायच्या. त्यानंतर सिंक म्हटल्यावर तुमच्या मोबीकॉल अकाऊंटवर असलेली सगळी मािहती मोबाईलवर जीपीआरचा वापर करून स्टोअर होते.

झिबमार्फतही अशाच प्रकारची मोफत सेवा दिली जाते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे झिब ही एक सोशल नेटवर्किंग साईटदेखील आहे. म्हणजे झिबवर रजिस्टर केलेला प्रत्येक जण या नेटवर्कचा एक भाग बनतो. दोन महिन्यांपूर्वीच व्होडाफोनने झिबला संपादित केले आहे.
Read the full story