,

लहानग्यांसाठीचे ‘गुगल’

May 31, 2008 1 comments

अग्गोबाई...ढग्गोबाईसारख्या बडबडगीतांमध्ये जरी मुलं रमत असली तरी त्याच वयाच्या मुलांना मोबाईल, लॅपटॉपसारख्या गोष्टींमध्येही तितकाच रस अाहे. त्यांना या गोष्टींची लहानपणापासूनच सवय होतेय. अशी सवय होणे चांगले की वाईट, हा मुद्दा वेगळा. पण चारचौघांत माझा मुलगा कस्सा बरोब्बर बाबांचा नंबर डायल करतो, वगैरे सांगण्यात पालक आघाडीवर असतात. असो.


मुलांच्या मनातली उत्सुकता शमविताना आणि त्यांच्या विचित्र प्रश्नांना उत्तरं देताना पालकांची कशी त्रेधा-तिरपिट होते, हे वेगळं सांगायला नको. मुलांच्या याच मानसिकतेचा विचार करून क्विन्टुरा या व्हिज्युअल सर्च इंजिन कंपनीने सुरू केलेल्या क्विन्टुरा किड्स या व्हिज्युअल सर्च इंजिनला भरपूर प्रतिसाद लाभत आहे.

रशियास्थित क्विन्टुराने व्हिज्युअल सर्चमध्ये आपला दबदबा राखला असून क्विन्टुरा किड्स हे लहान मुलांसाठी अत्यंत सुरक्षित सर्च इंजिन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यात न्यूरल नेटवर्किंग या तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना उपयोगी अशा गोष्टींचे टॅग क्लाऊड तयार करण्यात आले आहे. यावरील कोणत्याही टॅगवर माऊस पॉईंटर नेल्यास त्या टॅगशी संबंधित कीवर्ड्स डिस्प्ले होतात (डेमो व्हिडीओसाठी येथे क्लिक करा). प्रत्येक संबंधित कीवर्ड्ससाठीचे रिझल्ट्स त्या पेजवर दिसतात. मुलांना लहानपणापासूनच सर्चची सवय लावायची असेल किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरं द्यायची असतील तर क्विन्टुरा किड्स ट्राय करून पाहा...
Read the full story

आता कशाला 'बिला'ची बात...


भारतातील मोबाईलधारकांची संख्या एव्हाना अमेरिकेच्यापुढे गेली असेल (रिपोर्ट वाचा). मार्चअखेर भारतात सुमारे २५ कोटी मोबाईलधारक होते. चीनमध्ये एकूण ५४ कोटी मोबाईलधारक असून अमेरिकेत २५.६ कोटी मोबाईलधारक आहेत. भारतात दरमहा किमान ८० ते ९० लाख ग्राहकांची भर पडते, त्यामुळे एप्रिल महिन्यात भारताने अमेरिकेस मागे टाकले असण्याची शक्यता आहे. एका आकडेवारीनुसार शहरी भागातील सुमारे १० टक्के आणि ग्रामीण भागातील तीन टक्के मोबाईलधारक जीपीआरएस सेवेचा वापर करतात - अर्थात मोबाईलवरून इंटरनेट सर्फ करतात. वरचे आकडे पाहिल्यास ही संख्या प्रचंड असल्याचे तुमच्या लक्षात आलेच असेल. मोबाईलवरून इंटरनेट सर्फ करण्याचे प्रमाण वरचेवर वाढतच जाणार आहे. सध्या त्याचे दर फारसे आकर्षक नसले तरी भविष्यात मात्र ते मोबाईलच्या कॉलदराप्रमाणेच वेगाने घसरतील अशी अपेक्षा आहे.

मोबाईलवरून इंटरनेट सर्फ करणाऱ्यांसाठी डेटा डाऊनलोड ही मोठी चिंतेची बाब असते. म्हणजे तुम्ही मोबाईलवरून रेडीफ डॉट कॉम सर्फ करत असाल तर तुमचा मोबाईल ब्राऊजर आधी सगळ्या इमेजेस डाऊनलोड करेल, मग टेक्स्ट आणि तुमचा जीपीआरएस प्लॅन जर पर केबी डेटा साठीचा असेल तर तुमचे बिल वाढलेच म्हणून समजा. अशा वेळी फोनिफायर ही सेवा कामाला येते.

तुमच्या मोबाईल फोनच्या ब्राऊजरमध्ये जाऊन www.phonifier.com असे टाईप करा आणि त्यातील अॅड्रेसबारमध्ये तुम्हाला हव्या त्या साईटचा अॅड्रेस द्या. तुमच्या बिलाचा विचार करून फोनिफायर ती साईट ओपन करेल. विथ इमेजेस अॉर विदाऊट इमेजेस, तुम्हाला वाटेल त्या अॉप्शनसह. एकदा ट्राय तर करून पाहा...
Read the full story

, ,

दोघांत तिसरा...

May 30, 2008 3 comments

तुमच्यापैकी अनेक जणांचे जी-मेलवर अकाऊंट असेलच? असेल म्हणून काय विचारता, एक सोडून चार-चार अकाऊंट्स आहेत, असे उत्तर देणारे अनेक जण सापडतील. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या गुगल मेल अर्थात जी-मेलने बहुविध सुविधा देऊन त्याचा वापर करणाऱ्यांना आपलेसे केले. त्यामुळेच अनेक जणांनी जी-मेल वर दोन-दोन, तीन-तीन अकाऊंट्स ओपन केले आहेत. एक पर्सनल अकाऊंट, एक अॉफिशियल करस्पॉडन्ससाठी आणि एक फक्त फॉरवर्ड््ससाठी - प्रत्येकाची कारणे वेगळी आहेत. असो. आता तुम्ही विचाराल, हे आम्हाला सांगायची काय गरज? त्याचे मुख्य कारण म्हणजे, कोणत्याही ब्राऊजरमध्ये एकावेळी एकच अकाऊंट अॅक्सेस करता येत. दुसऱ्या अकाऊंटमध्ये लॉग-इन व्हायचे असेल तर पहिल्यातून लॉग-आऊट व्हावे लागते किंवा दोन अकाऊंट्स दोन वेगवेगळ्या ब्राऊजर्समध्ये (म्हणजे एक इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये आणि एक फायरफॉक्समध्ये) ओपन करावे लागतात.
पण यावर एक उत्तम पर्याय आहे...


हा पर्याय केवळ मोझिला फायरफॉक्स हे ब्राऊजर वापरणाऱ्यांकरिताच आहे. ज्यांच्याकडे फायरफॉक्स नसेल त्यांनी येथून डाऊनलोड करावे.


फायरफॉक्ससाठी ‘जी-मेल मॅनेजर’ (येथून डाऊनलोड करा) नावाचे एक ‘एक्स्टेंशन’ येते. ते डाऊनलोड करा किंवा दिलेल्या लिंकवरून थेट इन्स्टॉल करा. हे इन्स्टॉल झाल्यानंतर फायरफॉक्स एकदा रिस्टार्ट करावे लागते. रिस्टार्ट केल्यानंतर टूल्स अॅड-अॉन्स येथे जावे. त्यात तुम्हाला जी-मेल मॅनेजर असे एक्स्टेंशन दिसेल. हेच एक्स्टेन्शन ब्राऊजरच्या तळात उजव्या कोपऱ्यातही दिसेल. त्यावर राईट-क्लिक केल्यास प्रेफरन्सेस असा अॉप्शन येईल. त्यावर क्लिक करून तुमच्या जी-मेल अकाऊंट्सची माहिती भरा आणि ओके म्हणा. आता तुम्ही कितीही जी-मेल अकाऊंट यातून अॅक्सेस करू शकता!

(फायरफॉक्समध्ये इंटरनेटएक्स्प्लोरर टॅब असेही एक एक्स्टेंशन उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. इन्स्टॉल करण्यासाठी वर सांगितलेली पद्धत वापरा. ब्राऊजर रिस्टार्ट केल्यानंतर तळात उजव्या कोपऱ्यात तुम्हाला इंटरनेट एक्स्प्लोररचे ई असे चिन्ह दिसेल. दुसरा टॅब ओपन करून त्या चिन्हावर क्लिक केल्यास तो टॅब इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये कन्व्हर्ट होईल. आता तुम्ही एका फायरफॉक्स टॅबमध्ये एक अकाऊंट आणि दुसऱ्या इंटरनेट एक्स्प्लोरर टॅबमध्ये दुसरे जी-मेल अकाऊंट ओपन करू शकता. पण यात केवळ दोनच अकाऊंट ओपन करता येत असल्याने जी-मेल मॅनेजरचा पर्याय सर्वांत चांगला आहे.)

टेकसॅव्ही लोकांसाठी आणखी एक पर्यायः कुकीपाय १.१.० (अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा)
Read the full story

,

डोक्यात आहे ते कागदावर आणा...

आपल्या डोक्यात सतत काही ना काही कल्पना येत असतात. काही वेळा त्या कल्पना आपल्या करीअरच्या किंवा बिझनेसच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आपल्या डोक्यात त्याचा विस्तारही पक्का झालेला असतो. पण त्या दुसऱ्याला समजावून सांगताना मात्र तोंडाला फेस येतो. मग हे असे केल्यावर काय होईल, किंवा तसे न करता असेच केले तर आणि समजा तुम्ही तसे केले तर मग त्यातून आपल्याला काय मिळेल? अशी अनेक प्रश्नं विचारून समोरची व्यक्ती आपल्याला भंडावून सोडते. यासाठी माईंड मॅपिंग इन्स्टॉलेबल किंवा अॉनलाईन अॅप्लीकेशन्स अत्यंत उपयोगी ठरतात. त्यातील काही उपयुक्त अॅप्लीकेशन्सः


बबल असः वापरण्यास अत्यंत सोपे, अॉनलाईन अॅप्लीकेशन, कमी फीचर्स
माईंड ४२ः वापरण्यास सोपे, अॉनलाईन
मीड मॅपः विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त, ३० दिवसांसाठी मोफत ट्रायल
माईंडमिस्टरः अॅडव्हान्स्ड फीचर्स, बेसिक व्हर्जन मोफत, प्रिमीयमसाठी ४ डॉलर दरमहा
माईंडोमोः मायक्रोसॉफ्ट अॉफीस २००७ सारखा लूक, बेसिक व्हर्जन मोफत
माईंडजेटः सर्वोत्तम इन्स्टॉलेबल माईंड मॅप अॅप्लीकेशन, बहुविध फीचर्स, मोफत ट्रायल


ज्यांनी अद्याप माईंड मॅपिंग अॅप्लीकेशन्स वापरलेली नाहीत, त्यांच्यासाठी बबल अस हे ट्रेनिंग टूल ठरू शकते. पण मर्यादित फीचर्समुळे कालांतराने ते उपयोगी वाटेनासे होईल त्यावेळी इतर अॉनलाईन अॅप्लीकेशन्स वापरण्याचा सराव करावा.
माईंडजेट माईंड मॅनेजर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(माईंडजेट माईंड मॅनेजर क्रॅक करण्यासाठी काय करावे? वाचा सा.सो.टेक्नॉलॉजी)

अपडेटः माईंडजेट माईंड मॅनेजर क्रॅक करण्यासाठी इथे क्लिक करा. यात दिलेल्या चार सिरियलपैकी कोणतीही एक वापरून तुमची ट्रायल कॉपी रजिस्टर करा. ही लिंक ६ जून रोजी डिअॅक्टिव्हेट होईल)

Read the full story

,

करून तर पाहा...

May 29, 2008 2 comments


जी-मेलमध्ये कॉम्पोझ मेल यावर क्लिक केल्यास ती लिंक आहे त्याच विंडो किंवा टॅबमध्ये ओपन होते. इतर मेल सर्व्हीसमध्ये तुम्ही राईट क्लिक करून कॉम्पोझ मेल दुसऱ्या विंडोत किंवा टॅबमध्ये ओपन करू शकता. जी-मेलमध्ये ते शक्य होत नाही. पण अशक्य काहीच नाही. ब्लॉगर पीटर जॅल्बर्ट यांनी दिलेली टिप अशीः
जी-मेलमध्ये कॉम्पोझ मेल या लिंकवर माऊस पॉईंटर न्या आणि शिफ्ट दाबून क्लिक करा. कॉम्पोझ मेल दुसऱ्या विंडोत ओपन होईल. Read the full story

,

चोरून खाल्लेल्या कैऱ्या आणि अॉरकुट!

तुमच्या अॉफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये अॉरकुट ब्लॉक केले असल्यास खालील ट्रिक वापरून तुम्ही अॉरकुट अॅक्सेस करू शकताः
1. अॉरकुट प्रॉक्सीः
http://images.orkut.com किंवा
http://images3.orkut.com या साईटवर क्लिक केल्यास तुम्ही अॉरकुट अॅक्सेस करू शकाल. अॉरकुटवरील इमेजेस होस्ट करण्यासाठी तयार केलेल्या या साईट्स तुम्हाला अॉफिसमध्ये अॉरकुट सर्फिंगचा अानंद देऊ शकतात (चोरून खालेल्ल्या कैरीसारखा!).


2. एनकोडेड यूआरएलः अॉफिसमधील फायरवॉल बायपास करायचा असेल तर ही भन्नाच ट्रिक वापरा. लक्षात ठेवा, ही ट्रिक फक्त इंटरनेट एक्स्प्लोरर या ब्राऊजरमध्येच काम करते.

- http://www.swingnote.com/tools/texttohex.php या साईटवर लॉग-इन करा
- तेथे स्ट्रिंग असे लिहिलेल्या बॉक्समध्ये अॉरकुट असे टाईप करा व कन्व्हर्टवर क्लिक करा
- कन्व्हर्ट म्हटल्यानंतर Hex Encoded for URL: %6f%72%6b%75%74 असं काहीसं येईल. ही एनकोडेड यूआरएल तुमच्या ब्राऊजरच्या अॅड्रेसबारमध्ये टाईप करा.
- नाऊ, एन्जॉय अॉरकुट!

अशा अनेक ट्रिक्स आहेत, पण त्या ‘सा-सो’ (साध्या-सोप्या) गटात मोडत नाहीत. तरीदेखील त्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मला sasotechnology@gmail.com वर मेल करा.

अपडेटः अॉफिसमध्ये काही विशिष्ट साईट्स ब्लॉक केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता वाढते, असा गोड गैरसमज असणाऱ्यांना चपराक देणारा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. असे केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता घटते, असे त्यात म्हटले आहे.
याविषयीच्या बातमीसाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

तीन मुली, एक बाई आणि सुप्त इच्छा (?)

बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेली एक कथा. पुसटशी आठवतेय. तीन मुलींची ती कथा होती. एक मॉडेल असते, एक डान्सर आणि एक कथालेखक. तरुणपणी जीवलग मैत्रिणी असलेल्या या तिघींची कालांतराने ताटातूट होते आणि त्या थेट म्हातारपणी भेटतात. आपापल्या आयुष्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी असतात आणि त्या सोडविण्यासाठी त्या एका बाईकडे जातात. ती बाई त्यांना भूतकाळात नेते...बस्स एवढंच मला आठवतंय. या पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव मला हवंय. कोणी सांगू शकेल का प्लीज?

अशा अनेक पुस्तकांची, कादंबर््यांची नावं आपल्याला लक्षात राहत नाहीत आणि मग कधी मित्र-मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा करताना विषय निघाला की अस्वस्थ व्हायला होतं. ते नाव आठवत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. अशावेळी चटकन नेटवर जा आणि व्हॉट्सदॅटबुक डॉट कॉमवर लॉग इन व्हा. व्हॉट्सदॅटबुक ही एक फ्री सर्व्हीस असून त्यावर तुम्ही तुम्हाला जितकी आठवतीय तितकी माहिती पोस्ट करायची. त्यावरून दुसर््या एखाद्यास त्या पुस्तकाचे नाव माहिती असेल तर तो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. किंवा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती असल्यास त्याचे उत्तरही देता येते. व्हॉट्सदॅटबुकचा आणखी एक फायदा म्हणजे येथे तुम्हाला माहित नसलेल्या अनेक पुस्तकांची माहिती मिळते. त्यात काय आहे याची थोडक्याती माहितीही वाचायला मिळते. तुम्हीही पुस्तकांचे शौकिन असाल तर करा जॉईन ही कम्युनिटी!

(बाय द वे, त्या तीन मुलींच्या पुस्तकाचे नाव आहेः द समरहाऊस आणि ते लिहिलं होतं ज्यूड डेव्हेरॉने!)

Read the full story

अप-टू-डेट!

नव्याने येणाऱया सर्व मोबाईल हॅंडसेटमध्ये तुम्हाला आरएसएस रीडर असे एक अॅप्लीकेशन दिसून येईल. नेटसॅव्ही लोकांना त्याचे महत्त्व कळेल, परंतु जे फारसे नेटसॅव्ही नाहीत त्यांनी त्यावर कधी क्लिकही केले नसेल. आरएसएस - अथर्थात रियली सिंपल सिंडिकेशनद्वारे आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर एखाद्या साईटवरील कंटेंट पाहू शकतो. उदा. तुम्ही दी न्यूयॉर्क टाईम्स डॉट कॉमवरील टेक्नॉलॉजी सेक्शनला नेहमी भेट देता. या सेक्शनच्या आरएसएस फीडला सबस्क्राईब केल्यास त्यात नव्याने येणार््या सर्व बातम्या तुम्हाला तुमच्या गुगल रीडर किंवा आऊटलुकमध्ये पाहता येतात. जवळपास सर्व न्यूज साईट्स आणि ब्लॉग्जवर आरएसएस म्हणजे एक्सएमएल फीड उपलब्ध असतो. त्याला फक्त सबस्क्राईब करायचं.


लाईटफीड्स - ब्लॅकबेरीसाठी

स्मार्टफोनसाठी

पॉकेट पीसीसाठी
तुमच्या मोबाईलवरील आरएसएस रीडरमधून तुम्ही नेमकं हेच करू शकता. ज्यांच्या मोबाईलमध्ये आरएसएस रीडर नाहीये किंवा ज्यांना अॅडव्हान्स्ड सुविधा हव्यात, त्यांच्यासाठी लाईटफीड्स ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे. लाईटफीड्स डॉट कॉमवर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तेथे उपलब्ध असलेल्या विषयांमधून (जवळपास सर्व विषय यावर उपलब्ध आहेत) काही विषय निवडू शकता. हीच सेवा मोबाईलवर मिळविण्यासाठी http://litefeeds.com/m ही साईट तुमच्या मोबाईलवरून अॅक्सेस करा व लाईटफीड्स अॅप्लीकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. हीच फाईल तुम्ही लाईटफीड्स डॉट कॉमवरूव कॉम्प्युटरवरही डाऊनलोड करू शकता. त्यानंतर ती फाईल डेटाकेबल अथवा ब्लूटूथने मोबाईलवर ट्रान्सफर करून इन्स्टॉल करा. लक्षात ठेवा, ही सेवा मोबाईलवर मिळविण्यासाठी तुमचे जीपीआरएस अॅक्टीव्ह असले पाहिजे, तसेच तुमचा मोबाईल सिंबियन अथवा जावा अॉपरेटिंग सिस्टिमवर चालणारा असला पाहिजे. लाईटफीड्स ब्लॅकबेरीसाठीही उपलब्ध आहे. जे फीड्स तुम्हाला मोबाईलवर येणे अपेक्षित आहे, त्यावर अॅड मोबाईल असे क्लिक करावे. जगातील सर्व बातम्या एका क्षणात तुमच्या मोबाईलवर हजर होतील!
Read the full story

,

माझा मोबाईल...ताजा मोबाईल!

May 28, 2008 0 comments

सिंबियन अॉपरेटिंग सिस्टिम असलेले अनेक फोन वारंवार हॅंग होतात. कधी लावलेला कॉल डिसकनेक्ट होत नाही, तर कधी आलेला कॉल घेता येत नाही. कधी एखादे अॅप्लीकेशन ओपन व्हायला खूप वेळ लागतो. अशा वेळी समजावे की आपल्या फोनमध्ये काहीतरी गडबड आहे. याची कारणे अनेक असू शकतात. जशी कॉम्प्युटरला रॅम असते तशीच मोबाईलला सुद्धा रॅम असते. त्यामुळे कमी रॅमच्या मोबाईलवर भरपूर किंवा तुलनेने हेवी अशी अॅप्लीकेशन्स रन केली की मोबाईल हॅंग होतो. त्यामुळे शक्यतो अशी अॅप्लीकेशन्स वापरू नयेत. बरेच जण आपला कॉल लॉग वेळच्यावेळी डिलीट करत नाहीत. त्यामुळे मोबाईलची रॅम वापरली जाते आणि मोबाईल हॅंग होतो. म्हणून कॉल लॉग दोन-तीन दिवसांनी डिलीट करत जावे किंवा अॉटो-डिलीट अॉप्शन वापरावा. एवढं करूनही मोबाईल हॅंग झाला तर पुढील सोपा पर्याय वापरून पाहाः

1. मोबाईलवरील इन-बिल्ट फाईल एक्स्प्लोरर अॅप्लीकेशन ओपन करा (एफईएक्स्प्लोरर येथून डाऊनलोड करा)
2. C:\System\ directory येथे जा
3. System.ini नावाची फाईल (शक्यतो शेवटी असते) डिलीट करा
4. फोन स्विच-अॉफ करा. काही सेकंदांनी पुन्हा अॉन करा
5. यामुळे फोनमध्ये काही किरकोळ गडबडी दूर होण्यास मदत होते. काही मोठा प्रॉब्लेम असल्यास फोन फॉरमॅट करा.
Read the full story

,

गो...गेट इट; नव्हे गो...टॅग इट!

शाळेतले किंवा कॉलेजातले ग्रुप फोटो आता पाहायला गेल्यास ते चेहरे आठवतात, पण त्यातील मित्रांची नावं मात्र काही केल्या आठवत नाहीत. तो कसा होता, त्याच्या सवयी कशा होत्या, जोशी मास्तरांनी एकदा त्याला कसा चोपला होता, त्यानं कशी भन्नाट शक्कल लढवून कॅंटीनचे पैसे बुडवले होते वगैरे सगळ्या गोष्टी आठवतात. पण...श्या...त्याचं नाव तेवढं आठवत नाही. तोंडावर असतं, पण त्याचं नाव आठवत नाही. अशा वेळी काय करू शकतो. घरातल्या कपाटात कोपर््यात पडलेल्या अल्बम विसरून लोकं आता फ्लिकर, पिकासा, स्नॅपफीश अशा साईट्स वापरू लागले आहेत. यावर अपलोड केलेल्या फोटोलाच फोटो-टॅगिंग करता आलं तर?फेसबुकने अशी फोटो टॅगिंगची सुविधा दिली आहे. मात्र 'फ्लिकर' वर अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. पण 'फिकर' नॉट. टॅग ४ यू (www.tag4you.com) नावाच्या साईटवर जाऊन तुम्ही फ्लिकरवर अपलोड केलेल्या फोटोतील प्रत्येक व्यक्तीला टॅग करू शकता. उदाहरणार्थ - तुम्ही एखाद्या पारटीचे फोटो फ्लिकरवर अपलोड केला आहे. त्या फोटोत तुमचे चार मित्र आहेत. तुम्ही जेव्हा टॅग ४ यू वर लॉग-इन व्हाल, त्यावेळी तो तुम्हाला तुमच्या फ्लिकरच्या अकाऊंटवर लॉग-इन व्हायला सांगेल. तेथे लॉग-इन झाल्यावर तुमच्या फ्लिकर अकाऊंटवर जेवढ्या व्यक्तींचे चेहरे असतील ते डिस्प्ले होतील. त्यातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही टॅग करू शकता - म्हणजे त्याचे नाव देऊ शकता आणि त्यावर एखादी कॉमेंटही करू शकता. त्यानंतर फिनिश म्हटलं की हे सगळे टॅग फ्लिकरवर रिफ्लेक्ट होतात. एखाद्या फोटोतील व्यक्तीवर कर्सर नेला की त्याभोवती चौकट तयार होऊन त्याचं नाव दिसतं. सो, गो टॅग इट!
Read the full story

,

‘पासवर्ड फटीग’

तुम्ही रोज साधारण किती वेबसाईट्सना भेट देता? २, ४, १० की याहून अधिक? त्यातल्या किती साईट्सवर तुमचे पर्सनल अकाऊंट आहे? म्हणजे, तुम्ही दिवसातून समजा १५ साईट्सना भेट देत असाल, तर त्यापैकी याहू, जी-मेल, अॉर्कुट, फेसबुक, फ्लिकर, ब्लॉगर किंवा एखाद्या वर्तमानपत्राच्या साईटवर तुमचे अकाऊंट असेल. तिथे दरवेळी लॉग-इन होण्यासाठी यूजरनेम द्या, पासवर्ड लक्षात ठेवा वगैरे भानगडी कराव्या लागतात. याचा काहीवेळेस खरंच कंटाळा येतो. खरं तर, आपण १०० ठिकाणी स्वतःला रजिस्टर करत असतो, आणि काही ठिकाणी ६ अक्षरी पासवर्ड, काही ठिकाणी ८ अक्षरी, काही ठिकाणी अक्षर आणि आकड्यांचे कॉम्बिनेशन असे विचित्र प्रकार असतात. त्यामुळे बर््याच वेळेस यूजरनेम काय आणि पासवर्ड कोणता, यात कन्फ्युजन होतं. स्वतःचा लॅपटॉप असेल तर आपण ब्राऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह करू शकतो. पण अॉफिसमध्ये शेअर्ड पीसी असेल, तर पासवर्ड सेव्ह करता येत नाही.
असे ‘पासवर्ड फटीग’ टाळण्यासाठी आपण वापर करू शकतो क्लिपर्झ (www.clipperz.com) या अॉनलाईन सेवेचा. क्लिपर्झ ही एक पासवर्ड मॅनेजमेंट सेवा आहे. यात तुम्ही कुठलेही पासवर्ड्स, पिन सुरक्षितरित्या स्टोअर करून ठेवू शकता. क्लिपर्झवर तुम्ही एन्टर केलेला डेटा हा त्या ब्राऊजरमध्येच एनक्रिप्ट होतो. त्यामुळे तुमच्या पासवर्ड्सची सुरक्षितता अबाधित राहते. शिवाय क्लिपर्झवरील डेटा तुम्ही जसाच्या तसा पेनड्राईव्हवर सेव्ह करून घेऊन अॉफलाईन असतानासुद्धा अॅक्सेस करू शकता. क्लिपर्झ वापरण्यासाठी कुठलेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागत नाही. तेव्हा, तुम्हालाही ‘पासवर्ड फटीग’ आला असेल तर क्लिपर्झ वापरूनच पाहा!
(वि.सू.ः बॅंक खात्याचे अथवा इतर अत्यंत महत्त्वपूर्ण पासवर्ड्स यावर स्टोअर करू नयेत.)
Read the full story

ग्राहकहितासाठी अॉनलाईन फोरम

May 27, 2008 0 comments

"अॉल अवर कस्टमर केअर एक्झेक्युटिव्हज् आर असिस्टिंग अदर कस्टमर्स. प्लीज होल्ड द लाईन...," सुमारे २० मिनिटं हीच टेप एेकल्यानंतर राजेशचा पेशन्स संपला. इंग्रजीत एक सणसणीत शिवी हासडून आणि कंपनीच्या नावाचा योग्य उद्धार करून त्याने फोन चक्क आपटला. चांगल्या सेवेची खात्री देणार््््््या जाहिराती करून सेवा न देणार््या एका मोबाईल कंपनीचा तो उद्धार करत होता.

राजेशने सुमारे १५ दिवसांपूर्वी बिलिंग प्लान चेंज करण्यासंदर्भात अर्ज केला होता. त्यावर अॅक्शन घेणे दूरच, त्याची साधी दखल सुद्धा घेतली गेली नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो कस्टमर केअरशी संपर्क साधत होता. पण तो नंबर सारखा एंगेज लागत असल्याने त्याचा पार अजूनच चढला होता. तेव्हा त्याला आठवले की परवा कोणीतरी त्याला एक ई-मेल फॉरवर्ड केला होता. कन्झ्युमर कम्प्लेन्ट अशा काहीशा नावाने. त्याने चटकन नेट अॉन केले. त्याने काही वेळ काहीतरी टाईप केले आणि त्याचा पारा एकदम थंड झाला.
कन्झ्युमरकम्प्लेन्ट्स नावाची साईट गेल्या अॉक्टोबरमध्ये सुरू झाली. सहा-सात महिन्यांच्या कालावधीतच या साईटला भरपूर प्रतिसाद मिळाला असून त्यावर शेकडो जणांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या आहेत. या फोरमवर तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवू शकता. मोबाईल फोनपासून क्रेडिट कार्डपर्यंत आणि गॅस कनेक्शनपासून कार बुकिंगपर्यंत. ग्राहकाला पुरेपूर समाधान देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. काही कंपन्या त्यात अतिशय तत्पर असतात. मात्र, काही कंपन्यांसाठी ग्राहक म्हणजे किस झाड की पत्ती असतो. अशा कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचे चारचौघांत वाभाडे काढणेही तितकेच गरजेचे असते.

कन्झ्युमरकम्प्लेन्ट्स डॉट इन याच दिशने टाकलेले एक पाऊल आहे. हा फोरम कोणी सुरू केला, याची स्पष्ट माहिती त्यात दिली नसली तरी त्यांचे अभिनंदन!
Read the full story

,

हेवी फाईल्स पाठविण्याचे सोपे मार्ग


अनेकवेळा आपल्याला हेवी अॅटॅचमेंट््स पाठवाव्या लागतात. अशावेळी कोणतीही फ्री मेल सेवा आपल््याला २० एमबीपेक्षा अधिक आकाराची मेल पाठविण्याची सुविधा देत नाही. अशावेळी आपण पुढील काही सेवा वापरू शकतोः


१. ट्रान्सफर बिग फाईल्स (www.transferbigfiles.com):
या सेवेचा वापर करून आपण एक जीबी आकारापर्यंतच्या फाईल्स ट्रान्सफर करू शकतो. या सेवेचा वापर मोफत करता येतो आणि त्यासाठी रजिस्ट्रेशनही करावे लागत नाही. शिवाय आपण अनेक जणांना एक फाईल पाठवू शकतो. य़ा सेवेत फाईलसोबत मेसेजही पाठवता येतो, तसेच सुरक्षिततेसाठी फाईल्स पासवर्ड प्रोटेक्टही करता येतात.

२. यू सेन्ड ईटः (www.youSENDit.com):
अनेक कंपन्या मोठ्या फाईल्स पाठविण्यासाठी यू सेन्ड ईटचा पुरेपूर वापर करतात. ही सेवा मोफत असून त्यात १०० एमबी आकारापर्यंतच्या फाईल्स पाठविता येतात. याहून अधिक आकाराच्या फाईल्स पाठवायच्या असतील तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात.

३. माय फॅब्रिक (www.myfabrik.com):
आर्टिस्टिक टच असलेलीही साईट जराशी संभ्रमात टाकणारी असली तरी यातून १ जीबीपर्यंतच्या फाईल्स अनेक जणांना एकावेळी पाठविता येतात.

४. सेन्ड धिस फाईल (www.sendthisfile.com):
सेन्ड धिस फाईल या सेवेतून तुम्हाला तब्बल २ जीबीपर्यंतच्या फाईल्स पाठविता येतात.

५. ड्रॉपसेन्ड आणि विकिसेन्ड
हेवी फाईल्स पाठविण्यासाठीचा सगळ्यात सोपे मार्ग
Read the full story