, ,

गणपती बाप्पा मोरया!

August 31, 2008 5 comments


जगभर विखुरलेल्या महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणणारा गणेशोत्सव दोन दिवसांवर आला आहे. मायदेशापासून शेकडो मैल दूर असलेल्यांना गजाननाची आराधना करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ई-सकाळने मोरया हे नवे दालन काल सुरू केले आहे. गणपतीसंदभर्भात इत्थंभूत माहिती असलेल्या या दालनात गणपतीचे सुरेख वॉलपेपर्सही उपलब्ध आहेत. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या वाचकांसाठी यातील निवडक वॉलपेपर्स अायफोन आणि आयपॉड टचच्या साईझमध्ये उपलब्ध करून देत आहेत. (सौजन्यः ई-सकाळ आणि किरण वेल्हाणकर)

गणपतीचे आयफोन वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
गणपतीचे डेस्कटॉप वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
हेच वॉलपेपर्स इतर मोबाईलसाठी रिसाईझ करून वापरू शकता. त्यासाठी येथे क्लिक करा. अधिक माहितीसाठी वाचाः पाच मिनिटांत मोबाईल वॉलपेपर

आयफोनसाठीचे इतर वॉलपेपर्स तुम्ही येथून किंवा येथून डाऊनलोड करू शकता.
Read the full story

,

िरपीट टेलिकास्ट

August 30, 2008 0 comments

As per our telecon, forwarding you the details of XYZ project. Please find the file attached.
किंवा
Nice to meet you this afternoon at your premises.
अशी अनेक वाक्ये आपल्याला जवळपास सर्वच मेलमध्ये रिपीट करावी लागतात. दरवेळी तीच वाक्ये लिहिण्याचा अक्षरशः कंटाळा येतो. पण सांगणार कुणाला? काही वेळा ड्राफ्ट करून अापण मार्केटिंग किंवा तत्सम कार्याशी संबंधित मेल्स पाठवू शकतो. पण ज्यात काही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात किंवा पर्सनलाईज्ड मेल्स पाठवावी लागतात अशा वेळी ड्राफ्ट मेल्स उपयोगास येत नाहीत. अॉनलाईन फॉर्म्स भरतानादेखील तीच-ती माहिती पुनःपुन्हा भरावी लागते.

अशा वेळी आपण टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर्सची मदत घेऊ शकतो. टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर्स विशिष्ट टेक्स्टसाठी कीवर्ड्स वापरण्याची सुविधा देतात. उदा. अॉफिसच्या पत्त्यासाठी तुम्ही Addr1 आणि घराच्या पत्त्यासाठी तुम्ही Addr2 असे कीवर्ड्स वापरू शकता. याचा उपयोग केवळ मेल पाठवतानाचा होत नाही तर कोणत्याही वर्ड प्रोसेसरमध्ये तुम्ही टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर वापरू शकता. सेल्स आणि मार्केटिंग प्रतिनिधी, कॉल सेंटरमधील कर्मचारी, पब्लीशर्स आदी लोकांना यांना फायदा होऊ शकतो. ShortKeys Lite आणि Yadabyte Subtext ही दोन टेक्स्ट रिप्लेसमेंट सॉफ्टवेअर्स तुम्ही वापरू शकता. ही दोन्ही सॉफ्टवेअर्स फ्री आहेत.





Yadabyte Subtext डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ShortKeys Lite डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

नो टेंशन ट्रॅव्हल प्लॅनिंग

August 29, 2008 2 comments



मी जेव्हा-जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा माझ्याकडे संपूर्ण ट्रॅव्हल प्लॅन तयार असतो. गाडी किंवा फ्लाईट किती वाजता आहे, त्यासाठी किती अगोदर घरातून निघावे लागेल, प्रवास किती तासांचा आहे, परदेशात जाणार असल्यास कनेक्टिंग फ्लाईटमध्ये किती वेळाचे अंतर आहे, तेथील हवामान कसे आहे, तेथे शहरांतर्गत प्रवासाची काय सोय आहे, हॉटेल कुठे आहे, परतीचा प्रवास कसा आहे वगैरे सर्व बाबींचा अभ्यास करून त्याचे प्रिंटआऊट्स जवळ ठेवण्याची माझी सवय आहे. सुरक्षित प्रवास करायचा असेल तर हे सर्व करणे अत्यावश्यक आहे. तुमच्यापैकीही अनेक जण हे सर्व करत असतील. खरं सांगायचं तर यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि तेवढाच वेळही द्यावा लागतो. उच्चपदस्थ व्यक्तींना हे सर्व करून देण्यासाठी पर्सनल सेक्रेटरी असते. सर्वसामान्य व्यक्ती किंवा बिझी आंत्रप्रिन्युअरना मात्र ही सर्व कामे स्वतःच करावी लागतात. पण ट्रिपइट ही अॉनलाईन सेवा वापरून आंत्रप्रिन्युअर्स बहुमोल वेळेची बचत करू शकतात.




ट्रिपइट ही सेवा तुमच्यासाठी ट्रॅव्हल अॉर्गनायझरचे काम करते. ट्रिपइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही फक्त तुमचा फायनल ट्रॅव्हल प्लॅन (बुकिंग कन्फर्मेशन्स) plans@tripit.com या ई-मेल आयडीवर पाठवायचा. बस्स... ट्रिपइटकडे इटिनरेटर नावाची एक भन्नाट सिस्टिम आहे. या सिस्टिममध्ये तुमचा ट्रॅव्हल प्लॅन एंटर केला जातो. त्यानंतर इटिनरेटर इंटरनेटवर सर्व अतिरिक्त माहिती सर्च करून एक मास्टर ट्रॅव्हल प्लॅन तयार करतो. यात हवामान, नकाशे, ड्रायव्हिंग डायरेक्शन्स, सिटी गाईड, हॉटेल इन्फो आदी सर्व गोष्टींचा समावेश असतो. यासाठी Eventful, Flickr, Google Maps, SeatGuru, Wikipedia आदी साईट्सची मदत घेतली जाते.

Sample TripIt Itinerary




थोडक्यात काय तर जे काम तुम्हाला करावे लागते ते इटिनरेटरतफर्फे केले जाते आणि तुमच्या हातात तयार ट्रॅव्हल प्लॅन येतो. हा ट्रॅव्हल प्लॅन वापरून तुम्ही फ्लाईटसाठी अॉनलाईन चेक-इन देखील करू शकता. हा ट्रॅव्हल प्लॅन प्रिंट स्वरूपात तुमच्या सोबत राहू शकतो किंवा तो तुम्ही मोबाईलवरदेखील अॅक्सेस करू शकता.
Read the full story

,

टिनआयः अॉनलाईन इमेजेसचा बिग बॉस!

August 28, 2008 0 comments



मध्यंतरी गोव्यातल्या एका ब्लॉगरने भारतीय तसेच परदेशी माध्यमांच्या अकलेचं चांगलंच दिवाळं काढलं होतं. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या देण्याची इतकी चढाओढ लागलेली अाहे की जणू यांना उसेन बोल्टचा विश्वविक्रमंच मोडायचा आहे, असे वाटते. यांची ही खोड मोडून काढण्यासाठी पेनप्रिक्स हा ब्लॉग चालवणाऱ्यांनी अगदी खरी वाटेल अशी एक बातमी प्लॅंट केली आणि ती काही निवडक प्रसारमाध्यमांकडे पाठवली. त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ती तशीच्या तशी छापली. लोकल वाटणारी ही बातमी पाहता पाहता नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावरदेखील जाऊन पोचली आणि मग प्रसारमाध्यमांना आपली चूक कळली. पण तोवर ‘बूंद से गयी...’ अशी त्यांची अवस्था झाली होती. त्यानंतर पेनप्रिक्सने ती बातमी कशी तयार केली, त्यासाठी कुठली माहिती वापरली, कोणते फोटो वापरले वगैरे बाबींबद्दल ब्लॉगवर सविस्तर पोस्ट लिहिली. एखादी बाब तपासून पाहताना आपण सर्वप्रथम त्यातील तथ्यांची खातरजमा करतो. माहितीत काही फेरफार केला असल्यास आपल्या लक्षात येण्याची शक्यता अधिक असते, पण फोटोमध्ये काही गोंधळ असल्यास ते सहसा ध्यानात येत नाही किंवा आल्यास खातरजमा करण्यात अडचणी येतात. उदा. पेनप्रिक्सने पाठवलेल्या फोटोतील व्यक्ती ही योहान बाशंच आहे, हे कसं ओळखणार?

टिनआय ही सेवा वापरून तुम्ही रिव्हर्स फोटो सर्च देऊ शकता. म्हणजे गुगल इमेज सर्च वापरून आपण हिलरी क्लिंटनचे शेकडो फोटो मिळवू शकतो. पण ज्यावेळी फोटोतील अॉब्जेक्टबद्दल माहिती हवी असते त्यावेळी आपल्याकडे अंदाज बांधण्याखेरीज दुसरा कोणताही पयर्याय नसतो. अशा वेळी टिनआय कामास येऊ शकते. टिनआय च्या आधारे तुम्ही एखादा फोटो अपलोड करून तो इंटरनेटच्या मायाजालात कुठे आणि कसा वापरला आहे याची माहिती मिळवू शकता. उदा. पेनप्रिक्सने वापरलेला योहान बाशचा फोटो अपलोड केल्यास तो बाश आहे याची कुठेच माहिती मिळत नाही. ओल्ड मॅन अशा नावाने दोन-तीन साईट्सवर संबंधित फोटो वापरला गेला आहे. यावरून तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.



हा झाला टिनआयचा एक फायदा. याचा दुसरा फायदा म्हणजे, तुम्ही जर फोटोग्राफर किंवा क्रिएटिव्ह आर्टिस्ट असाल तर तुमचे फोटो किंवा इतर आर्टवर्क तुमच्या परवानगीशिवाय इतर कुठे व्यावसायिक कामासाठी वापरले जात अाहे किंवा कसे, याची माहितीही तुम्हाला मिळू शकते. यासाठी टिनआयतर्फे sophisticated pattern recognition algorithm ही प्रणाली वापरली जाते. यात प्रत्येक फोटोचे पिक्सेल-बाय-पिक्सेल विश्लेषण करून बोटांच्या ठशाप्रमाणे एक विशिष्ट आकृती तयार केली जाते. या आकृतीशी मिळती-जुळती आकृती इंटरनेटवर शोधली जाते. त्यामुळे तुम्ही अपलोड केलेला फोटो इतर कुठल्या फोटोशी जुळत असल्यास तो १०० टक्के टिनआयच्या रिझल्ट्समध्ये दिसतो. तो तुमच्या मूळ फोटोशी कितपत जुळतो हेही तुम्ही कम्पेअर करू शकता. क्रॉप केलेले, मिक्स केलेले किंवा करेक्शन केलेले फोटोही टिनआयच्या नजरेतून सुटत नाहीत.
टिनआयचे फायरफॉक्स एक्स्टेंशनही उपलब्ध आहे.

Read the full story

,

आवाज की दुनिया!

August 27, 2008 0 comments



तुमच्यापैकी अनेक जण कॉम्प्युटरवर काही ना काही प्रयोग करत असणार, याची मला खात्री आहे. प्रयोग म्हणजे, एकतर कॉम्प्युटरमधील सॉफ्टवेअर्स एक्स्प्लोअर करणे किंवा त्यांचा वापर करून काहीतरी क्रिएटिव्ह वर्क तयार करणे. उदा. तुमच्या ट्रिपचा स्लाईडशो तयार करणे किंवा व्हिडीओ एडिट करणे, एखादा नव्या डिझाईनचा ब्लॉग तयार करून पाहणे वगैरे. प्रोफेशनल्सची गोष्ट निराळी असते. नवशिक्यांना निर्मितीचा आनंद अधिक होतो. आता अॉडिओ-व्हिडीओशी संबंधित असे काही प्रयोग करायचे म्हणजे वेगवेगळ्या साऊंड क्लिप्स लागणार. अशा शेकडो क्लिप्स साठवून ठेवणाऱ्या साऊंडस्नॅप या सेवेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

नवशिके आणि प्रोफेशनल्स या दोघांसाठीही साऊंडस्नॅप ही सेवा अतिशय उपयोगी ठरते. सोळा गटांत विभागलेल्या साऊंड क्लिप्स तुम्ही साऊंडस्नॅपवरून डाऊनलोड करू शकता. साऊंडस्नॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे साऊंड लव्हर्सचे एक नेटवर्क आहे. साऊंडस्नॅपचे सदस्य झाल्यानंतर तुम्ही तुमच्याकडील क्लिप्स अपलोड करू शकता.





साऊंडस्नॅपवरील क्लिप्स एमपीथ्री, डब्लूएव्ही आणि इतरही फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. साऊंडस्नॅप लवकरंच पेड मेंबरशीप मॉडेलचा अवलंब करणार असून अपलोड करणाऱ्यांनाही विशिष्ट मोबदला देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे मोफत डाऊनलोड करणाऱ्यांनी आताच साईटवर जाऊन हव्या त्या क्लिप्स डाऊनलोड करून घ्याव्यात.
Read the full story

,

क्लिक अॅण्ड कन्व्हर्ट...

August 26, 2008 0 comments

साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या अनेक वाचकांनी अॉडिओ आणि व्हिडीओ कन्व्हर्टरबद्दल विचारणा केली आहे. इंटरनेटवर अनेक अॉनलाईन सेवा (उदा. झमझार) उपलब्ध आहेत. पण प्रोफेशनल्सना डेस्कटॉप कन्व्हर्टर असणे अधिक सोयीचे जाते. याविषयी सर्च केल्यास अनेक अॉडिओ, व्हिडीओ कन्व्हर्टर्स सापडतात, पण त्यातील बरीचशी फ्री नसतात. काहींचे ट्रायल व्हर्जन उपलब्ध असते. काही सेवांमध्ये वेळेची मयर्यादा असते, काहींमध्ये लोगो किंवा डेमो अशी अक्षरे येतात. या सवर्वांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही क्विक मीडिया कन्व्हर्टर वापरून पाहा.



परवा इंटरनेटवर यासंदभर्भात सर्च करताना डेलीग्यान या ब्लॉगवर क्विक मीडिया कन्व्हर्टरबद्दल (QMC) माहिती वाचली. अॉडिओ आणि व्हिडीओ कन्व्हर्टर्सचा इंटरफेस साधा आणि सोपा असणे आवश्यक असते. या बाबतीत िक्वक मीडिया कन्व्हर्टर बाजी मारून जातो. िक्वक मीडिया कन्व्हर्टरमध्ये ईझी आणि एक्स्पर्ट असे दोन मोड अाहेत. तुम्हाला कन्व्हर्जनमधील तांत्रिक बाबी समजत नसतील तर तुम्ही ईझी मोड वापरून अॉडिओ किंवा व्हिडीओ कन्व्हर्ट करू शकता. यात फ्रेम रेट, आस्पेक्ट रेश्यो, कोडेक्स आदी पॅरामीटर्स िक्वक मीडिया कन्व्हर्टर स्वतःच ठरवतो. एक्स्पर्ट मोडमध्ये हे पॅरामीटर्स तुम्ही ठरवू शकता.

क्विक मीडिया कन्व्हर्टर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Read the full story

,

टेक ए ब्रेक

August 25, 2008 3 comments

आजच्या युगात कॉम्प्युटरशिवाय चालणारे क्वचितंच एखादे काम असेल. त्यामुळे प्रत्येकास अॉफिस अवर्स आणि त्यानंतरदेखील कॉम्प्युटरवर काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. सतत कॉम्प्युटरवर काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो, हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉम्प्युटरवर काम करूनही डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठीचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे ठराविक अंतराने ब्रेक्स घेणे. पण कितीही ठरवले तरी काम करण्याच्या नादात आपण असे ब्रेक्स घेण्यास कायम विसरतो. पण आयडिफेंडर हा प्रोग्राम वापरून तुम्ही आता रेग्युलर ब्रेक्स घेऊ शकाल.

सतत कॉम्प्युटरकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येणे, अस्पष्ट दिसणे, डोकेदुखी, मान आणि पाठदुखी, डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची आग होणे, प्रकाशाचा त्रास होणे, कपाळ जड होणे आदी लक्षणे उद्भवू शकतात. याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (CVS) असे म्हणतात. CVS टाळण्यासाठी आपण काही प्रतिबंधात्मक उपाय योजू शकतो. ठराविक अंतराने ब्रेक्स घेणे हा तो सोपा उपाय. यासाठी आयडिफेंडर हा छोटासा आणि विनामूल्य प्रोग्राम तुम्हाला मदत करू शकतो. आयडिफेंडर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या सिस्टिम ट्रेमध्ये राहतो आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेनंतर (उदा. ३० मिनिटानंतर किंवा ४५ मिनिटांनंतर) तुम्हाला ब्रेक घेण्याची आठवण करून देतो. आठवण करून देण्यासाठी आयडिफेंडर पुढील चार मागर्गांचा वापर करू शकतोः
१. ठरवून दिलेले एखादे चित्र दाखवणे
२. डोळ्यांना आराम देण्यासाठीचे व्हिज्युअल ट्रेनिंग रन करणे
३. डिफॉल्ट स्क्रीनसेव्हर सुरू करणे
४. ब्रेक घ्या, अशी आठवण करू देणारी विंडो पॉप-अप करणे





आयडिफेंडर इन्स्टॉल केल्यानंतर त्यातील अनेक सेटिंग्ज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलू शकता. एखाद्या दिवशी तुम्हाला भरपूर काम असेल आणि आयडिफेंडरचा अडथळा नको असेल तर तशी सेटिंग्ज तुम्ही करू शकता. किती वेळेनंतर ब्रेक येणार आहे हेही तुम्हाला दिसू शकते. विंडोज ९८, मिलेनियम, २०००, एक्सपी आणि व्हिस्टावर आयडिफेंडर इन्स्टॉल करू शकता.
आयडिफेंडर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Read the full story

, ,

अॉनलाईन मिचर्ची!

August 24, 2008 0 comments


इंटरनेटवर शेकडो रेडिओ स्टेशन्स एेकता येतात. यातील अधिकांश स्टेशन्स परदेशी आहेत. आपल्याकडील बहुतांश लोक पाश्चात्य संगीतापेक्षा भारतीय संगीत एेकणे अधिक पसंत करतात. अशा लोकांचा कल जुनी गाणी किंवा लोकल एफएम स्टेशन एेकण्याकडे असतो. दुर्दैव असं की, भारतातील विविध शहरांतून प्रसारित केली जाणारी सर्व एफएम स्टेशन्स अॉनलाईन उपलब्ध नाहीयेत. काही निवडक स्टेशन्स मात्र अॉनलाईन एेकता येतात. रेडिओ टाईम या साईटवर जाऊन तुम्ही भारतासह जगातील कोणत्याही देशातील, कोणत्याही शहरातील रेडिओ स्टेशन एेकू शकता.

रेडिओटाईमवर जाऊन तुम्ही हवा तो खंड, देश, राज्य आणि शहर सिलेक्ट करून तेथे उपलब्ध असलेल्या रेडिओ स्टेशन्सची माहिती पाहू शकता. स्ट्रीमिंगची सुविधा देणारी रेडिओस्टेशन्स तुम्ही थेट ब्राऊजरमध्येच एेकू शकता.



रेडिओटाईमसारख्या अनेक सुविधा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातील अनेक सुविधा मी वापरूनदेखील पाहिल्या आहेत. पण रेडिओटाईम ही सर्वांत सोपी आणि हमखास रिझल्ट्स देणारी सुविधा आहे.

रेडिओ एेकण्याचा आणखी एक सोपा मार्गः
तुम्ही जी-टॉक (जी-मेल चॅट नव्हे) वापरत असाल तर तुम्ही त्यातंच पॅरिसहून प्रसारित होणारा रेडिओ तीन ताल एेकू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
१. जी-टॉकमध्ये जाऊन service@gtalk2voip.com हा अॅड्रेस फ्रेंड म्हणून अॅड करा
२. त्यानंतर 110@radio.gtalk2voip.com हाही अॅड्रेस फ्रेंड म्हणून अॅड करा.
३. काही क्षणांनंतर दुसऱ्या अॅड्रेसवर कॉल करा.
४. तुम्ही रेडिओ तीन तालला कनेक्ट व्हाल.
Read the full story

,

भाष्य नाही...

August 23, 2008 1 comments



भारतात नुकताच आयफोन ३जी लॉंच झाला आहे. नव्याने आयफोन घेणाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्वसाधारण फोनच्या धाटणीपासून शेकडो मैल दूर असलेला आयफोन फीचर्सच्या बाबतीतही तेवढाच (किंबहुना जरा जास्त) दूर आहे. त्यात सुधारणा होण्यास आणखी किती वेळ लागेल, याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. आयफोन ३जीबद्दल बरे-वाईट तुम्ही एेकले, वाचले, पाहिले असेल. गिझ्मोडोने या विषयावर अधिक बोलण्याएेवजी आपल्या भावना वरील चित्राने व्यक्त केल्या आहेत.
गिझ्मोडोवरील आयफोन ३जी संदभर्भातील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

इट्स नाईस टू बी ए क्रिटीक....

August 22, 2008 1 comments



निंदकाचे घर असावे शेजारी, असे म्हणतात ते खरंच आहे. आपण करत असलेल्या एखाद्या गोष्टीवर बरी-वाईट टीका होणं अत्यावश्यक असतं. त्याशिवाय आपण त्यात सुधारणा करू शकत नाही. आपल्या कामाबद्दल, आपल्या व्यवहाराबद्दल, वागणुकीबद्दल, अॉफिसमध्ये आपण इतरांशी कसे वागतो याबद्दल, स्वभावाबद्दल सतत फीडबॅक मिळणेही तितकेच गरजेचे आहे. आपण जशी इतरांवर टीका करत असतो, तशी इतर लोक आपल्याबद्दलही टीका करत असतील, याचे भान ठेवले पाहिजे. तुझी वागणूक योग्य नाही, असे एखाद्या मित्रास किंवा सहकाऱ्यास थेट सांगणे काही वेळा कठीण जाते. पण त्याला ते न सांगणेही चुकीचे आहे. कोणत्याही माध्यमातून त्याच्यापर्यंत हा मेसेज जाणे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल, हा टेक्नॉलॉजीसंदर्भात लिहायचे सोडून भलतेच काहीतरी कायल िलहितोय? आजच्या पोस्टमध्ये मी इतरांना फीडबॅक देण्यासाठी तयार केलेल्या एका सेवेबद्दल माहिती देणार आहे.



असा फीडबॅक देताना आपण शक्यतो अनाम राहण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी एसएमएस किंवा ई-मेल कामास येत नाहीत. अशा लोकांना अनाम राहून ई-मेल पाठवण्यासाठी तुम्ही नव्याने सुरू झालेल्या नाईसक्रिटीक या सेवेचा वापर करू शकता. NiceCritic.com is a way of communicating difficult thoughts comfortably. This free service gives users the ability to say something to someone that has been on their minds in a safe, non-embarrassing environment. हे नाईसक्रिटीकचे मिशन स्टेटमेंट आहे. यावरून त्यांचा उद्देश स्पष्ट होतो. उदा. तुमच्या एखाद्या सहकाऱ्याला मिटींगमध्ये इतरांना बोलू न देण्याची सवय आहे, तर त्याला तुम्ही Please let others talk during a meeting असा अनाम ई-मेल पाठवू शकता. आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची त्याची वृत्ती असेल, तर तो जरूर सुधारण्याचा प्रयत्न करेल. अनाम राहून तुमचे कार्य पूर्ण होईल. नाईसक्रिटीकमध्ये अशा एकूण नऊ विभागांत मेसेजेसची विभागणी केलेली आहे. हे नऊ विभाग पुढीलप्रमाणेः
Personal Hygiene
Appearance
Office Behaviour
Cubicle Critic
Sports Etiquette
Neighbouroly Suggestion
Thoughts for Schoolmates
General Behavoiur
Anonymous Praise

तुम्ही आणखी विभागांची नावे सुचवू शकता. एखाद्या व्यक्तीस यातील कोणत्याही विभागातील मेसेज पाठवायचा असेल तर मेसेज सिलक्ट करून सेन्ड धिस मेसेजवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या सहकाऱ्याचे नाव आणि ई-मेल अॅड्रेस एंटर करा. संबंधित सहकाऱ्यापर्यंत नाईसक्रिटीक नावाने तुमचा मेसेज पोचवला जाईल.





या सेवेचा उद्देश चांगला असता तरी याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीस त्रास होऊ नये याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. एकदा एक मेसेज पाठविल्यानंतर पुढचे ९६ तास त्या व्यक्तीस तोच मेसेज पाठवता येणार नाही आणि संबंधिक व्यक्ती नाईसक्रिटीककडून येणारे मेसेजेस थांबवूही शकते.
Read the full story

,

शॉर्टकट्ससाठी अतिरिक्त ‘एफएसआय!’

August 21, 2008 0 comments

विंडोज अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांना शॉर्टकटसाठी केवळ दोन-तीनच जागा उपलब्ध आहेत. एक म्हणजे सिस्टिम ट्रे, दुसरी जागा क्विक लॉंच आणि तिसरी जागा म्हणजे प्रत्यक्ष डेस्कटॉप. एखाद्या फोल्डरचा किंवा अॅप्लीकेशनचा शॉर्टकट डेस्कटॉपवर ठेवून तुम्ही तो सहजरित्या अॅक्सेस करू शकता. पण ट्रेमध्ये आणि डेस्कटॉपवर असे किती शॉर्टकट्स ठेवता येतात? रिसेन्ट डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी तुम्हाला स्टार्ट मेनूत जावेच लागते. हे टाळायचे असेल तर शॉर्टकटसाठी भरपूर जागा उपलब्ध करून द्यायला हवी. पण कुठे आणि कशी?



तुमच्या डेस्कटॉपवर असलेल्या टास्कबारसारखाच अाणखी एक शॉर्टकट बार मिळाला तर? हुलूबुलू सॉफ्टवेअरने तयार केलेले विनएक्सटी हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही शॉर्टकटसाठी अतिरिक्त जागा तयार करू शकता. विंडोजच्या टास्कबारपेक्षा विनएक्सटीचा मेनूबार अधिक फ्लेक्झिबल आहे. यात विविध प्रोग्रम्स, फोल्डर्स यांचे शॉर्टकट्स ठेवता येतात. याखेरीज रिसेन्ट फाईल्सही अॅक्सेस करता येतात. तुम्ही विंडोज व्हिस्टा वापरत असाल तर साईडबारची सवय झाली अाहे.



पण एक्सपी किंवा त्याअगोदरचे व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी रॅम, सीपीयू युसेज, हार्डडिस्क स्पेस आदी गोष्टी डेस्कटॉपवर पाहायला मिळत नाहीत. विनएक्स्टीच्या इन्फोबारमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. विंडोज युझर्सनी वापरून पाहावेच, असे हे प्रॉडक्ट आहे.

विनएक्सटी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

डोन्ट बी कन्फ्यूझ्ड!

August 20, 2008 0 comments



नवा मोबाईल फोन घेताना काही लोक प्रचंड अभ्यास करतात तर काही जण कोणताही विचार न करता आवडलेला फोन थेट घेऊन टाकतात. तुम्ही नेमके कोणत्या गटात मोडता? अभ्यास करणाऱ्यांच्या की थेट जाऊन घेणाऱ्यांच्या? मोबाईल फोन ही अशी वस्तू आहे की जी घेण्यापूर्वी तुम्ही थोडा-फार तरी अभ्यास करायलाच हवा. कारण बाजारात विविध कंपन्यांची शेकडो मॉडेल्स उपलब्ध आहेत आणि त्यात दररोज नव्या फोन्सची भर पडत असते. त्यामुळे मोबाईल घेताना कन्फ्युज्ड माईंड ठेवणे बरोबर नाही. अापले बजेट आणि नेमकी गरज या दोन गोष्टी समोर ठेवून जरी अभ्यास केला तरी पुरेसा ठरतो. तुम्हाला हा अभ्यास करणं सोपं जावं यासाठी फोनएग ही साईट मदत करेल.



फोनएग या साईटवर ४२ कंपन्यांच्या तब्बल ७४९ हॅंडसेट्सची माहिती साठवलेली आहे. या साईटचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कोणतेही दोन हॅंडसेट कम्पेअर करता येतात. कंपन्यांच्या स्वतंत्र साईटवर संबंधित कंपनीच्याच फोन्सचे कम्पॅरिझन शक्य होते. पण तुम्हाला नोकिया आणि सोनी-एरिक्सनचे मल्टिमीडिया फोन कम्पेअर करायचे असतील तर फोनएग हा उत्तम मार्ग आहे. फोनएगवर ब्रॅंड्स, कम्पॅरिझन आणि टॉप फोन्स असे तीन सेक्शन्स आहेत. Usability, Connectivity, Software, Hardware, आणि Ergonomics या पाच निकषांच्या आधारे फोनएगतर्फे टॉप फोन्स निवडले जातात. याखेरीज तुम्हाला Fastest Processor, Highest Amount of Internal Memory, Highest Camera Resolution, Highest Display Resolution, Highest Ram Amount, Lightest Mobile Phone, Longest Stand-by Time, Longest Talk Time, Slimmest Mobile Phone, Smallest Handset आदी निकषांच्या आधारेदेखील टॉप फोन्स पाहता येतील. केवळ एवढ्या माहितीवर तुमचे समाधान झाले तर उत्तम; अन्यथा कम्पॅरिझन सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कोणत्याही दोन हॅंडसटेच्या फीचर्सची विस्तृत माहिती मिळवू शकता. नव्याने लॉंच होणारे फोन्स फोनएगच्या यादीत सातत्याने अॅड होत असतात. We cannot guarantee the validity of information found here, अशी नम्र सूचना फोनएगने दिली असली तरी या साईटवर तुम्ही नक्कीच विसंबून राहू शकता.
Thanks Ganesh
Read the full story

, ,

व्हॅल्यू अॅडेड फाईल शेअरिंग

August 19, 2008 0 comments


फाईल शेअरिंगसाठी आपण शक्यतो एफटीपी (फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल) वापरतो. पण एफटीपीचा वापर केवळ फाईल ट्रान्स्फर करणं शक्य होतं. शिवाय फाईल ट्रान्स्फर करण्यासाठी एफटीपी क्लाएंट लागतो, फाईल ट्रान्स्फर केल्यानंतर ई-मेल करून संबंधितांना सांगावं लागतं, फाईलसोबत काही मेसेजेस द्यायचे असतील तर ते देता येत नाहीत. थोडक्यात काय, तर एफटीपी म्हणजे राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस - अर्थात लाल डबा. फाईल ट्रान्स्फर शंभर टक्के होणार - पण मूल्यवर्धित सेवांशिवाय. मस्त एअरकंडिशन्ड वातावरणात चित्रपट आणि संगीताचा आस्वाद घेत, खड्ड्यांची काळजी न करता केलेला आणि तितकाच सुरक्षित प्रवास करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप आयओ ही नव्याने सुरू झालेली वापरायला हवी.

व्हॅल्यू अॅडेड अॅंड हॅसल फ्री फाईल ट्रान्स्फर किंवा फाईल ट्रान्स्फर २.० असे ड्रॉपआयओचे वर्णन करता येईल. तुम्ही म्हणाल की मी या सेवेची एवढी स्तुती का करतोय. वापरून पाहिल्यानंतर तुम्हीही माझ्या मताशी सहमत व्हाल, याची मला खात्री आहे. अगदी ४ सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही ड्रॉप आयओ वापरण्यास सुरूवात करू शकता. ड्रॉपआयओ तुमच्यासाठी एक स्वतंत्र स्पेस तयार करते. या स्पेसचा वापर करून तुम्ही फोटो, व्हिडीओ, अॉडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर सर्व प्रकारच्या फाईल्स स्टोअर करून शेअर करू शकता. या स्वतंत्र स्पेसला ड्रॉप असे नाव दिले आहे. एक व्यक्ती असे कितीही ड्रॉप्स तयार करू शकते. प्रत्येक ड्रॉपवर तुम्ही १०० एमबी एवढा डेटा स्टोअर करू शकता. ड्रॉप तयार केल्यानंतर त्या नावाने एक ई-मेल अॅड्रेस आणि फोन नंबर जनरेट केला जातो. त्यानंतर या ई-मेल अॅड्रेस आणि फोनचा वापर करून तुम्ही नव्या फाईल्स अपलोड करू शकता. ड्रॉपआयओचा वापर करून तुम्ही फॅक्स पाठवू आणि मिळवू शकता.



ड्रॉपआयओच्या माध्यमातून तुम्ही इतरांसोबत तुमचा ड्रॉप शेअर करू शकता आणि संबंधित व्यक्तींना त्याच ड्रॉपमध्ये फाईल अॅड करण्याची परवानगीदेखील देऊ शकता. तुमच्या ड्रॉपवर एखादी नवी फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ई-मेल, एसएमएस (केवळ अमेरिकेतील मोबाईल ग्राहकांसाठी) आणि ट्विटर अलर्टही मिळतात. ड्रॉपआयओवरील फाईल्स सुरक्षित राहतील, याची पुरेपूर काळजी कंपनीने घेतली असून यावरील फाईल्स कोणत्याही सर्च इंजिनवर डिस्प्ले होत नाहीत.
ड्रॉपआयओचे फायरफॉक्स एक्स्टेंशन वापरूनदेखील तुम्ही फाईल शेअर करू शकता.
याहून अधिक स्टोरेज स्पेस आणि आणखी सुविधा हव्या असतील तर तुम्ही तुमचे ड्रॉपआयओ अकाऊंट अपग्रेडही करू शकता. साधारण एक जीबी स्पेस एका वर्षासाठी हवी असेल तर केवळ १० डॉलरमध्ये तुम्ही ती मिळवू शकता.
Read the full story

,

क्विक पीडीएफ

August 18, 2008 3 comments



एखादी फाईल दुसऱ्याला पाठवताना कायम विचार करावा लागतो की त्याकडे संबंधित सॉफ्टवेअर असेल ना, त्याचे व्हर्जन अपडेटेड असेल ना, त्याकडे आपण वापरलेलेच फॉंट्स असतील ना वगैरे. काही वेळा एखादी फाईल तयार करण्यास वेळ लागत नाही, पण ती ज्याला पाठवली आहे त्याला दिसण्यास जास्त वेळ लागतो. यावर उत्तम पर्याय म्हणजे पीडीएफ फाईल पाठवणे. पीडीएफ रीडर शक्यतो सगळ्यांकडे असतो. त्यामुळे पीडीएफ फाईल दिसण्यात काही अडचण येत नाही. पीडीएफ रीडर असला तरी अॅक्रोबॅट प्रोफेशनल नसल्यामुळे इतर फॉरमॅटमधील डॉक्युमेंट्स पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करण्यात अडचणी येतात. यावरचा सोपा मार्ग म्हणजे व्हचर्चुअल पीडीएफ प्रिंटर ड्रायव्हर वापरणे. तो कसा वापरायचा हे मी या पोस्टमध्ये समजावून सांगणार आहे.

डॉक्युमेंट्स, क्रिएटिव्ह मटेरियल्स, फोटोग्राफ्स वगैरे एक्स्चेंज करण्यासाठी सहसा पीडीएफ - पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट वापरला जातो. अनेकवेळा आहे त्या फॉरमॅटला पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी खूप प्रोसेसेस कराव्या लागतात. एखादी प्रोफेशनल व्यक्ती ज्या सफाईदारपणे हे काम करू शकते तेवढेच ते सर्वसाधारण व्यक्तीसाठी कठीण जाते. अशा लोकांसाठी क्युटपीडीएफ किंवा डूपीडीएफ ही व्हचर्चुअल पीडीएफ प्रिंटर ड्रायव्हर्स उपलब्ध आहेत. इन्स्टॉल केल्यानंतर केवळ एका क्लिकवर तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करू शकाल.
उदा. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून १० पानी रिपोर्ट तयार केला आहे. तो पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी केवळ प्रिंट कमांड (Control + P) द्या. एरवी येणाऱ्या प्रिंट अॉप्शनसह सेव्ह अॅज पीडीएफ अशा आशयाचे एक बटन तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही संबंधित डॉक्युमेंट पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅटमध्ये (पीडीएफ) सेव्ह करू शकता.

क्युट पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. (क्युटपीडीएफ रन करण्यासाठी लागणारी PS2PDF घोस्टस्क्रिप्ट येथून डाऊनलोड करा)
डू पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे दोन्ही व्हचर्चुअल पीडीएफ प्रिंटर ड्रायव्हर विंडोज ९८, ME, २०००, २००३, एक्सपी आणि व्हिस्टाला (३२ आणि ६४-बिट) सपोर्ट करतात.
Read the full story

,

सर्च बाय डेट...

August 17, 2008 0 comments

जी-मेल सर्चचा किती उपयोग होतो हे तुम्हाला एव्हाना लक्षात आलं असेलंच. जी-मेलद्वारे दिल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या स्पेसमुळे आपण शक्यतो मेल डिलीट करण्याच्या भानगडीत पडत नाही आणि त्यामुळे जुना मेल सर्च करण्यासाठी ढिगारा उपसावा लागतो. गुगलने मेल सर्च करण्यासाठी विविध सर्च अॉपरेटर्स दिले असले तरी ते लक्षात ठेवणे आणि योग्य वेळी त्याचा वापर करणे शक्य होईल असे नसते. काही वेळा आपल्याला साधारण तारखेचा अंदाज असतो. त्यावेळी after:2008/5/11 before:2008/5/18 अशा ठराविक पद्धतीने सर्च देणे नाही म्हटले तरी कठीणच जाते. त्याएेवजी 'सर्च बाय डेट' असे एखादे बटन तयार केले तर?



ग्रीसमंकी स्क्रिप्ट वापरून सर्च बाय डेटचे स्वतंत्र बटन तयार करणे शक्य आहे. हे एक्स्टेंशन फायरफॉक्स वापरणाऱ्यांसाठी आहे. सर्वप्रथम ग्रीसमंकी स्क्रिप्ट इन्स्टॉल करा. आता Gmail Date Search User Script इन्स्टॉल करा. फायरफॉक्स रिस्टार्ट केल्यानंतर तुमच्या सर्च बॉक्ससमोर 'सर्च मेल' आणि 'सर्च द वेब'समोर 'सर्च बाय डेट' असे तिसरे बटन दिसू लागेल. आता तुम्ही केवळ तारीख (उदा. 5/11 किंवा 5/18) एंटर करून सर्च बाय डेटवर क्लिक करा. त्या तारखेला आलेले मेल डिस्प्ले होतील. वेळ वाचवण्यासाठी हे एक्स्टेंशन अत्यंत उपयोगी ठरते.
Read the full story

,

आज लिहा, उद्या पाठवा...

August 16, 2008 0 comments


केवळ एक ई-मेल करण्यासाठी तुम्हाला कधी अॉफिसमध्ये यावं लागलंय किंवा रात्री उशिरापर्यंत जागावं लागलंय? केवळ एका ई-मेलसाठी सुटीचा अख्खा दिवस वाया गेलाय? केवळ एक ई-मेल पाठवला नाही म्हणून नाही-नाही ते एेकावं लागलंय? एकच ई-मेल दहा वेळा रिमाईंडर म्हणून पाठवावा लागलाय? नसेल तर उत्तम, पण असेल तर...

जी-मेल, याहू, एमएसएन आदी प्रचलित मेल सेवा दररोज काहीतरी नवे फीचर इन्ट्रोड्यूस करत असतात. पण या सगळ्या सेवांनी एक महत्त्वाचे फीचर अजूनही अॅड केलेले नाही. हे फीचर म्हणजे शेड्यूल्ड मेल - अथर्थात ठराविक तारखेस व ठराविक वेळेस मेल पाठवण्याची सोय. तुम्ही ब्लॉगरची सेवा वापरत असाल तर तुम्हाला शेड्यूल्ड पोस्ट्सची सुविधा माहित असेल. अगदी त्याच पद्धतीने शेड्यूल्ड मेल सेवा सुरू करण्याची गरज आहे. जी-मेल, याहूने ही सेवा उपलब्ध करून दिलेली नसली तरी लेटर मी लॅटर ही सेवा वापरून तुम्ही मेल शेड्यूल करू शकता. लेटर मी लॅटर ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्टर व्हावे लागेल. त्यानंतर तुम्ही नेहमी वापरत असलेला ई-मेल अॅड्रेस देऊन लेटर मी लॅटरमधून हवा तो मेल शेड्यूल करू शकता.



तुम्ही ज्यांना ई-मेल पाठवणार आहात त्यांना तुमच्या नेहमीच्या ई-मेल अॅड्रेसवरूनच मेल आलेला दिसेल. त्यांनी केलेला रिप्लायही तुम्हाला नेहमीच्याच अॅड्रेसवर पाहता येईल. तुम्ही हा मेल शेड्यूल केला होता, हे ही त्यांना कळणार नाही. एखाद्या व्यक्तीस ठराविक काळानंतर आठवणीसाठी एकच मेल करायचा असेल तर तीही सुविधा यात आहे. लेटर मी लॅटर ही मेल सेवा नसल्याने यातून अॅटॅचमेंट्स पाठवत येत नाहीत.
Read the full story

नावात तर सगळं आहे...

August 15, 2008 0 comments



शैलेश नुकताच मलेशियाहून परतला होता. बिझनेसच्या निमित्ताने मलेशियाला गेलेल्या शैलेशने ब्रेक म्हणून मिळालेल्या दोन दिवसांत शक्य तितकी मुशाफिरी केली. पेट्रोनास टॉवर्स, केएल टॉवर, बाटू केव्ह्ज, गेन्तिंग हायलॅंड, बर्ड पार्कला व्हिजीट आणि मनसोक्त शॉपिंग - असा त्याचा दोन दिवसांचा प्रोग्राम होता. सोबत असलेल्या डिजीटल कॅमेऱ्याची मेमरी संपेपर्यंत फोटो काढले. घरी आल्यावर लॅपटॉपवर ते डाऊनलोड केले. शैलेश किती आळशी आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्याच्या लॅपटॉपवर कोकण सहल, माथेरान ट्रेक, कंपनीच्या नव्या अॉफिसचे भूमीपूजन, नंतर उद्घाटन, महेशच्या मुलीचा पहिला वाढदिवस, क्लाएंटची साईट, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, आणि मलेशिया अशा सगळ्या फोटोंच्या फोल्डर्सची अक्षरशः खिचडी झाली होती. फोल्डरला नाव दिले होते म्हणून फोटो कुठले ते कळत तरी होतं. आतील सगळ्या फोटोंचे फाईलनेम DSCN000376.JPG असे काहीसे होते. (DSCN म्हणजे Digital Still Capture Number). एकेक फोटो सिलेक्ट करून रिनेम करणं म्हणजे अशक्य होतं. अशावेळी लुपस रिनेम हे सॉफ्टवेअर वापरू शकतो.



लुपस रिनेम हे केवळ २५२ केबींचे सॉफ्टवेअर वापरून तुम्ही बॅच रिनेम करू शकता. लुपस रिनेम ओपन केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरवर असलेले कोणतेही फोल्डर किंवा फाईल तुम्ही त्यातून अॅक्सेस करू शकता. एखाद्या फोल्डरमधील फाईल्स रिनेम करायच्या झाल्यास त्या सर्व फाईल्स सिलेक्ट करून तुम्हाला हवे ते नाव द्या व रिनेम म्हणा. फाईल्स रिनेम करण्याबरोबरच फाईलमधील एखादे नाव रिप्लेस करायचे असेल तर तेही शक्य होते. शिवाय अॉटोनंबरिंग (म्हणजे DSCN0001 एेवजी Malaysia 1, Malaysia 2...), अप्पर केस, लोअर केस, एक्स्टेंशन एडिटिंग आदी गोष्टी करणेही शक्य होते. लुपस रिनेमचा आणखी एक फायदा म्हणजे यात अॅट्रिब्युट्स वापरूनही फाईलनेम चेंज करता येते. उदा. तुमच्याकडे असलेली एमपीथ्री गाणी विचित्र नावाने सेव्ह झालेली असल्यास अॅट्रिब्युट अर्थात फाईल क्रिएट करताना एंटर केलेली माहिती वापरून तुम्ही ती रिनेम करू शकता. म्हणजे तुमची गाणी चित्रपटाच्या, संगीतकाराच्या किंवा गीतकाराच्या नावाने रिनेम होऊ शकतील. फोटोंच्या बाबतीतही अॅट्रिब्युट बेस्ड रिनेमिंग शक्य आहे.

लुपस रिनेम विंडोज एक्स्पी आणि त्याअगोदरच्या व्हर्जन्ससाठी वापरता येऊ शकते.
लुपस रिनेम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

, ,

डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस

August 14, 2008 0 comments



ज्या लोकांना नव्या अॉनलाईन सेवा ट्राय करून पाहण्याचा नाद आहे त्यांचे मेलबॉक्सेस कायम ओसंडून वाहत असतात. शंभर वेबसाईट्सवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसरं काय होणार? शिवाय अनेक ठिकाणी ई-मेल अॅड्रेसेस दिल्यामुळे स्पॅम मेल्सचीही संख्या वाढते. स्पॅमचे मूळ हे ई-मेल अॅड्रेसमध्ये आहे. ई-मेल अॅड्रेसच्या ट्रिक्स वापरून स्पॅमपासून बचाव कसा करता येईल, याची माहिती तुम्ही स्टे अवे फ्रॉम स्पॅम या पोस्टमध्ये वाचली असेल. पण त्यापुढे जाऊन डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस वापरला तर?

डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस? ही काय भानगड आहे? होय. स्पॅम बायपास करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे डिस्पोजेबल मेल अॅड्रेस वापरणे. मेलिनेटर ही सेवा वापरून तुम्ही स्पॅम बायपास करू शकता. मेलिनेटरद्वारे डिस्पोजेबल मेल अॅड्रेस तयार करून त्यावर येणारे मेल अॅक्सेस करण्याची सुविधा दिली जाते. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नसेल, त्यावेळी bigbangboom किंवा mylifeissohappy असे कोणतेही रॅंडम नाव जनरेट करून पुढे @mailinator.com जोडले की तुमचा डिस्पोजेबल ई-मेल अॅड्रेस तयार होतो. आता मेलिनेटर डॉट कॉमवर जाऊन चेक युवर मेलबॉक्समध्ये तुमचा आयडी एंटर केला की मेलिनेटर मेलबॉक्स ओपन होतो. यावरून तुम्हाला मेल पाठवता येत नाही किंवा आलेला मेल डिलीटही करता येत नाही. यात एकावेळी केवळ १० ई-मेल्स दिसतात. काही वेळानंतर ते आपोआप डिलीट होतात. त्यामुळे स्पॅम मेल असले तरी तुम्हाला प्रत्येक मेल चेक करण्याची गरज उरत नाही. मेलिनेटर वापरण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही. मेलिनेटरच्या इनबॉक्समध्ये आलेले मेल चेक करण्यासाठी तुम्ही आरएसएस रीडर किंवा मेलिनेटर विजेटही वापरू शकता.



मेलिनेटर वापरताना एक गोष्ट ध्यानात ठेवावीः
तुम्ही तयार केलेला ई-मेल अॅड्रेस कुणीही अॅक्सेस करू शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या मेलसाठी मेलिनेटर ई-मेल अॅड्रेस वापरू नये. एखादी नवी अॉनलाईन सेवा किंवा सॉफ्टवेअर रजिस्ट्रेशनसाठी अथवा एखाद्या फोरमवर, ब्लॉगवर डिस्कशन करण्यासाठी मेलिनेटर वापरू शकता. काही साईट्स मेलिनेटरचे ई-मेल अॅड्रेस अॅक्सेप्ट करत नाहीत. अशा वेळी पुढे दिलेल्या डोमेनपैकी कोणतेही नाव तुम्ही वापरू शकता.

mailinator2.com
sogetthis.com
mailin8r.com
mailinator.net
spamherelots.com
thisisnotmyrealemail.com

Read the full story

,

व्हॉट द फॉंट?

August 13, 2008 0 comments

गुगलच्या लोगोसाठी कोणता फॉंट वापरला आहे सांगू शकाल? तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? त्यांनी वापरलेला फॉंट आपण ओळखूच शकणार नाही. आणि ओळखून करणार काय? तुम्ही डिझायनर किंवा फॉंट अॅडिक्ट असाल तर मात्र एखादा नवा लोगो दिसला की हा फॉंट कोणता, हे चटकन ओळखत असाल किंवा याच्याएेवजी तो फॉंट वापरला असता तर डिसेंसी आली असती, अशी चचर्चा करत असाल. पण काही वेळेला एखादा नवा फॉंट आपण ओळखू शकत नाही. तो अापल्याला कुठेतरी वापरायचा तर असतो, पण त्याचा सोर्स कळत नाही. अशा वेळी व्हॉट द फाॅंट नावची सेवा वापरून तुम्ही तो फॉंट कोणता आहे, हे ओळखू शकता.

व्हॉट द फॉंट ही सेवा वापरण्यास अतिशय सोपी आहे. ज्या लोगोमधील फॉंट ओळखायचा आहे तो लोगो अथवा लोगो एखाद्या साईटवर असल्यास त्याची लिंक अपलोड करायची. त्यानंतर व्हॉट द फॉंटमार्फत लोगोवरून कॅरेक्टर्स ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. तुम्ही गुगलचा लोगो अपलोड केला असल्यास लोगोतील G, o, o, g, l, e ही कॅरेक्टर्स बरोबर आहे किंवा कशी हे विचारले जाते. त्यात चूक असल्यास तुम्ही दुरूस्ती करू शकता. त्यानंतर सर्च म्हटल्यावर या लोगोसाठी वापरलेल्या फॉंटचे नाव डिस्प्ले होते. त्याच फॉंटशी साधर्म्य असलेले अनेक फॉंट्स असतील तर त्यांची यादी पाहायला मिळते.



गुगलच्या लोगोसाठी वापरलेला फॉंटः Catull BQ-Regular.



Read the full story

,

िझझायनर ‘शब्दखेळ’!

August 12, 2008 1 comments

अनेक वेबसाईट्स आणि ब्लॉग्जवर तुम्ही टॅग क्लाऊड पाहिले असेल ना? संबंधित साईट किंवा ब्लॉगवर एखाद्या विशिष्ट विषयावर अधिक लिखाण होत असेल तर त्या विषयाचे नाव मोठ्या, ठळक अक्षरांत दिसायला लागते. ज्या विषयावर कमी चचर्चा होत असेल त्याला दिलेला टॅग किंवा कीवर्ड लहान अक्षरांत िदसतो. अशा लहान-मोठ्या आकारांतील कीवर्ड्सच्या जाळ्यांस टॅग क्लाऊड म्हणतात. या टॅग क्लाऊडचा वापर केवळ साईट्स किंवा ब्लॉगसाठी होतो असे नाही. थोडे लॉजिक लावले तर याच संकल्पनेचा वापर इतर ठिकाणीही होऊ शकतो, हे वर्डल या सेवेने सिद्ध केले आहे. आजच्या पोस्टमध्ये वर्डलबद्दल अधिक माहिती घेऊया.



Wordle is a toy for generating "word clouds" from text that you provide - असे या सेवेचे वर्णन केले आहे. एकदा वापरल्यानंतर अक्षरशः अॅडिक्ट करणारी ही सेवा आहे. वर्डल वापरून तुम्ही तुमच्या ब्लॉग किंवा साईटसाठी वर्ड क्लाऊड तयार करू शकता. यासाठी तुमच्या ब्लॉग किंवा साईटच्या आरएसएस फीडचे डिटेल्स लागतात. शिवाय तुम्ही वर्डल मध्ये थेट टाईप करूनही वर्ड क्लाऊड तयार करू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो कराः
- वर्डल डॉट नेटवर गेल्यानंतर तुम्हाला क्रिएट अशी एक लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर टेक्स्ट अॅड करण्यासाठीचे विविध अॉप्शन्स दिसतील.
- सवर्वांत वर असलेल्या बॉक्समध्ये तुम्ही थेट टेक्स्ट अॅड करू शकता. तुम्ही अॅड केलेल्या टेक्स्टमध्ये जो शब्द सर्वाधिक वेळा आला असेल तो वर्ड क्लाऊडमध्ये मोठ्या अक्षरांत डिस्प्ले होईल. यात तुम्ही मराठीतही टाईप करू शकता.
- ब्लॉग किंवा साईटसाठी वर्ड क्लाऊड तयार करायचे असल्यास लिंक किंवा आरएसएस फीड एंटर करावे लागेल. तुम्ही तुमच्या डेलिशियस अकाऊंटसाठीदेखील टॅग क्लाऊड तयार करू शकता.
- टेक्स्ट एंटर करून गो किंवा सबमिट म्हटल्यानंतर सुंदर अशा रंगसंगतीमधील वर्ड क्लाऊड तुमच्यासमोर असेल.
- रॅंडमाईझ अॉप्शन वापरून तुम्ही अनेक वेगळ्या डिझाईन्समध्ये वर्ड क्लाऊड तयार करू शकता.
- तयार झालेले क्लाऊड इमेज फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्यावा लागेल. त्यानंतर पेंटब्रश किंवा फोटोशॉपमध्ये एडिट करू शकता.

वर्डल कशासाठी?
१. एखादा नवा विषय शिकवण्यापूर्वी त्यातील विविध संकल्पनांसाठी वर्ड क्लाऊड तयार करता येऊ शकतो. त्यातील एकेक संकल्पना नंतर क्रमाने समजावून सांगता येऊ शकते.
२. प्रेझेंटेशनसाठी उत्तम प्रकारे वर्ड क्लाऊड वापरता येऊ शकतो.
३. बिझनेस कार्ड तयार करण्यासाठीही वर्डलचा प्रभावीपणे वापर करता येतो.
४. प्रोजेक्टसाठी कव्हरपेज म्हणून वर्ड क्लाऊड वापरता येऊ शकेल

अशा अनेक पद्धतीने सवर्वांना वर्ड क्लाऊडचा उपयोग होऊ शकतो.

Image created using wordle.net


Read the full story

, ,

आय प्ले फॉर यू, यू प्ले फॉर मी...

August 11, 2008 0 comments

एखाद्या मित्राच्या कॉम्प्युटरवर एखादं चांगलं गाणं एेकलं की ते अापल्याकडेही असावं असं वाटतं. त्याची आणि आपली आवड मिळती-जुळती असली तर आपण गाण्यांचं अख्खं फोल्डर पळवतो. गाणी ही अशी गोष्ट आहे, की कितीही असली तरी कमीच वाटतात. आणि आजकाल हार्डडिस्कची कपॅसिटी किमान १०० जीबींच्यापुढेच असते, त्यामुळे आपण कितीही गाणी स्टोअर करू शकतो. आता प्रश्न असा आहे की एवढी गाणी मिळवायची कुठून? त्यातही आपली आवड इतरांपेक्षा हटके असेल तर गाणी मिळवण्यासाठीचे सोर्सेस अत्यंत मर्यादित राहतात. अशा लोकांसाठी यू प्ले मी सारखे म्युझिक सोशल नेटवर्क कामास येते.

होय. सोशल नेटवर्किंगमधील नवा ट्रेंड म्हणून म्युझिक नेटवर्किंगकडे पाहिलं जातंय. यू प्ले मी ही याच प्रकारातील एक सेवा. यू प्ले मी डॉट कॉमवर मेंबर म्हणून रजिस्टर केल्यानंतर तुम्ही साधारण २० एमबीचा डेस्कटॉप क्लाएंट डाऊनलोड करून घेऊ शकता. आता तुम्ही जेव्हा अॉनलाईन असाल आणि तुमच्या लोकल अॉडिओ किंवा व्हिडीओ प्लेअरवर एखादं गाणं एेकत किंवा पाहत असाल त्या वेळी यू प्ले मी तेच गाणं एेकणाऱ्या किंवा पाहणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात करतो. अशी एखादी व्यक्ती सापडल्यास त्याचे प्रोफाईल डिस्प्ले केले जाते. अर्थात त्याचवेळी तुमचे प्रोफाईलही त्या व्यक्तीस दिसते. त्या व्यक्तीच्या प्लेलिस्टमधील इतर गाणीही तुम्ही एेकू शकता. अॉनलाईन मेसेजही पाठवू शकता. त्या व्यक्तीस फ्रेंडलिस्टमध्ये अॅड करून तुम्ही नवे म्युझिक नेटवर्क तयार करू शकता.



Supported Players:


यू प्ले मी विंडोज (एक्सपी, व्हिस्टा) आणि मॅकिन्तोष अॉपरेटिंग सिस्टिमवर इन्स्टॉल करता येते.
Read the full story

,

फसवणूक जी-मेलची!

August 10, 2008 8 comments

आजकाल बहुतांश जण जी-मेल वापरतात. जी-मेलमधील सोयी-सुविधांमुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. सोपा आणि सुटसुटीत इंटरफेस, चॅटिंग, पुश मेल (POP3/IMAP), मेल मर्ज अशा अनेक सुविधांमुळे अनेक लोक जी-मेलवर शिफ्ट झाले. त्यासमोर इतर अकाऊंट्स खरोखर फिके पडले. जी-मेलमध्ये कमीत कमी स्पॅम मेल्स येतात आणि जे काही येतात तेही फिल्टर होऊन थेट स्पॅम फोल्डरमध्ये जातात. त्यामुळे वेळेची बचत होते. एवढी सगळी फीचर्स असली तरी एक सुरक्षेच्या कारणास्तव गुगलने एक्झिक्युटेबल अर्थात .EXE फाईल्स पाठविण्याची सोय जी-मेलमध्ये ठेवलेली नाही. पण एक अगदी सोपी ट्रिक वापरून तुम्ही हेही करू शकता...

.EXE फाईल .ZIP करून पाठवली तर? पण जी-मेल तेवढे इंटेलिजंट नक्कीच आहे. .ZIP मध्ये .EXE असेल तरीदेखील आपल्याला ती फाईल जी-मेलमधून पाठविता येत नाही. अशा परिस्थितीत .EXE फाईल पाठविण्यासाठी केवळ एक्स्टेंशन बदलावे. उदा. तुम्हाला xyz.exe ही फाईल पाठवायची आहे. .EXE असल्यामुळे जी-मेल ही फाईल अॅटॅचमेंट म्हणून अॅक्सेप्ट करणार नाही. अशा वेळी .EXE च्या एेवजी .doc किंवा .exx किंवा कोणतेही रॅंडम एक्स्टेंशन द्या. म्हणजे हीच फाईल xyz.exx अशी होईल. आता तुम्ही ही फाईल अॅटॅचमेंट म्हणून पाठवू शकता. रिसीव्ह करणाऱ्याने ही फाईल रिनेम करून एक्स्टेंशन पुन्हा .EXE करावे. अॅज सिंम्पल अॅज दॅट!



Read the full story

, ,

लॉस्ट अॅंड फाऊंड!

August 9, 2008 0 comments

“Ya firdaus barruhe jaminast,
aminasto aminasto aminast!"


"If there be a paradise on earth, It is here, it is here, it is here!"

मुघल बादशहा जहांगीरने काश्मीरचे केलेले हे वर्णन आजही लागू होते. काश्मीरबाबत वषर्षानुवषर्षे सुरू असलेले वाद बाजूला ठेवले तर या ओळींचे महत्त्व पटते. असो. माझ्या एका अत्यंत जवळच्या मित्राने काश्मीरहून केलेला हा एसएमएस वाचून तेथील स्वर्गवत वातावरण अक्षरशः समोर उभे राहिले. म्हटलं, तो आल्यावर तेथील फोटो तरी पाहू. पण कशाचं काय? तो आला आणि मेमरी कार्डमधून फोटो डाऊनलोड करताना चुकून मेमरी कार्ड फॉरमॅट झालं. आता स्वतःवर चिडचिड करण्यात काहीच हशील नव्हते. गुगलवर सर्च दिला - “recover photos from memory card” आणि ढिगाने सोल्यूशन्स सापडली. मेमरी कार्ड किंवा कोणत्याही एक्स्टर्नल मेमरी डिव्हाईसवरून चुकून डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्यासाठीच्या एका उत्तम सोल्यूशनची माहिती मी आज देणार आहे.

पीसी इन्स्पेक्टर स्मार्ट रिकव्हरी हे त्या सोल्यूशनचे नाव. पीसी इन्स्पेक्टर स्मार्ट रिकव्हरी हे केवळ सहा एमबीचे सॉफ्टवेअर डिलीट झालेल्या फाईल्स रिकव्हर करू शकते. या कॅटेगरीत येणारी अनेक सोल्यूशन्स पेड आहेत. पीसी इन्स्पेक्टर मात्र १०० टक्के मोफत आहे. मेमरी कार्ड किंवा इतर डिव्हाईसवरील डेटा डिलीट झाला असल्यास तो रिकव्हर करण्याचे चान्सेस वाढविण्यासाठी कृपया त्यावर इतर डेटा स्टोअर करू नका. सर्वप्रथम पीसी इन्स्पेक्टर डाऊनलोड करा. पीसी इन्स्पेक्टर विंडोज ९८ पासून एक्सपीपर्यंतच्या सर्व व्हर्जन्सवर रन होते. आता कार्ड रीडर किंवा डेटा केबलच्या साह्याने मेमरी कार्ड किंवा डिजिटल कॅमेरा कॉम्प्युटरला जोडा व पुढील स्टेप्स फॉलो कराः
-पीसी इन्स्पेक्टर रन करा
-ज्या ड्राईव्हमध्ये मेमरी कार्ड किंवा इतर मेमरी डिव्हाईस आहे तो ड्राईव्ह सिलेक्ट करा.
-ज्या फोल्डरमध्ये रिकव्हर झालेल्या फाईल्स ठेवायच्या आहेत, ते लोकेशन स्पेसिफाय करा.
-स्टार्टवर क्लिक करा.
-तुमच्याकडून डिलीट झालेल्या फाईल्स काही क्षणांतच रिकव्हर होतील



पीसी इन्स्पेक्टरचा वापर करून तुम्ही खालील फॉरमॅटमधील फाईल्स रिकव्हर करू शकताः
ARJ, AVI, BMP, CDR, DOC, DXF, DBF, XLS, EXE, GIF, HLP, HTML, HTM, JPG, LZH, MID, MOV, MP3, PDF, PNG, RTF, TAR, TIF, WAV, ZIP
Read the full story

,

गो फॉर अॉनलाईन शॉपिंग!

August 8, 2008 2 comments


तुम्ही कधी अॉनलाईन शॉपिंग केली आहे? नसेल तर नक्की करून पाहा. येत्या १६ अॉगस्टला रक्षाबंधन आहे. तुमची बहीण दुसऱ्या शहरांत किंवा परदेशात राहत असेल तर तिला गिफ्ट पाठवण्यासाठी अॉनलाईन गिफ्ट सेन्डिंग सारखा दुसरा उत्तम पयर्याय नाही. शिवाय अॉनलाईन शॉपिंग केल्याने तुम्हाला इतर फायदेही मिळतात, जसेः
-रस्त्यावरील गदर्दी टाळता येते
-पार्किंगसाठी जागा शोधत फिरावे लागत नाही.
-दुकानात शंभर वस्तू पाहण्याची तसदीही घ्यावी लागत नाही
-दुकानदारांशी हुज्जत घालण्याची गरज नाही
-इतरांपेक्षा कमी किमतीत हवी ती वस्तू मिळते
-कुरियर, पोस्ट करण्याची तसदी घ्यावी लागत नाही.

आता हे सर्व करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही खुशाल अॉफलाईन शॉपिंग करू शकता. पण हे सर्व टाळायचे असेल तर अॉनलाईन शॉपिंगला पयर्याय नाही. सणासुदीच्या दिवसामुळे भारतीय अॉनलाईन मार्केटही सध्या फुलले आहे.

कोणत्याही भारतीय अॉनलाईन शॉपिंग साईटवर गेल्यास तुम्हाला सध्या रक्षाबंधनसाठीच्या विशेष अॉफर्सचे बॅनर्स दिसतील. अॉनलाईन मोबाईल फोन खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण आता वाढत आहे. मोबाईल नेक्स्टने नुकत्याच सुरू केलेल्या Mobilenxt.com या साईटवर खास रक्षाबंधनसाठी अनेक फोन्सवर तब्बल ५० टक्के सवलत देऊ केली आहे. त्याचप्रमाणे नेटवर्क १८ अंतर्गत येणाऱ्या स्टोअरगुरू आणि होमशॉप १८ या साईट्सवरही रक्षाबंधनसाठी अनेक विशेष अॉफर्स आहेत. या साईट्सवर इतर कॅटेगरीतल्या वस्तूही तुम्ही गिफ्ट म्हणून पाठवू शकता.
या साईट्सवर तुम्ही अॉनलाईन शॉपिंग करू शकताः
www.ebay.in
www.futurebazaar.com
www.indiaplaza.in
www.onlinedeals.in
www.naaptol.com
Read the full story

,

पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्टर

August 7, 2008 1 comments

एखाद्या विशिष्ट विषयावर सर्च करत असताना आपण अनेक वेगवेगळ्या फॉरमॅटमधील फाईल्स डाऊनलोड करत असतो. म्हणजे काही माहिती आपण थेट वेबसाईटवरून घेतो. काही माहितीसाठी वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट फाईल्स डाऊनलोड करतो. काही वेळा पीडीएफ फाईल्सही डाऊनलोड करतो. आता नेमकी या पीडीएफ फाईलमधील एखादी इमेज आपल्याला कुठेतरी वापरण्यासाठी हवी असते. बोंबला...आता आली का पंचाईत? ही इमेज कशी मिळवायची?


मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल किंवा पॉवपॉईंट यातील एखादी इमेज तुम्हाला मूळ स्वरूपात हवी असल्यास ती फाईल सेव्ह अॅज एचटीएमएल करा. तुम्ही जिथे फाईल सेव्ह कराल तिथे एका एचटीएमएल फाईलसह एक नवे फोल्डर तयार होईल. त्यात तुम्हाला हव्या असलेल्या इमेजेस मूळ स्वरूपात (.jpg, .gif वगैरे) सेव्ह झालेल्या असतील. आता प्रश्न उरतो तो पीडीएफ फाईल्सचा. पीडीएफमधील इमेजेस मूळ स्वरूपात कशा मिळवता येतील? वरील पद्धतीने इमेजेस मिळवता येतील. पण त्यासाठी तुमच्याकडे अॅडोब अक्रोबॅट असायला हवे. अॅडोब अॅक्रोबॅटची तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही आणखी एका मार्गाने पीडीएफ फाईलमधील इमेजेस एक्स्ट्रॅक्ट करू शकता.



सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट नावाचे एक छोटेसे अॅप्लीकेशन वापरून तुम्ही पीडीएफ फाईलमध्ये असलेल्या TIF, JPEG, BMP, GIF, PNG, TGA, PBM, PPM, PCX या फॉरमॅटमधील इमेजेस एक्स्ट्रॅक्ट करू शकता.
एवढेच नव्हे तर हे अॅप्लीकेशन वापरून एनक्रिप्ट केलेल्या पीडीएफ फाईल्समधील इमेजेसही तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट विंडोज एनटी/२०००/एक्सपी/२००३ आणि व्हिस्टालाही सपोर्ट करते.

सम पीडीएफ इमेज एक्स्ट्रॅक्ट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

व्हेरी ब्राईट ‘डिमडिम’...

August 6, 2008 0 comments



सॉफ्टवेअर क्षेत्रात भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहेच, आता भारतीय इंजिनिअर्स वेब २.० मध्येही (नव्या युगातील इंटरनेट क्रांती - असे याचे वर्णन करता येऊ शकते) नावीन्यपूर्ण कल्पना आणून आपला ठसा उमटवत आहेत. कालच्या पोस्टमध्ये तुम्ही वीगो या आगळ्यावेगळ्या सेवेबद्दल वाचलेच असेल. भारतीय असलेल्या डी. डी. गांगुली, प्रकाश खोत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी गेल्या वषर्षी लॉंच केलेल्या ‘डिमडिम’ या अॉनलाईन वेब कॉन्फरन्सिंग सेवेबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

गांगुली आणि खोत यांनी सुमारे १२ वषर्षांच्या अनुभवानंतर २००६ मध्ये ‘डिमडिम’ प्रोजक्टवर काम सुरू केलं होतं. गेल्या वषर्षी अॉक्टोबरमध्ये त्यांनी ‘डिमडिम’ ही जगातील पहिली अोपन सोर्स वेब कॉन्फरन्सिंग सेवा सुरू केली. या क्षेत्रात प्रचलित असलेल्या गोटूमिटींग आणि वेबएक्ससारख्या सेवांच्या स्पर्धेत ‘डिमडिम’ थेट उतरले आहे. जगभरातील सुमारे सव्वा लाख लहान-मोठ्या कंपन्या आज ‘डिमडिम’ची सेवा वापरत आहेत. आता तुम्ही म्हणाल, स्काईप आणि जी-टॉक असताना ‘डिमडिम’ पाहिजे कशाला? डॉक्युमेंट्स शेअर करायचे झाले तर गुगल डॉक्स वापरू शकतो. पण या सगळ्या सेवांचे इंटिग्रेशन म्हणजे ‘डिमडिम’. शिवाय ‘डिमडिम’वरून वेब कॉन्फरन्सिंग करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागत नाही. अगदी पाच मिनिटांत ‘डिमडिम’वर रजिस्ट्रेशन करून वेब कॉन्फरन्सिंग सुरू करता येते. काही मयर्यांदासह ‘डिमडिम’चे बेसिक व्हर्जन मोफत वापरता येते. लहान व मध्यम आकाराच्या कंपन्यांची गरज एवढ्यावर पूर्ण होऊ शकते. अॅडव्हान्स्ड फीचर्ससाठी ठराविक रक्कम भरून एंटरप्राईझ एडिशन तुम्ही विकत घेऊ शकता.

Schedule a Conference


Actual Conference on Dimdim



‘डिमडिम’चा वापर करून कॉन्फरन्स होस्ट करणाऱ्यास प्रेझेंटर असे म्हटले जाते. या प्रेझेंटरकडे कॉन्फरन्ससंदर्भातील सर्व हक्क असतात. म्हणजे यात कोण सहभागी होणार, कॉन्फरन्स किती वेळ चालणार वगैरे. इतरांना कॉन्फरन्समध्ये सामावून घेण्यासाठी एका विशिष्ट लिंकवर क्लिक करावे लागते. ही लिंक आपण त्यांना ई-मेलने पाठवू शकतो. कॉन्फरन्स सुरू असताना सर्व सभासद एकमेकांशी चॅट करू शकतात, डॉक्युमेंट्स आणि डेस्कटॉपही शेअर करू शकतात. म्हणजे मी माझ्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन रन करून तो इतर सवर्वांना दाखवू शकतो.
(सेवाविस्तारासाठी ‘डिमडिम’ला नुकतेच ६ मिलियन डॉलर्स मिळाले असून आता आणखी नव्या सेवांची अपेक्षा करण्यास हरकत नाही)

बेसिक व्हर्जनची वैशिष्ट्येः
-एकावेळी २० जणांशी कॉन्फरन्स
-अॉडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा दोन्ही सेवा उपलब्ध
-पाच तासांपर्यंत सलग कॉन्फरन्सिंग शक्य
-चॅट, स्क्रीनकास्ट, व्हाईटबोर्डसारख्या व्हॅल्यू अॅडेड सेवा
Read the full story

,

मेरे पास ‘वीगो’ है...

August 5, 2008 0 comments



आजकाल जवळ-जवळ सर्वच लॅपटॉपमध्ये बिल्ट-इन वेबकॅम असतो. पण ज्यांचा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जुना आहे, अशांना स्वतंत्र वेबकॅम घ्यावा लागतो. वेबकॅम ही तशी फार महागडी वस्तू नसली, तरी रोज त्याचा फारसा वापर होत नसल्याने आपण त्याचा विचार करत नाही. पण तुम्हाला फुकटात वेबकॅम देऊ केला तर? अॉल्वेज वेलकम! लॅपटॉप किंवा डेस्कटॉप आहे; पण वेबकॅम नाही, अशा लोकांसाठी ‘वीगो’(WWIGO) हे सॉफ्टवेअर उपयोगास येते. काय आहे हे ‘वीगो’?



‘वीगो’अथर्थात Webcam Wherever I Go - WWIGO.काही भारतीय युवकांनी विकसित केलेले हे सॉफ्टवेअर आता जगभर लोकप्रिय झाले आहे. कॅमेरा मोबाईल फोनचा वेबकॅम म्हणून वापर कसा करता येईल, यासाठी बंगलोरस्थित मोत्विक या कंपनीने सुमारे ६ महिने संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाचे फलित म्हणजे ‘वीगो’. यात दोन अॅप्लीकेशन्स आहेत. एक तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर व एक तुमच्या कॅमेरा मोबाईल फोनवर इन्स्टॉल करावे लागते. मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यातून कॅप्चर केलेले व्हिडिअो ब्लुटूथद्वारे तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर पाठवले जातात. सर्वसाधारण वेबकॅमचे रिझॉल्यूशन हे कॅमेरा फोन्सच्या रिझॉल्यूशन्सपेक्षा कमी दजर्जाचे असते. त्यामुळे ‘वीगो’चा वापर करून रेकॉर्ड केलेले व्हिडिओ किंवा व्हिडिओ चॅट अधिक दर्जेदार होते. ‘वीगो’ सध्या केवळ नोकियाच्या सिरीज ६० (व्हर्जन २.० आणि ३.०) फोन्ससाठी तयार केले आहे. इतर फोनधारकांना ही सेवा वापरता येणार नाही. ‘वीगो’चा वापर करून तुम्ही स्काईप, याहू मेसेंजर किंवा विंडोज लाईव्ह मेसेंजरमध्ये व्हिडिओ चॅट करू शकता.
सपोर्टिंग सिस्टिम्सः विंडोज २०००, एक्सपी आणि व्हिस्टा
‘वीगो’ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
‘वीगो’सारखीच आणखी एक सेवा आहे. मोबिओला हे त्या सेवेचे नाव. ही सेवा मोफत नाही.
Read the full story