,

ग्रुप मेल पाठविण्यासाठी...

June 30, 2008 0 comments

एखादे ई-मेल पाठविताना आपण सहसा त्या विषयाशी संबंधित असलेल्या काही जणांना ‘सीसी’ करतो. संबंधित लोकांचे असे अनेक ग्रुप असतात. फॉरवर्ड करतानाही आपण ठराविक ग्रुपलाच मेल फॉरवर्ड करतो. म्हणजे काही मेल फक्त मित्रांना, काही फक्त मैत्रिणींना, काही शाळेतल्या मित्रांना, काही कॉलेजच्या ग्रुपला, काही अॉफिसमधील सहकाऱ्यांना वगैरे. असे अनेक ग्रुप झाले की मेल पाठविताना सगळ्यांचे मेल आयडी लक्षात ठेवावे लागतात. बहुतांश सर्वच मेल सेवांमध्ये पहिली काही अक्षरे टाईप केली की त्याने सुरू होणारे ई-मेल आयडी दिसतात व त्यातील आयडी आपण सिलेक्ट करू शकतो. तरीदेखील एखाद्या ग्रुपला मेल पाठविताना त्रास होतो. अशावेळी आपण ग्रुप तयार करून ठेवू शकतो. जी-मेल आणि याहूमेलमध्ये अशी सेवा आहे.

जी-मेलमध्ये ग्रुप तयार करण्यासाठी डाव्या बाजूच्या नेव्हीगेशन पॅनलमध्ये असलेल्या कॉन्टॅक्ट्सवर क्लिक करावे. त्यात न्यू ग्रुप असा अॉप्शन असेल. त्यावर क्लिक करून तुमच्या नव्या ग्रुपला एखादे नाव द्या (उदा. Friends, Schoolmates, College Group, HR वगैरे). त्यानंतर कॉन्टॅक्ट्स या सेक्शनमधील पहिल्या कॉलममध्ये तुमच्या ग्रुपचे नाव तुम्हाला दिसेल. ते सिलेक्ट करून तुम्हाला यात जे ई-मेल अायडी अॅड करायचे असतील ते दुसऱ्या कॉलमच्या तळाशी असलेल्या या बॉक्समध्ये जाऊन टाईप करा. ते ई-मेल आयडी तुम्ही सिलेक्ट केलेल्या ग्रुपमध्ये अॅड होतील. आता तुम्हाला ज्यावेळी एखाद्या ग्रुपला ई-मेल पाठवायचा असेल त्यावेळी अॅड्रेस बॉक्समध्ये केवळ ग्रुपचे नाव लिहायचे.

याहू मेलमध्ये कॉन्टॅक्ट्स या टॅबमध्ये जाऊन अॅड कॅटेगरीवर क्लिक करून तुम्ही एखादा ग्रुप तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्यांना या कॅटेगरीत अॅड करायचे आहे त्यांच्यासमोरील बॉक्समध्ये चेक करून अॅड टू कॅटेगरी म्हणायचं. संबंधित कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट केलेल्या कॅटेगरीत अॅड होतील.
Read the full story

,

आयट्यून्सपासून मुक्ती!

लग्नाच्या तिसऱ्या अॅनिव्हर्सरीला रमेशने कविताला एक सरप्राईझ दिले. अनेक दिवसांपासून तिला हवा असलेला आयपॉड नॅनो त्याने गिफ्ट दिला. त्यामुळे पुढचा आठवडाभर कविता रमेशवर जाम खूश होती. तिने रमेशकडून आयपॉडमध्ये आवडीची सगळी गाणी स्टोअर करून घेतली होती. तिच्या आयपॉडमध्ये जवळ-जवळ ५०० गाणी होती. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एका जुन्या गाण्याच्या मोहात तिने तिचा आयपॉड अॉफिसमधल्या एका सहकाऱ्याच्या कॉम्प्युटरला जोडला...आणि त्यामुळे रमेशच्या लॅपटॉपशी सिंक केलेल्या तिच्या आयपॉडमधली सगळी गाणी इरेझ झाली...तासभर मेहनत घेऊन किमान २० फोल्डर्समधून निवडलेली सगळी गाणी एका क्लिकमध्ये इरेझ झाली. कविताचे अज्ञान आणि तंत्रज्ञानातील मयर्यादा यामुळे तिच्यावर ही सर्व गाणी पुन्हा निवडायची वेळ आली. साहजिकच रमेशवरही तिने चिडचिड केली. पण आता रमेश हुशार झाला होता. कविताने पुन्हा अशी चूक करू नये म्हणून त्याला एक नामी युक्ती सापडली होती...यमीपॉड हे त्या युक्तीचे नाव.

अॅपल अायपॉड कोणत्याही मशीनवर अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला आयट्यून्स हे सॉफ्टवेअर लागते आणि यातील एक मयर्यादा म्हणजे कोणताही आयपॉड केवळ एकाच कॉम्प्युटरशी सिंक्रोनाईझ करता येतो. तो दुसऱ्या कॉम्प्युटरवरून अॅक्सेस करायचा झाल्यास त्यातील सगळी गाणी इरेझ होतात. पण यमीपॉड या छोट्याश्या अॅप्लीकेशनने (यमीपॉड विंडोज, मॅकिन्तोश आणि लिनक्सवर रन होतो) तुमचा आयपॉड कोणत्याही कॉम्प्युटरवरून अॅक्सेस करता येतो. शिवाय गाणीही ट्रान्स्फर करता येतात. यमीपॉड हे अॅप्लीकेशन थेट अायपॉडवर रन होत असल्याने तुमचा आयपॉड कोणत्याही कॉम्प्युटरवरून अॅक्सेस करणं शक्य होतं. यमीपॉड इन्स्टॉल करण्यासाठी पुढील स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो कराः
1. यमीपॉड आयफोन आणि आयपॉड टच वगळता इतर सर्व आयपॉडवर रन करता येते. सर्वप्रथम तुमचा आयपॉड कॉम्प्युटरला कनेक्ट करून आयट्यून्स ओपन करा. त्यानंतर आयपॉडच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Open iTunes when this iPod is attached हा अॉप्शन ‘अनचेक’ व Enable disk use हा अॉप्शन ‘चेक’ करा. सेटिंग्ज सेव्ह करा. यमीपॉडसाठी किमान ४० एमबी एवढी जागा लागते. तेवढी जागा मोकळी करा. पुढे जाण्याअगोदर आयपॉडमध्ये किमान एक तरी गाणे अाहे, याची खात्री करा.

2. आयट्यून्स क्लोज करा. यमीपॉड डाऊनलोड करा. त्यानंतर ड्राईव्हच्या जागी दिसणाऱ्या तुमच्या आयपॉडमध्ये यमीपॉडची अॅप्लीकेशन फाईल ड्रॅग करा. आता आयपॉडमध्ये दिसणाऱ्या यमीपॉडच्या आयकॉनवर क्लिक करून तो इन्स्टॉल करा. लक्षात ठेवा - यमीपॉड आयपॉडवर इन्स्टॉल करायचे आहे, कॉम्प्युटरवर नव्हे.
यमीपॉड तुमच्या आयपॉडचे जनरेशन आपोआप सेट करतो. तसे न झाल्यास ड्रॉपडाऊन मेनूमधून तुमच्या आयपॉडचे जनरेशन सिलेक्ट करा. (उदा. शफल, नॅनो)

3. आता कंडिशन्स अॅक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही यमीपॉडच्या मेन इंटरफेसवर जाल. यात तुमच्या आयपॉडमध्ये स्टोअर असलेली गाणी दिसतील. नवी गाणी अॅड करण्यासाठी कॉम्प्युटरवर असलेल्या फोल्डरमधून थेट ड्रॅग करू शकता.
आता तुमचा आयपॉड आयट्यून्सपासून मुक्त झाला असे समजावे. आता तुम्ही कोणत्याही कॉम्प्युटरला आयपॉड जोडला की त्यात दिसणाऱ्या यमीपॉडच्या आयकॉनवर क्लिक करायचं...


विंडोज, मॅकिन्तोश आणि लिनक्सवर रन होणारे आणखी काही असेच अॅप्लीकेशन्सः
फ्लूला
सॉंगबर्ड

वाचाः आयट्यून्समधून तयार करा रिंगटोन्स
Read the full story

डाऊन फॉर यू?

June 29, 2008 0 comments

कधी-कधी आपण एखादी साईट ओपन करायला जातो तर कायम काहीतरी एरर मेसेज येतो. कनेक्शन तर व्यवस्थित आहे, साईटचा अॅड्रेसही बरोबर आहे...मग तरी एरर मेसेज का येतोय? मग आपण एक निष्कर्ष काढतो की जाऊ देत, साईट डाऊन असेल. वैतागून असा निष्कर्ष काढणं बरोबर आहे, पण बऱ्याच वेळा साईट अप असते आणि पण आपल्या सेटिंग्जमध्ये काही गोंधळ असल्यामुळे ती ओपन होत नाही. अशा वेळी संबंधित साईट ही डाऊन आहे का अप आहे, हे ठरविण्यासाठी एक अतिशय साधी-सोपी सेवा आहे.डाऊन फॉर एव्हरीवन अॉर जस्ट मी डॉट कॉम हे त्या सेवेचे नाव. नाव भलं मोठं असलं तरी साईटचे काम मात्र अतिशय सोपे आहे. तुमच्याकडे जी साईट ओपन होत नाहीये तिचा अॅड्रेस टाकला की क्षणार्धात आपल्याला कळतं की ती साईट अप आहे, का डाऊन आहे का अस्तित्त्वातंच नाहीये. एखादी साईट काहीही केल्या ओपन होत नसेल तर आधी एकदा या सेवेचा वापर करून क्रॉस चेक करा आणि मग हवा तो निष्कर्ष काढा.

संडे लाईट्सः
अॉरकुटवरून व्हा अदृश्य!
चेक युवर स्पीड
Read the full story

, ,

लॅपटॉप चोरांपासून वाचण्यासाठी...

June 28, 2008 0 comments


आजकाल व्हाईट कॉलर क्राईम्सचे प्रमाण खूप वाढले आहे. कोणाचे तरी बॅंक अकाऊंट हॅक करून पैसे पळविल्याच्या बातम्या कानावर पडत असतात. आपले अकाऊंट हॅक होऊ नये म्हणून अॉनलाईन ट्रान्झॅक्शन्स करताना काय काळजी घ्यावी, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे व्हाईट कॉलर क्राईम करणारे त्यावर फारसे अवलंबून राहतंच नाहीत. आपण कुठे ढिसाळपणा करू शकतो, याकडे त्यांचे लक्ष असते. यातील एक म्हणजे, कोणत्या वेबसाईटवर लॉग-इन होतोय हे आपण काळजीपूर्वक तपासत नाही. त्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स मी फेक अॅड्रेसेस कसे ओळखाल? या पोस्टमध्ये दिल्या होत्या. यामुळे आपण इंटरनेटवर तरी किमान सुरक्षित राहू शकतो. आता प्रश्न राहिला तो अॉफलाईन सुरक्षिततेचा. म्हणजे, तुमचा लॅपटॉप समजा चोरीला गेला तर काय करायचं? अशी वेळ तुमच्यावर येऊ नये, परंतु आलीच तर चोराला ट्रॅक करणं शक्य आहे.

अॉनलाईन थेफ्ट ट्रॅकिंग सिस्टिम्सद्वारे तुम्ही चोरीस गेलेला लॅपटॉप नेमका कुठे आहे हे ट्रॅक करू शकता. यासाठी चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट करणे आवश्यक आहे. ‘लॅपटॉप लॉक’ हे या सेवेचे नाव. ‘लॅपटॉप लॉक’वर रजिस्टर करून तुमच्या लॅपटॉपचे डिटेल्स एंटर केल्यानंतर ‘लॅपटॉप लॉक’ क्लाएंट डाऊनलोड करावा लागतो. त्यानंतर हा क्लाएंट व तुमचे ‘लॅपटॉप लॉक’वरील अकाऊंट एकमेकांना लिंक केले की रजिस्ट्रेशन आणि इन्स्टॉलेशनची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर डेस्कटॉप क्लाएंट ओपन करून लॅपटॉप चोरीस गेल्यावर काय प्रोसेस होणं अपेक्षित आहे, याची माहिती भरावी लागते. म्हणजे चोरट्याने तुमचा लॅपटॉप इंटरनेटला कनेक्ट केला की ‘लॅपटॉप लॉक’ अॅक्टिव्हेट होऊन ठरवून दिलेल्या प्रोसेसेस (उदा. महत्त्वाच्या ड्राईव्हमधील फाईल्स डिलीट करणे, काही फाईल्स एन्क्रिप्ट करणे वगैरे) पूर्ण करतो. चोरीला गेल्यानंतर तुम्ही ‘लॅपटॉप लॉक’च्या अकाऊंटवर लॉग-इन करून लॅपटॉपचे स्टेटस मिसिंग किंवा स्टोलन असे करावे लागते. त्यानंतर चोरट्याच्या आयपी अॅड्रेसवरून त्याचा नेमका पत्ता शोधला जातो. ‘लॅपटॉप लॉक’तर्फे चोरी पकडण्याची किंवा चोरीस गेलेला लॅपटॉप परत मिळवून देण्याची कोणतीही हम दिली जात नसली तरी ही माहिती पोलिसांसाठी महत्त्वाची ठरू शकते व तुमचा लॅपटॉप परत मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात. ‘लॅपटॉप लॉक’ ही सेवा फक्त विंडोज २०००, एक्सपी आणि व्हिस्टासाठी उपलब्ध आहे.

मॅकिन्तोश वापरणाऱ्यासाठी याहून अधिक खात्रीलायक सेवा उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे अंडरकव्हर. अंडरकव्हरची प्रोसेस ‘लॅपटॉप लॉक’शी मिळतीजुळती असली तरी यातील नवे फीचर म्हणजे चोरट्याने लॅपटॉप विकण्याचा प्रयत्न केला तर विकत घेणाऱ्यास, हा लॅपटॉप चोरीचा असल्याची माहिती मिळते. अंडरकव्हर ही पेड सेवा अाहे. मॅकिन्तोशमधील इनबिल्ट कॅमेऱ्याचा वापर करून चोरट्याचे फोटो पाठविण्यासाठी अायअलर्टयू ही सेवा कामाला येते. यातील कोणतीही सेवा तुमचा लॅपटॉप परत देण्याची हमी देत नसले तरी अधिक सुरक्षिततेसाठी या सेवा वापरण्यास काहीच हरकत नाही.
Read the full story

,

मशीन एक...और फायरफॉक्स दो?

June 27, 2008 0 comments

तुम्ही फायरफॉक्स ३.० डाऊनलोड केलंत का? की तुम्ही फायरफॉक्स २.०वर समाधानी आहात? फायरफॉक्स ३.० ची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण किती नव्या सोयी-सुविधांपासून दूर जात आहोत. असो. एवढं करूनही तुम्हाला फायरफॉक्स २.०च हवं असेल तर राहू देत. पण एक शेवटचा अॉप्शन देऊन पाहतो. जर तुम्हाला दोन्ही व्हर्जन्स एकाचवेळी उपलब्ध करून दिली तर तुम्ही ट्राय कराल?

जेव्हा एखाद्या अप्लीकेशन किंवा सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन आपण इन्स्टॉल करतो त्यावेळी आपल्याकडे असलेले जुने व्हर्जन आपोआप रिप्लेस होते. त्यामुळे एकाच वेळी फायरफॉक्स २.० आणि ३.० वापरणे प्रॅक्टिकली शक्य नाही. पण एक सोपी ट्रिक वापरली तर हेही शक्य होते. ही ट्रिक केवळ मॅकिन्तोश अॉपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांसाठी आहे.
तुम्ही जर फायरफॉक्स २.० वापरत असाल तर फायरफॉक्स ३.० डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर जेव्हा इन्स्टॉलेशनसाठी .dmg वर क्लिक कराल त्यावेळी खालीलप्रमाणे एक विंडो ओपन होईल.

नेहमीप्रमाणे इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही फायरफॉक्सचा लोगो अॅप्लीकेशन फोल्डरमध्ये ड्रॅग करता. तसे न करता फायरफॉक्सचा लोगो डेस्कटॉपवर ड्रॅग करा. आता हा लोगो रिनेम करा (म्हणजे फायरफॉक्स३ किंवा फायरफॉक्स न्यू असे काहीतरी नाव द्या). रिनेम केल्यानंतर हा लोगो अॅप्लीकेशन फोल्डरमध्ये ड्रॅग करून इन्स्टॉल करा. आता तुम्ही फायरफॉक्सची दोन्ही व्हर्जन्स डॅशबोर्डमध्ये ठेवून वापरू शकता.

िंवडोज वापरणाऱ्यांसाठीही एक ट्रिक आहे. पण ती थोडीशी कठीण आहे. त्यात चूक होण्याची शक्यता आहे. तरीदेखील ज्यांना प्रयोग करून पाहायचा आहे त्यांनी इथे भेट द्यावी.

Read the full story

शून्य रुपयात व्हा ५० जीबींचे मालक!


आपल्या कॉम्प्युटरवर असलेला कोणताही डेटा डिलीट करायचा नाही म्हटलं तर काही दिवसांनी आपल्याला टेराबाईटमध्ये (१ टेराबाईट म्हणजे १००० गिगाबाईट्स) क्षमता असलेल्या हार्डडिस्क्स घ्याव्या लागतील. फ्लॉपी ते पेनड्राईव्ह आणि पेनड्राईव्ह ते पोर्टेबल हार्डडिस्क हा प्रवास पाहिला तर आताच्या १००-२०० जीबीच्या हार्डडिस्क लवकरंच नामशेष होतील. पण एक वर्ग असा आहे की ज्याला ५०-१०० जीबींचे स्टोरेजही खूप वाटते. त्याहून अधिक स्पेस मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तरी हरकत नाही अशांसाठी आणि ज्यांना आपला डेटा ग्लोबली अॅक्सेसिबल हवा अाहे अशांसाठी तब्बल ५० जीबींचे फ्री अॉनलाईन स्टोरेज देणाऱ्या ‘ए ड्राईव्ह’ या सेवेबद्दल आज मी माहिती देणार आहे.

अॉनलाईन स्टोरेज देणाऱ्या असंख्य सेवा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. बहुतांश कंपन्या साधारण १ ते २० जीबींपर्यंतचे स्टोरेज मोफत देतात. अनलिमिटेड स्टोरेज हवे असल्यास त्यांनी अॉफर केलेल्या अनेक प्लॅन्समधून एखादा प्लॅन निवडावा लागतो. मध्यम आकाराच्या कंपन्या किंवा नवउद्योजकांसाठी अशा पेड सेवा उपयोगी ठरतात. पण व्यक्तिगत वापरासाठी सहसा कोणी पेड सेवांच्या मागे लागत नाही. त्यामुळे ५-१० जीबींच्या मोफत स्टोरेजला फारसे महत्त्व उरत नाही. अशा विविध सेवांच्या भाऊगर्दीत ‘ए ड्राईव्ह’ या सेवेने तब्बल ५० जीबींचे मोफत स्टोरेज अॉफर केले आहे. गेल्या अॉक्टोबरमध्ये बेसिक फीचर्ससह सुरू झालेल्या या सेवेने आता अनेक अॅडव्हान्स्ड फीचर्ससह इतर सेवांना मागे टाकण्याचे ठरविलेले आहे, असे दिसते. ‘ए ड्राईव्ह’वर रजिस्टर केल्यानंतर तुम्ही थेट फाईल अपलोड करू शकता. यात विविध फोल्डर्स आणि फाईल्स थेट अपलोड करता येतात. अपलोड केलेल्या फाईल्स तुम्ही इतरांबरोबर शेअरही करू शकता.

याच फाईल्स तुम्ही जगात कुठूनही अॅक्सेस करू शकता. शिवाय इंटरनेटवरील कोणतीही लिंक देऊन तुम्ही ती फाईल थेट ‘ए ड्राईव्ह’वर सेव्ह करू शकता. उदा. एखाद्या साईटवर उपलब्ध असलेली एमपीथ्री फाईल तुम्ही कॉम्प्युटरवर डाऊनलोड न करता त्याची लिंक ट्रान्स्फर रिमोट फाईल येथे सबमिट करून थेट ‘ए ड्राईव्ह’वर सेव्ह करता येते.

५० जीबी नको असल्यास यापैकी एखादी सेवा वापरून पाहा.
डुप्लीकेट झालेल्या फाईल्स डिलीट करण्यासाठी वाचा हार्डडिस्कला घेऊ द्या मोकळा श्वास!

Thanks Ganesh

Read the full story

याहू! योडलर...

June 26, 2008 2 comments


याहू! आणि गुगलमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जाहिरातीसंदर्भात एक महत्त्वाचा करार झाला. त्यापूर्वी याहू! आणि मायक्रोसॉफ्टच्या तथाकथित डीलबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले गेले. सर्च इंजिनच्या बाजारात गुगल टिकणार की मायक्रोसॉफ्ट आणि याहू!च्या एकत्रित ताकदीपुढे झुकणार, मायक्रोसॉफ्टचा गुगलपुढे कसा टिकाव लागणार वगैरे, वगैरे. मी याचे विश्लेषण करणार नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून नेटीझन झालेल्या मला जी गोष्ट काल समजली ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बऱ्याच जणांना माहितही असेल. फार महत्त्वाची नसली तर इंटरेस्टिंग मात्र नक्की आहे...

तसा मी याहू!चा फार चाहता नाही. पण इंटरनेटची माझी ओळख झाली ती मुळी याहू!ने. मी इंटरनेटवर पाहिलेली पहिली साईट याहू! होती. या घटनेला जवळपास दहा वर्षे झाली असतील. भारतातील आद्य इंटरनेट सर्फर म्हणून शम्मी कपूर यांची ओळख आहे. शम्मी कपूरच्या जंगली या चित्रपटात या...हू...चाहे कोई मुझे जंगली कहे...या गाण्यावरून या साईटला याहू! असे नाव दिले असावे, अशी माझी संकल्पना होती. कारण त्या वेळी जेरी यांग (याहू!चे संस्थापक) यांची माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे जसे इंटरनेट फोफावत गेले तसे गुगलचे प्रस्थ निर्माण झाले आणि त्यानंतर आजतागायत गुगलची साथ सुटलेली नाही. काल अचानक एका साईटवर याहू!तील उद्गारवाचक चिह्नामागे दडलेले रहस्य उलगडले.

ज्यांना माहित नसेल त्यांनाही हे वाचून आश्चर्य वाटेल की याहू!च्या उद्गारवाचक चिह्नामागे दडलीये याहू!ची आरोळी! होय...या चिह्नावर क्लिक केल्यानंतर जो आवाज येतो तो ‘याहू योकल’ या नावाने ओळखला जातो. काल दिवसभरात मी तो किमान दहा वेळा एेकलाय...
Read the full story

महिनाअखेरीचा ‘शॉक’ आणि इलेक्ट्रिक चेकबुकजानेवारी २००८
रिलायन्स फ्रेशः ३५५ रुपये
इनॉरबिट मॉल (कपडे)ः १८९० रुपये
मूव्हीः ४५० रुपये
स्नॅक्सः १७५ रुपये
पेट्रोलः १५०० रुपये
क्रेडिट कार्ड पेमेंटः ८००० रुपये
इन्शुरन्स प्रीमियमः ५००० रुपये
इतरः ५००० रुपये
एकूण खर्चः २२३७० रुपये

जानेवारीत सुरू केलेला हा उपक्रम फेब्रुवारीत बारगळतो आणि मग थेट पुढच्या वषर्षीच आठवायला लागतो. तोपर्यंत टॅक्सची झळ पोचलेली असते. आता या वषर्षापासून व्यवस्थित हिशेब ठेवायचा, असा दृढनिश्चय आपण करतो आणि तोही जेमतेम महिनाभर टिकतो. यात आपला दोष नाही. दोन-तीन क्रेडिट काडर्ड्स, दोन बॅंक अकाऊंट्स, शेअर्स, महिन्याचा खर्च हे सगळं कागदावर उतरवणं आणि त्याचा हिशेब राखणं हे अत्यंत अवघड काम आहे. कधी कोणत्या क्रेडिट काडर्डाचे पैसे भरले आणि कधी मॉलमधून कपडे खरेदी केले, हे दोन-तीन महिन्यानंतर विचारले तर लक्षातही येणार नाही. अशावेळी आपण इलेक्ट्रीक चेकबुक या अॉनलाईन सेवेचा आधार घेऊ शकतो.

अमेरिकन लोकांना समोर ठेवून तयार केलेले इलेक्ट्रीक चेकबुक हे अॅप्लीकेशन डॉलरचे चिह्न वगळले तर कोणत्याही देशातली व्यक्ती वापरू शकते. यात सर्वप्रथम तुमचे अकाऊंट तयार करावे लागते. उदा. तुम्ही तुमच्या दोन बॅंकांसाठी दोन वेगळे अकाऊंट्स तयार करू शकता. त्यानंतर ज्या खचर्चाच्या बाबी अाहेत, म्हणजे क्रेडिट कार्ड्स, मोबाईल बिल, इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे त्यांची माहिती एंटर करा. आता महिन्यानुसार जमा-खर्च भरत जा. आता कुठले बिल कोणत्या अकाऊंटमधून, किती तारखेला भरले याचाही ट्रॅक ठेवता येईल आणि असलेल्या पैशांचे योग्य व्यवस्थापनही करता येईल. महिनाअखेरीस बसणाऱ्या ‘शॉक’पासून वाचायचे असेल तर इलेक्ट्रिक चेकबुक वापरून पाहायलाच पाहिजे.
Read the full story

चार जीबींचे ‘पार्सल’!

June 25, 2008 1 comments


हेवी फाईल्स पाठविण्यासाठीचे काही सोपे मार्ग मी गेल्या एक पोस्टमध्ये सांगितले होते. त्यातून तुम्ही अधिकाधिक एक जीबीपर्यंतच्या फाईल्स पाठवू शकता. साध्या ई-मेल सेवा याबाबतीत अगदीच कुचकामी ठरतात. त्यातून तुम्ही फार-फार तर २० ते २५ एमबी क्षमतेच्या फाईल्स पाठवू शकता. पण काहीवेळा आपल्याला १ जीबीहून अधिक क्षमतेच्या फाईल्स पाठवाव्या लागतात, उदा. एखादे व्हिडिओ फुटेज, मूव्ही फाईल किंवा बॅक-अप डेटा. तेव्हा कामाला येणारी एक सेवा म्हणजे सिव्हिल नेटीझन.

सिव्हिल नेटीझन हा एक डेस्कटॉप क्लाएंट आहे. पण हा इतका शक्तीशाली आहे की याचा वापर करून तुम्ही तब्बल चार जीबी क्षमतेच्या फाईल्सही लीलया ट्रान्स्फर करू शकता. विंडोज आणि मॅकिन्तोश या अॉपरेटिंग सिस्टिम्ससाठी सिव्हिल नेटीझन क्लाएंट उपलब्ध आहे. यातील पार्सल ही संकल्पना भन्नाट आहे. फाईल पाठवताना अट फक्त एकच...तुम्ही ज्याला ती पाठवणार आहात त्याच्याकडेही सिव्हिल नेटीझन क्लाएंट असणं आवश्यक आहे. सिव्हिल नेटीझन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. सिव्हिल नेटीझन इन्स्टॉल केल्यानंतर केवळ दोन स्टेप्समध्ये आपण फाईल पाठवू शकतो आणि केवळ एका स्टेपपमध्ये समोरचा ती डाऊनलोड करू शकतो. सिव्हिल नेटीझन क्लाएंट ओपन केल्यानंतर पुढील स्टेप्स फॉलो कराः
पॅकः तुम्हाला जी फाईल पाठवायची आहे ती सिलेक्ट करा. तुमच्या पार्सलला नाव द्या आणि पॅकेज पार्सल म्हणा
सेन्डः तुम्ही डेस्कटॉप मेल क्लाएंट (आऊटलूक, अॅपल मेल) किंवा इतर मेल सेवा (जी-मेल, याहू, रेडिफ इ.) वापरून समोरच्या व्यक्तीस पार्सल स्लिप पाठवू शकता. पार्सल स्लिप म्हणजे एन्क्रिप्ट केलेले टेक्स्ट मॅटर असते. हे जसेच्या तसे कॉपी करून समोरच्या व्यक्तील मेलद्वारे पाठवायचे.
पिक-अप अॅण्ड अनपॅकः समोरच्या व्यक्तीने ही स्लिप त्याच्याकडे असणाऱ्या सिव्हिल नेटीझनच्या पिक-अप बॉक्समध्ये पेस्ट केले की डाऊनलोड पार्सल लिंक अॅक्टिव्हेट होईल.
ट्रॅकः आपण आतापर्यंत पाठवलेले पार्सल्स, समोरच्या व्यक्तीने डाऊनलोड केलेले पार्सल याचा संपूर्ण ट्रॅक आपण ठेवू शकतो.


मी आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या सेवांमध्ये ही सवर्वांत अत्याधुनिक आणि सुरक्षित सेवा आहे. तुम्हीही हे सेवा ट्राय करू शकता. तुम्हाला जर तुलनेने कमी हेवी फाईल्स पाठवायच्या असतील तर तुम्ही इतर सेवांचा वापर करू शकता.

कॉम्प्रेस्ड फाईल्स डाऊनलोड करून घेण्याअगोदर पाहा त्यातील कन्टेन्ट...वाचा झिप, झॅप, झूम


Read the full story

सेव्ह, सर्च, अॅनालाईझ अॅण्ड शेअर...कधी-कधी आपल्याला वाटतं की इन्स्टा मेसेंजर नसते तर जगता आलं असतं का. काही लोकांना इन्स्टा मेसेंजर्स म्हणजे टाईमपासचे साधन किंवा कामात व्यत्यय वाटत असेल; पण जी लोकं व्यवसायासाठी याचा वापर करतात त्यांना इन्स्टा मेसेंजर्स वरदान वाटतात. इन्स्टा मेसेंजरचा वापर मुख्यतः इन्फॉर्मेशन शेअरिंगसाठी केला जातो. इन्स्टा मेसेंजरवरून शेअर केलेली माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत थेट पोचते. ई-मेलच्या तुलनेत ही सेवा अधिक ‘लाईव्हली’ आहे. पण बहुतांश इन्स्टा मेसेजिंग सेवा झालेले संभाषण साठवून ठेवत नाहीत. त्यामुळे ते रिट्राईव्ह करण्यात अडचणी येतात. बऱ्याच वेळा आपण यातून काही लिंक्स शेअर करतो, काही फोन नंबर्स शेअर करतो. ही माहिती परत मिळविण्यासाठी आणि आपण किती वेळ, कुणाशी बोललो याचे विश्लेषण करण्यासाठी डेक्सरेक्स ही सेवा वापरता येईल.


डेक्सरेक्स या अॉनलाईन सेवेचा वापर करून तुम्ही AIM, Skype, Yahoo Messenger, MSN, Google Talk, Jabber, Windows Live आदी इन्स्टा मेसेंजर्सवरून केलेल्या चॅट्स एका ठिकाणी सेव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनदेखील करावे लागत नाही. तुम्ही ज्या सेवा नेहमी वापरता त्यावर लॉग-इन होऊन एकदा डेक्सरेक्सवरून कन्फर्मेशन मिळालं आणि डेक्सरेक्स वरून डाऊनलोड केलेल प्लग-इन्स इन्स्टॉल केले की तुमच्या चॅट्स सेव्ह होण्यास सुरवात होते. हे प्लग-इन्स तुमच्या इन्स्टा मेसेंजर अकाऊंटला डेक्सरेक्सशी कनेक्ट करतात. तुम्ही काही चॅट्स अगोदर सेव्ह करून ठेवलेल्या असतील तर त्याही इम्पोर्ट करता येतात. एकदा सेट-अप झाल्यानंतर तुम्ही नाव, नंबर, लिंक काहीही शोधू शकता. एखादे संभाषण मित्रांसोबत शेअरही करू शकता. शेअर करताना काही ओळी तुम्हाला नको असतील तर त्या काढून टाकण्याची सोयही डेक्सरेक्समध्ये दिली आहे. यातील सवर्वांत सुंदर फीचर म्हणजे अॅनालिटीक सूट. यातून तुम्हाला तुमचे प्रोफाईल तयार करण्यास मदत होते. म्हणजे तुम्ही कोणाशी, किती वेळ, कोणत्या विषयावर बोललात, कोणत्या सेवेचा वापर करून बोललात वगैरे माहितीचे विश्लेषण केले जाते. तुम्ही जितके अधिक बोलाल तितके नवे टूल्स तुमच्यासाठी खुले होतात.


डेक्सरेक्सने नुकतीच नव्या फीचरची घोषणा केली असून त्याद्वारे ब्लॅकबेरीधारकांना त्यांचे एसएमएस स्टोअर करून ठेवता येणार आहेत. डेक्सरेक्स वापरायला सुरवात केल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॅकबेरीचा नंबर दिलात की तुम्हील त्यातील मेसेजेस स्टोअर करून ठेवू शकता. तेव्हा सेव्ह, सर्च, अॅनालाईझ अॅण्ड शेअर यूवर चॅट्स...

मोबाईलवरूनही चॅट करा...वाचा चटपटीत मोबाईल ‘चॅट’
Read the full story

,

ट्रॅक युवर व्हर्जन

June 24, 2008 0 comments


कोणे एके काळी इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर आपण वषर्षानुवषर्षे वापरत असतो आणि विशेष म्हणजे समाधानीही असतो. सॉफ्टवेअर ही अशी गोष्ट आहे की ती केव्हा अपडेट होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्या गतीने सॉफ्टवेअर्स किंवा प्रोग्राम्स अपडेट होतात, त्या गतीने आपण अपडेट होणे गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? त्या लोकांनी रात्रीतून काही बदल केले तर आम्ही काय रोजची कामं सोडून सॉफ्टवेअर अपडेटकडे लक्ष द्यायचं? नाही. तुम्ही फक्त एक साईट पाहायची...

तुम्ही विंडोज किंवा मॅकिन्तोश वापरत असाल, तर व्हर्जनट्रॅकर डॉट कॉम ही साईट तुम्हाला कायम अप-टू-डेट ठेवण्याचे काम करेल. कर्ट ख्रिश्चन्सनने सुरू केलेल्या व्हर्जनट्रॅकर, मॅकफिक्सिट आणि आयफोन अॅटलास या तिन्ही साईट्स गेल्या वषर्षी अॉगस्टमध्ये सीनेटने संपादित केल्या. त्यानंतर या साईटच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. व्हर्जनट्रॅकरवर तुम्हाला कोणत्याही फ्री किंवा पेड सॉफ्टवेअरसंदर्भातील अपडेट्स पाहता येतात. पाम मोबाईल अॉपरेटिंग सिस्टिमसंदर्भातील अपडेट्सही यावर पाहावयास मिळतात. तेव्हा तुम्हीही जर एखाद्या सॉफ्टवेअरचे जुनाट व्हर्जन वापरत असाल तर व्हर्जनट्रॅकरवर जाऊन अपडेटेड व्हर्जन आजच डाऊनलोड करा.
Read the full story

, ,

शब्द खाली पडू न देणारे ‘हायपरवड्‌र्ड्स’

इंटरनेटवर आपण सारखं काही तरी ‘शोधत’ असतो. त्यामुळेच आपल्याला कायम गुगल किंवा विकिपेडियाचा आधार लागतो. कधी एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती शोधत असतो, कधी कंपनीबद्दल, कधी पुस्तकाबद्दल, कधी स्वस्त मोबाईल कुठे आणि कितीला मिळेल याबद्दल, कधी एक्स्चेंज रेटबद्दल, कधी एक टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट्स याबद्दल...प्रत्येकाच्या शोधाचे विषय वेगळे असतील, पण शोध मात्र कायम सुरू असतो. इंटरनेट हे शेवटी एकप्रकारचे जाळेच आहे. त्यामुळे तुम्ही एकदा त्यात अडकला की अाणखी अडकत जाता. एखाद्या चांगल्या साईटवर काहीतरी वाचताना नवा शब्द समोर येतो. त्याचा अर्थ शोधण्यासाठी आपण आणखी एक सर्च देतो. त्यानंतर एखाद्या नव्या प्रोसेसचा उलगडा होतो. त्यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अापण विकिपेडियासारख्या साईटचा आधार घेतो. काहीवेळानंतर लक्षात येतं की आपण काहीतरी वेगळंच शोधायला आलो होतो आणि आता काहीतरी वेगळंच वाचतोय. या सगळ्या गोंधळात आपल्या ज्ञानात अमूल्य भर पडते, पण मूळ जे शोधत होतो ते हाती लागत नाही. इंटरनेटच्या या मायाजालात मूळ विषयापासून दूर न जाता इतर माहिती मिळविण्यासाठी हायपरवड्‌र्ड्सची मदत मोलाची ठरते.

हायपरवड्‌र्ड्स हे फायरफॉक्ससाठी तयार केलेले एक अॅड-अॉन आहे. त्यामुळे हायपरवड्‌र्ड्स वापरण्यासाठी तुम्हाला फायरफॉक्स हे ब्राऊजर डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. नुकतेच रिलीज झालेले फायरफॉक्स ३.० तुम्ही येथून डाऊनलोड करू शकता. हायपरवड्‌र्ड्स म्हणजे वन-स्टॉप शॉप. तुमचा कोणताही शब्द खाली पडू न देण्यासाठीच हायपरवड्‌र्ड्सची निर्मिती झालेली आहे. उदाहरणानेच समजावून देतो. समजा तुम्ही एखाद्या साईटवर खालील बातमी वाचत आहातः
Apple success linked to more than just Steve Jobs

SAN FRANCISCO (Reuters) - The thought of Apple Inc (AAPL.O: Quote, Profile, Research) without Chief Executive Steve Jobs spooks many investors, but his absence might not spell long-term disaster for the innovation machine behind the iPod and iPhone.

Last year, investment weekly Barron's estimated that Jobs accounted for $16 billion, or 20 percent, of Apple's market capitalization at the time, more than any other CEO.

यात स्टीव्ह जॉब्ज कोण आहे, तो कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला गुगल किंवा विकिपेडियावर जावे लागेल. अॅपल या कंपनीच्या शेअरचा ताजा भाव जाणून घेण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजच्या साईटवर जावे लागेल. १६ बिलियन डॉलर म्हणजे किती रुपये, हे कन्व्हर्ट करण्यासाठी एखादी करन्सी कन्व्हर्ट करणारी साईट शोधावी लागेल. आता कल्पना करा की या सगळ्या सोयी केवळ माऊसच्या राईट-क्लिकवर उपलब्ध झाल्या तर? हायपरवड्‌र्ड्स नेमकं हेच काम करते.


तुम्हाला ज्या शब्दाबद्दलची माहिती हवी आहे तो सिलेक्ट केला की हायपरवड्‌र्ड्सचा मेनू डिस्प्ले होतो. यात तुम्ही त्या शब्दाबद्दलची माहिती गुगल, याहू, अास्क आदी सर्च इंजिनवर किंवा विकिपेडियावर शोधू शकता. त्यासंदर्भातील इमेजेस, व्हिडिओ पाहू शकता. एखाद्या शब्दाचे भाषांतर करू शकता, डॉलरमध्ये असलेली करन्सी रुपयांत कन्व्हर्ट करू शकता, कंपनीच्या शेअरचा ताजा भाव पाहू शकता, टेक्स्ट किंवा यूआरएल थेट कॉपी करू शकता, मोठ्या यूअारएल टाईनी किंवा स्निपयूआरएल वापरून लहान करू शकता, ब्लॉगवर पोस्ट करू शकता, ई-मेल करू शकता, त्यात दिलेल्या वस्तू ई-बे किंवा अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता आणि आणखीही बरंच काही करू शकता. हायपरवड्‌र्ड्सद्वारे काय-काय करता येतं त्याची संपूर्ण यादी तुम्ही येथे पाहू शकता. अॅड-अॉन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ज्या-ज्या सेवा हव्या आहेत त्या तुम्ही प्रेफरन्सेसमध्ये जाऊन सेट करू शकता. तुम्ही रिसर्चर, लेखक, ब्लॉगर किंवा पत्रकार असाल तर तुमच्यासाठी हायपरवड्‌र्ड्स हे वरदान ठरू शकते.

हायपरवड्‌र्ड्स इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

हार्डडिस्कला घेऊ द्या मोकळा श्वास!

June 23, 2008 3 comments

आजकाल सगळ्यांच्या हार्डडिस्क्स किमान ८० ते १२० जीबी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या असतात. त्यामुळे आपण कसलाही विचार न करता फाईल्स स्टोअर करत जातो. तुम्ही व्यवस्थित पाहणी केली तर तुम्हाला तुमच्या हार्डडिस्कमध्ये मस्तपणे पहुडलेल्या एमपीथ्री फाईल्स (ज्यातील अनेक गाणी तुम्ही वर्षातून एकदा वगैरे एेकत असाल), व्हिडीओ फाईल्स, असंख्य फोटोज आणि शेकडो डॉक्युमेंट्स दिसतील. यातील अनेक गोष्टी डिलीट करण्यासारख्या असतात, पण आपण त्या करत नाहीत. त्यामुळे अनावश्यक फाईल्सचा कचरा वाढत जातो आणि एक दिवस, ‘यूवर सी ड्राईव्ह हॅज व्हेरी लिटल स्पेस. प्लीज डिलीट सम डेटा’ अशा आशयाचा मेसेज आल्यानंतर आपल्याला जाग येते. मग आपण नको असलेल्या फाईल्स डिलीट करायला घेतो. त्यावेळी लक्षात येतं की, अरे आपण एकच फाईल तीन ठिकाणी सेव्ह करून ठेवलेली आहे. अशी वेळ येऊ नये किंवा आल्यास डुप्लीकेट फाईल्स शोधून पटकन डिलीट करता याव्यात यासाठी एक उत्तम टूल आहे. इझी डुप्लीकेट फाईंडर हे त्याचं नाव.इझी डुप्लीकेट फाईंडर हे डुप्लीकेट फाईल शोधून डिलीट करण्यासाठीचे एक मोफत टूल आहे. केवळ ७३८ केबीचा हा प्रोग्राम इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमधील डुप्लीकेट झालेल्या फाईल्स चुटकीसरशी डिलीट करू शकता. हा प्रोग्राम केवळ फाईल नेमवर न जाता बाईट टू बाईट कम्पॅरिझन करतो. त्यामुळे एकसारखा कन्टेन्ट (टेक्स्ट, इमेजेस, अॉडिओ, व्हिडिओ) असणाऱ्या कोणत्या फाईल्स डुप्लीकेट झालेल्या आहेत, हे लगेच समजते. बऱ्याच वेळा आपल्याला माहित असतं की या दोन फोल्डर्समध्ये किंवा दोन ड्राईव्ह्जमध्ये डुप्लीकेट फाईल्स असण्याची शक्यता आहे. अशावेळी केवळ संबंधित फोल्डर्स किंवा ड्राईव्ह्जमधून डुप्लीकेट फाईल्स शोधता येतात. डुप्लीकेट झालेल्या फाईल्स एका क्लिकमध्ये डिलीट करता येतात. इझी डुप्लीकेट फाईंडर विंडोजच्या सर्व व्हर्जन्सना (विंडोज ९५ ते विंडोज व्हिस्टा) सपोर्ट करतो. तुमच्या हार्डडिस्कला जरा मोकळा श्वास घेऊ देण्यासाठी इझी डुप्लीकेट फाईंडर वापरा आणि अनावश्यक व डुप्लीकेट झालेल्या फाईल्स डिलीट करा.

इझी डुप्लीकेट फाईंडर डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
इझी डुप्लीकेट फाईंडर संदर्भात अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Read the full story

चेक युवर स्पीड

June 22, 2008 0 comments

रविवारी मी तुम्हाला कोणत्याही अॅप्लीकेशनबद्दल माहिती देणार नाही. आज फक्त टाईमपास करायचा. साधी-सोपी टेक्नॉलॉजी नियमित पाहणाऱ्या बहुतांश वाचकांकडे ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी असल्याचे गुगल अॅनालिटिक्सवरून स्पष्ट होते. काहीवेळा नेटकवर्क अॉपरेटर्स मिळणाऱ्या स्पीडबाबत मोठे दावे करतात. प्रत्यक्षात मात्र आपल्याला कमी स्पीड मिळते. आपल्या नेटवर्कची स्पीड तपासण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या सेवांचा वापर करू शकता.


स्पीडटेस्ट डॉट नेट

ब्रॉडबॅण्डरिपोर्ट्स डॉट कॉम
इंटरनेटफ्रॉग डॉट कॉम
स्पीकइझी डॉट कॉम
बॅण्डविड्थप्लेस डॉट कॉम
Read the full story

,

कीपइट अॅण्ड फरगेट इट!

June 21, 2008 6 comments


"अरे रमेश, ती दहावीची मार्कलिस्ट आहे का रे माझ्या कपाटात? जरा बघ ना. असेल तर लगेच स्कॅन करून मेल कर ना. फार अर्जंट आहे."
रमेशला कविताची मार्कलिस्ट तर सापडली पण ती स्कॅन कुठून करायची हा प्रश्न पडला होता. बहुतांश जणांकडे स्कॅनर किंवा प्रिंटर या गोष्टी घरात नसतात. डेस्कटॉप, लॅपटॉप असतो, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते, पण स्कॅनर वगैरे नसतो. आता रमेशला बाहेर जाणं आलं. स्कॅनिंग करून देणारा शोधणं आलं. काय ही कटकट, असं म्हणून रमेश निघाला. रमेशला कीपइट बद्दल माहिती नव्हती, म्हणून त्याच्यावर स्कॅनिंगसाठी बाहेर पडण्याची वेळ आली. पण तुमच्यावर असा प्रसंग नक्कीच येणार नाही.

कीपइट ही एक अॉनलाईन स्कॅनिंग सेवा आहे. यात तुम्ही मोबाईल किंवा डिजीटल कॅमेऱ्याने काढलेले फोटो थेट पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करून मिळतात. उदा. रमेशने जर कविताच्या मार्कलिस्टचा मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढला असता आणि तो कीपइटवर अपलोड केला असता तर कविताला थेट तिच्या मार्कलिस्टची पीडीएफ कॉपी मिळाली असती. बऱ्याचवेळा आपण काही महत्त्वाच्या नोट्स लिहून घेतो आणि नंतर नेमके तेच पान आपल्याला सापडत नाही.
कीपइट असे काम करते...


एखाद्या सेमिनारला गेल्यावर व्हाईटबोर्डवर लिहिलेली माहिती पटापट उतरवून घेण्याच्या नादात वक्ता समजावून देत असलेला मुद्दा सुटतो आणि पुढे कसलाच संदर्भ लागत नाही. अशावेळी तुम्ही व्हाईटबोर्डचा फोटो काढला आणि तो कीपइटला मेल केला की काही सेकंदात त्याची पीडीएफ फाईल तुम्हाला मिळते. नोट्सच्या बाबतीतही हेच करता येईल. फोटो काढायचा आणि कीपइटला पाठवायचा. यात तुम्ही कलर आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट अशा दोन पयर्यायांत फाईल मागवू शकता. पीडीएफ झालेल्या फाईल्स इतरांना मेल किंवा फॅक्सही करता येतात.

मूळ कॉपी कीपइट कॉपी

कीपइटप्रमाणेच स्कॅनर नावाचीही एक सेवा उपलब्ध आहे. मात्र, स्कॅनरसाठी किमान 2 मेगापिक्सेल कॅमेऱ्यातून काढलेले फोटो लागतात. कीपइटमध्ये 1.3 मेगापिक्सेल कॅमेऱ्यातून काढलेले फोटोही चालतात.
Read the full story

चटपटीत मोबाईल ‘चॅट’


काही वेळा आपल्याजवळ लॅपटॉप नसतो. आपण कुठेतरी प्रवासात असतो. नेमक्या अशावेळी आपल्याला जर्मनीतल्या क्लाएंटचा मेसेज येतो. प्लीज कम अॉन जी-टॉक इमिजिएटली. धिस इज समथिंग अर्जंट. आता झाली का पंचाईत. ना धड कॉल करता येत, ना धड एसएमएस करता येत. आता काय करणार?
यावर एक उपाय आहे. तुमच्या मोबाईलवर जीपीअारएस अॅक्टीव्ह असेल तर तुम्ही थेट मोबाईलवरून चॅट करू शकता. मोबाईल आयएमसाठी (इन्स्टा मेसेंजर) कोणताही खर्च नाही. तुमच्या जीपीआरएस प्लॅनप्रमाणे डाटा ट्रान्स्फरचे पैसे मोजावे लागतील. अनलिमिटेड सर्फिंग असेल तर काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही.


मोबाईल अायएम सेवेसाठी अनेक पयर्याय उपलब्ध आहेत. त्यातील एक म्हणजे इको. हे एक फ्री अॅप्लीकेशन आहे. इको डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करून तुमचा मोबाईल नंबर दिलात की काही क्षणांत तुम्हाला पासवर्डचा एसएमएस येतो. त्यानंतर तुम्ही मोबाईलवरूनच इको डाऊनलोड करू शकता किंवा लॅपटॉप अथवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करून मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता. त्यानंतर ते अॅप्लीकेशन मोबाईलवर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन दरम्यान एसएमएसवर आलेला पासवर्ड एंटर करावा लागतो. त्यामुळे तो कुठेतरी लिहून ठेवावा. आता यानंतर तुम्ही आयएमच्या टॅबवर जाऊन अॉप्शन्सवर क्लिक करा व अॅड अायएम असे म्हणा. इकोचे हे अॅप्लीकेशन जी-टॉक, एमएसएन, आयसीक्यू, याहू, जॅबर आदी सर्व आयआम सेवांना सपोर्ट करते. तुम्ही निवडलेल्या आयएम सेवेचे यूजरनेम आणि पासवर्ड दिले की तुम्ही लॉग-इन होता. आता तुम्ही बिंधास्त चॅट करू शकता. कुठेही आणि कधीही. इकोचा वापर करून स्वस्त दरांत (?) परदेशात कॉल आणि एसएमएसही करता येतात.
तुम्हाला आणखी काही मोबाईल आयएम अॅप्लीकेशन्स माहित असतील तर त्यासंदर्भात कॉमेंट बॉक्समध्ये माहिती द्या. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या इतर वाचकांना त्याचा फायदा होईल.
Read the full story

,

सर्च विथ ‘एक्स्पीरियंस’

June 20, 2008 1 comments

सिमॅंटिक सर्च इंजिननंतर काल मी व्हिज्युअल सर्च इंजिनसंदर्भात अधिक माहिती गोळा करत होतो. यापूर्वी साधी-सोपी टेक्नॉलॉजीमध्ये मी क्विन्टुरा या व्हिज्युअल सर्च इंजिनसंदर्भात माहिती दिली होती. क्विन्टुरतफर्फे मुलांसाठी क्विन्टुरा किड्स नावाने विशेष सेवा दिली जाते. सध्या अाणखी एक सेवा जोरात चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात सोमवारी (९ जून) जेव्हा स्टीव्ह जॉब्जने आयफोन थ्रीजीची घोषणा केली त्याच दिवशी डलासस्थित व्ह्यूझी नावाच्या एका कंपनीने आपले नवे व्हिज्युअल सर्च इंजिन (बीटा) लोकांसाठी खुले केले.आयफोनचे वैशिष्ट्य म्हणजे आयफोनने लोकांना मोबाईलची एक नवी अनुभूती दिली. नवा एक्स्पीरियंस दिला. व्ह्यूझीचे निर्माते स्वतःला सर्च इंजिनमधील आयफोन म्हणवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार गुगल किंवा याहूचे रिझल्ट्स प्लेन टेक्स्ट फॉरमॅटमध्ये डिस्प्ले होतात. त्याएेवजी लोकांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले तर सर्च एक्स्पीरियंस देता येईल. त्यादृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. व्ह्यूझी वापरून पाहिल्यास तुम्हाला याची प्रचिती येईल.


सध्या व्ह्यूझीमध्ये खालील पयर्याय उपलब्ध आहेत -

Simple Text View: यात इतर सर्च इंजिनप्रमाणे रेग्युलर टेक्स्ट फॉरमॅटमध्ये रिझल्ट्स डिस्प्ले होतात.
4 Sources Viewः यात गुगल, याहू, आस्क आणि एमएसएन या चारही सर्च इंजिनमधून रिझल्ट्स एकत्रित करून डिस्प्ले केले जाता. यात कलर कोडिंगचा वापर केला आहे.
Basic Photo Viewः यात दिलेल्या सर्च स्ट्रिंगसाठी रेग्युलर इमेज रिझल्ट्स दाखवले जातात.
3D Photo cloudः यात तेच रिझल्ट्स थ्रीडीमध्ये दिसतात. हा एक्स्पीरियंस खूप छान वाटतो.
Celebrity Photo Viewः सेलेब्रिटीजचे विविध फोटो सर्च करण्यासाठी हा व्ह्यू उत्तम आहे.
Album Viewः म्युझिक, फिल्म अल्बम शोधण्यासाठी उत्तम.
Web Screenshot Viewः रेग्युलर सर्चमध्ये येणाऱ्या साईट्सचे थेट स्क्रीनशॉट दिसतात.
Video X3 Viewः सर्च स्ट्रिंगसंदर्भातील सर्व व्हिडिओ रिझल्ट्स. हे व्हिडिओ थेट ब्राऊजरमध्ये पाहता येऊ शकतात.
Everyday shopping Viewः अॅमेझॉन, ई-बे, टारगेट आणि वॉलमार्ट या साईटमधील एकत्रित रिझल्ट्स पाहता येतात. म्हणजे तुम्हाला आयफोनच्या किमती पाहायच्या असतील तर आयफोन असा सर्च देऊन एव्हरीडे शॉपिंग व्ह्यू सिलेक्ट करा. चारही शॉपिंग साईटवरील निकाल एकत्रित पाहावयास मिळतील.
Recipe Viewः एव्हरीडे शॉपिंगप्रमाणेच चार रेसिपी साईट्समधील रिझल्ट्स एकत्रित पाहायला मिळतील.
The Weather Viewः एखाद्या शहरातील हवामान पाहण्यासाठी वेदर व्ह्यू सिलेक्ट करा.
Amazon Book Viewः सर्च केलेल्या कीवर्डसंदर्भात जी पुस्तके अाहेत त्यांची अॅमेझॉनवरील सर्व माहिती पाहायला मिळते.
TechCrunch Viewः टेकक्रंच या साईटवर दिलेल्या विषयासंदर्भात जे काही लिहिले असेल ते एकत्रित पाहायला मिळते.
MP3 Search Viewः व्ह्यूझीतील मोस्ट पॉप्युलर फीचर. यात तुम्ही अल्बम आणि आर्टिस्टचे नाव टाकल्यास गाण्यांची यादी डिस्प्ले होते. आणि ती गाणी थेट ब्राऊजरमधूनच प्ले करता येतात. म्हणजे ते गाणं तुम्हाला डाऊनलोड करण्याचीही गरज नाही. एमपीथ्री सर्च व्ह्यू हा एक सुंदर एक्स्पीरियंस आहे.
Read the full story

,

हाकियाची हाक...


गुगलशिवाय आपला दिवस सरत नाही. दिवसाला किमान पन्नास-शंभरवेळा आपण गुगल सर्चचा वापर करतो. शिवाय जी-मेल, जी-टॉक, अॉरकुट, ब्लॉगर हेही तेवढेच जवळचे. तोंडी लावायला गुगल डॉक्स, गुगल मॅप्स, गुगल अर्थ हे आहेतच. कधी असा प्रश्न पडतो की गुगल नसते तर काय झालं असतं? काहीही झालं नसतं. गुगलची जागा दुसऱ्याने घेतली असती. जी-मेल आल्यावर आपण कसं याहू, हॉटमेल, रेडीफसोडून पळालो, तसं आणखी एखादं सर्च इंजिन आलं की आपण गुगल सोडून तिकडं वळू. तुम्हाला वाटेल, कालपर्यंत हा बरा होता...आज अचानक काय झालं. मला काहीही झालेलं नाही. खरं तर गुगलच्या साम्राज्याला धक्का देणं अवघड आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही. आता हेच पाहा ना - हाकिया नावाच्या एका नव्या सर्च इंजिननं आताच गुगलला विचार करायला भाग पाडलंय.हो...न्यूयॉर्कमध्येच अस्तित्त्वात आलेल्या हाकियानं सिमॅंटिक (अर्थात मोस्ट लॉजिकल) सर्च रिझल्ट्स ची पद्धत अवलंबिल्यानं गुगलच्या अरिथमॅटिक सर्च पद्धतीला एका अर्थाने आव्हान दिल्यासारखंच आहे. एखाद्या प्रश्नावर आपण अचूक आणि तर्कशुद्ध उत्तराची अपेक्षा ठेवतो. एखाद्याने चटकन अचूक आणि योग्य उत्तर दिलं तर आपण प्रभावित होतो. याऊलट एखाद्याने तेच उत्तर देण्यासाठी आपली पाच-सात मिनिटे घेतली आणि पाल्हाळ लावत उत्तर दिलं तर साहजिकच आपण तितकेसे प्रभावित होत नाही. हाकियाच्या आणि सध्याच्या प्रचलित सर्च इंजिन्सच्या तंत्रज्ञानात नेमका हाच फरक आहे. उदा. हाकिया डॉट कॉमवर जाऊन आपण What is the population of Germany? असा सर्च दिल्यास आपल्यास सर्वांत आधी जर्मनीची ताजी लोकसंख्या पाहावयास मिळते. शेजारी जर्मनीचा ध्वजही पाहावयास मिळतो.

Search string: What is the population of Germany?

हाकियावरील रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गुगलवरील रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याहूवरील रिझल्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तुमच्या प्रश्नाशी सुसंगत असे रिझल्ट्स विविध कॅटेगरीत मांडले जातात. उदा. इमेज सर्च, कंट्री प्रोफाईल, गव्हर्न्मेंट अॅण्ड पॉलिटिक्स, एम्बासीज, हिस्टरी, कल्चर वगैरे. गुगलमध्ये तुम्ही हाच सर्च दिल्यास अचूक रिझल्ट्स मिळतात, पण त्यातून हवी ती माहिती काढण्यास आपल्याला अधिक कष्ट पडतात. हाकिया तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे जाणून तसेच रिझल्ट्स दाखवते. हाकियाचे रिझल्ट्स गुगल किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनपेक्षा अधिक दर्जेदार अाहेत, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. तुम्ही हाकिया आणि इतर सर्च इंजिनची तुलना करून पाहिल्यास तुम्हालाही तेच जाणवेल. याशिवाय हाकियामध्ये तुमच्यासारखीच माहिती शोधणाऱ्यांशी तुम्ही संपर्कही साधू शकता. हाकिया क्लब ही नावीन्यपूर्ण संकल्पनाही यात आहे. त्यामुळेच मी सुरवातीस म्हटलंय, की गुगलच्या साम्राज्याला तडा देणं अशक्य नाही. आता उद्या गुगलने हाकियाच विकत घेतलं तर वेगळी गोष्ट. कारण गुगलसाठी हे अशक्य मुळीच नाही!
हाकियाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

या ‘िंवडो’खाली दडलंय काय?

June 19, 2008 2 comments

एखादा चर्चेत असलेला किंवा वादात अडकलेला ब्लॉग किंवा एखाद्या साईटने आपल्याच बॉसवर किंवा कंपनीवर केलेली टीका अॉफिसमध्ये बसून वाचायची म्हणजे भलते कष्ट घ्यावे लागतात. शेजारी कोणीतरी बसलेलं असतं किंवा मागून बॉस जाण्याची शक्यता असते. अशावेळी विंडोज लहान करून वाचण्याची रिस्क घ्यावी लागते किंवा शेजारून एखादी व्यक्ती गेली की लगेच दुसऱ्या विंडोत वर्ड ओपन करून आपण काम करतोय, असा दिखावा करावा लागतो. तरीदेखील पकडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण इतक्यात हार मानू नका. इंटरनेटच्या या युगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बॉसला गुंगारा देण्यासाठी एक अॉनलाईन सेवा तयार आहे.


वर्कफ्रेंडली डॉट नेट हे त्या सेवेचं नाव. काम करता-करता तुम्ही एखादी वादग्रस्त साईट किंवा एखादा वादग्रस्त ब्लॉग वाचू शकता. वर्कफ्रेंडलीच्या अॅड्रेस बारमध्ये तुम्हाला जी साईट वाचायची आहे त्याचा अॅड्रेस टाकला की मायक्रोसॉफ्ट वर्ड २००३ सारख्या भासणाऱ्या विंडोमध्ये ती साईट ओपन होते. या वर्डसारख्या भासणाऱ्या विंडोमध्ये साईटचा लेअाऊट मात्र डिस्टर्ब होतो. टेक्स्ट व्यवस्थित वाचता येते.

वर्कफ्रेंडलीचा वापर केल्यास साईट्स अशा वर्डसारख्या भासणाऱ्या विंडोमध्ये ओपन होतात.

गंमत म्हणजे, यातही पकडले जाऊ नये याची वर्कफ्रेंडलीच्या निमर्मात्याने पूर्ण काळजी घेतली आहे. या विंडोमध्ये सवर्वांत वर डाव्या बाजूस ‘बॉस की’ नावाच्या कंट्रोलवर क्लिक केल्यास विंडोमध्ये एक डमी वर्ड फाईल ओपन होते. त्यामुळे तुमच्याकडे पाहणाऱ्यास कसलीही शंका येत नाही.
Read the full story

रॅम एक्स्प्रेस


आजकाल सर्व डेस्कटॉप आणि लॅपटॉप किमान १ जीबी रॅमसह येतात. त्यामुळे कोणतेही हेवी प्रोग्राम्स रन करण्यास स्पीडची कसलीच अडचण येत नाही. पण ज्यांचे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जुने (जुने म्हणजे सहा महिन्यांपूर्वीचे) आहेत व ज्यांची रॅम २५६ किंवा ५१२ एमबी आहे, त्यांना हेवी प्रोग्राम रन करायचे म्हणजे पोटात गोळाच येत असेल. विंडोज व्हिस्टासाठी तुम्ही रेडीबूस्ट वापरून रॅम वाढवू शकतो. एक्सपी वापरणाऱ्यांनी काय करायचे असा प्रश्न येतो. त्यांच्यासाठी एक साधी-सोपी ट्रिक आहे.

तुमच्या स्लो झालेल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपला स्पीडबूस्ट देण्यासाठी पुढे दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो कराः
१. सर्वप्रथम नोटपॅड ओपन करून (नोटपॅड अॅक्सेसरीजमध्ये असते) त्यात MYSTRING=(80000000) असे टाईप करा (आठावर सात शून्य द्या).
२. ही फाईल तुमच्या डेस्कटॉपवर RAM.VBE या नावाने सेव्ह करा.
३. आता ज्यावेळी तुम्हाला प्रोसेसिंग स्पीड कमी झाल्यासारखी वाटेल त्यावेळी या फाईलवर डबलक्लिक करा. तुमच्या रॅमला आवश्यक तेवढा बूस्ट मिळेल.
ज्यांची रॅम १२८ एमबी आहे त्यांनी स्ट्रिंगमध्ये आठ एेवजी १६ लिहावे. ही ट्रिक व्हिस्टासाठीही कामास येते.
Thanks Paul
Read the full story

अस्खलित उच्चारासाठी...

Luis Miguel Arconada

Che Guevara

जरा उच्चार करण्याचा प्रयत्न करून बघा. असे दुसऱ्या भाषेतील किंवा इंग्लिशमधीलच फारसे न एेकलेले शब्द आले की उच्चार करण्यास कठीण जातात. त्यामुळे चारचौघांत बोलताना आपण असे कठीण शब्द वापरायचे सफाईने टाळतो. पण काही लोकांना हे शब्द टाळता येत नाहीत. उदा. टीव्हीवर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बातम्या देणाऱ्यास एखाद्या फुटबॉलपटूचे किंवा एखाद्या शहराचे नाव उच्चारावेच लागते. दरवेळी तुम्हाला त्या भाषेतील तज्ज्ञ व्यक्ती सापडेलंच असं नाही. मग काय करणार? यासाठी एक अॉनलाईन पर्याय उपलब्ध आहे. फोरवो!


फोरवो डॉट कॉम - तुमचा अॉनलाईन मार्गदर्शक. फोरवो हा विकिपेडियासारखा एक कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट आहे. यात सुमारे १८३ भाषांचा समावेश असून त्यातील शब्दांचे उच्चार थेट एेकता येतात. तुम्हाला एखाद्या शब्दाचा उच्चार एेकायचा असेल किंवा एखाद्या शब्दाचा उच्चार कसा आहे, हे विचारायचे असेल तर तुम्ही गेस्ट म्हणून विचारू शकता. पण तुम्हाला एखाद्या उच्चाराला रेट करायचे असेल किंवा त्याची एमपीथ्री फाईल डाऊनलोड करायची असेल तर या साईटवर रजिस्टर व्हावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हीदेखील तुमच्या भाषेतील शब्दांचे उच्चार रेकॉर्ड करून साईटवर ठेवू शकता. फोरवोवर मराठीचाही समावेश आहे. फोरवोवरील लिसन अॅण्ड लर्न सेक्शनमध्ये तुम्ही रोज अनेक नवे शब्द कसे उच्चारायचे हे शिकू शकता.

तुम्हाला केवळ इंग्लिश शब्दांचे उच्चार हवे असतील याहून अधिक सोपा पर्याय उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला फायरफॉक्स ब्राऊजर वापरावा लागेल. फायरफॉक्स ३.० नुकताच रिलीज झाला अाहे. त्याची वैशिष्ट्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा. फायरफॉक्ससाठी वेबस्टरने Pronounce 1.1 हे अॅड अॉन डेव्हलप केले असून ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ज्या शब्दाचा उच्चार एेकायचा आहे तो सिलेक्ट करून राईट-क्लिक करा व Pronounce म्हणा. त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला एेकायला मिळेल.
Pronounce 1.1 इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

शॉर्टकट टू शटडाऊन...

June 18, 2008 3 comments

विंडोज वापरणाऱ्यांना शॉर्टकट वापरण्याची फार सवय असते. शॉर्टकट टू डेस्कटॉप म्हणून आपण अनेक फंक्शन्स डेस्कटॉपवर साठवून ठेवत असतो. बऱ्याच जणांच्या डेस्कटॉपवर अशा अनेक आयकॉन्सची खिचडी झालेली असते. पण काहीही केलं तरं तुम्हाला शटडाऊन, रिस्टार्ट करण्यासाठी मात्र कोणताही शॉर्टकट नाही. पण...फिकर नॉट. यासाठीही एक ट्रिक आहे...


पुढे दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा.
१. डेस्कटॉपवर जाऊन राईट-क्लिक करा. त्यानंतर ‘न्यू’वर कर्सर नेऊन ‘शॉर्टकट’ सिलेक्ट करा.
२. आता
अ. शटडाऊनसाठीः Shutdown -s -t 0 (Shutdownनंतर स्पेस, -s नंतर स्पेस, -t नंतर स्पेस)
ब. रिस्टार्टसाठीः Shutdown -r -t 0
क. हायबरनेटसाठीः Shutdown -h -t 0
ड. लॉग-अॉफसाठीः Shutdown -l -t 0
असे टाईप करून 'नेक्स्ट'वर क्लिक करा.
३. त्यानंतर या शॉर्टकटसाठी एखादे नाव टाईप करा (उदा. क्विकशट) आणि फिनिशवर क्लिक करा.
४. या नव्या शॉर्टकटवर राईट-क्लिक करून तुम्ही त्याचा आयकॉनही चेंज करू शकता.

नवे आयकॉन्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

फायरफॉक्स ३.० - रिलीज्ड!


इंटरनेट एक्स्प्लोररपेक्षा ९.३ पटींनी आणि फायरफॉक्सपेक्षा सुमारे अडीच पटींनी जलद असणारे फायरफॉक्स ३.० हे ब्राऊजर आता लोकांसाठी उपलब्ध झाले आहे. अनेक अल्फा आणि बीटा टेस्ट्सनंतर मोझिलाने हे ब्राऊजर आता सर्वसामान्य ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत अनेक डेव्हलपर्स आणि सॉफ्टवेअर टेस्टर्स हे वापरत होते. फायरफॉक्स ३.० ची काही वैशिष्ट्येः

१. फायरफॉक्स २.० पेक्षा अधिक जलद
२. स्मार्ट लोकेशन बार - वेबसाईट यूआरएलसह पेज हेडिंगपण पाहायला मिळते
३. स्मार्ट बुकमार्क अॉर्गनायझर - शेकडो यूआरएल्स मॅनेज करण्यासाठीचा उत्तम मार्ग
४. सिस्टिम इन्टिग्रेटेड लूक्स - अॉपरेटिंग सिस्टिमनुसार डिफॉल्ट ब्राऊजर थीम बदलणार. म्हणजे एक्सपी, व्हिस्टा आणि मॅकसाठी वेगवेगळा लूक
५. अधिक सुरक्षितता - स्पॅम आणि फिशिंगपासून अधिक सुरक्षितता.

फायरफॉक्स ३.० डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

पाच मिनिटांत गुगल गॅजेट!

June 17, 2008 0 comments

ब्लॉग आणि वेबसाईट चालविणाऱ्यांना आरएसएस (रियली सिंपल सिंडिकेशन) म्हणजे काय हे वेगळे सांगायची गरज नाही. तुमच्या साईट किंवा ब्लॉगसाठी तुम्ही आरएसएस फीड जनरेट केला असेल तर (आरएसएस फीड जनरेट करण्यासाठी फीडबर्नर या साईटला भेट द्या) त्याच फीड यूआरएलपासून तुम्ही गुगल गॅजेटही तयार करू शकता.


आयगुगलवर जाऊन तुमच्या नावाने लॉग-इन झाल्यानंतर या लिंकवर किंवा अॅड स्टफवर क्लिक करा. येथे पहिल्या कॉलममध्ये सर्वांत खाली Ad Feed or Gadget असे लिहिले असेल. त्यावर क्लिक करून आलेल्या चौकटीत तुमच्या ब्लॉग अथवा साईटमधील एखाद्या सेक्शनच्या फीडसाठी मिळालेली यूआरएल सबमिट करा. तुमच्या ब्लॉग किंवा साईट सेक्शनमधील पहिल्या तीन पोस्ट्स आयगुगलवर पाहायला मिळतील. गॅजेटवर जाऊन तुम्हाला या सेटिंग्ज बदलता येतात. आता राहिला प्रश्न तो तुमचे गॅजेट गुगल गॅजेट डिरेक्टरीमध्ये कसे अॅड करायचे त्याचा? यासाठी तुमच्या साईटवर भरपूर व्हिजिटर्स येणे गरजेचे आहे. गुगलने यासंदर्भातील नियम स्पष्ट केले नसले तरी क्रिटिकल मास असणाऱ्या वेबसाईट्स आणि ब्लॉग्जचे फीड गुगल गॅजेट डिरेक्टरीत अॅड केले जातात.

साधी-सोपी टेक्नॉलॉजी आयगुगलवर अॅड करण्यासाठी खालील अायकॉनवर क्लिक करा
Add to Google

मराठी बातम्या तुमच्या आयगुगल होमपेजवर पाहण्यासाठी ई-सकाळचे गॅजेट उपलब्ध आहे. हे गॅजेट अॅड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

क््विक ब्राऊजिंगचा नवा मंत्र!

आपल्या आवडीच्या साईट्स अॅक्सेस करण्यासाठी आपण त्या बुकमार्क करून ठेवतो. पण तरीदेखील लॉग-इन झाल्यावर ब्राऊजर ओपन करा, बुकमार्कवर क्लिक करा आणि आपली साईट उघडा एवढ्या स्टेप्स कराव्याच लागतात. याहून वेगळा आणि सोपा पर्याय काही असू शकतो का? म्हणजे एखाद्या साईटचा आयकॉनंच डेस्कटॉपवर ठेवला तर? शक्य आहे का हे?


बबल्स या नव्या सेवेत हे करणे अगदी शक्य आहे. साईट स्पेसिफिक बबल्स अथर्थात एसएसबी म्हणजे साईटसाठी तयार केलेला डेस्कटॉप शॉर्टकटंच! उदा. तुम्ही नित्यनेमाने जी-मेल अॅक्सेस करता. त्यासाठी तुम्हाला रोज जी-मेल डॉट कॉमवर जावे लागत असणार. तिथे यूजरनेम, पासवर्ड दिल्यानंतर तुमचा इनबॉक्स लोड होणार. आता कल्पना करा, की तुमच्या डेस्कटॉपवरंच जी-मेलचा एक आयकॉन आहे. त्यावर क्लिक केलं की तुम्ही थेट इनबॉक्स करू शकाल. कसं काय वाटलं? मस्त ना? यालाच म्हणतात साईट स्पेसिफिक ब्राऊजर. बबल्समध्ये जी-मेल, याहू, विंडोज लाईव्ह मेल, फेसबुक, नेटव्हाईब्ज, झोहो, फ्लिकर आणि बेसकॅम्प आदी साईट्स थेट अॅक्सेस करता येतात. हे आयकॉन तुम्ही डेस्कटॉपवर किंवा सिस्टिम ट्रेमध्ये ठेवू शकता. विंडोज वापरणाऱ्यासांठी हे अॅप्लीकेशन तयार केलेले आहे.
बबल्सचा सेटअप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Read the full story

,

अचूक कॅल्क्युलेशन!

June 16, 2008 1 comments

काकाः तुमचं वय किती हो?
रमेशः ३१, म्हणजे ३१ पूर्ण...अजून पूर्ण झालेली नाहीत.
काकाः अहो, पण तुमचा जन्म एप्रिल ७६चा ना? मग तुम्ही तर ३२चे असला पाहिजे..
रमेशः हो, म्हणजे ३२चा होईल आता...२००८ ना...म्हणजे ७६ आणि दहा ८६ आणि दहा ९६ आणि दहा २००६ आणि २...म्हणजे ३२ लागेल आता...
काकाः मग तुम्ही ३१ काय म्हणताय?
रमेशः नाही...म्हणजे ३१ पूर्ण होतील...म्हणजे पूर्ण झाले...एप्रिलमध्ये...
काकाः तसं सांगा ना मग...तुमचं आजचं वय ३२ वर्षे, १ महिना आणि १९ दिवस. दिवसांत सांगायचं तर ११७३७ दिवस आणि तासांत सांगायचं तर दोन लाख ८१ हजार ६८८ तास, आणि मिनिटांत सांगू का?
रमेशः नको...नको...पुरे...
काकांनी रमेशची पुरती विकेट काढली होती. वय विचारलं की आपण कायम काहीतरी घोळ घालतो. कधी चुकून किंवा कधी जाणून-बुजून. मानवी स्वभावंच आहे तो. असो. पण तुम्हाला आश्चर्य वाटले की काकांनी रमेशचं एवढं अचूक वय कसं कॅल्क्युलेट केलं?


एज कॅल्क्युलेटर हे ईझीकॅल्क्युलेशन डॉट कॉमवर असणाऱ्या असंख्य कॅल्क्युलेटरपैकी एक आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक कॅल्क्युलेटरसह विद्यार्थी, शिक्षक, इंजिनीअर्स यांना कायम लागणारी अनेक सायंटिफीक कॅल्क्युलेटर्सदेखील यात तुम्हाला आढळतील. याशिवाय फॅट कॅल्क्युलेटर, बॉडी-मास रेश्यो कॅल्क्युलेटर, लोन-रिपेमेंट, सेव्हींग्ज, वेदर, कलर आणि गमतीशील लव्ह कॅल्क्युलेटरही यात आहे. बुकमार्क म्हणून सेव्ह करण्यासारखी ही साईट आहे.
Read the full story

,

अॉरकुटवरून व्हा अदृश्य!

June 15, 2008 1 comments

रविवारी सगळ्यांचा मूड जरा वेगळाच असतो. रविवारी नेटवर लॉग-ईन होणारे एक तर टाईमपास करण्यासाठी येतात किंवा अगदीच करमत नाही म्हणून येतात. त्यामुळे आज मीही एक टाईमपास ट्रिकच सांगणार आहे. कृपया ही ट्रिक केवळ गंमत म्हणूनच वापरा.
अॉरकुटवर आपले प्रोफाईल तयार करताना काही फील्ड्स हे आवश्यक या कॅटेगरीत मोडणारे असतात. (उदा. नेम, जेंडर वगैरे). ते न भरता आपण प्रोफाईल सेव्ह करू शकत नाही. सर्वच जण प्रोफाईलमध्ये खरं नाव डिस्प्ले करतात असं नाही. पण त्या फील्डमध्ये काहीतरी लिहावेच लागते. त्याशिवाय पर्याय नाही. कल्पना करा, की एक दिवस आपण अॉरकुटवरून अदृश्य झालो तर?

तुम्ही म्हणाल, असं कसं शक्य आहे? पण हे शक्य आहे. पुढे दिसेल्या रिकाम्या चौकटीत कर्सर ठेवा. तो त्यात ब्लिंक होणार नाही. काळजी करू नका.चौकटीत कर्सर ठेवल्यानंतर कंट्रोल सी (कॉपी) करा. आता तुमच्या अॉरकुट प्रोफाईलवर जाऊन एडिटवर क्लिक करा. तेथे तुमच्या नावासमोरील फील्डवर जा. त्यात जे काही लिहिले असेल ते डिलीट करा आणि कंट्रोल व्ही (पेस्ट) करा. हीच प्रक्रिया तुम्ही लास्ट नेमसाठीही करू शकता. आता प्रोफाईल अपडेट करा. झालात तुम्ही अदृश्य!
पण लक्षात ठेवा...हा प्रयोग केवळ गंमत म्हणून करा.
Thanks Sahil
Read the full story

,

मस्ट हॅव!

June 14, 2008 3 comments

तुम्ही जर विंडोज अॉपरेटिंग सिस्टीम (९८ आणि त्यापुढील) वापरत असाल तर खालील तीन अॅप्लीकेशन्स तुमच्यासाठी मस्ट आहेत.

ट्वीक यूआयः विंडोजचा तोच-तो लूक पाहून तुम्ही कंटाळला असाल, तर ट्वीक यूआय इन्स्टॉल करा. ट्वीक यूआयच्या माध्यमातून तुम्ही विंडोजमधील अनेक हिडन टूल्स वापरू शकाल. विंडोजचे लूक अॅंड फील बदलण्यासाठी याचा फायदा होईल.
ट्वीक यूआय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

मदरबोर्ड मॉनिटरः डेस्कटॉप किंवा लॅपटॉपचा मदरबोर्ड म्हणजे त्याचे जीवन. त्यामुळे मदरबोर्डची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तो जास्त तापू नये म्हणून फॅन दिलेला असतो, तरीही भारतात अनेक लोक एअरकंडिशन्ड वातावरणात डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरत नसल्याने त्यावर ताण येतो. आपला मदरबोर्ड किती तापला आहे, प्रोसेसरची कंडिशन काय आहे, फॅन कसा आहे वगैरे गोष्टींची माहिती घेण्यासाठी मदरबोर्ड मॉनिटर अत्यंत उपयुक्त ठरते. ज्यांनी पीसी असेंबल करून घेतला असेल, त्यांच्यासाठी हे अॅप्लीकेशन अत्यावश्यक आहेत.
मदरबोर्ड मॉनिटर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सीसीक्लीनरः आजकाल आपण सतत इंटरनेटवरून काहीतरी डाऊनलोड करत असतो. वेगवेगळे प्रोग्राम्स रन करण्यासाठी लागणारे शेकडो प्लग-इन्स आपोआप इन्स्टॉल होत असतात. विविध फाईल एक्स्टेन्शन्स टेम्पररी इंटरनेट फाईल्समध्ये साचून बसलेले असतात. पण केवळ बाऊजर कॅश डिलीट करून आपला पीसी साफ होतो, असं नाही. अनेक प्रोग्राम्समध्येही (उदा. अॅडोबचे सर्व प्रोग्राम्स) कॅश आणि अनयूज्ड फाईल्स असतात. हा सर्व कचरा साफ करून पीसीची प्रोसेसिंग स्पीड वाढविण्यासाठी सीसीक्लीनर आवश्यक आहे.
विंडोज एक्सपी आणि व्हिस्टासाठी सीसीक्लीनर येथून डाऊनलोड करा.

Read the full story

‘दमदार’ फाईल कन्व्हर्टर!

‘ब्लॉगर ओन्ली अॅक्सेप्ट्स jpg, gif, bmp and png इमेजेस,’ असा मेसेज आल्यानंतर शैलेशचा मूडच गेला. गेल्या तासाभरापासून मेहनत करून लिहिलेल्या ब्लॉगपोस्टसाठी त्याने शोधलेली इमेज नेमकी tiff एक्स्टेन्शनची होती. आता काय करणार? बरं त्याच्याकडे फोटोशॉप सारखं प्रोफेशनल सॉफ्टवेअर पण नव्हतं. आता काय करणार?

रमेशला अर्जंट एक डॉक्युमेंट पाठवायचं होतं आणि त्याने वापरलेले फॉन्ट्स ज्याला पाठवायचं होतं त्याच्या लॅपटॉपवर नव्हते. त्यामुळे त्याला ते पीडीएफ करून पाठवावं लागणार होतं. त्याच्याकडेही अॅक्रोबॅट सारखं प्रोफेशनल सॉफ्टवेअर नव्हतं. आता काय करणार?


शैलेश आणि रमेशच्या अडचणींवर एक उत्तर आहे - आणि हे असं उत्तर आहे जे तुमच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी उपयोगाला येणार आहे. त्याचं नाव आहे, झमझार.


झमझार म्हणजे फाईल कन्व्हर्जन फॅक्टरीच आहे. यात तुम्ही कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्स, इमेजेस, अॉडिओ, व्हिडीओ फाईल्स त्यांच्या विविध एक्स्टेंशनमध्ये कन्व्हर्ट करू शकता. उदा. .doc to .html, .pdf, .png, .txt किंवा .jpg to .bmp, .tiff, .pcx, .ico वगैरे. कोणते फाईल फॉरमॅट्स तुम्ही कशाकशांत कन्व्हर्ट करू शकता याची संपूर्ण यादी येथे पाहायला मिळेल. झमझार ही अॉनलाईन सेवा आहे. मोफत सेवा वापरण्यासाठी तुम्हाला रजिस्टर होण्याचीदेखील गरज नाही. तुम्हाला जी फाईल कन्व्हर्ट करायची आहे ती सिलेक्ट करायची, त्यानंतर ती फाईल ज्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करायची आहे तो फॉरमॅट सिलेक्ट करायचा आणि तुमचा ई-मेल आयडी सबमिट करायचा. कन्व्हर्ट केलेल्या फाईलची लिंक काही मिनिटांत तुमच्या ई-मेलवर पाठविली जाते. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही ती फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता. अॅज सिंपल अॅज दॅट!
झमझारच्या पेड व्हर्जन्समध्ये तुम्हाला काही जीबींपर्यंतचे अॉनलाईन स्टोरेजही मिळते. शिवाय इतर अनेक सुविधाही त्यात मिळतात. तेव्हा शैलेश आणि रमेशसारखे तुम्हीही कधी अडचणीत सापडलात तर आता तुमच्याकडे दमदार उत्तर आहे - झमझार!
Read the full story

,

झटपट डाऊनलोड

June 13, 2008 55 comments

यूट्यूबवरील एखादा व्हिडीओ तुम्हाला आवडला तर तो डाऊनलोड करण्यासाठी भले कष्ट उपसावे लागतात. म्हणजे त्या व्हिडीओची लिंक कॉपी करा, ती एखाद्या व्हिडीओ डाऊनलोडिंग साईटवर पेस्ट करा (उदा. कीपव्हिड डॉट कॉम), त्यानंतर गेट व्हिडीओवर क्लिक करा, मग कन्व्हर्ट झालेली फाईल डाऊनलोड करा. एवढं सगळं करण्यापेक्षा यूट्यूबवरूनच व्हिडीओ थेट डाऊनलोड करता आले तर?


कॉपीराईट्सच्या कारणाने यूट्यूबवर व्हिडीओ डाऊनलोडिंगची सुविधा उपलब्ध नसली तरी जगात वेब डेव्हलपर्सची संख्या कमी नाहीये. एक्स्ट्रॅक्ट यूट्यूब डॉट कॉम ही साईट पाहिल्यास तुम्हाला याची प्रचिती येईल. एक्स्ट्रॅक्ट यूट्यूब म्हणजे यूट्यूबची प्रतिकृती. तुम्हाला हव्या असलेल्या व्हिडीअोचा सर्च दिला की संबंधित व्हिडीओ डिस्प्ले होतील. ते तुम्ही थेट डाऊनलोड करू शकता. एखाद्या व्हिडीओची लिंक तुम्हाला माहित असेल तर लिंक देऊनही व्हिडीओ डाऊनलोड करता येईल. व्हिडीओ सेव्ह करताना फक्त डॉट एफएलव्ही (.FLV) एक्स्टेंशनने सेव्ह करा. हा व्हिडीओ व्हीएलसी प्लेयरचा वापर करून पाहता येईल. (व्हीएलसी प्लेयर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read the full story

,

फॉरवर्डिंग इज नाईस!

The best environment day slogan...

'Save Earth, this is the only planet with girls ! ':-)


असे अनेक एसएमएस तुम्हाला रोज येत असतील. बऱ्याच जणांना फॉरवर्डेड मेल्स आणि फॉरवर्डेड एसएमएस अजिबात आवडत नाहीत (मलासुद्धा). पण माझ्यासारखे लोक मोबाईल ग्राहकांमध्ये आणि ई-मेलधारकांमध्ये मायनॉरिटीत गणले जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझा एक मित्र रात्री दोन वाजता शेवटचा एसएमएस फॉरवर्ड करून झोपायचा आणि सकाळी फॉरवर्ड मेसेजच्या बीपने उठायचा. ई-मेल आणि एसएमएस फॉरवर्ड ही अहोरात्र चालणारी एक प्रक्रिया असून ती थांबविणे अशक्य आहे, असा निष्कर्ष यावरून काढण्यास काहीही हरकत नाही. असो. आता तुम्ही म्हणाल, एवढी प्रस्तावना कशासाठी? त्याचे उत्तर सोपे आहे. भारतीय तरुणांची मानसिकता लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या एका साईटबद्दल आज मी माहिती देणार आहे.


वाकाऊ (www.vakow.com) ही ती साईट. तुम्हाला आवडलेले एसएमएस तुम्ही तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करता. वाकाऊने हात धागा पकडून या साईटची निर्मिती केली आहे. आता हाच एसएमएस तुम्ही इंटरनेटवरील हजारो मित्रांनाही फॉरवर्ड करू शकता. वाकाऊवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून वाकाऊवर एसएमएस पाठवू शकता किंवा थेट वाकाऊतील इंटरफेसचा वापर करून तिथेच एसएमएस टाईप करू शकता. तुम्ही पोस्ट केलेले एसएमएस म्हणजे तुमचा एसएमएस ब्लॉग. हे एसएमएस वाचून वाकाऊचे इतर सदस्य त्यांच्या मित्रांना ते मोबाईलवर किंवा ई-मेलवर फॉरवर्ड करू शकतील-अगदी मोफत! वाकाऊतील एखाद्या मित्राला तुम्ही फॉलो करत असाल तर त्याने पोस्ट केलेले एसएमएस तुम्हाला थेट मोबाईलवरही मिळू शकतील. वाकाऊतील एखादा टॅगही (उदा. संता-बंता, गुडमॉर्निंग) तुम्ही फॉलो करू शकता. वाकाऊवरून तुम्ही तुमच्या मित्रांना मोफत पर्सनल एसएमएसही पाठवू शकता. वाकाऊने नुकतेच अॅड केलेले एक फीचर म्हणजे वाकाऊवरील एसएमएस तुम्ही एखाद्या मित्राच्या अॉरकुट अकाऊंटवर स्क्रॅप म्हणूनही पोस्ट करू शकता. वाकाऊचे फेसबुक अॅप्लीकेशनही उपलब्ध आहे. ही सेवा सध्या फक्त भारतापुरती मर्यादित असून, ती लवकरच इतर देशांतही सुरू होण्याची शक्यता आहे.
Read the full story

,

शॉर्ट अॅण्ड स्वीट!

June 12, 2008 0 comments

रमेशः हॅलो, अरे ही साईट बघ ना जरा...
सतीशः कोणती रे?
रमेशः टाईप करः एचटीटीपी कोलन स्लॅश स्लॅश आयडीएम -
सतीशः एन का एम?
रमेशः एम - एम - एम फॉर मुंबई
एचटीटीपी कोलन स्लॅश स्लॅश आयडीएमएल डॉट कॉम स्लॅश सवर्व्हीसेस स्लॅश सपोर्ट
सतीशः एक मिनिट - सवर्व्हीस का सवर्व्हीसेस?
रमेशः सवर्व्हीसेस - सवर्व्हीसेस - एस
रमेशः हं...कुठपर्यंत आलो होतो मी? सपोर्ट स्लॅश मॅकओएसएक्स स्लॅश एफटीपीयूजरक्रिएट डॉट एचटीएमएल

एवढं सांगूनही सतीशकडे लिंक अोपन झालीच नाही.
एखादा स्मार्ट नेट यूजर असता तर त्याने हिच लिंक अशी सांगितली असती -

एचटीटीपी कोलन स्लॅश स्लॅश एस (फॉर सतीश) सेव्हन (आकड्यात) वाय डॉट यूएस स्लॅश नाईन हंड्रेड (आकड्यात)
तुम्ही म्हणाल हे काय सोपं आहे...टायनीयूआरएल वापरून मोठ्या लिंक्स छोट्या करता येतात. पण नव्याने सुरू झालेल्या अनेक सेवांच्या तुलनेत टायनीयूआरएल मागे पडले आहे. अगदी नव्याने सुरू झालेल्या दोन सेवांसोबत मी टायनीयूआरएलची तुलना करून पाहिली.
वर उल्लेख केलेलीच लिंक मी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निकाल असाः

मूळ यूआरएलः http://www.ldml.com/services/support/macosx/ftpUserCreate.html - ६२ कॅरेक्टर्स
टायनीयूआरलचा वापर करून शॉर्ट केलेली यूआरएलः http://tinyurl.com/37uado - २५ कॅरेक्टर्स
फ्यूजयूआरएलचा वापर करून शॉर्ट केलेली यूआरएलः http://fuseurl.com/d8 - २१ कॅरेक्टर्स
श्रिंकिफायचा वापर करून शॉर्ट केलेली यूआरएलः http://s7y.us/900 - १७ कॅरेक्टर्स

विजेता तुमच्यासमोर आहे. नव्याने सुरू झालेल्या श्रिंकिफाय या सेवेचा वापर करून आपल्याला दिलेल्या मोठ्या यूआरएलचे शॉर्ट आणि शॉर्टर व्हर्जन्स मिळतात. शिवाय श्रिंकिफाय हे फायरफॉक्सचे एक्स्टेंशन म्हणून वापरता येते. त्यामुळे दरवेळी श्रिंकिफायच्या साईटवर जाऊन यूआरएल शॉर्ट करण्याची गरज भासत नाही. मॅक वापरणाऱ्यासांठी या डॅशबोर्ड विजेट आणि आयगुगल वापरणाऱ्यासाठी आयगुगल गॅजेटही उपलब्ध आहे.
मोस्ट पॉप्युलर आणि जस्ट लॉंच्ड अशा सेवांची तुलना मी यात केली आहे. तथापि, तुम्हाला अजूनही काही अॉप्शन्स हवे असतील तर इथे भेट द्या. यावर अशाच प्रकारच्या नव्वदहून अधिक सेवांची माहिती दिलेली आहे. एंजॉय!
Read the full story

आज पाहा...उद्या वाचा


तुम्ही गुगल किंवा याहूवर काहीतरी शोधताय आणि जे हवं आहे त्याएेवजी दुसरंच काही तरी सापडतंय, असं अनेक वेळा होतं. हे दुसरं काहीतरी कितीही महत्त्वाचं असलं तरी ते त्या वेळी आपल्याला उपयोगाचं नसतं. त्यामुळे साहजिक आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते अॅड टू बुकमार्क करून ठेवतो. नंतर ज्यावेळी आपल्याला ते दुसरं काहीतरी हवं असतं तेव्हा आपण काहीतरी वाचलं होतं आणि ते अमुक एका साईटवर होतं एवढंच आठवतं. ते बुकमार्क करून ठेवल्याचंही आठवतं - पण अॉफिसमध्ये. आणि आता आपण नेमकं घरी असतो. श्या...आता काय करणार?
अशावेळी कामाला येतात त्या सोशल बुकमार्किंग सेवा. म्हणजे आपण इंटरनेटवर जे पाहतो, वाचतो ते अॉनलाईन बुकमार्क करून ठेवायचं आणि त्याचवेळी ते इतरांशीही शेअर करायचं. सोशल बुकमार्किंग म्हटलं की डेलिशियस आणि डिग या दोन सेवांची नावं प्रामुख्यानं समोर येतात. तुम्ही अद्याप या सेवा वापरल्या नसतील तर वापरून पाहा. अशीच, पण सोशल नेटवर्किंग नसलेली एक सेवा नुकतीच सुरू झाली आहे - लॅटर-धिस. या सेवेची बहुतांश फीचर्स इतर बुकमार्किंग सेवांप्रमाणेच असली तरी याचा इंटरफेस इतरांच्या तुलनेत अत्यंत साधा आणि अॉपरेट करण्यास सोपा आहे. लॅटरधिसवर अकाऊंट अोपन केल्यानंतर लॅटरधिस नावाचे बुकमार्कलेट इंटरनेट एक्स्प्लोरर, सफारी किंवा फायरफॉक्समध्ये सेव्ह करायचे. तुम्ही समजा एखादी वेबसाईट पाहत आहात आणि तुम्हाला ती पूर्ण वाचण्यासाठी आता वेळ नाहीये. तुमच्या बुकमार्कवर जाऊन लॅटरधिसवर क्लिक करा. तुम्ही थेट तुमच्या लॅटरधिस अकाऊंटवर जाल. त्यात संबंधिक वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट आलेला असेल. त्याशेजारी त्या वेबसाईटचे नाव डिस्प्ले होईल. तिथे तुम्ही तुमच्या कॉमेंट्सही लिहू शकता. सेव्ह लिंक म्हटल्यावर तुम्ही पुन्ही संबंधित वेबसाईटवर याल. अशा कितीही लिंक्स तुम्ही लॅटरधिसवर सेव्ह करून ठेवू शकता. याच लिंक तुम्ही डेलिशियसवर शेअरही करू शकता. तुमच्या अकाऊंटवर लॉग-इन झाल्यास त्यारखेनुसार सेव्ह केलेल्या लिंक्स दिसतील.
लॅटरधिससारख्याच आणखी काही सेवाः मेन्टो आणि नेटरॉकेट
Read the full story

एक खिडकी योजना


तुम्हाला नेटव्हाईब्ज किंवा पेजफ्लेक्स माहित आहे का? नाही? आयगुगल तरी माहित आहे का? या सगळ्या सेवा पर्सनलाईझ्ड होम पेज या गटात मोडतात. तुमचे फेव्हरेट विजेट्स, गॅजेट्स, सोशल नेटवर्किंग साईट्स, मेल बॉक्सेस आदी सगळ्या गोष्टी एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यासाठी या सगळ्या सेवा वापरतात. तुम्ही त्या अद्याप ट्राय केल्या नसतील तर करून पाहा. या यादीत गेल्या आठवड्यात एक नवे नाव दाखल झाले आहे - पेजवन्स

पेजवन्स ही सेवा या सगळ्यांपेक्षा जरा वेगळी आहे. यातून तुम्ही विविध सेवांवरील तुमचे अकाऊंट थेट अॅक्सेस करू शकता. म्हणजे यातून तुम्ही जी-मेल, याहू, हॉटमेल, एओएलमेल आदी ई-मेल सेवांपासून फ्लिकर, मायस्पेस, हाय५, फ्रेंडस्टर, डिग, डेलिशियस आदी सोशल नेटवर्किंग सेवांवरील अकाऊंट्स सुरक्षितरित्या अॅक्सेस करू शकता. ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगसह अनेक ट्रॅव्हल, मोबाईल, मनोरंजन आणि अार्थिक सेवा पुरविणाऱ्या साईट्सवरील तुमची अकाऊंट्स तुम्ही पेजवन्सवरून अॅक्सेस करू शकता. यासाठी पेजवन्सने अनेक कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून इन्फॉर्मेशन शेअरिंगचे हक्क मिळविले आहेत. यात नोंद नसलेल्या अनेक सेवांचे हक्क मिळविण्यासाठीही पेजवन्सचे प्रयत्न सुरू आहेत.

पेजवन्सवर अकाऊंट ओपन केल्यानंतर तुम्ही त्यात तुमची विविध अकाऊंट्स अॅड करू शकता. अॅड अकाऊंट म्हणून सेवेचे नाव (उदा. जी-मेल) आणि यूजरनेम, पासवर्ड टाकल्यास तुमचे अकाऊंट थेट अॅक्सेस करता येईल. नवे मेल्स तुम्ही पेजवन्समधून पाहू शकात. असे अनेक अकाऊंट अॅड करत गेल्यास तुमच्या स्क्रीनवर विविध अकाऊंट्सची थोडक्यात माहिती देणारे बॉक्सेस दिसतील. शंभर विंडोज उघडून दोनशेवेळा यूजरनेम पासवर्ड्स एंटर करण्यापासून मुक्ती हवी असेल तर पेजवन्स वापरून पाहाच...

पासवर्ड मॅनेजरबद्दल वाचाः पासवर्ड फटीग

Read the full story

,

तुमच्याकडे आहे का म्युझिक लॉकर?

June 11, 2008 0 comments

आयपॉड सोबत असताना आपल्याला इतर गोष्टींची फारशी गरज भासत नाही. आपण आणि आपला आयपॉड. आयपॉड किंवा इतर एमपीथ्री प्लेयर्सही आजकाल अगदी ५१२ एमबीपासून ८० जीबीपर्यंतचे मिळतात. त्यामुळे यात कमी गाणी बसतात, वगैरे कारणांनाही जागा उरत नाही. आता प्रश्न येतो तो आपल्या आवडत्या गाण्यांचा. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला जी गाणी आवडतात ती आपल्या लॅपटॉपवरही असतात, अॉफिसमधल्या किंवा घरातल्या डेस्कटॉपवरही असतात, आपल्या आयपॉडवरही असतात, गाडीतल्या सीडीतही असतात आणि त्यातलं अतिशय अावडतं एखादं गाणं आपल्या मोबाईलमध्येही असतं. अशाप्रकारे एकाच गाण्याच्या आपण चार-पाच कॉपीज करून ठेवतो आणि मौल्यवान मेमरी वाया घालवतो. तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहित असेल, की अशावेळी आपण आपली आवडती गाणी इंटरनेटवर साठवून ठेवू शकतो. ही गाणी अॉनलाईन एमपीथ्री प्लेयर्सच्या साह्याने एेकताही येतात. एवढंच नव्हे तर, इंटरनेटवरूनच आपण ही गाणी अॉनलाईन प्लेयरवर अपलोडही करू शकतो. म्हणजे गाण्याची फाईल तुमच्या डेस्कटॉपवर डाऊनलोड करण्याची गरजही उरत नाही. अशा अनेक सेवा आहेत. त्यातील एक सेवा म्हणजे

एमपीथ्रीट्यून्स डॉट कॉम. यातील लॉकर फॅसिलिटीचा वापर करून तुम्ही सुमारे २५ जीबी क्षमतेची गाणी अॉनलाईन स्टोअर करू शकता. ही गाणी तुम्ही कोणत्याही ब्राऊजरमधून एेकू शकता. त्यासाठी एखादे विशिष्ट प्लेयर असणेही बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या आयट्यून्समध्ये असलेली सर्व गाणी किंवा विशिष्ट प्लेलिस्ट्स एमपीथ्रीट्यून्ससोबत सिंक्रोनाईझ करू शकता.

त्यासाठी तुम्हाला याच साईटवरून लॉकरसिंक नावाचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. या सेवेतील मला सर्वाधिक आवडलेले फीचर म्हणजे वेबलोड. यातून तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेले एखादे गाणे थेट तुमच्या लॉकरमध्ये अपलोड करू शकता. यासाठी ते गाणं जिथे होस्ट केलेले आहे त्याची लिंक देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी एमपीथ्रीट्यून्सनेच इंटरनेट एक्सप्लोरर आणि फायरफॉक्ससाठी साईडलोड नावाचे प्लग-इन विकसित केले आहे. तुम्ही एखाद्या म्युझिक साईटवर असाल तर या प्लगइनमुळे त्या साईटवर उपलब्ध असलेल्या सर्व गाण्यांच्या लिंक्स तुम्हाला दिसतील आणि त्यावर क्लिक केलं की ती गाणी तुमच्या लॉकरमध्ये स्टोअर होतील.
एमपीथ्रीट्यून्ससारख्या अनेक सेवा उपलब्ध आहेत. त्यातील काही सेवांबद्दल आगामी काही पोस्टमध्ये मी माहिती देईन.
Read the full story

,

गिफ्ट युवरसेल्फ अ ब्लॅकबेरी!


भारतातील ब्लॅकबेरी सर्व्हीसवरची टांगती तलवार अजून हटलेली नाहीये. सुरक्षिततेच्या कारणावरून केंद्र सरकारने कॅनडास्थित रिसर्च इन मोशन (रिम) या कंपनीला ब्लॅकबेरीचे मेल साठविणारे एन्टरप्राईज सर्वर्स भारतात बसविण्याचे सांगितले आहे. असे केल्यास रिमची आर्थिक गणिते चुकू शकतात. अर्थात हा वाद अजूनही संपलेला नाही. पण एक गोष्ट मात्र झाली आहे - साधारण सात-आठ वषर्षांपूर्वी मोबाईल असणं हा स्टेटस सिंबॉल होता, दोन-तीन वषर्षांपूर्वी महागडा मोबाईल बाळगणं हा स्टेटस सिंबॉल होता आणि आता ब्लॅकबेरी वापरणं हा स्टेटस सिंबॉल झालाय. ज्यांच्याकडे ब्लॅकबेरी नाही, त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. कारण तुमच्या साध्या फोनला ‘ब्लॅकबेरी’त कसं कन्व्हर्ट करायचं हे सांगतो. पुढे वाचत तर जा...

तुमच्या साध्या फोनवर (साधा म्हणजे, अगदीच साधा नाही हं. ज्या फोनमध्ये अॅक्टीव्ह जीपीआरएस आहे त्याच फोनवर ही सुविधा मिळू शकेल) ब्लॅकबेरीसदृश पुश-मेल सेवा मिळण्याकरिता तीन अॅप्लीकेशन्स आहेत.

१. इमोझेः आऊटलूक, लोटस नोट्स आणि जी-मेल सिंक्रोनाईझ करण्यासाठी इमोझे अत्यंत उपयुक्त आहे. इमोझे मोबाईल क्लाएंट डाऊनलोड करण्यासाठी इमोझे डॉट कॉमवर जा. तेथे गेट इमोझेवर क्लिक करून तुमचा हॅंडसेट निवडा. त्यानंतर मॅन्युअल सेट-अप आणि एसएमएस सेटिंग्ज असे अॉप्शन्स असतील. त्यातील एक सिलेक्ट करा. मॅन्युअस सेट-अप सिलेक्ट केल्यास मोबाईलमधील ई-मेल सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला दिलेल्या सूचना फॉलो कराव्या लागतील. एसएमएसचा अॉप्शन सिलेक्ट केल्यास मेसेजद्वारे मिळालेल्या सेटिंग्ज थेट सेव्ह करा. त्यानंतर ई-मेल सेटिंग्जमध्ये जाऊन तुमचे जी-मेल यूजरनेम आणि पासवर्ड द्या. मोबाईलच्या मेसेज मेनूमध्ये इमोझे नावाचं फोल्डर तयार झालेलं असेल. त्यातील इनबॉक्समध्ये जाऊन गेट अॅंड सेन्ड म्हटलं की तुम्हाला आलेले मेल थेट मोबाईलवर पाहता येतील.


२. कोटर्टाडोः ई-मेल क्लाएंट असलेल्या कोणत्याही मोबाईलवर कोटर्टाडोची पुश-मेल सव्हर्व्हीस वापरता येते. कोटर्टाडो डॉट कॉमवर जाऊन कोटर्टाडो फ्रीवर क्लिक करा. तिथे रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दिलेल्या सूचनांनुसार सेटिंग्ज केल्या की तुमची सर्व्हीस सुरू होईल. कोटर्टाडोची सर्व्हीस कोणत्याही POP (Post Office Protocol) किंवा IMAP (Internet Message Access Protocol) या रिमोट मेलबॉक्स अॅक्सेस प्रोटोकॉलला सपोर्ट करणाऱ्या मेलसाठी लागू होते.


३. एमअॉरेंजः यात पुश-मेलसह अनेक व्हॅल्यू अॅडेड सर्व्हीसेस मिळतात. याद्वारे तुम्ही एमएसएन, जी-टॉक, याहू मेसेंजर किंवा अन्य कोणतेही इन्स्टन्ट मेसेंजर वापरून मोबाईलवरूनच चॅट करू शकता. तसेच तुमच्या मोबाईलवरून डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरील एखादी फाईलही अॅक्सेस करू शकता. मात्र त्यासाठी तुमच्याकडे एमअॉरेज डेस्कटॉप क्लाएंट इन्स्टॉल करावा लागेल.

तेव्हा, यापैकी एखादे अॅप्लीकेशन वापरून पाहा आणि ब्लॅकबेरीचा अनुभव घ्या!
Read the full story