जाहिरातीचा ‘टेक’ फंडा!

June 3, 2008 Leave a Comment

कल्पना करा, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये आहात आणि तुमच्या मोबाईलचे ब्लुटूथ अॉन आहे. तुम्ही ली-कूपरच्या स्टोअरजवळ आहात आणि तुम्हाला ब्लुटूथ वरून एक मेसेज येतो. ‘Come within next 15 minutes to avail 25% discount on Lee-Cooper shoes at Shop # 22, Level 2’. नॉट अ बॅड आयडिया...ब्लुटूथ अॅडव्हर्टायझिंगने आता जोर धरलाय. तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर ही नवी मार्केटिंग कन्सेप्ट ट्राय करायला हरकत नाही.



ब्लुमॅग्नेट सॉफ्टवेअर असे दिसते

तुमच्याकडे ब्लुटूथ एनेबल्ड डेस्कटॉप किंवा लॅपटॉप असेल तर त्यावर ब्लुमॅग्नेट, ब्लुसेन्डर किंवा ब्लुब्लिट्झ इन्स्टॉल करा. त्यात तुमच्या जाहिरातीचा मजकूर लिहा. ही जाहिरात किती वाजता पाठवायची त्याच्या वेळाही फिक्स करता येतात. आता तुमच्या भोवती किती ब्लुटूथ डिव्हायसेस अॉन आहेत, हे तुम्हाला दिसेल. त्यातील ज्यांना जाहिरात पाठवायची आहे त्यांचे डिव्हायसेस सिलेक्ट करा आणि पाठवून द्या.
ब्लुटूथ अॅडव्हर्टायझिंग सॉफ्टवेअर्स साधारण १०० ते १५० डॉलर्सना (अंदाजे चार ते सहा हजार रुपये) मिळतात. पण त्यातून ग्राहक ओढला जाणार असेल तर ही गुंतवणूक फार मोठी नाहीये...


ब्लुटूथ मार्केटिंग कुठे वापरता येऊ शकते?

एअरपोर्ट्
बॅंक्स
बस स्टॉप्स
अॉटो शोरूम्स
लाईव्ह शोज, कन्सर्ट्स
हॉस्पीटल्स
हॉटेल्स, रिसॉर्ट्स
शॉपिंग मॉल्स
मल्टिप्लेक्सेस, नाट्यगृह
पब्ज
सार्वजनिक ठिकाणे (बाजारपेठा, मंडई, बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन इ.)
मैदाने
प्रदर्शने
कॉलेज किंवा अॉफिस कॅम्पस

ब्लुब्लिट्झची वैशिष्ट्ये (प्रेझेंटेशन डाऊनलोडकरण्यासाठी येथे क्लिक करा)

Related Posts :



0 comments »