फॉरवर्डिंग इज नाईस!
The best environment day slogan...
'Save Earth, this is the only planet with girls ! ':-)
असे अनेक एसएमएस तुम्हाला रोज येत असतील. बऱ्याच जणांना फॉरवर्डेड मेल्स आणि फॉरवर्डेड एसएमएस अजिबात आवडत नाहीत (मलासुद्धा). पण माझ्यासारखे लोक मोबाईल ग्राहकांमध्ये आणि ई-मेलधारकांमध्ये मायनॉरिटीत गणले जातात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझा एक मित्र रात्री दोन वाजता शेवटचा एसएमएस फॉरवर्ड करून झोपायचा आणि सकाळी फॉरवर्ड मेसेजच्या बीपने उठायचा. ई-मेल आणि एसएमएस फॉरवर्ड ही अहोरात्र चालणारी एक प्रक्रिया असून ती थांबविणे अशक्य आहे, असा निष्कर्ष यावरून काढण्यास काहीही हरकत नाही. असो. आता तुम्ही म्हणाल, एवढी प्रस्तावना कशासाठी? त्याचे उत्तर सोपे आहे. भारतीय तरुणांची मानसिकता लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या दोन माजी विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या एका साईटबद्दल आज मी माहिती देणार आहे.
वाकाऊ (www.vakow.com) ही ती साईट. तुम्हाला आवडलेले एसएमएस तुम्ही तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करता. वाकाऊने हात धागा पकडून या साईटची निर्मिती केली आहे. आता हाच एसएमएस तुम्ही इंटरनेटवरील हजारो मित्रांनाही फॉरवर्ड करू शकता. वाकाऊवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून वाकाऊवर एसएमएस पाठवू शकता किंवा थेट वाकाऊतील इंटरफेसचा वापर करून तिथेच एसएमएस टाईप करू शकता. तुम्ही पोस्ट केलेले एसएमएस म्हणजे तुमचा एसएमएस ब्लॉग. हे एसएमएस वाचून वाकाऊचे इतर सदस्य त्यांच्या मित्रांना ते मोबाईलवर किंवा ई-मेलवर फॉरवर्ड करू शकतील-अगदी मोफत! वाकाऊतील एखाद्या मित्राला तुम्ही फॉलो करत असाल तर त्याने पोस्ट केलेले एसएमएस तुम्हाला थेट मोबाईलवरही मिळू शकतील. वाकाऊतील एखादा टॅगही (उदा. संता-बंता, गुडमॉर्निंग) तुम्ही फॉलो करू शकता. वाकाऊवरून तुम्ही तुमच्या मित्रांना मोफत पर्सनल एसएमएसही पाठवू शकता. वाकाऊने नुकतेच अॅड केलेले एक फीचर म्हणजे वाकाऊवरील एसएमएस तुम्ही एखाद्या मित्राच्या अॉरकुट अकाऊंटवर स्क्रॅप म्हणूनही पोस्ट करू शकता. वाकाऊचे फेसबुक अॅप्लीकेशनही उपलब्ध आहे. ही सेवा सध्या फक्त भारतापुरती मर्यादित असून, ती लवकरच इतर देशांतही सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रिय, अमित टेकाळे, (www.vakow.com) ची माहिती फ़ारच उपयोगी आहे धन्यवाद
राजेन्द्र सरंबळकर sarambalkar@yahoo.com
Dear Mr. Rajendra,
Thank you for giving such a nice feedback. Keep reading this blog for more...
Amit