, ,

‘राईट’-क्लिकचा ‘रॉंग’ वे!

July 26, 2008 Leave a Comment


काही वेळा आपण एखाद्या साईटमध्ये किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये वापरण्यासाठी महत्प्रयासाने शोधलेली इमेज सेव्ह करायला जातो आणि Right-Click Function Disabled! असा मेसेज येतो. अशा वेळी त्या साईटला आणि साईट अॅडमिनिस्ट्रेटरचा उद्धार करून आपण पुन्हा एकदा शोधप्रक्रिया सुरू करतो. इमेज सापडते, पण याला त्या इमेजची सर नाही, असे म्हणत नाईलाजाने ती इमेज वापरावी लागते. अशा वेळी जावास्क्रिप्टची एक ओळ वापरून ‘रॉंग’ वेने तुम्ही ‘राईट’-क्लिक करू एनेबल करू शकता.

राईट-क्लिक फंक्शन डिसेबल करण्यासाठी साईट अॅडमिनिस्ट्रेटर जावास्क्रिप्टचा वापर करतात. सर्वसामान्य वेब यूजरना राईट-क्लिक करून इमेज सेव्ह करण्याची सवय असते. त्यामुळे राईट-क्लिक डिसेबल्ड असा मेसेज आल्यानंतर इमेज सेव्ह करण्याचे सर्व मार्ग संपले, असे म्हणून ते त्यापासून दूर जातात. बऱ्याच साईट्स सुरक्षिततेसाठी राईट-क्लिक डिसेबल करतात किंवा त्यांनी सदर इमेजेस अधिकृतरित्या विक्रीस ठेवालेल्या असतात. त्यामुळे ज्यांना त्या वापरायच्या आहेत त्यांनी त्या अॉनलाईन विकत घ्याव्या, अशी त्यांची अपेक्षा असते. पण काही कारणांमुळे ते शक्य नसल्यास आपण त्या साईटसाठी राईट-क्लिक एनेबल करू शकतो. तसे करण्याची पद्धत अशीः
१. सर्वप्रथम तुम्हाला जी इमेज सेव्ह करायची आहे, त्या पेजवर जा. इमेजवर राईट-क्लिक केल्यास फंक्शन डिसेबल्ड असा मेसेज येईल.
२. त्याच पेजवरील अॅड्रेसबार मध्ये पुढे दिलेला कोड पेस्ट करून एंटर करा -
javascript:void(document.oncontextmenu=null)

३. आता पुन्हा राईट-क्लिक करून पाहिल्यास ते फंक्शन अॅक्टिव्ह झाल्याचे लक्षात येईल. सेव्ह इमेज वर क्लिक केल्यास हवी ती इमेज तुम्ही हार्डडिस्कवर सेव्ह करू शकाल.

(वि.सू.ः या पद्धतीचा अवलंब करून इमेज सेव्ह केल्यानंतर कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात, याची जाणीव ठेवावी.)

Related Posts :



0 comments »