,

ब्राऊजर इंटिग्रेटेड सर्च

November 3, 2008 Leave a Comment

सर्फिंगसाठी तुम्ही इंटरनेट एक्स्प्लोअरर वापरता की नव्याने लॉंच झालेले गुगल क्रोम? ब्राऊजरमधील साधी-सोपी फीचर्स आणि वापरण्यातील सहजता यावरून आपण नकळत कोणत्या ना कोणत्या ब्राऊजरचे फॅन होतो. अॅड-अॉन्स किंवा एक्स्टेंशन्सच्या सोयीमुळे मला अजूनही फायरफॉक्स आवडते, तर माझा मित्र अॅड-अॉन्सला कंटाळून गुगल क्रोमचा फॅन झाला आहे. ब्राऊजरप्रमाणेज आपण सर्च इंजिन्सचेदेखील फॅन होतो. आता तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही फायरफॉक्सवर गुगल सर्च अधिक वापरता किंवा इंटरनेट एक्स्प्लोअररवर एमएसएन (किंवा विंडोज लाईव्ह) सर्च अधिक वापरता. कल्पना करा की तुम्हाला तुमच्या आवडत्या ब्राऊजरच्या नावानेच सर्च इंजिन मिळाले तर?

जगातील सुमारे ४९ टक्के वेबसर्फर्स इंटरनेट एक्स्प्लोअरर (आयई ६, आयई ७ आणि आयई ८) वापरतात. त्याखालोखाल म्हणजे सुमारे ४३ टक्के लोक फायरफॉक्स वापरतात. नुकतेच लॉंच झालेले गुगल क्रोम वेगाने लोकप्रिय होत असून अल्पावधीतच त्याने सुमारे ३ टक्के हिस्सा काबीज केला आहे. उरलेल्या पाच टक्क्यांत सफारी, अॉपेरा आणि इतर ब्राऊजर्सचा समावेश होतो. हीच बाब सर्च इंजिनच्या बाबतीत आहे. येथील सुमारे ७२ टक्के हिस्सा गुगलकडे अाहे. त्यापाठोपाठ याहू (१८ टक्के), एमएसएन (५ टक्के) आणि इतर सर्च इंजिन्सचा क्रमांक लागतो.





झुगो लिमिटेड या कंपनीने ब्राऊजर बेस्ड सर्चची व्याख्या बदलून टाकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. ब्राऊजरच्या नावाने इंटिग्रेटेड सर्च इंटरफेस तयार करण्यासाठी झुगोने आस्क डॉट कॉमशी करार केला. झुगोने फायरफॉक्ससाठी फायरसर्च आणि इंटरनेट एक्स्प्लोअररसाठी आयईसर्च या दोन सेवा तयार केल्या आहेत. या दोन्ही साईटचा इंटरफेस अत्यंत साधा-सोपा आणि गुगलशी मिळता-जुळता आहे. सर्च हे एकमेव उद्दिष्ट ठेवल्याने या सेवा वापरण्यायोग्य आहेत. सर्च इंजिनच्या स्पर्धेत आस्क डॉट कॉम तळाशी असले तरी त्यांची सेवा उत्तम आहे. त्यामुळे मिळणाऱ्या रिझल्ट्समुळे तुमचे समाधान नक्कीच होईल. तुम्हाला गुगलशिवाय जमतच नसेल तर ही सेवा रूचणार नाही. पण गुगलचा कंटाळा आला असेल तर ही ब्राऊजर इंटिग्रेटेड सर्च सेवा वापरून पाहण्यास हरकत नाही.

आस्क डॉट कॉमबद्दल थोडेसेः आस्क डॉट कॉमची तुम्हाला माहिती नसल्यास एकदा अवश्य भेट देऊन पाहा. गेल्या काही महिन्यांत आस्क डॉट कॉमने त्यांच्या इंटरफेसमध्ये भरपूर बदल केले आहेत. सर्च इंजिनला पर्सनलाईज्ड लूक देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अास्कच्या होमपेजवर तुम्ही तुमचा फोटोही बॅकग्राऊंड इमेज (स्किन) म्हणून सेव्ह करू शकता.
याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Related Posts :



0 comments »