, ,

एक का तीन, एक का तीन...

November 17, 2008 Leave a Comment

गुगलमध्ये सर्च दिल्यास नेहमीप्रमाणे मोस्ट रिलेव्हन्ट रिझल्ट्स पहिल्या पाचांत आपल्याला मिळतात. एकदा का अपेक्षित लिंकवर क्लिक केलं की आपण पुन्हा गुगलच्या रिझल्ट पेजवर फिरकत नाही. सर्च रिझल्ट्सच्या प्रेझेंटेशनवर आपण फारसं लक्ष देत नाही. पण यावर सर्च इंजिन चालवणाऱ्यांचे बारीक लक्ष आहे. कशा पद्धतीने रिझल्ट्स डिस्प्ले केल्यानंतर वाचकाला सवर्वाधिक समाधान मिळेल, यासंदभर्भात या कंपन्या सतत अभ्यास करत असतात. यातूनच व्हिज्युअल सर्च इंजिन्सची संकल्पना पुढे आली. साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी आतापर्यंत काही व्हिज्युअल सर्च इंजिनची अोळख करून दिलेली आहे (अधिक माहितीसाठी Related Stories वाचा). गुगलच्या सर्च िरझल्ट्समध्ये थोडेसे नावीन्य आणणाऱ्या एका फायरफॉक्स एक्स्टेंशनची माहिती मी आज देणार आहे.

गुगलचा डिफॉल्ट सर्च रिझल्ट व्ह्यू सिंगल कॉलम आहे. सिंगल कॉलममध्ये एका पेजवर जास्तीत जास्त १० सर्च रिझल्ट्स दिसतात. अधिक स्क्रीन रिझॉल्यूशन किंवा वाईडस्क्रीन मॉनिटर्स वापरणाऱ्यांना संपूर्ण स्क्रीनचा वापर करावयचा असल्यास गुगल मल्टी-कॉलम व्ह्यूचा फायदा होऊ शकतो. 1920×1200 रिझॉल्यूशन ठेवलेल्या मॉनिटरवर गुगल मल्टी-कॉलम वापरून एका वेळी ३० रिझल्ट्स पाहता येणे शक्य आहे. प्रॉडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी गुगल मल्टी-कॉलमचा नक्कीच फायदा होऊ शकतो.



फायरफॉक्स वापरणाऱ्यांसाठी ग्रीसमंकी स्क्रीप्ट इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. ग्रीसमंकी एनेबल केल्यानंतर गुगल मल्टी-कॉलम युजरस्क्रीप्ट इन्स्टॉल करण्यासाठी येथे क्लिक करा. प्रत्येक इन्स्टॉलेशननंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करणे गरजेचे आहे. आता तुम्ही ALT 1, ALT 2 आणि ALT 3 वापरून गुगल सर्च रिझल्ट पेज एक, दोन किंवा तीन कॉलममध्ये पाहू शकाल.

Related Posts :



0 comments »