,

बुक्स अॉन मोबाईल

January 5, 2009 Leave a Comment

गेल्या वर्षभरापासून शैलेशच्या कामाचा व्याप वाढला होता. बारा-बारा तास अॉफिस, मुंबई-दिल्ली- बेंगळुरू दौरे, बॉसबरोबर मीटिंग्ज या साऱ्यात त्याला त्याचा सवर्वांत आवडता - वाचनाचा छंद जोपासायला वेळच मिळत नव्हता. दौऱ्यावर जाताना सोबत पुस्तकांचं ओझं नेणं नकोसं होते. त्यामुळे प्रवासात किंवा रात्री झोपतानाही वाचन होत नाही. वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला बरेच दिवस वाचायला काही मिळालं नाही की ती सैरभैर होते. अशा व्यक्तींसाठी बुक्स इन माय फोन ही सेवा उपयोगी ठरू शकते.

बुक्स इन माय फोन या सेवेचे उद्दिष्ट नावातूनच स्पष्ट होते. या साईटवर शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही लेखक किंवा पुस्तकाच्या नावाने सर्च करून हवे ते पुस्तक मिळवू शकता. पुस्तक मिळाल्यानंतर ते थेट मोबाईलवर डाऊनलोड करू शकता किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून मोबाईलवर ट्रान्स्फर करू शकता. जावा आकर्काईव्ह, जावा डिकम्पायलर (JAR, JAD) या फॉरमॅटमधील मोबाईल बुकची साईज काही केबींत असते. त्यामुळे तुमच्या मोबाईलची फारशी मेमरीही जात नाही.


वॉटपॅड ही देखील अशीच एक सेवा. m.wattpad.com वरून वॉटपॅडचे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही हवे ते पुस्तक वाचू शकता. मोबाईलवर पुस्तक वाचण्याकरता आणखी काही साईट्स तुम्हाला माहित असतील तर त्या जरूर शेअर करा.

Related Posts :



0 comments »