, ,

प्रोफेशनल ब्लॉगर टेम्प्लेट्सचा मिनी-खजिना!

June 26, 2009 Leave a Comment

नव्याने ब्लॉगिंगमध्ये उतरणाऱ्या व्यक्तीसाठी ब्लॉगर हा एक अप्रतिम प्लॅटफॉर्म आहे. केवळ तीन स्टेपमध्ये ब्लॉग तयार करून एखादी व्यक्ती लिहिण्यास सुरवात करू शकते. त्यानंतरही तो मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. पण एकदा का ब्लॉगरवर हात बसला की मग ‘काड्या’ कराव्याशा वाटतात. लोगो बदलता येतो का ते पाहणे, बॅकग्राऊंड बदलून पाहणे, नव-नवे विजेट्स किंवा गॅजेट्स अॅड करणे अशा विविध लेव्हलच्या ‘काड्या’ आपण करून पाहतो. ‘एचटीएमएल’ची माहिती असेल तर मग ही लेव्हल आणखी पुढे जाते; पण ‘काड्या’ करून पाहिल्या ना तरीसुद्धा ‘एचटीएमएल’ थोडेबहुत कळायला लागते आणि मग ब्लॉगमध्ये हवे तसे बदल करणे शक्य होते.

एकदा का यशस्वीरित्या काही बदल करणं जमलं की आत्मविश्वास वाढतो आणि आपण अजून पुढे जायला लागतो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण टेम्प्लेट किंवा थीम बदलायचा विचार करतो. पण इतरांहून जरासं वेगळं टेम्प्लेट मिळणं, ते आवडणं आणि ते यशस्वीरित्या ब्लॉगला अप्लाय करणं तितकसं सोपं नाही. मुळात ब्लॉगरसाठी फार क्रिएटिव्ह टेम्प्लेट तयार करणं तांत्रिक मर्यादांमुळे शक्य होत नाही. हे खरं असलं तरी इस्तंबूलच्या ओरक (Ooruc चा उच्चार बहुदा असाच असावा) नावाच्या एका तरूणाने उच्च दर्जाचे प्रोफेशनल ब्लॉगर टेम्प्लेट्स तयार केले आहेत.themes.ooruc.com वर ही टेम्प्लेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. ब्लॉगरवर उपलब्ध असणारी रटाळ टेम्प्लेट्स किंवा इतर उपलब्ध असणारी दोन, तीन, चार किंवा पाच कॉलममधील टेम्प्लेट्स पाहून आणि वापरून कंटाळा आला असेल आणि सिरियस ब्लॉगिंग करायचं असेल तर ओरकने तयार केलेली टेम्प्लेट्स वापरून पाहायला हरकत नाही. वर्डप्रेसवरून प्रेरणा घेत मूळ वर्डप्रेससाठी तयार केलेली मॅगझिन स्टाईल टेम्प्लेट्सही कन्व्हर्ट करून ब्लॉगरसाठी वापरली जातात; पण ओरकच्या प्रीमियम टेम्प्लेट्सना खरंच तोड नाहीये. ही टेम्प्लेट्स वापरून तयार केलेला ब्लॉग पाहिल्यास तो ब्लॉगरवर होस्ट केलाय, यावर खरंच विश्वास बसत नाही. मॅगझिन, न्यूजपेपर, म्युझिक, गॅजेट्स, ई-कॉमर्स आदींसाठी वापरता येण्याजोगे टेम्प्लेट्स ओरकने तयार केले आहेत. यातील काही टेम्प्लेट्स मोफत डाऊनलोड करता येतात; तर काही टेम्प्लेट्ससाठी पैसे मोजावे लागतील. त्यांच्या किमती बारा डॉलरपासून पुढे आहेत. पण पन्नास-शंभर डॉलरच्या गुंतवणुकीत एखाद्या छोट्या वर्तमानपत्राची किंवा मासिकाची वेबसाईट सहज तयार होऊ शकत असेल तर काय हरकत आहे? जर तुम्हीसुद्धा सिरियसली असा काही विचार करत असाल आणि तुमच्या दृष्टीने ब्लॉगर हे सर्वांत सोपे माध्यम असेल तर ओरकचे एखादे टेम्प्लेट नक्की वापरा आणि तुमच्या साईटला किंवा ब्लॉगला एक खास प्रोफेशनल लूक द्या.

Related Posts :1 comments »

  • Prakash Ghatpande said:  

    काड्या म्हणल कि आम्हाला हे आठवते.यातील दत्तु हा काड्या करुन रेडिओ दुरुस्त करीत असे.