ग्राहकहितासाठी अॉनलाईन फोरम

May 27, 2008 Leave a Comment

"अॉल अवर कस्टमर केअर एक्झेक्युटिव्हज् आर असिस्टिंग अदर कस्टमर्स. प्लीज होल्ड द लाईन...," सुमारे २० मिनिटं हीच टेप एेकल्यानंतर राजेशचा पेशन्स संपला. इंग्रजीत एक सणसणीत शिवी हासडून आणि कंपनीच्या नावाचा योग्य उद्धार करून त्याने फोन चक्क आपटला. चांगल्या सेवेची खात्री देणार््््््या जाहिराती करून सेवा न देणार््या एका मोबाईल कंपनीचा तो उद्धार करत होता.

राजेशने सुमारे १५ दिवसांपूर्वी बिलिंग प्लान चेंज करण्यासंदर्भात अर्ज केला होता. त्यावर अॅक्शन घेणे दूरच, त्याची साधी दखल सुद्धा घेतली गेली नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो कस्टमर केअरशी संपर्क साधत होता. पण तो नंबर सारखा एंगेज लागत असल्याने त्याचा पार अजूनच चढला होता. तेव्हा त्याला आठवले की परवा कोणीतरी त्याला एक ई-मेल फॉरवर्ड केला होता. कन्झ्युमर कम्प्लेन्ट अशा काहीशा नावाने. त्याने चटकन नेट अॉन केले. त्याने काही वेळ काहीतरी टाईप केले आणि त्याचा पारा एकदम थंड झाला.




कन्झ्युमरकम्प्लेन्ट्स नावाची साईट गेल्या अॉक्टोबरमध्ये सुरू झाली. सहा-सात महिन्यांच्या कालावधीतच या साईटला भरपूर प्रतिसाद मिळाला असून त्यावर शेकडो जणांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या आहेत. या फोरमवर तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवू शकता. मोबाईल फोनपासून क्रेडिट कार्डपर्यंत आणि गॅस कनेक्शनपासून कार बुकिंगपर्यंत. ग्राहकाला पुरेपूर समाधान देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. काही कंपन्या त्यात अतिशय तत्पर असतात. मात्र, काही कंपन्यांसाठी ग्राहक म्हणजे किस झाड की पत्ती असतो. अशा कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचे चारचौघांत वाभाडे काढणेही तितकेच गरजेचे असते.

कन्झ्युमरकम्प्लेन्ट्स डॉट इन याच दिशने टाकलेले एक पाऊल आहे. हा फोरम कोणी सुरू केला, याची स्पष्ट माहिती त्यात दिली नसली तरी त्यांचे अभिनंदन!

Related Posts :



0 comments »