,

‘पासवर्ड फटीग’

May 28, 2008 Leave a Comment

तुम्ही रोज साधारण किती वेबसाईट्सना भेट देता? २, ४, १० की याहून अधिक? त्यातल्या किती साईट्सवर तुमचे पर्सनल अकाऊंट आहे? म्हणजे, तुम्ही दिवसातून समजा १५ साईट्सना भेट देत असाल, तर त्यापैकी याहू, जी-मेल, अॉर्कुट, फेसबुक, फ्लिकर, ब्लॉगर किंवा एखाद्या वर्तमानपत्राच्या साईटवर तुमचे अकाऊंट असेल. तिथे दरवेळी लॉग-इन होण्यासाठी यूजरनेम द्या, पासवर्ड लक्षात ठेवा वगैरे भानगडी कराव्या लागतात. याचा काहीवेळेस खरंच कंटाळा येतो. खरं तर, आपण १०० ठिकाणी स्वतःला रजिस्टर करत असतो, आणि काही ठिकाणी ६ अक्षरी पासवर्ड, काही ठिकाणी ८ अक्षरी, काही ठिकाणी अक्षर आणि आकड्यांचे कॉम्बिनेशन असे विचित्र प्रकार असतात. त्यामुळे बर््याच वेळेस यूजरनेम काय आणि पासवर्ड कोणता, यात कन्फ्युजन होतं. स्वतःचा लॅपटॉप असेल तर आपण ब्राऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह करू शकतो. पण अॉफिसमध्ये शेअर्ड पीसी असेल, तर पासवर्ड सेव्ह करता येत नाही.
असे ‘पासवर्ड फटीग’ टाळण्यासाठी आपण वापर करू शकतो क्लिपर्झ (www.clipperz.com) या अॉनलाईन सेवेचा. क्लिपर्झ ही एक पासवर्ड मॅनेजमेंट सेवा आहे. यात तुम्ही कुठलेही पासवर्ड्स, पिन सुरक्षितरित्या स्टोअर करून ठेवू शकता. क्लिपर्झवर तुम्ही एन्टर केलेला डेटा हा त्या ब्राऊजरमध्येच एनक्रिप्ट होतो. त्यामुळे तुमच्या पासवर्ड्सची सुरक्षितता अबाधित राहते. शिवाय क्लिपर्झवरील डेटा तुम्ही जसाच्या तसा पेनड्राईव्हवर सेव्ह करून घेऊन अॉफलाईन असतानासुद्धा अॅक्सेस करू शकता. क्लिपर्झ वापरण्यासाठी कुठलेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागत नाही. तेव्हा, तुम्हालाही ‘पासवर्ड फटीग’ आला असेल तर क्लिपर्झ वापरूनच पाहा!
(वि.सू.ः बॅंक खात्याचे अथवा इतर अत्यंत महत्त्वपूर्ण पासवर्ड्स यावर स्टोअर करू नयेत.)

Related Posts :0 comments »