,

गो...गेट इट; नव्हे गो...टॅग इट!

May 28, 2008 Leave a Comment

शाळेतले किंवा कॉलेजातले ग्रुप फोटो आता पाहायला गेल्यास ते चेहरे आठवतात, पण त्यातील मित्रांची नावं मात्र काही केल्या आठवत नाहीत. तो कसा होता, त्याच्या सवयी कशा होत्या, जोशी मास्तरांनी एकदा त्याला कसा चोपला होता, त्यानं कशी भन्नाट शक्कल लढवून कॅंटीनचे पैसे बुडवले होते वगैरे सगळ्या गोष्टी आठवतात. पण...श्या...त्याचं नाव तेवढं आठवत नाही. तोंडावर असतं, पण त्याचं नाव आठवत नाही. अशा वेळी काय करू शकतो. घरातल्या कपाटात कोपर््यात पडलेल्या अल्बम विसरून लोकं आता फ्लिकर, पिकासा, स्नॅपफीश अशा साईट्स वापरू लागले आहेत. यावर अपलोड केलेल्या फोटोलाच फोटो-टॅगिंग करता आलं तर?फेसबुकने अशी फोटो टॅगिंगची सुविधा दिली आहे. मात्र 'फ्लिकर' वर अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. पण 'फिकर' नॉट. टॅग ४ यू (www.tag4you.com) नावाच्या साईटवर जाऊन तुम्ही फ्लिकरवर अपलोड केलेल्या फोटोतील प्रत्येक व्यक्तीला टॅग करू शकता. उदाहरणार्थ - तुम्ही एखाद्या पारटीचे फोटो फ्लिकरवर अपलोड केला आहे. त्या फोटोत तुमचे चार मित्र आहेत. तुम्ही जेव्हा टॅग ४ यू वर लॉग-इन व्हाल, त्यावेळी तो तुम्हाला तुमच्या फ्लिकरच्या अकाऊंटवर लॉग-इन व्हायला सांगेल. तेथे लॉग-इन झाल्यावर तुमच्या फ्लिकर अकाऊंटवर जेवढ्या व्यक्तींचे चेहरे असतील ते डिस्प्ले होतील. त्यातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही टॅग करू शकता - म्हणजे त्याचे नाव देऊ शकता आणि त्यावर एखादी कॉमेंटही करू शकता. त्यानंतर फिनिश म्हटलं की हे सगळे टॅग फ्लिकरवर रिफ्लेक्ट होतात. एखाद्या फोटोतील व्यक्तीवर कर्सर नेला की त्याभोवती चौकट तयार होऊन त्याचं नाव दिसतं. सो, गो टॅग इट!

Related Posts :2 comments »

  • रुचिरा said:  

    Amit, tuza blog mast aahe..aasech nawin nawin technology chi mahiti det raha.

  • Amit Tekale said:  

    Thanks Ruchira. Keep Readin...(And thanks a ton for yummy recipes...)