से नो टू बुकिंग चार्ज!
इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयएटीए) गेल्या शनिवारी शेवटचे पेपर एअर तिकीट इश्यू केलं. (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा). अॉनलाईनच्या या युगात पेपर तिकीट बाळगणं सोयीचही नाही आणि ते इश्यू करणं विमान कंपन्यांना परवडणारंही नाही त्यामुळे २४० सभासदांच्या या असोसिएशनने हा निर्णय घेतला. नेहमी विमानप्रवास करणाऱ्यांना जाणवलं असेल की गेल्या एक-दोन वर्षांत विमानाची तिकीटं मिळणं किती सोपं झालंय ते. ट्रॅव्हल एजंटला फोन केला की दुसऱ्या मिनिटाला ई-तिकीट हजर. काही लोक तर ट्रॅव्हल एजंटकडे सुद्धा जात नाहीत. मेकमायट्रिप, क्लियरट्रिप, यात्रा या साईट्सवरून बुकिंग करतात. पण या साईट्सवरून बुकिंग केल्यास काही सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो. तो टाळायचा असेल तर?
तर आपण ज्या एअरलाईनने प्रवास करणार आहोत त्या एअरलाईनच्या अधिकृत साईटवर जाऊन बुकिंग करणे, हा एकमेव पर्याय आहे. मग मेकमायट्रिप, क्लियरट्रिप या साईट्सचा फायदा काय? या साईट्स आपल्याला आपण दिलेल्या रूटवरील सर्व फ्लाईट्सची एकत्रित यादी देतात. त्यातून आपण आपल्याला सोयीस्कर अशा वेळचे आणि परवडेल अशा दराचे फ्लाईट निवडतो आणि तेथूनच त्याचं बुकिंग करतो. मग आपल्याला अशी एखादी सर्व्हिस मिळाली की जी अशी एकत्रित माहितीही देईल आणि नंतर ज्या-त्या एअरलाईन्सच्या किंवा सप्लायरच्या साईटवर आपल्याला रिडायरेक्ट करेल?
आहे...अशीच एक साईट आहे - मोबिसिमो डॉट कॉम. मोबिसिमो ही साईट तुम्ही दिलेल्या क्वेरीसाठी सुमारे १५७ साईट्स सर्च करते. या १५७ साईट्समध्ये जगातील सर्व प्रमुख एअरलाईन्स, ट्रॅव्हल एजन्सीज आणि ट्रॅव्हल साईट्सही अाहेत. त्यामुळे एखाद्या रूटसाठी मेकमायट्रिप किंवा तत्सम साईट्सने काही अॉफर दिल्या असतील तर त्याही तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा तुमच्या पुढील प्रवासासाठीच्या बुकिंगसाठी मोबिसिमो वापरून पाहा.
STEP 1:
मोबिसिमो डॉट कॉमवरील सर्च रिझल्ट असे दिसतात
STEP 2:
फ्लाईट सिलेक्ट केल्यावर मोबिसिमो आपल्याला किंगफिशरच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट करते.
STEP 3:
किंगफिशरवरील किंमत आणि मोबिसिमोवरील किंमत सारखी आहे (रू. ५३७५ आणि १२६.१० यूएस डॉलर)
0 comments »
Post a Comment