,

विकिपेडियाः वाचा आणि एेकासुद्धा!

June 4, 2008 Leave a Comment

आजकाल कुठलीही गोष्ट शोधायची असेल तर लोकं गुगल किंवा विकिपेडिया या दोन साईट्सचाच आधार घेतात. इथे नाही; तर कुठेच नाही, असे म्हणण्याची आता वेळ आली आहे. विकिपेडियावरील आर्टिकल्स आपण वाचतो. पण हीच आर्टिकल्स एेकायची म्हटली तर?

विकिपेडियाच्याच स्पोकन विकिपेडिया या प्रोजेक्टमध्ये दिलेले योगदान म्हणजे पेडियाफोन. जर्मनीतील हॅगन विद्यापीठाच्या कंट्रोल इंजीनिअरिंग ग्रुपतर्फे ही सेवा दिली जाते. अॅंड्रेस बिशॉफ यांचा त्यात मोलाचा वाटा आहे. पेडियाफोन सध्या बिटा फेजमध्ये आहे. यात तुम्ही सर्चसाठीचा कीवर्ड एंटर केला आणि 'Generate MP3/Podcast from Wikipedia article' यावर क्लिक केलं की पेडियाफोनद्वारे विकिपेडियावर त्या कीवर्डसाठी सर्च सुरू होतो आणि आलेला रिझल्ट एमपीथ्रीमध्ये कन्व्हर्ट केला जातो.

तुम्ही ही एमपीथ्री फाईल डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा ती ब्राऊजरमध्येच एेकू शकता. तुम्ही आय-ट्यून्स वापरत असल्यास एक्सएमएल फाईल थेट आय-ट्यून्समध्ये एेकू शकता. पेडियाफोन इंग्लिश, जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांत उपलब्ध आहे.



पेडियाफोनद्वारे आपण विकिपेडियावरील माहिती फोनवरूनसुद्धा घेऊ शकतो. त्यासाठी येथे दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि व्हॉईस प्रॉम्प्ट फॉलो करायच्या. (ही सेवा भारतात उपलब्ध नाही)
मोबाईलवर पेडियाफोन सर्व्हिस मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts :



0 comments »