अॉरकुटवरून व्हा अदृश्य!
रविवारी सगळ्यांचा मूड जरा वेगळाच असतो. रविवारी नेटवर लॉग-ईन होणारे एक तर टाईमपास करण्यासाठी येतात किंवा अगदीच करमत नाही म्हणून येतात. त्यामुळे आज मीही एक टाईमपास ट्रिकच सांगणार आहे. कृपया ही ट्रिक केवळ गंमत म्हणूनच वापरा.
अॉरकुटवर आपले प्रोफाईल तयार करताना काही फील्ड्स हे आवश्यक या कॅटेगरीत मोडणारे असतात. (उदा. नेम, जेंडर वगैरे). ते न भरता आपण प्रोफाईल सेव्ह करू शकत नाही. सर्वच जण प्रोफाईलमध्ये खरं नाव डिस्प्ले करतात असं नाही. पण त्या फील्डमध्ये काहीतरी लिहावेच लागते. त्याशिवाय पर्याय नाही. कल्पना करा, की एक दिवस आपण अॉरकुटवरून अदृश्य झालो तर?
तुम्ही म्हणाल, असं कसं शक्य आहे? पण हे शक्य आहे. पुढे दिसेल्या रिकाम्या चौकटीत कर्सर ठेवा. तो त्यात ब्लिंक होणार नाही. काळजी करू नका.
चौकटीत कर्सर ठेवल्यानंतर कंट्रोल सी (कॉपी) करा. आता तुमच्या अॉरकुट प्रोफाईलवर जाऊन एडिटवर क्लिक करा. तेथे तुमच्या नावासमोरील फील्डवर जा. त्यात जे काही लिहिले असेल ते डिलीट करा आणि कंट्रोल व्ही (पेस्ट) करा. हीच प्रक्रिया तुम्ही लास्ट नेमसाठीही करू शकता. आता प्रोफाईल अपडेट करा. झालात तुम्ही अदृश्य!
पण लक्षात ठेवा...हा प्रयोग केवळ गंमत म्हणून करा.
Thanks Sahil
faarch changli trick ahe amit, really thanks for sharing such information.
- disha